(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • धर्मात्म्याची ओळख

    संत एकनाथ महाराज हे खऱ्या अर्थाने धर्मात्मा होते. एकदा आषाढीच्या वारीसाठी पैठणहून दिंडी निघाली. त्या दिंडीत एकनाथ महाराज ही होते. वाटेत एका गावी दिडींचा रात्रीचा मुक्काम होता. त्या गावातील एका गावकर्‍याला संत एकनाथ महाराजांचे दर्शन घेण्याची फार इच्छा होती. मात्र दिंडीत एवढे असंख्य लोक होते, की आपल्याला त्यांचे दर्शन कसे मिळणार व आपण त्यांना ओळखणार कसे? हाच प्रश्र्न त्याच्यापुढे पडला. शेवटी त्याने एक युक्ती केली. गावात असेलल्या आंब्याच्या झाडाची दोन-तीन पाने तोडली व तो दिंडीच्या ठिकाणी गेला. तेथे लोकांची प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीत त्याने काही लोकांना ती आंब्याची पाने दाखविली व म्हणाला, '' पाहा, आमच्या गावातील चिंचेच्या झाडाची ही पाने किती मोठी आहेत.' ' त्यावर लोकांनी त्यालाही चिंचेची पाने नसून आंब्याची पाने आहेत असे सांगून त्याला वेड्यात काढले. मात्र तो गावकरी ज्याला त्याला ही चिंचेचीच पाने आहेत असे ठामपणे सांगू लागला. त्यामुळे त्याच्याभोवती प्रचंड गर्दी जमली व लोक त्याच्याशी हुज्जत घालू लागले. संत एकनाथ महाराजांनाही ही गोष्ट कळली व ते स्वतःच तेथे आले व त्या गावकर्‍याशी वाद घालणार्‍या लोकांना म्हणाले, ' 'ईश्वराने वृक्षवीची निर्मिती करताना काही त्यांना नावे दिली नव्हती. आपल्या सोयीसाठी आपण झाडांना तशी नावे दिली आहेत. त्याच्या गावात जर चिंचेला आंबा म्हणत असतील, तर म्हणून द्या. तुम्ही त्याच्याशी निरर्थक वाद घालून तुमचा वेळ निष्कारण वाया घालवू नका. तोच वेळ तुम्ही नामस्मरणात किंवा संतांचे चांगले विचार ऐकण्यात घालवा. '' त्या गावकर्‍याला त्याचक्षणी संत एकनाथ महाराजांची ओळख पटली व हाच खरा धर्मात्मा हे ओळखून त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले.

      March 4, 2017


  • व्हिएतनाम – एक बेधडक राष्ट्र – भाग १

    व्हिएतनाम हे दक्षिण पूर्व आशिया खंडातील एक राष्ट्र. एकेकाळी चीन, कधी फ्रान्स तर कधी अमेरिका यांच्या अधिपत्याखाली असलेले राष्ट्र.. ह्यांच्या खुणा आजही आपल्याला पहायला मिळतात. तर मागच्या दोन दशकापासून जगावर आपला ठसा उमटवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणाऱ्या ह्या देशाला तुम्ही जर स्वतःहून भेट देणार असाल तर काय काय करावे याचे माझ्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन आणि अश्या मी केलेल्या काही भ्रमंतीचे वर्णन येत्या काही भागात मी करणार आहे.

      September 18, 2019


  • प्रभात’चा संधिप्रकाश

    १९६३ सालची गोष्ट आहे.. सी. विश्वनाथ या दिग्दर्शकाने एस. फत्तेलाल यांना सांगितलं की, आपण मुंबईला व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत आपल्या नवीन चित्रपटाचं चित्रीकरण करुयात. त्यासाठी दोघेही मुंबईला पोहोचले.

      September 15, 2021


  • दिगंबर

    कांदेपोहे हा त्याचा वीक पॉईंट आहे. ऐन जेवणावेळी येऊन पक्वान्नांऐवजी हिला पोहे करून मागणारा आणि पोट भरल्यावर “मजा आली यार…” म्हणून तृप्त भावाने निघणारा हा माणूस कुणाच्याही समजण्यापलीकडचा आहे!

      September 1, 2018


  • हेल्पलेस

    अशा वेळी कोणाला कोरोनाची लागण झाली तर काय होईल ह्या भीतीने प्रत्येकजण हादरला आहे. जहाजावर कोणी नवीन माणूस येऊ नये असे सुद्धा प्रत्येकाला वाटत आहे. नवीन येणार असतील तर सगळ्यांनाच एकदम जाऊ द्या असेही काहीजणांना वाटते आहे. परंतु हे शक्य नाही कारण प्रत्येक जण हेल्पलेस आहे.

      March 25, 2020


  • रेशीमगाठी – भाग ४

    पाच-दहा मिनिटांतच एक उंचीपुरी, गौरवर्णी, तरतरीत मुलगी आत आली. वेळेवर पोचतो की नाही यामुळे येणारा एक प्रकारचा अस्वस्थ भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला होता. ती घाईने क्लार्ककडे आली आणि तिने विचारलं, “का हो, कुणी केदार देशपांडे आले आहेत का?”

      March 10, 2022


  • ती’ तिच्या सोबतच !

    मला खूप लहानपणा पासून चष्मा लागलाय ,म्हणजे लावायला लागला . याला माझे क्रिकेटचे वेड कारणीभूत होते . असेन दहा बारावर्षाचा ,फॉरवर्ड शॉर्ट लेग माझी फिल्डिंग पोझिशन , नेहमीचीच . तेव्हा आजच्या सारखी हेल्मेट्स नव्हती .

      April 9, 2018


  • स्मरणशक्तीचे सर्वोत्तम उदाहरण : माझी आजी

    माझी आजी आनंदी रामकृष्ण जोशी निरक्षर होती तथापि, श्रीसत्यवान-सावित्रीचे वटपौर्णिमेचे महत्व सांगणाऱ्या साडेतीनशे ओव्या तिला मुखोद्गत होत्या ! आजीने मौखिक पद्धतीने शिक्षण घेतले होते ! तिच्या अफाट स्मरणशक्तीचं मला नेहेमीच कौतुक वाटत आलंय !

    माझी आजी म्हणजे माहेरची "द्वारका" ही जुन्नरच्या रुख्मिणी पंढरीनाथ हरकरे ह्यांची सुकन्या ! विवाहानंतर तिचे नाव सौ. आनंदी रामकृष्ण जोशी असे झाले, तरी "द्वारकाकाकू, द्वारकामावाशी" ह्याच नावाने सर्वत्र सुपरिचित होती. एकोणीसशे दहा सालचा तिचा जन्म ! त्या काळामध्ये लवकर विवाह व्हायचे. लाक्षणिक शालेय शिक्षण जरी नसले, तरी ती आदर्श गृहपत्नी होती.

    शिवनेरी, लेण्याद्री जिथे आहे ते जुन्नर हे माझे आजोळ ! तेथील वरल्या आळीमधील श्री मुरलीधराचे मंदिरात ज्येष्ठी पौर्णिमेला तीन दिवसांचा हा उत्सव असायचा . माझी आजी तीन दिवस उपवास करायची. त्यावेळी वट सावित्रीच्या ह्या ३५० ओव्या, तीन भागामध्ये अर्थात तीन दिवसात, ती म्हणायची आणि ते ऐकण्यासाठी खूप गर्दी व्हायची. आजीचा आवाज गोड होता, श्लाघ्य होता, आजही तिचा तो मधाळ स्वर कानामध्ये घुमतोय !

    नंतर काही वर्षे, पुण्यातील सदाशिव पेठेतील श्री खुन्यामुरलीधर मंदिरात तिने वटसावित्रीच्या ओव्या म्हणल्या होत्या. दिनांक १०, ११, १२ जून १९६८ ह्या तीन दिवसामध्ये माझ्या आजीने, तीन भागातील ह्या वट सावित्रीच्या ओव्या, पुण्यातील शनिवार पेठेतील गोळे राम मंदिरामध्ये सादर केल्या होत्या. त्याचे वार्तांकन आणि छायाचित्र, पुण्याच्या सकाळच्या सि. पु. थत्ते ह्यांनी केले होते, १३ जून १९६८ रोजी "सकाळ"मध्ये ते प्रसिद्ध झाले होते ! फोटोमध्ये आजीच्या डावीकडे, ओव्या लिहिलेली वही उघडून बसलीय ती माझी आई, उषा पंडित चिंचोरे !

    जुन्नरच्या सराई पेठेमध्ये राहणाऱ्या चंद्रभागा घाटपांडे पारुंडेकर मावशी ह्या तिच्या नातेवाईक, त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून मौखिक पद्धतीने "वटसावित्री"च्या ओव्या शिकल्या होत्या. त्या पारुंडेकर मावशींनी माझ्या आजीची जिद्द हेरून, तिला ह्या ओव्या शिकविल्या. माझी "आनंदीआजी घरातील सगळी कामे झाल्यावर, दररोज दुपारच्यावेळी पारुंडेकर मावशींच्या घरी जायची. त्या माझ्या आनंदी आजीला रोज एकेक ओवी म्हणून दाखवायच्या. ते ऐकून, माझी आजी ती ओवी घोकून घोकून पाठ करायची. विशेष म्हणजे, ओव्या शिकवत असतांना, पारुंडेकर मावशी माझ्या आनंदी आजीच्या पुढ्यात, त्यांचे निवडणं-टिपणं ठेवायच्या. आजी एकीकडे ते काम करता-करता, "परळी-आडणी या विस्तारली ताटं" अश्या ओव्या पाठ करायची. ओवी पाठ झाल्यावर, माझी आजी आपल्या स्वतःच्या घरी यायची की संध्याकाळची कामं - तेलवात, कंदील तयार ठेवणे, अशी कामे करायची. दुसया दिवशी दुपारचेवेळी, आजी मावशींच्या घरी गेल्यावर, आधल्या दिवसाची ओवी आधी म्हणून दाखवायची मग पुढची ओवी शिकायची, अश्या मौखिक पद्धतीने "वट सावित्रीच्या साडे तीनशे ओव्या" तोंडपाठ व्हायला तिला सहा महिने लागले !

    आनंदी आजीची अफाट स्मरणशक्ती शेवटपर्यत तल्लख होती. आज मनात विचार येतो, आजकाल साक्षर मुलांना सर्व सुख-सुविधा उपलभ्द असूनसुद्धा साधी तीन कडव्यांची शाळेच्या पुस्तकातील कविता पाठ नसते.

    "आनंदी"आजी नाव सार्थक करणारी होती, माझे आजोळ जणू "द्वारका" नगरी होती ! माझ्या आजीची गणपतीवर भारी श्रद्धा होती. गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय तिच्या मुखाखाली कधीही घास उतरला नव्हता. "मोरया मोरया" असा अविरत जप करणा-या माझ्या आजीला देवाज्ञा झाली, ती सुद्धा भाद्रपद चतुर्थीला १५ सप्टेंबर १९७२ रोजी आणि तेही अहेवपणी, जणू तिने घेतलेल्या, सत्यवान सावित्रीच्या वश्याची सांगता झाली !

    -- उपेंद्र चिंचोरे
    19 june 16

      June 19, 2016


  • सांजवेळ निवृत्तीची, विरक्तीची (ललित)

    बऱ्याच दिवसांनी आश्रमात जल्लोषाचे वातावरण पसरले होते.आश्रमातल्या वयोवृद्ध कुटुंबात एका हिरमुसलेल्या ,मनाने खंगलेल्या दाम्पत्याचं स्वागत करायचं होतं सगळ्यांना.
    इथे आलेले वयोवृद्ध जेव्हा प्रथम या आश्रमात आले होते ,तेव्हा त्यांचीही अवस्था याहून वेगळी नव्हती .पण आश्रमाच्या स्वागत सोहळ्यानेच त्यांच्यात आमुलाग्र बदल घडवून आणला होता.
    उत्सवमुर्तींसाठी व्यासपिठावर आखिव -रेखिव अशा सुंदर खुर्च्या मांडलेल्या होत्या.सर्वत्र फुग्यांची सजावट करण्यात आलेली होती.
    सगळीकडे फुललेल्या गुलाबाच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या.
    सर्वप्रथम ज्येष्ठ वयोवृद्ध काकासाहेब आणि काकींनी उभयतांचं स्वागत केलं.
    त्यानंतर आश्रम व्यवस्थापकांचं स्वागतपर परंतू सकारात्मक भाषण झालं.अनुभव कथन,मौज मजा मस्ती ह्यावर प्रत्येकानी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकला.
    सजीव चित्ररथातून जगण्याचा मुलमंत्र दाखवण्यात आला.आणि शेवटी मिष्टान भोजनाचा आस्वाद,मुखशुद्धी होताच नविन समाविष्ट झालेल्या दाम्पत्याला पायघड्या घालून त्यांंच्या खोलीत रितसर पोचवण्यात आलं.
    एक एक करून सगळेच ज्येष्ठ आपापल्या खोल्यांमधे परतले.

    संध्याताई,सुधाकरराव आज एकवर्षापुर्वी आयुष्याच्या सांजवेळी बरोबर तिन्हीसांजेला या आश्रमात आले होते.
    निराश मनाला,हताश जगण्याला नवसंजिवनी मिळाली ,ती ह्याच आश्रमात .
    आज मात्र दोघेही या आश्रमाचे सुत्रधार होते. सांजवेळेला प्रभातवेळेत बदलवण्याचं कसब ते शिकवण्यात तरबेज झाले होते.स्वत:चे दु:ख कवटाळण्यापेक्षा दुसऱ्याचे अश्रु पुसावे ह्याचं साधं सरळ सोपं सुत्र ते साऔजवेळी सगळ्यांना शिकवत होते.
    ही "मंतरलेली सांजवेळ" आज सगळ्यांनाच हवी हवीशी होती.

    सौ.माणिक शुरजोशी.
    नाशिक

      January 10, 2020


  • दिवेलागण

    मी एकाच जागी एकाच चक्रात अडकलेली . पण कुठेही असलास तरी सकाळी मेसेज आणि दिवसभरात एक तरी फोन न चुकता करणारा तू . मी नवीन काहीही लिहिले तरी सगळ्यात पहिल्यांदा तुलाच वाचून दाखवणे . आधी whatsapp आणि मग दिवसभरातला voice call . कारण तुला skype download करायचा कंटाळा . ” जमलय ” अशी तुझी दिलखुलास दाद . . .आणि मग तू प्रत्यक्षात म्हणायच्या आधीच माझ्या काना – मनात घुमनार तुझे वाक्य . . . जवळ असतीस तर . . . ” हे वाक्य नाही रे पाठ सोडत . . .

      February 5, 2026