(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सर्वात वाईट वस्तू

    एक मौलवी होते. त्यांनी सगळीकडे आपल्या प्रामाणिकपणाचा प्रचार प्रसार केला. मशीदीत बसून दिवसभर मुलांना शिकवित असत आणि जी फी मिळे त्यात आपला उदर निर्वाह करीत असे. एक दिवस संध्याकाळी ते घरी आले आणि पत्नीला म्हणाले, “आज काय स्वयंपाक केला आहे. फार भूक लागली आहे.” ती म्हणाली, “आपण जेवावयास बसा. मी कोंबडा बनविला आहे.” “कोंबडा कुठून आणला?” मौलवीनी विचारले.

      September 26, 2024


  • नितळ

    त्यांच्या एकुलत्या एक कन्येला, शिल्पाला पहायला पाहुणे येणार होते. त्यांनी सकाळी अकराची वेळ दिली होती.

      September 1, 2021


  • आंतरराष्ट्रीय न्याय दिवस

    १७ जुलै ही रोम या देशाला संविधान लागू होण्याची तारीख आहे. तसेच १ जून २०१० ला कंपाला (युगांडा) मध्ये रोमच्या संविधानाबद्दल चर्चा करण्यासाठी संमेलन आयोजित करण्यात आले. तेथील विधान सभेत अनेक पक्षांद्वारे १७ जुलै ही आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या रूपात साजरा करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला.

      July 17, 2022


  • चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी

    रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव निर्माण होतो. त्याच वेळी त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो.

      January 22, 2015


  • कात्री बोले कंगव्याला..

    पेरुगेट चौकीसमोर एक दळवी बंधूंचं सलून होते. तिथे मी बरीच वर्ष जात होतो. काही वर्ष आमचे हरहुन्नरी कलाकार मित्र विजय तावरेच्या दुकानी जात होतो.

      December 9, 2021


  • प्रवास एका वर्तुळाचा….

    ती गाडीतून खाली उतरली पाठोपाठ दोन मुले आणि एक म्हातारी बाई पण उतरली,ती तिची सासू असणार असा मी अंदाज केला होता , ती सासूच होती. ते सर्वजण जवळ आले तेव्हा ती सून हसली माझ्याकडे बघून, मी पण हसले. पण तिच्या सासूला जेव्हा बघितले तेव्हा लक्षात आले ह्या बाईना कुठेतरी आधी, पूर्वी पाहिले आहे, ती सासूपण हसली ,

    ती पण माझ्याकडे बघत होती.

      April 18, 2020


  • नाट्यछटा – गो कोरोना …..

    सांग सांग भोलानाथ,
    शाळा सुरू होईल काय?
    कोरोनाचं संकट टळून
    शाळा उघडेल काय?

    भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
    आठवड्यातून बाहेर जायला मिळेल का रे एकदा
    भोलानाथ भोलानाथ

    आई, ए आई ऽ ऽ , बाबा ऽऽऽ कुठे आहात सगळे?
    मला जाम कंटाळा आलाय? बाबा कधी जायचं शाळेत, निदान समोरच्या बागेत तरी जाऊदे ना? चार दिवस झाले मी कुठेही गेले नाहीये.

    ए आई काय करीत होतीस, भांडी घासत होतीस? अगं त्या मावशी का नाही येत आहेत आपल्याकडे? हे सगळं काय चाललंय?

    अग हो कोरोना कोरोना कोरोना हेच ऐकतेय नुसतं. म्हटलं ना आपण ‘गो कारोना’ तरी हा कोरोना जात का नाहीये? मला तर जाम कंटाळा आलाय. हो ग धुतले ग हात किती वेळा धुऊ. हो अगदी चोळून धुतले गं त्या जाहिरातीतल्या बंटीसारखा विचार देखील आला मनात,

    ‘‘ए बंटी तुझा साबण स्लो आहे का?’’ किती ते हात धुवायचे?

    ए आई कसा होतो ग हा कोरोना काय म्हणतेस? त्या गणितात शिकवतात तसं?
    हा म्हणजे ए बरोबर बी, बी बरोबर सी, म्हणजेज ए बरोबर सी. म्हणजे , ए ने बी ला हात लावला आणि जर ए ला रोग असेल तर तोच रोग बी लाही होईल बी ने सीला हात लावला तर तोच रोग सीलाही होईल बापरे म्हणजे आख्खं एक्स वाय झेड पर्यंत.... अरे देवा...

    बाबा, तुम्ही बाहेर जाताना मास्क लावून का जाताय? आणि बाकी सगळ्या जगाला सुट्टी आहे, किंवा काय ते वर्क फ्रॉम होम आहे, पण तुम्हाला, डॉक्टर काकांना सुट्टी का नाही? काय म्हणता बँक ही अत्यावश्यक सेवा आहे? लोकांना पैशाची कमी पडायला नको म्हणून बँक चालू ठेवलीय का? अरे देवा, पण मग आता तुम्हीही काळजी घ्या.

    ए आई, पण परवापर्यंत तरी संपेल का गं हे? परवा माझा वाढदिवस आहे, अगदी खूप लांबच्या नाही, पण पलीकडच्या बिल्डींगमध्ये राहणार्‍या माझ्या मैत्रिणींना, मावशीला, आत्याला माझ्या बहीणभावडांना तरी बोलवायचं का ग आपण?
    काय म्हणतेस कुणालाही बोलवायचं नाही, आई, तूच असं करतेयस? नेहमी तर मला म्हणत असतेस, की घरी कोणी आलं की बोलावं, त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्यावीत. त्यांना पाणी विचारावं आणि आता ग आता?

    अरे देवा, म्हणजे आपला वाढदिवस करायचा नाही असंही सांगितलंय का शासनाने? अच्छा अच्छा म्हणजे आपल्यामुळे दुसर्‍याला किंवा दुसर्‍यामुळे आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून शक्यतो बाहेर जायचं नाही, काय म्हणतेस शक्यतो नाही जायचंच नाही.

    शी बाबा.

    शाळेत जायचं नाही, परीक्षा रद्द झाली, क्लास नाही मग करायचं तरी काय? आयडिया आई, नाहीतरी मावशी नाहीत, मी तुला थोडी मदत करते. मी तुला मटार सोलून देऊ का? आणि दुपारी केर पण काढेन.

    काय गं आज्जी कशाला हाका मारतेयस? काय म्हणतेस? आजपासून तू मला रामरक्षा शिकवणारेस, रामरक्षा म्हटल्याने आपल्यावरचं म्हणजे जगावरचं संकट नाहीसं होईल. बरं बरं मी नक्की शिकेन ग रामरक्षा.

    आज्जे, आज्जू ये ग तू इकडे आपण दोघी मिळून पत्ते खेळुयात. हो अगं इतकं लगेच कुचकं नको बोलू. मला सारखा तो फोन बघून कंटाळा आलाय, डोळे पण दुखतायत. दादीटला बघ नुसता फोनमध्ये डोकं खुपसून बसलाय. काय म्हणतेस तो आईला मदत करतोय. वा वा काय करतोय मदत? काय आज तो कुकर लावायला शिकला? पण आई मला गॅसजवळ जाऊ देत नाही, म्हणते तू लहान आहेस? मग मी काय करू? मी आपली भाजी निवडेन, केर काढेन.

    आजी, तू या लोकरीचा स्वैटर विणतेयस मला पण शिकवशील का गं? मी पण तुला आमच्या शाळेतला डान्स शिकवेन. अगं काही नाही मोडत तुझा पाय नाचून? अगदी सोपा आहे. जमेल तुला. आणि आपण सगळे मिळून अंताक्षरी पण खेळू.

    पण माझा वाढदिवस घरातच जाणार, मला केक मिळणार नाही, बाहेर जाऊन काही खायला मिळणार नाही.

    काय म्हणतेस आई, तू यूट्युबवर बघून माझ्यासाठी घरीच केक करणारेस वाव ऽ ऽ किती मज्जा. आपण सगळे मिळून घरात धमाल करू म्हणतेस. बरं बाई, पण माझा हा वाढदिवस वायाच जाणार ना?

    काय म्हणतेस? ‘शिर सलामत तो पगडी पचास म्हणजे काय?’’ अच्छा अच्छा म्हणजे या वाढदिवशी जर आपण सरकारचं ऐकलं, नियम पाळले तर आपलंच नाही तर देशाचंही भलं होईल बरं, आणि आजचा एक वाढदिवस घरात केला तर पुढे अनेक वाढदिवस मी साजरे करू शकेन.

    हो हेही खरंच आणि आई अगं हे सारं संपलं की, आपण जाऊच की बाहेर पण तोपर्यंत मात्र मी अजिबात वाईट वाटून घेणार नाही, मला तुझं म्हणणं अगदी पटलंय. बघ तोपर्यंत मी रोज नवीन नवीन काही तरी शिकत राहीन. व्यायामसुद्धा करीन बरं आम्हाला शाळेत शिकवतात आणि तुम्हाला पण शिकवीन.

    योग करू, शतपावली करू, घरात राहूनच मज्जा करू
    या कोरोनावर मात करू, जगावरील संकटाला दूर करू.
    मी घरातच राहीन...... घरातच राहीन. गो कोरोना गो कोरोना
    भोलानाथ कोरानावर औषध निघेल काय? भोलानाथ भालानाथ.

    -- सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

      April 14, 2020


  • का चिंतामणी जालिया हाती। सदा विजयवृत्ति मनोरथीं। ……. ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी २२

    गुरू अनेक प्रकारचे असतात व ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी उभे असतात. आपण घेतलेल्या श्वासाच्या पहिल्या क्षणी आपल्याला, आपला पहिला गुरू भेटतो- मातृगुरू! आपली आई. आई श्वास घ्यायला शिकवते, बोलायला शब्द देते, जगण्याची मूल्ये देते.

      August 9, 2015


  • चिंटी कान मैं हातीके (सुमंत उवाच – १२३)

    सुमंत जयंत परचुरे. 

    कोणाचे दुःख कोणते असते याला काही सीमा नसते. एखादा काळा माणूस मी काळा का? म्हणून दुःख करीत बसतो तर एखादी गोरी बाई बाहेर गेल्यावर गोरेपण टिकवण्यासाठी ते झाकावे लागते या दुःखात बुडालेली असते.

      January 12, 2022


  • अविमारक

    भास लिखित अविमारक चा नायक काशिराजाची राणी सुदर्शना हिला अग्नीपासून झालेला पुत्र. चण्डभार्गव नावाच्या ऋषींच्या शापामुळे त्याचे पिता सौवीरराज यांना चांडालत्व आले . ते गुप्त वेषात राहात आहेत. सौवीरराज यांच्या मुलाचे नाव तेथे विष्णुसेन आहे.

      July 3, 2026