(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक परीस स्पर्श ( भाग – १४ )

    ती जिचं विजयला शाळेत असताना आकर्षण होतं ती म्हणजे निलिमा…विजयच आयुष्य ढवळून काढणारी पहिली मुलगी दिसायला ? विजयच्या आयुष्यात आलेली सर्वात सुंदर स्त्री…विजय आणि तिचीही एक गोड कथा आहे ती ही सांगू कधीतरी या कथेच्या ओघात…

      February 4, 2022


  • ते त्रिकोणी कुटुंब (एक सत्यकथा)

    नियती मात्र या कुटुंबावर पहिला आघात करण्याला सिद्ध झाली होती. २००६ साली ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चंदू आजोबा आश्चर्यकारकपणे वाचले. अगदी नेमकं सांगायचं तर त्या पहिल्या वर्गाच्या डब्यात ते एकटेच वाचले होते. स्फोटामुळे कानाना प्रचंड दडे बसले होते , रक्त येत होतं , आजूबाजूची अंगावर शहारे आणणारी परिस्थिती पाहून मनावर प्रचंड आघात झाला होता.

      January 13, 2022


  • टारगेट ७५० चे

    यानंतर दोन मोठ्या कार्यक्रमांसाठी मी गायलो. माझे आवडते संगीतकार एस.डी. बर्मन आणि सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा एक प्रदीर्घ कार्यक्रम इंद्रधनू या संस्थेने केला आणि माझे गुरू संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या रचनांचा 'श्रीकांतसंध्या' हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकरता साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे आम्ही सादर केला. या कार्यक्रमात माझ्याबरोबर गायिका रंजना जोगळेकर आणि निवेदक भाऊ मराठे होते. या सर्व कार्यक्रमांनी मला लोकप्रियता तर दिलीच. पण माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ७५०व्या कार्यक्रमाच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. माझ्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा होता. ५०० नंतर ७५० वा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करायचा असे ठरवले होते. त्यामुळे या कार्यक्रमाची तयारी आम्ही जोरात सुरू केली. माझ्या सर्व तरुण विद्यार्थ्यांचा उत्साह तर ओसांडून वहात होता. सर, या कार्यक्रमाला एक हिंदी फिल्मस्टार बोलावू या. सर, आपण अवधूत गुप्तेंना बोलावयाचे का? त्यावेळी 'झी सारेगमप' लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्यामुळे आमच्या तरुण मंडळींचा आग्रह होता. माझा मित्र अविनाश जोशी अवधूत गुप्तेशी बोलला आणि अवधूतने लगेच होकार दिला. काही कार्यक्रमांच्या निमित्ताने अभिनेता चंकी पांडे यांच्याशी ओळख झाली होती. माझे मित्र सिन्नरकर यांनी त्याची भेट घडवून आणली. यापूर्वी चंकी ठाण्यात आलाच नव्हता. “तुम्हारा गाना सुनने के लिए पहेली बार मैं थाने आऊंगा," चंकी म्हणाला. मग काय? आमची सर्व विद्यार्थी मंडळी एकदम खूष झाली. यावेळी कार्यक्रमासाठी प्रायोजक मिळायला वेळ लागला नाही. माझ्या पहिल्या जाहीर कार्यक्रमाला प्रयत्न करूनही प्रायोजक मिळाले नव्हते. पण आता वेळ बदलली होती. माझा ७५० वा कार्यक्रम होता. पुढील दोन महिने या कार्यक्रमासाठी एक मोठी टीम काम करत होती. वादक कलाकार, स्टेज डेकोरेशन, जाहिराती कार्यक्रमाच्या रिहल्सल्स या सर्वांमध्ये कार्यक्रमाचा दिवस कधी उजाडला ते कळलेच नाही. या टीममध्ये माझी पत्नी प्रियांका आणि मोठी मुलगी शर्वरीसुद्धा असल्याने आमचे संपूर्ण घर कार्यक्रमात बुडाले होते. ९ फेब्रुवारी २००७ च्या रात्री ठीक ८.३० वाजता माझ्या ७५०व्या जाहीर कार्यक्रमाला सुरवात झाली. कार्यक्रमाची सुरवात माझी मुलगी शर्वरीच्या सरस्वतीस्तवनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे आणि अभिनेत्री समीरा गुजर करणार होते. 'अनिरुद्ध, गडकरी रंगायतन श्रोत्यांनी संपूर्ण भरलेले आहे. जय शारदे वागेश्वरी कठीण गाणे आहे. शर्वरी घाबरणार तर नाही ना?bभाऊ मराठे काळजीच्या स्वरात मला विचारत होते. 'शर्वरी माझी मुलगीच नाही तर माझी विद्यार्थिंनीसुद्धा आहे. तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तिला संधी देणे हे सुद्धा माझे काम आहे.' मी भाऊंना उत्तर दिले. शर्वरीने माझे शब्द सार्थ ठरवले. कार्यक्रमाची सुरुवात तिने उत्तम केली. टाळ्यांच्या कडकडाटात मी स्टेजवर प्रवेश केला. "बाबा, तुम्ही अगदी राजासारखे स्टेजवर आलात." नंतर शर्वरी मला म्हणाली. पण मला त्यावेळी खरोखरच राजा असल्यासारखे वाटत होते. तीस वर्षे सातत्याने गाणे शिकून, रियाज करून मी गाण्याचा आत्मविश्वास मिळवला होता. आत्तापर्यंत गायलेल्या ७४९ कार्यक्रमांनी त्यात सहजता आणि सफाई आणली होती आणि रसिक प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम मी मिळवले होते. माझे गाणे ऐकण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर समोर बसले होते. मग अजून काय हवे? काही गझल आणि गाणी सादर केल्यावर मान्यवरांना स्टेजवर निमंत्रित करण्यात आले. हिंदी चित्रपट अभिनेते चंकी पांडे, संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते, खासदार प्रकाशजी परांजपे, माजी महापौर सतीश प्रधान, आमदार निरंजन डावखरे, चित्रपट दिग्दर्शक प्रमोद जोशी, निवेदक अशोक शेवडे आणि वासंती वर्तक, ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष एम.वाय. गोखले, उपाध्यक्ष उत्तमराव जोशी, बीपीएल मोबाईलचे अध्यक्ष अरुण सोनाळकर, इंद्रधनूचे अध्यक्ष महेश वर्दे आणि कित्येक मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.

    “नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत अनेक मान्यवरांची उपस्थिती ही अनिरुद्धची खरी कमाई आहे." माझ्या ठाणे शहराच्या या गझल गायकाला दिल्लीतही ओळखले जाते याचा मला सार्थ अभिमान आहे. खासदार प्रकाशजी परांजपे म्हणाले.

    “अनिरुद्ध जोशी हा उत्तम गायकच नव्हे तर धाडसी आयोजकदेखील आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे इतके काटेकोर आयोजन पाहून मी थक्क झालो," अवधूत गुप्तेने कौतुक केले. हे कौतुक माझ्या एकट्याचे नसून आमच्या टिमचे होते. त्यात माझे असंख्य विद्यार्थी, पत्नी प्रियांका, मुलगी शर्वरी आणि छोटी केतकी आणि माझी आईदेखील होती. मला एक मोठा फरक जाणवत होता. एकूण कार्यक्रमाचा ताण सोडल्यास मला परिश्रम बिलकूल झाले नव्हते. 'स्वर-मंच'च्या अनेकांनी तो भार उचलला होता. मी लावलेल्या रोपट्याचा आता वृक्ष होत होता. याची काही गोड फळे मला चाखायला मिळत होती.

    -अनिरुद्ध जोशी

      August 6, 2022


  • मला देव दिसला – भाग १

    बाल वयात जेव्हा पासून सभोवतालच्या जगाविषयी समज येवू लागली, त्या ईश्वराला जाणण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली. सर्व अद्भूत जग निर्माण करणारा त्यावर नियंत्रण ठेवणारा, त्याला नियमानुसार चालविणारा कुणी तरी असेल हा विचार पक्का होऊ लागला. बुध्दीमध्ये स्थीर होवू लागला.

      March 12, 2021


  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १८)

    व्यवसायानिमित्त रोज माझी महाराष्ट्रात जिथे काम असेल तिथे भ्रमंती असे. एक दिवस कामानिमित्त मी कोल्हापूरला होतो. तिथे गुरूराज प्रिंटर्स कोल्हापूरचे श्री. सतीश शिवदे यांचेकडे माझे काम सुरू होते. नातेवाईकच होते. संध्याकाळी वेळ होता म्हणून आम्ही दोघेही रंकाळ्यावर चाट (भेळ) खाण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा मला शिवदे म्हणाले ” आप्पा समोरून कोण येत आहे त्यांना ओळखले कां.? मी ओळखत नाही म्हणालो, तेंव्हा शिवदे यांनी त्या व्यक्तीला ” अहो नानासो . म्हणून हाक मारली व म्हणाले अहो आप्पा हे नाना म्हणजे ख्यातनाम विख्यात गीतकार जगदीश खेबुडकर आहेत.

      June 11, 2021


  • तुम अपना रंज ओ गम अपनी परेशानी मुझे दे दो !

    १९६४ च्या “शगुन ” मधील खय्याम ने संगीतबद्ध केलेलं हे गीत त्याच्या पत्नीने (जगजीत कौर ने) गायलेलं ! गीतकार- हिंदीतला आजवरचा ऑल टाइम ग्रेट – साहीर ! (त्याच्या नंतर गुलज़ार , मग जावेद , मग निदा फाजलीं – ही माझी यादी )

      May 9, 2021


  • पुस्तक मिटून ठेव

    पुण्याच्या बुधवारपेठेतील भिडे वाड्यात १८४८ मध्ये जोतिराव फुले यांनी मुलींची शाळा उघडली, स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे ते पहिले भारतीय, त्या काळात पुण्यातला एक एक सनातनी ब्राह्मण म्हणजे ‘आरडीक्स पेक्षा महाभयंकर होता. सनातनी खवळले.

      December 27, 2023


  • लेडी विथ द लॅम्प

    १८२० साली इटलीमध्ये फ्लाॅरेन्स येथे नाइटिंगेलचा जन्म झाला. वयाच्या ३३व्या वर्षी १८५३ मध्ये झालेल्या क्राइमियन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची तिने अहोरात्र शुश्रुषा केली. रात्री हातात दिवा घेऊन जखमी सैनिकांना शांत झोप लागली आहे का? हे ती प्रत्येक खाटेजवळ जाऊन पहात असे. इतकी तिने त्या जखमी सैनिकांची सेवाभावाने काळजी घेतली म्हणून तिला ‘लेडी विथ द लॅम्प’ असे संबोधले जाऊ लागले.

      May 12, 2021


  • कॉमनवेल्थ (4) कृष्णमेघ आणि कॉमनवेल्थसाठी बनलेले दिल्लीचे रस्ते

    – थोड्या पाऊसातच दिल्लीच्या रस्त्यांचे काय हाल होतात – आपण वर्तमान पत्रात वाचतच असाल. कॉमनवेल्थ आणि दिल्लीचे रस्ते ही फक्त एक वात्रटिका आहे ….

      September 3, 2010


  • शेतकऱ्याचे चातुर्य

    एका चोराने देवळातली घंटा चोरली व तो जंगलातल्या बाजूने पळून गेला. जंगलातून जाताना चोराला वाघाने ठार केले. चोराने चोरून नेलेली घंटा जंगलातच पडून राहिली. पुढे ती घंटा एका माकडाला सापडली. माकड आपले दररोज दिवसा रात्री जोरजोराने ती घंटा वाजवी. जंगलाजवळच्या गावात त्या घंटेचा आवाज ऐकू येई. गावातील लोकांना वाटे रात्री, अपरात्री घंटा कोण वाजविते?

      December 17, 2023