(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वृक्षवल्ली

    निसर्गाशी माणसाचं नातं फार पुरातन काळापासून आहे. आपल्या बोलण्यातून कित्येक झाडं, झुडपं, रोपं, फळा-फुलांचे संदर्भ सहजपणे येत असतात.. त्यामुळेच संत तुकाराम महाराजांनी म्हटलेला अभंग माणसांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो.. वृक्षवल्ली आम्हा, फक्त सोयरीच नाही तर ती आमच्यात भिनलेली आहेत..

      July 28, 2021


  • कॅश व्हॅन

    बायको ज्या शाखेत काम करत होती. ती ब्रँच करन्सी चेस्ट अशा स्वरूपातली होती. बायकोची स्टेट बँक नव्हती. त्यामुळे त्यांच्या बँकेच्या करन्सी चेस्ट कमीच. बँकेची सुमारे दोनशे किमी परिघातली  ही एकच करन्सी ब्रँच. परिसरातील प्रत्येक शाखेतील स्टाफने जरुरीप्रमाणे कॅश रॅमिटन्स घेऊन जाणे आणि आणणे यामध्ये वेळ, पैसा खर्च, कर्मचारी लागतात.

      March 7, 2023


  • दिवाळी अंक साकारताना… भाग पहिला

    मराठी वाचनानंदात मग्न असलेल्याला दिवाळी अंक नाहीत नाही, असं होऊच शकत नाही. ही चटक काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९मधे लावली आणि दिवाळी अंकाचे हे लोण इतकं पसरत गेलं आहे की, त्याची व्याप्ती आकाराच्या बाबतीत मोजायची झाली तर ती रामायण-महाभारतालादेखील मागे सारील!

      August 10, 2025


  • “स्पेस, पॉझ आणि आपण “

    दोनेक वर्षांपूर्वी कुठल्याश्या news channel वर काही सेकंदांसाठी एक news flash झाली ती अशी होती …. “ ऐनसणा सुदीच्याकाळात सोनंम हागणार………. आता ही “सोनम” कोण ?? हा विचार करायला लागणार एव्हढ्यात सुधारित बातमी आली …. “ऐन सणासुदीच्या काळात सोनं महागणार” ….आणि मला हायसं वाटलं …….. SPACE चुकीच्या ठिकाणी आल्याचा परिणाम.

      August 24, 2021


  • भेळ अन मसाला दुध

    लहानपणी कोजागरी पौर्णिमा आमच्या सोसायटीच्या गच्चीवर साजरी केली जायची. तिथल्या पाण्याच्या टाकीवर “कोजागरी पौर्णिमा” अस पांढरा, लाल, हिरव्या रंगीत खडूने छान अक्षरात लिहीलेले असायचे. बाजूला सुंदर नक्षी काढलेली असे.

      October 11, 2019


  • बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १८ – सावरकर आणि टिळक

    लोकमान्य टिळक आणि सावरकर हि गुरु शिष्याची एक आदर्श जोडी होती. न. चि केळकर यांनी ८ ऑगस्ट् १९४१ च्या केसरीत लिहिले होते की “ सावरकर यांच  राजकारण टिळकांच्या कित्त्यावर तेलकागद ठेवून काढलेल्या पुस्तीसारखे आहे “ खरे तर राजकारण नव्हे तर अनेक बाबतीत गुरुशिष्या सारखे होते.

      October 19, 2022


  • मी आणि ती – २० (कथा)

    आज तू इथे नाहीस, आहेस कुठे तरी परदेशात. २० वर्षे झाली, सपंर्क नाही. पण तू मात्र चांगलीच आठवतेस.

      May 26, 2021


  • सैनिकाच्या मुलाची दिवाळी

    दिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी येतील, कुणास ठाऊक? सैनिकाचा काय भरोसा? त्याचे सुखरूप येणे हेच महत्वाचे! यंदा दिवाळीला फक्त दोघंच असणार होती घरी, ती आणि राजस. दिवाळीची कांहीच तयारी तिला करतां आली नव्हती. बऱ्याच सहकारी नर्सेस रजेवर होत्या. तिला रजा तर मिळत नव्हतीच पण अधून मधून डबल ड्यूटी करावी लागत होती. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. विशेष खरेदी तर सोडाच पण निदान फराळासाठी लागणारं सामान आणि राजस साठी थोडे कपडे घ्यायला हवे होते ना! ह्यांतल कांही तिला करतां येत नव्हतं. तिला मदत करायलाही कुणी नव्हतं. राजस घरी एकटाच असायचा. शेजारी चांगले होते पण ते सतत कसे पहाणार. कितीही चांगल्या ठीकाणी राजस रहायला तयार नव्हता. तो आता पाळणाघरांत रहायला काय लहान होता काय?

      January 9, 2024


  • शाईपेन,, लेखणी

    ..... हे शाईचे पेन पहिले की मनाला फार आनंद होतो व असे सुंदर सुंदर पेन पाहिले की डोळ्याचे पारणे फिटते. पूर्वी शाळेला होतो तेव्हा टाक दौत बरु अशा वस्तू असायच्या पण पुढे पुढे टाक व दौत जावूनशाईपेन आले. त्यावेळी अनेक कंपन्या पेपर क्विन या नावाचा पेन बाजारात येत होता. तशा अनेक कंपन्या शाईचे पेन विक्रीसाठी काढत होत्या. सध्या तर रंगीबेरंगी बॉल पेन बाजारात पहावयास मिळतात मी लेखक असल्यामुळे शाईपेन वर माझे फार प्रेम आहे. बाजारात शाईचा पेन आला म्हणजे मी खरेदी करणारच इतकं प्रेम. शेवटी काय आहे पेन कोणताही असो लिहिण्याची प्रतिभा मोठी असली पाहिजे त्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही हे मात्र निश्चित. मध्यंतरीच्या काळामध्ये एअर पेन कंपनीचा पेन हुबळी ऑफिस मध्ये एका क्लार्क च्या हातात मला दिसला. माझा जोडीदार रेल्वे कर्मचारी गुंडाप्पा हा हुबळी डिव्हिजन मध्ये शिपाई म्हणून काम करत होता. क्लार्क च्या हाता मधील हिरव्या रंगाचा शाईपेन पाहून माझं मन म्हणू लागले. हा शाईपेन माझ्या मनात भरला आहे तो मला मिळाला पाहिजे म्हणून मी गुंडाप्पा जवळ आग्रह धरला व मी म्हणालो माझं लक्ष त्या शाईच्या पेन वर गेले आहे. तो क्लार्क मला पेन देईल का काहीही करून मला तो पेन फार आवडला आहे आपण त्याला पैसे देऊ. हुबळी हा भाग कर्नाटक मध्ये असल्यामुळे तेथील मूळ भाषा कन्नड आहे गुंडाप्पा ला कन्नड येत होते. माझा हट्ट पाहून तो त्या क्लार्क जवळ गेला आणि कन्नड मध्ये सांगू लागला. हा रेल्वे कर्मचारी आहे त्याने माझ्यासोबत किर्लोस्करवाडीला काम केले आहे. शिवाय तो मराठी रायटर आहे त्याला तुमचा पॅन फार आवडला आहे तो क्लार्क मनाला ठीक आहे त्याने लगेच पैसे दिल्या बरोबर मला हिरव्या रंगाचा पिल दिला. माझ्या मना ला फार आनंद झाला आणि एका क्षणात तो पेन मी आनंदाने खिशाला लावला. इतकं प्रेम माझेपेनवरतीआहे परवा तर मी कराडला सहज गेलो असता प्रथम पेन दुकान कोठे आहे याची चौकशी करतो कराड सिटी मध्ये शालीनी बुक दुकान मी शोधून काढले. पाठीमागे एकदा याच दुकानातून शाईचा एअरमैल पेन खरेदी केला होता. तोपेन भरपूर जाड व त्या पेनला आठ नंबरची मोठी निफ दिसायला पेन बहारदार असा सध्या माझ्याजवळ शाईपेन भरपूर आहेत. मी माणसापेक्षा पेन वर पुस्तकावर अतिशय प्रेम करतो हा माझा स्वभाव आहे. बाजारामध्ये एखाद्या नवीन लेखकाचे पुस्तक आले म्हणजे खरेदी करणारच इतकं प्रेम. मला काही लेखक लोक म्हणतात तुमची शाळा कमी इतके साहित्य कोणत्या पेन ने लिहिले मी त्यांना म्हणतो कोणताही पेन असो लेखका जवळ प्रतिभा असावी लागते. तर काहीजण म्हणतात रेल्वेची बारा तासाची ड्युटी करून तुम्ही साहित्यनिर्मिती कशी करता. या सार्‍या प्रश्नांची उत्तरे मला द्यावी लागतात एवढे मात्र निश्चित. पेन मधून जिभळी च्या साह्याने काळी किंवा निळी साई उतरते त्याप्रमाणे डोक्यातील विचार पेनच्या साह्याने ऑटोमॅटिक उतरतात हा माझा अनुभव आहे. मी फक्त एकदाच लिहितो त्या साहित्यामध्ये खाडाखोड अजिबात नसते. इतका विश्वास माझा शब्दावर आहे म्हणूनच काही पुस्तकाचे लेखन मी करू शकलो. आमच्या घरामध्ये पूर्वी कोणाचाच वारसा लेखक म्हणून नाही तो माझ्याकडे कसा आला हे सुद्धा मला माहीत नाही. सातत्याने लिहित गेलो अजूनही लिहितोय हा माझा एक वेगळा आगळा छंद आहे. कधी पुरस्कारासाठी कुठेही अर्ज केला नाही पुरस्कार संस्थासुद्धा मला माहीत नाहीत. माझ्या बाबतीत वर्तमानपत्रातून व माझ्या साहित्यातून महाराष्ट्राला समजले यातच मी माझा आनंद व्यक्त करतो. शब्द भांडवल समाजाचे आहे मी यात कुणीही नाही समाजाकडून शब्द भांडवल घेतले व साहित्याच्या रुपाने मी त्यांना परत केले आहे. लेखक होऊन होत नाही प्रतिभा व वास्तव याचा मेळ झाल्याशिवाय साहित्य निर्मिती होत नाही. हल्ली कथा कादंबरी कशी लिहायची याची कार्यशाळा निघत आहे परंतु पुढे घडलेली कथा किंवा कादंबरी त्यावेळचा परिसर कथेतील किंवा कादंबरीमध्ये येऊन गेलेली पात्रे. ही पात्रे कादंबरी किंवा कथेशी निगडीत असतात त्याच्यासाठी कार्यशाळेची काय गरज परंतु हल्ली तर कार्यशाळा निर्माण होत आहेत याचा आनंद मानू बस इतकच...।

    -–दत्तात्रय पांडुरंग मानुगडे,

    ग्रामीण कथा लेखक...।

      September 19, 2022


  • “अपरिचित जगाचे यथार्थ चित्रण”

    समुद्राचं आकर्षण कोणाला नसतं? समुद्र आणि त्याचं अथांगपण हे मानवी आयुष्याला वेढून टाकणार आहे. आपण सामान्य माणसं आपलं सरळसोट आयुष्य जगत असतो, त्यावेळी समुद्रावर, तेथील जहाजांवर असणारे दर्यावर्दी, त्यांचं पाण्यावर तरंगणारं जीवन कसं असेल याचंही एक सुप्त आकर्षण आपल्या मनात असतं. समुद्रावरील जहाजे महिनोंमहिने त्या अथांग प्रवाहावरून दूरदेशी जात असतात. त्या आयुष्यात आव्हाने आहेत, साहस आहे, रोमांचकारी अनुभव आहेत. जमिनीपासून दूर जाऊन खूप मोठा काळ काढणं हा विचारच किती रोमांचक आहे. अशा सागरी जीवनाचे चित्र रेखाटणारी दोन पुस्तके अशाच प्रकारचे अनुभव व माहितीचा विलक्षण खजिना आपल्यासमोर ठेवतात.

      November 13, 2022