(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १२ – विज्ञाननिष्ठ सावरकर

    सावरकर विज्ञाननिष्ठेचे कट्टर पुरस्कर्ते होते. कोणतीही गोष्ट विद्यानाच्या कसोटीवर पारखल्याशिवाय ती आचरणात आणायची नाही ही त्यांचे सांगणे होते. राष्ट्राची प्रगती व्हावी व ती विज्ञाननिष्ठेनेच होईल अशी त्यांची धारणा होती.

      October 8, 2022


  • मेरिट

    पण गीता ला मात्र अश्या प्रसंगांची अगदी लहानपणा पासूनच सवय होती , नीता आणि गीता या सुलभा ताई आणि श्रीधर राव यांच्या संसार वेलीवर दोन वर्षांच्या अंतराने उमललेल्या कळ्या..पण आत्ता पर्यंतच्या आयुष्यात नियतीचे फासे मात्र दोघींसाठी काही एकसारखे पडले नव्हते , नीता मोठी म्हणून लाडाची या न्यायाने प्रत्येक गोष्ट तिला न मागता विनासायास … मिळत गेली , नवीन सायकल असो वा कपडे किंवा वह्या पुस्तकं नीताला सगळं नवीन मिळायच , आणि ” चांगलेच तर आहेत की , कुठं खराब झालेत ? ” अश्या पालुपदांनी मात्र नीताचे वापरून झालेले कपडे व पुस्तकं गीताच्या वाट्याला यायची , आणि ती ही सगळं हसतमुखाने , विना तक्रार स्वीकारायची .

      December 5, 2024


  • अमेरिकेतील एक – – Dating Center

    अमेरिकेतील एक - - Dating Center

    (डेटींग --- मनाची उकल संकल्पना )

    अमेरीकेत मुलाकडे सहा महीन्याचा मुक्काम होता. रोज सकाळी मुलगा ऑफिसला जाताना मला जवळच्या वाचनालयांत सोडून देत असे. माझी सून मला तीन तासाने घेण्यासाठी येई. दररोजचा हा कार्याक्रम शिस्तबध्द चालू होता. एक दिवस कादंबरी वाचून संपली. वाचण्याचा कंटाळा आला. आणखी एक तास तेथेच थांबणे गरजेचे होते. थोडेसे पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो. समोर बाग होती. तेथे फेर फटका मारला.

    बागेच्या दुसऱ्या टोकाजवळ एक मॉल प्रमाणे वास्तू होती. बाहेरचा बोर्ड वाचला. Glee Dating Centre Club. मला त्या वास्तूचा व कार्यप्रणालीचा लगेच बोध झाला नाही. बराच वेळ दुरुन बघत राहीलो. क्वचित वेळी कांही स्त्री-पुरुषांची ये जा दिसून आली. आपण परकिय. त्या परिस्थितीबद्दल अज्ञानी. गम्मत म्हणून कशाचा आहे हा क्लब याची चौकशी करावी, माहिती घ्यावी हा विचार डोकावला. मनाशीच हासलो. वयस्कर असल्यामुळे जेष्ठत्वाचा फायदा घेत हिम्मत केली.

    तेथे गेलो. एका भव्य टेबलाजवळ दोन कपाटे होती. तीन खुर्च्या व एक कंप्युटर, फोन इत्यादी गोष्टी दिसल्या. समोर भव्य हॉल, फर्नीचर, मासीके व वर्तमानपत्रे पडलेली दिसली. एक वयस्कर रिशेप्शनिस्ट बसली होती. कंप्युटरवरुन ती कांही रेकॉर्ड बघून नोंद वहीत नोंदी घेत होती. मी जवळ जाताच तीने माझे स्वागत केले. " May I help you Sir ? " तीने प्रश्न करीत मला मदत करण्याचे व्यक्त केले. मी नुसते स्मित केले. तीला काय विचारावे हे मलाच माहीत नव्हते. " What is this club ? " मी विचारले. " It’s a Dating Centre Sir " ती म्हणाली. मला डेटींग विषयी मुळीच माहिती नव्हती, फक्त इंग्रजी सिनेमातून थोडेसे कळले होते. पण माझे अज्ञान तिच्यासमोर व्यक्त होणे, हे पण खेदजनक वाटले. " Ya ! Ya! Is it that " म्हणत मी फक्त मान हालवली. असे का ? परंतु मी बघीतले की मी त्या वातावरणांत अपरिचीत होतो. परकिय होतो. तीने सहकार्य केले. मी जेथून आलो, त्या भागात, डेटींग ह्या संकल्पनेविषयी कमीच माहीती असते हे तीने जाणले.

    तीच्याकडून जी माहीती मिळाली, त्याची खूप गम्मत वाटली. माझ्यासाठी तो एक चिंतनाचा विषय वाटला. सर्वांत महत्वाचे म्हणजे ती संकल्पना तेथील सामाजीक, कौटूंबीक, वातावरणात स्थिर झालेली होती. मान्यता पावली होती, रुळली होती. आज तरी तसल्या गोष्टी भारतीय संस्कृतीमध्ये आणणे केवळ कठीण नव्हे, तर अशक्य आहे. जसे ३ हा आकडा व ६ हा आकडा आपआपले वैशिष्टे बाळगून आहेत. परंतु दोघांचे अस्तित्व एकमेकाच्या एकदम विरुद्ध दिसते. ह्याची जाणीव ठेवणे फार महत्वाचे. दोन्हीही संस्कृतीमधली पाळमुळ, मुळतत्व, वैचारीक बैठक, यांचा आधारच भिन्न आहे.

    त्या रिसेप्शनिस्टकडून कळले की तेथे अनेक स्वतंत्र खोल्या व खाण्यापिण्याच्या (विशेष करुन पिण्याच्या ) सोई होत्या. लोक फोन करुन खोल्या ठरलेल्या वेळेसाठी आरक्षित करीत. मित्रांनी, नातेवाईकांनी, अपरिचीतांनी, कुणीही, तेथे यावे ही संकल्पना. डेटींग ह्या नावाविषयी इंग्रजी सिनेमातून थोडेसे कळले होते.

    तेथील कर्मचाऱ्याकडून कांही माहिती मिळविण्याचा मी प्रयत्न केला. थोडेफार त्यानी सांगीतलेले " Dating " बद्दलचे वर्णन आणि मला जे समजले ते असे होते. कदाचित् ती त्या संस्थेच्या कार्यप्रणाली व हालचाली संबंधी असेल.

    Dating ची त्यांची प्रमुख संकल्पना होती

    " जोडीदार आणि संवाद ".

    निसर्गनिर्मीत जीवनचक्रांत केव्हांच बदल झालेला नाही. अथवा होणार नाही. मात्र जगण्याच्या संकल्पना, मार्ग, पद्धती, बदलतात. ती काळाची गरज असते. शिव पार्वती यांच्या विवाह पद्धतीपासून आजतागायत जोडीदार निवड व विवाह चालत आलेले आहेत. स्वयंवरा पासून आजपर्यंत जोडीदार पारख व निवड हे विविध पद्धतीने होत आलेले आहेत. धर्म- संस्कृती आणि समाज ह्यांचा ह्या पद्धतीवर प्रभाव पडत गेलेला आहे.

    जोडीदाराची पारख, निवड आणि एकत्र सहजीवन घालवणे ह्या गोष्टी महत्वाच्या. पूर्वीच्या काळी सामाजीक संकल्पनेनुसार जोडीदार निवड ही आई-वडील, पालक, वा मित्रमंडळी यांच्या मार्फत होत असे. त्याकाळी घराणे व आर्थिक चौकट हे प्राधान्याचे पैलू होते. आज चित्र पूर्ण बदललेले दिसते. प्रत्येकजण आपला जोडीदार स्वतःच निवडतो व सहजीवन व्यतीत करतो. शिक्षण, बौद्धीक उंची, कर्तृत्व, योग्यता, व वैचारीक झेप ह्या बाबी महत्वाच्या होऊ लागल्या. पुर्वीचे कस आज दुय्यम झाले आहेत.

    ह्याच वेळी एक अलिखीत परंतु अत्यंत महत्वाचा दृष्टीकोण दिसून येत आहे. जो आपला जोडीदार असेल त्याची विचारसरणी, स्वभाव ठेवण , आवडी निवडी, आपल्याशी मिळती जुळती असतील कां ? हे अत्यंत बारकाईने बघीतले जाते. समजुन घेतले जाते.

    कसे साध्य व्हावे हे महत्वाचे परिक्षण ?. कारण हे स्वतःला दिसले पाहीजे, कळले पाहीजे, मान्य झाले पाहीजे. ह्यात कुणाचा दबाव, रद्-बदली नसावी. परिक्षण केवळ मानसिक समजावर न राहता, आत्मिक स्थरावर बिंबले पाहीजे.

    जोडीदार - - म्हणजे नविन मित्र निर्माण करणे. ह्यात पुन्हा आगदी सख्यातले, जवळचे, ओळखीचे आशा चौकटी असत. सख्यातल्या कुणाची तरी निवड जन्मसाथीदार म्हणून असते. अर्थात त्याच्याशी विवाहाचे बंधन अडकवणे हे होत असे. परंतु हे सहज झाले व ठरले ही संकल्पना नव्हती. डेटिंग सेंटर मध्ये सभासद म्हणून नोंदणी नोंद केली जाई. एखाद्याची पारख जर मनाला पटली, भावली, आणि जोडीदाराचे स्वभाव गुणधर्म आपल्या स्वभावाशी जुळतील याची खात्री वाटली तर ती व्यक्ती अशाना आपला जन्मसाथीदार म्हणून निवडत असे. इच्छुक व्यक्ती तेथे सभासद होताना आपली संपुर्ण माहिती ( Bio-data in detail ) देत असत. त्याच प्रमाणे अपेक्षीत जोडीदार कसा असावा हे ही दिले जायी.

    आपसातील भेटींचा गाभा हाच मुळी जोडीदार याची निवड व पारख ह्या ध्येयावर आधारलेला असतो. त्यात विश्वास आणि आपुलकी ह्याची निर्मिती होणे अत्यंत गरजेची अपेक्षा ठरते. कुणाचा कोणताही भावनीक अतीरेक त्या योजलेल्या भेटीला तडा देऊ शकतो. शिवाय समोरच्यामधील मानसिक, बौद्धीक, भावनीक आणि स्वभाव जाणून घेण्यासाठी एक नव्हे अनेक भेटी ह्या सहमतीने होतात. त्यामुळे परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठी वागणूकीतील चांगुलपणाची काळजी घ्यावी लागते. अततायीपणा करुन चालत नाही.

    परंतु त्या संस्कृतीमध्ये, संस्कारामध्ये, अधुनिकता, मोकळेपणा, हाच पाया ठरलेला आहे. तेथे भाव विचार व्यक्त होत असताना, शारीरिक हालचालीकडे सहजगत्या दुर्लक्ष केले जाते. कांहीजण तर सहविचाराने शारीरिक आवयवांची तपासणी वा चाचणी देखील करुन घेतात. अनेक वेळा

    शरीरातील जन्म दोष, विकृती, Congenital Deformity वेळीच न कळल्यामुळे त्याचा भावी आयुष्यावर विपरीत परीणाम होऊ शकतो. योग्य तपासण्यामुळे हे टळू शकते.

    " थोडासा संकोच आणि जीवनभर खंत सोसणे " हे त्यांच्या संस्कृतीला अमान्य असते.

    जोडीदाराची जीवनसाथी म्हणून निवड हे Dating Centre मार्फत पुर्ण केले जाते.

    संवाद - -

    तसेच चांगले मित्र मिळवणे ही संकल्पना देखील तेथेच तयार होते. खरा मित्र, प्रिय मित्र ही बाब वेगळीच पडते. आगदी जीवनसाथी प्रमाणेच हा मित्रपण संपर्कांत हवा. आपल्या सुख दुःखातील प्रत्येक घटनेमध्ये सहभागी हवा. वैचारीक भावनीक वादळामध्ये खऱ्याअर्थाने सांत्वन करणारा, वा आनंदातही आपल्याला साथ देणारा असावा. त्या मित्राची जवळीक ही केवळ मानसिक स्थरावरची हवी. शारीरिक संपर्क त्यात येऊ नये. जीवनसाथीदाराच्या शारीरिक सुखाच्या अपेक्षा, त्या मित्राच्या वागण्यात नसाव्यात. ही काळजी, मित्र भेटीत Dating मध्ये घेतली जाते.

    स्त्रीपुरुषांचा एकांतातील संपर्क, मोकळेपणा, भाव व्यक्त होण्याच्या प्रक्रियेत, अनेकदा वेगळे परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच वातावरणांत शारीरिक संबंध होण्याची दाट शक्यता असते. परंतु हे त्यांच्या मानसिक मान्यतेवर अवलंबून राहते. ह्यांत बळजरी होऊ शकत नाही. संस्था याची काळजी घेते. सतर्क नजर ठेऊन असते.

    त्याच बरोबर पाश्चिमात्यांची स्वैर विचारसरणी वा वागणूक असते. त्यांची तयारी, बैठक इतकी रुजलेली असते की हे त्याना कांहीच वाटत नसते. जीवनाचा त्यानी हा एक भाग स्विकारलेला आहे. त्यामुळे कुणाबरोबर भेट झाली, Dating झाले, हे सारे ते अत्यंत सहजतेने घेतात.

    जोडीने, स्त्री अथवा पुरुष, मित्रांनी. नुकतीच ओळख झालेली वा एकदंम अपरिचीत व्यक्तीं तेथे येतात. कांही काळ घालवावा, आपल्या मनातील विचार, भावना, दुसऱ्यासमोर मोकळेपणाने व्यक्त करावे. आपल्या मनातील वैचारीक तुफान अथवा आनंदी लाटा ह्या व्यक्त करुन त्या भावनाना मार्ग द्यावा. मन हलके करावे. हा प्रमुख भाग होता.

    वैचारीक स्थरावर मन मोकळे करणे, ही संकल्पना आपल्याकडेही पुर्वापार चालत आलेली आहे. मानसिक स्थरावर वैचारीक देवाण घेवाण करीत आलेलो आहे. आज देखील कुणीही व्यक्ती जेंव्हा दुसऱ्या व्यक्तीला भेटतो, त्याच्या मधला जर संवाद जाणला तर ते विचार सांगणे व त्या योगे मन हलके करणे, हाच प्रकार असतो. --- हे अस झाल. --तो तसा म्हणाला.—तो तसा वागला.—त्यानी असे केले.—ही घटना अशी घडली.—त्याला हे जबाबदार.—त्याच वागण चुकल.—चांगल वाटल.—इत्यादी. संसारीक घटनांचाच उहापोह करतो. आपल्या समजण्यानुसार आपली मते व्यक्त करतो. हेच सर्व साधारण घडते. घटनेतील राग लोभ प्रेम इत्यादी भावनाना शाब्दिक आकार देत त्या व्यक्त करतो.

    जर त्या कुण्या विचारांचा वा भावनेचा आपल्या मनावर आघात झाला असेल तर आपण ते सारे समोरच्या व्यक्तीकडे व्यक्त करतो. आशी समज की त्याने मन हालके होते. मनावरचा ताण कमी होतो. तणाव कमी झाला की मनामुळे जे मानसिक विकार शरीरावर होण्याची शक्यता असते, त्या पासून सुटका होते.

    एका शेतकऱ्याची छोटीशी गोष्ट ऐकली होती. शेतात काम करताना एकदा दुर अंतरावर त्याने एक चमत्कारीक घटना बघीतली. तो चकीत झाला. कांहीतरी अघटीत झाल्याचे त्याच्या लक्षांत आले. तो ती गोष्ट सांगण्यासाठी पळतच शेजारच्या शेतात गेला. परंतु क्षणातच त्याच्या मनांत विचार चमकला की हे मी दुसऱ्यास कसे वा कां सागू . एक भिती, एक शंका, आणि अनिश्चीतता ह्या भावनेनी तो पुरता गोधळून गेला. कांही न बोलता तो परतला. त्या बघीतलेल्या घटनाचे तुफान त्याच्या मनात सतत उठू लागले. तो बेचैन झाला. परंतु वाच्यता करण्यात हातबल राहीला. विचारांची वादळे शांत होईनात. मन तगमगत राहीले. तो आजारी पडला. गांव वैद्यानी तपासले. हा मानसिक आजार आहे. त्यानी आपले मन सतत तणावात ठेवले आहे. ते मोकळे जेंव्हा होईल, त्याला बरे वाटेल.

    त्याचे विचार कसे व्यक्त होणार. कारण कोणात्यातरी अनामिक भितीत, शंकेत, ते वावरत होते. त्याचे हे द्विधा झालेले मन त्याच्या एका मित्राने जाणले. त्यानी उपाय सुचविला.

    शेतकरी नदीकाठच्या एका निर्मनुष्य जागी गेला. तेथे एक मोठे रोपटे होते. वृक्ष मित्र असतो ना.

    त्याला जवळ केले. त्यानी जे बघीतले होते ते सारे त्याने त्या रोपट्याला सांगीतले.

    बस चमत्कार झाला. शेतकऱ्याचे मन हालके झाले. तणावमुक्त झाले. तो आनंदून गेला. त्याच्या मनात घोंगावणारे विचारांचे तुफान निघून गेले. तो चांगला झाला.

    आपल्या खेडवळ शब्दात सांगायच तर गप्पा मारणे, सटाके मारणे, पुड्या सोडणे, टर्रे उडवणे, इत्यादी. येथे शब्दांत विनोदबुद्धी, गमतीने वर्णन केले असेल. म्हणतात- - एक हात लाकूड तर नऊ हात धिलपी - - ही रचना असेल. तरी त्यातील थोडे का होइना, सत्य बाहेर येणे महत्वाचे ठरते. मग तो व्यक्त मार्ग कसा का असेना. मानसिक तणाव तुफान निर्माण करतो. व्याधीना कारण बनतो. ते मन हलके होत जाणे, तुमचे विचार कोंडून न राहता, प्रवाहीत होणे हीच मन मोकळे करण्याची संकल्पना.

    मला बालपणीचा एक प्रसंग आठवतो. मी मामाबरोबर रेल्वेने जात होतो. समोरच्या बाकावर एक कुटूंब बसले होते. मामा बोलके. त्यानी त्या कुटूंबाचा परिचय विचारला. कोठे जाणार ? काय करता ? हे झाले. हवा, पाणी शेती पिके ह्या गोष्टी झाल्या. नंतर मामा गंभीर झाले. त्यांच्या लहान भावाचे नुकतेच निधन झाले होते. मामानी त्या भावाबद्दल, त्याच्या वागण्याबद्दल, कामाबद्दल, बरेच कांही त्या अपरिचीत कुटूंबाला सांगीतले. काय हेतू होता मामांचा हे सारे सांगुन ? कोणताही नाही. फक्त आपल मन हालक करण्याचा. कोणत्या तरी स्थरावर लपून बसलेला मानसिक तणाव कमी करण्याचा. मग ह्यात वर्णन करताना मिळालेला आनंद वा आठवणी, यानापण उजाळा दिला गेला.

    कदाचित् हे एकतर्फी असेल. कारण त्या समोरच्या कुटुंबाला त्याचे कांही देणे घेणे नव्हते. परंतु ते ऐकणाराची भूमिका व्यवस्थीत पार पाडीत होते. मामाच्या बोलण्याकडे लक्ष देत होते. सहकार्य करीत होते. हाच तर त्यांच्या संवादाचा आत्मा होता.

    बोलणे, विचार भावना व्यक्त करणे हे जेवढे गरजेचे, तेवढेच त्यांचा स्विकार कुणी तरी सतर्कतेने करावा, ही भावना अत्यंत महत्वाची. भाव- विचार व्यक्त होण्यास बोलणारा तसाच ऐकणारा असावा लागतो. पुर्वीच्या काळी प्रवासांत, बागेमध्ये, शेतात, समारंभात, कोठेही माणसे समोरच्या माणसाचा प्रथम थोडा परिचय करुन घेत. मग वैचारीक देवाण घेवाण होई. मन हालके होत असे. समाज वा कुटूंब जसजसे कार्यबाहूल्यांत व्यस्त होऊ लागले, मग्न होऊ लागले. ही विचार व्यक्त संकल्पना लोप पावू लागली. परिणामी मानसिक तणावामुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधी वाढू लागल्या हे दुर्दैव.

    सामान्यपणे माणसे गप्पाटप्पा, घटनांच्या विषयांची माहितीची देवाण घेवाण करतात. ह्यापेक्षा जास्त खोलवरच्या स्थरावर आपसातील संवाद ही फार मोठी मानसिक संकल्पना आहे. चंचल मनाकडून अनेक घटनांचा जन्म होत असतो. मन हे विचारावर, भावनांवर, बुद्धीवर, देखील आरुढ होत असते. आवडो वा न आवडो शेवटी ते माझेच, स्वताःचेच माझ्या शरीरांतील एक भाग असते. त्याला मान्यता द्यावीच लागते. मात्र मन मनालाच प्रश्ने विचारते. " हे असे कां ? " " हे योग्य आहे का ? " " हे अयोग्य आहे का ? " " हे जीवनाचे व्यक्तीमत्व वाढवेल का ? " " जीवन सुखकर वा दुःखकर होईल का ? " " कुणावर मी विश्वास करावा ? " " येत असलेले विचार बदलत कां राहतात ? " " मन नेहमी संशयाच्या चक्रांत का राहते ? " " कित्येक गोष्टी पटल्या, आवडल्या, तरी मन शासंक का असते ? " ---- इत्यादी अनेक अनेक मनाच्या वागण्याची उकल करताना व्यक्ती खुप उत्सुक असतो. त्याच्या ह्या व अशा प्रश्नांची सोडवणूक केवळ चर्च्या करुनच होऊ शकते. मानसिक संवाद हाच याचा प्राण असतो.

    ह्याचाच एक भाग म्हणजे Dating ची कल्पना.

    एक साहित्यीक, ज्ञानी कथा कादबऱ्या मासिके वृतपत्रे वाचून अनेकांचे विचार जाणून घेतो. तर अनेकजण ते गप्पा मारुन व्यक्त करीत असतात. ह्यांत एकच नैसर्गीक साम्य दिसते. दोघानाही मनाचा करिश्मा- अविष्कार जाणण्याची ओढ असते. गप्पाटपा विषयांची, प्रसंगांची माहिती हे सामान्य होय. ह्याच्यापेक्षा जास्त खोल स्थरावरच्या बाबी सांगणे वा एकणे वेगळे. तसा संवाद-प्रतिसाद अपेक्षीला जातो. मनामध्ये रुजलेल्या विचारना उद्युक्त केले जाते. ज्यात निर्माण झाल्या असतील आवडी निवडी, ओढ अत्मियता, तिरस्कार घृणा, प्रेम लोभ इत्यादी भावना. सहजगत्या ज्याचे वर्णन करणे सामान्याना शक्य नसते. त्या स्थरावर देखील ऊतरुन वैचारीक भावनीक देवाण घेवाण वा मार्ग दर्शनाची छुपी अपेक्षा त्यामध्ये असते. जीवन जगण्याच्या द्दष्टीकोणाचा तेथे उहापोह होतो. जवळचा जोडीदार वा लग्नासारख्या बंधनानी बांधला गेलेल्या व्यक्तीबरोबर देखील कांही चर्चाना मर्यादा ठरतात. तुमच्या प्रत्येक शब्दामधून अप्रत्यक्ष तुमची आवड, इच्छा, व्यक्त होत असते. त्या कदाचित् तुमच्या स्वभावाची ठेवण दाखवितात.

    सर्वाना अशा प्रकारचे संवाद वा मनाचा सत्य मोकळेपणा आवडतो. परंतु ज्या वेळी समोरचा जोडीदार पती वा पत्नी ह्या भूमिकेत असतो, त्याला ह्या मोकळेपणाच्या बाबी पचनी पडत नसतात. त्याना ब्रेक लागतो. हा संस्काराचा वा धर्माचा कदाचित् प्रभाव असू असेल.

    Dating ची संकल्पना ही वैचारीक आणि एका मर्यादेपर्यंत भावनिक स्वातंत्र्याला मान्यता देते.पाश्चिमात्य लोकानी त्यांच्या संस्कृती, सामाजिक, कौटूंबीक जडन घडन इतकी बदलून टाकली की त्या ठिकाणी कुणाच्याही विचारांना, भावनेला आणि म्हणून वागण्याला पायबंद राहात नाही. " मी काल माझ्या बालपणीच्या मित्राकडे Dating ला गेले होते. रात्री घरी येणे जमले नाही. " असे वाक्य स्वताःच्या नवऱ्यासमोर सांगते. नवरा देखील हासून "बरी आहेस ना तूं " अस हासून म्हणतो. कोठेही खंत व्यक्त करीत नाही. कारण हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अंग झालेल आहे. तीकडे जर ज्यास्त चौकशीच्या मागे कुणी गेला तर एकमेकापासून ती कुटूंबे आलिप्त होण्याचा मार्ग लगेच घेतात. ही त्यांची स्वाभाविक मानसिकता झालेली असते. त्यांच्या समाजालाच नव्हे तर देशाला ते मान्य असते.

    अमेरिकेतील Dating Centre चा उद्देश, तत्वज्ञान, मानसिक विचार स्वातंत्र्याला वाहून घेतलेली संकल्पना ही योग्य व खूप पुरोगामी ( अधुनीक ) वाटते. परंतु आजतरी त्याचे दृष्य परिणाम जे दिसून येतात ते भयानक व निराशजनक वाटतात. कारण Divorce rate in US and UK हा जवळ जवळ 90 % झालेला आहे असे म्हणतात. कदाचित् आपण त्यालाच उध्वस्त कौटूंबीक परिणाम म्हणतो ते योग्य नव्हे काय .

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 1, 2016


  • अन्याय

    सकाळी अकरा- साडेअकराची वेळ होती. जरा बाहेरची कामे करुन यावी म्हणून निघाले होते. घरात बाहेरची कामेच जास्त असतात. कधी लाईट बील, पाणी बील, बाजार हाट, बँकाची आणि ही सगळी कामे सकाळीच करायला लागतात. तशीच त्या दिवशी पण बाजारात जायला निघाले होते. जवळच सेंट्रल स्कूल आहे. शाळा सुटली होती. सोसायटीतील लहान मुले परीक्षा संपल्या म्हणून जवळ जवळ नाचतच आनंदात घरी परत चालली होती.

      November 27, 2025


  • नातं..

    एका माणसाचं दुसऱ्या माणसाशी नातं जुळणं ही या संसारातील सगळ्यात मोठी आणि भाग्यशाली गोष्ट. रस्त्याने जातांना कुणी ओळखीचं दिसलं की आपण लगेच हसतो, गालातल्या गालात. जवळचे आप्त-नातेवाईक हे तर असतातच… पण त्यांच्याही पलिकडे काही नाती अगदीच घट्ट होत जातात… टिकतात आणि आयुष्यभर साथ देणारी होतात…. माणुसपणाचं नात दृढ झालं पाहिजे… वाढले पाहिजे…..हेच मागणे..!

      May 14, 2019


  • सुलेखनातील राज’कुमार’

    मोत्यांसारखं लिहिलेलं अक्षर कुणाला आवडत नाही? ते सर्वांनाच मनापासून आवडतं. ते पाहून आपणही असंच सुवाच्य लिहावं, अशी पहाणाऱ्याची मनोमनी इच्छा होते..

      September 28, 2021


  • बियोन्ड हॉरिझॉन (काल्पनिक विज्ञान कथा) – भाग – २

    शीर्षक: Beyond Horizon.. (क्षितिजापलीकडले)

    प्रकरण दुसरे

    समीर काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटना आठवत घरी निघाला.. काय घडले होते काही महिन्यांपूर्वी???
    काही महिन्यांपूर्वी......

    प्राध्यापक वसिष्ठ आपल्या बी. एस्.सी. - ऍस्ट्रो फिजिक्सच्या वर्गात बिग बँग थियरी शिकवत होते. लहानपणापासून प्राध्यापक खूप हुशार! खगोल शास्त्राची खूप आवड. सुट्ट्यांमध्ये जमेल तसे रात्री आकाश न्याहाळणे हा त्यांचा आवडता छंद! कुठल्या तरी विज्ञान प्रदर्शनात एक हाताने बनवलेली दुर्बीण बघून त्यांनी पण घरीच दुर्बीण बनवण्याचा प्रयत्न केला होता. नव- नवीन प्रयोग करून बघण्याची तर त्यांना लहानपणापासूनच आवड!

    खेळ ही कसले त्यांचे, तर आज ह्या ग्रहावर घर, उद्या त्या ग्रहावर, मग कोणी तरी एलियन्स् येणारं, त्याच्या बरोबर युद्ध असे अतर्क!! घरचं वातावरण पूर्ण धार्मिक, आई ग्रुहीणी तर वडील वेद-शास्त्राचे गाढे पंडीत. त्यामुळे सहाजिकच प्राध्यापकांची अनेक स्तोत्रे मुखोद्गत!

    तर अशा वातावरणात वाढलेले प्रोफेसर वसिष्ठ इंजिनिअरिंग/ मेडिकलला सहज मिळणारी एडमिशन डावलून, - ऍस्ट्रो फिजिक्स मधे ग्रॅज्यूएशनसाठी गेले. तिथेच पुढे एम्.एस्सी, पी.एच.डी. करून प्रोफेसर म्हणून रुजू झाले. प्रचंड मेहनत, बुद्धिमत्ता आणि शिकवण्यात हातखंडा ह्या गुणांमुळे लवकरच ते सर्व शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले. हळू हळू एकेक पायरी चढत आता ते हेड ऑफ द डिपार्टमेंट झाले होते. युनिव्हर्सिटीने त्यांना युनिव्हर्सिटीच्या आवारातच शिक्षक वसाहतीमध्ये कॉलनीपेक्षा थोडा लांब एक बंगला दिला होता. बाजूलाच एक सर्व्हंट क्वार्टर होते, ज्याचे त्यांनी प्रयोगशाळेत रूपांतर केले होते. अनेक छोटे मोठे प्रयोग येथे यशस्वीरीत्या पूर्ण करून नव-नवीन सिद्धांत मांडले होते.
    आताही ते अशाच एका प्रयोगामध्ये गुंतले होते. मात्र हा प्रयोग फार वेगळा होता आणि धोकादायक होता. कोणाला कुणकुण लागली असती तर त्यावर बंदी आली असती किंवा त्याचा दुष्ट लोकांनी दूर उपयोग केला असता. त्यामुळे हे जोखमीचे काम ते रात्रीच्या वेळी कोणी डिस्टर्ब करायला नसताना करत होते.

    बिग बँग थियरीसुधा ते इतक्या सहजतेने विविध दाखले देत शिकवत होते. गहन/ क्लिष्ट विषय सोपा करून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. ते खूप तल्लीन होऊन शिकवत होते. कशी शून्यातून विश्व निर्मिती झाली. बोलताना त्यांच्या तोंडून "अणू पासूनी ब्रह्मांड एवढे होत जात असे" वाक्य निघून गेलं आणि त्यांच्या मनाने कौल दिला. अचानक काही तरी सापडलं त्यांना. एखाद्या गूढ अंधाऱ्या गुहेत एखादी प्रकाशाची बारीक तिरीप दिसावी असे काही तरी त्यांना वाटले. ते अचानक गप्प झाले. आणि तब्येतीचे कारण सांगून क्लास अर्धवट सोडून तडक ते आपल्या घराकडे निघाले.

    समीर त्यांच्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म बदल टिपत होता. त्याला काही तरी वेगळे जाणवले. सगळी लेक्चर्स झाली की आपण सरांना त्यांच्या घरी जाऊन भेटुयात असे मनाशी ठरवून तो दिवस कधी संपतोय ह्याची अधिरतेने वाट बघू लागला. इकडे प्राध्यापक घरी आले आणि झरझर आपल्या जाडजूड वहीची पाने उलटून काही तरी संदर्भ शोधू लागले.

    वही कसली, आत्ता पर्यंत केलेल्या प्रयोगांची टाचणे, नोंदी, काही महत्त्वाचे संदर्भ ह्या सगळ्यांना एका धाग्यांमध्ये गुंफलेला जाड-जूड ग्रंथच म्हणा ना! आणि त्यांना हवा होता तो संदर्भ मिळाला.

    लहानपणी मनावर झालेले धार्मिक संस्कार, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि संस्कृतची उपजत जाण ह्या जोरावर त्यांनी गीता, वेद, भागवत पुराण अशा ग्रंथांचाही थोड फार अभ्यास केला होतं. त्यावरून गीतेतले काही श्लोक आणि बिग बँग थियरीचा संबंध जोडायचा प्रयत्न केला होता.

    ‘विश्वची उत्पत्ती माझ्यातून आहे. मी अविनाशी पुरुषोत्तम आहे.’ हे पंधराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, चार पाच हजार वर्षांपूर्वी...

    आता अलीकडे आलेली बिग बॅग थियरी हेच सांगते ना, अती प्रचंड ऊर्जा असणार्या एका छोट्या कणापासून म्हणजेच अत्यंत तेजोमय अशा लहानशा अणूपासून हे विश्व बनले आहे आणि त्यातूनच पुढे ग्रह तारे आकाशगंगा बनल्या आहेत. आणि विश्वची सतत उत्पत्ती आणि वाढ होत आहे. हाच संदर्भ घेत त्यांचे पुढच्या प्रयोगावर संशोधन सुरू होते.

    आता त्यांनी उत्साहाने पुढच्या नोंदी आणि अभ्यासाला सुरुवात केली. त्या आधी देवी प्रसादला प्रयोग शाळेत एक गरमा गरम फिल्टर कॉफी आणून द्यायला सांगितली आणि ते कपडे बदलून प्रयोग शाळेकडे गेले.

    देवीप्रसादने इतक्या वर्षांच्या अनुभव वरून ताडले की आता सर काही ८-१० तास बाहेर येत नाहीत. त्याने सरांसाठी कॉफी बनवली आणि प्रयोग शाळेत घेऊन गेला. "तुझं काम झालं की दरवाजा ओढून घे आणि तू घरी जा" असे सांगत सरांनी त्याच्या हातातून कॉफीचा मग घेतला.

    परत बंगलीवर येऊन देवीप्रसादने घर आवरून ठेवले. सरांना आवडणारी निशिगंधाची फुले त्यांच्या झोपायच्या खोलीत बेड जवळच्या फुलदाणीत नीट सजवून ठेवली. संध्याकाळ होत आली तशी देवाजवळ दिवा लाऊन, दिवाणखान्यात मंद धूप लावला. घराचे वातावरण अगदी प्रसन्न झाले. मग सरांना आवडते तशी मऊसूत भाताची खिचडी करून ती एका बाउलमध्ये घालून ओव्हन मध्ये ठेवली, म्हणजे सर आले की ती गरम करून खातील. टेबलावर पाण्याचा जग आणि ग्लास ठेवला. हे सर्व कित्येक वर्षाच्या सवयीने त्याच्या अंगवळणी पडलं होतं. आता तो निघणार इतक्यात समीर आला. समीरचे हे आवडते सर होते आणि समीरही सरांचा लाडका विद्यार्थी होता. त्यामुळे बरेचदा तो सरांच्या घरी शंका विचारायला, चर्चा करायला येत असे. सरही त्यांच्या प्रयोगामध्ये नोंदी करायला मदती साठी त्याला बोलावत असत.

    त्यामुळे समीरचे येणे देवीप्रसादसाठी नवीन नव्हते. त्याला सर दुपारपासूनच प्रयोग शाळेत आहेत, मी निघतो तुम्ही तिकडे भेटा त्यांना असं सांगून देवीप्रसाद घरी जायला निघाला. जाण्यापूर्वी त्याने समीरसाठी सुद्धा कॉफी बनवली.

    समीरला आश्चर्य वाटलं, तब्येत बरी नाही म्हणून सर घाई घाईने घरी आले आणि दुपारपासूनच प्रयोग शाळेत आहेत. म्हणजे नक्कीच काही तरी महत्त्वाच्या विषयावर संशोधन चालू असणार. अशावेळी त्यांना डिस्टर्ब करावं का नाही अशा विचारात समीर दिवाणखान्यात रेंगाळत होता. तितक्यात सर घाई घाईने घरात आले. समीरला घरात बघून एक दोन क्षण चपापले. लगेच स्वतःला सावरून म्हणाले, ‘अरे समीर, ये. ये! तू कधी आलास?’

    ‘हे काय, आत्ताच येतोय मी. तुमची तब्येत कशी आहे आता? तब्येतीची चौकशी करायला आलो होतो.’
    सरांच्या चेहऱ्यावर एक गूढ वलय निर्माण झालं. समीरला सांगावं का नाही ह्या गोंधळात पडले. पण समीर कडून आपल्याला काही धोका किंवा नुकसान तर नक्कीच नाही. झालीच तर मदतच होईल. असा विचार करत सर एक-दोन क्षण थांबले. सर कुठल्या तरी गहन विषयावर काम करत आहेत आणि ते आपल्याला सांगावं की नाही ह्या विचारात ते पडले असावेत हे चाणाक्ष समीरने तत्काळ ओळखले.

    ‘सर, कसला विचार करताय? मी काही मदत करू शकतो का? आणि माझ्याकडून तुम्ही अगदी निःशंक रहा.’
    ह्या त्याच्या वाक्याचे सरांना कौतुकही वाटले आणि न कळत चेहऱ्यावर स्मित उमटले.कशाला इतका विचार करतोय आपण, न बोलताच मनाचे मनाशी संभाषण झाले होते आणि सरांना दिलासा मिळाला होता. न कळत त्यांच्या तर्काला एक पुष्टी मिळाली होती.

    ‘हं चल प्रयोग शाळेत!’ असं म्हणत आणि ड्रॉवरमधला पेन ड्राईव्ह खिशात टाकून ते समीरसह प्रयोग शाळेत गेले.
    गेल्याबरोबर त्यांनी प्रयोग शाळेचे दार खिडक्या बंद केले. पडदे बंद केले म्हणजे चुकूनही कोणी डोकावून पाहिलं तरी आत काय चाललय हे त्याला दिसणार नाही.

    सरांच्या ह्या वागण्याचे समीरला नवल वाटत होते आणि त्याचे कुतूहल देखील वाढले होते. सर आता काय सांगतील ह्याची समीर उत्सुकतेने वाट पाहू लागला.

    कॉफीचा एक घोट घेत सरांनी घसा खाकरून बोलायला सुरुवात केली, ‘समीर तुझ्या घरातही आमच्यासारखे धार्मिक वातावरण आहे. तुझी बरीचशी स्तोत्रे पाठ आहेत. त्यामुळे मी जे काही आता सांगणार आहे, ते तुला कळू शकेल. कुठे काही शंका आली तर ती नोट करून ठेव. माझं पूर्ण बोलणं झाल्यावर तू तुझ्या शंका विचारू शकतोस.’

    समीर कान आणि मन एकाग्र करून सरांचे बोलणे ऐकू लागला. सर एक दोन क्षण घुटमळत कुठून सुरुवात करावी ह्या विचारात होते. मग डोळे मिटून एक मोठा श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.

    ‘समीर, हे तर तू मनातोस की हे विश्व निर्माण करणारी एक नैसर्गिक शक्ती आहे, जिने हे विश्व निर्माणच केले नाही तर हे विश्व नियंत्रण देखील त्या शक्तीच्या हातात आहे. आपण जर वैज्ञानिक भाषेत हे सांगायचे ठरवले तर हे विश्व एका छोट्या अत्यंत तेजोमय कणापासून बनले आहे. तो सूक्ष्म कण ज्याला आपण वैज्ञानिक भाषेत atom म्हणतो.

    गीतेमध्ये श्री कृष्णाने सांगितले आहे, मी अविनाशी पुरुषोत्तम आहे. माझ्यातून विश्व निर्माण झालं आहे, आणि ते माझ्यातच संपते. म्हणजेच तेजाचा, ऊर्जेचा स्रोत माझ्यात अखंड आहे.

    हेच तर आइन्स्टाईन सांगतो, ‘Energy in the universe can not be created nor be destroyed, it can be change from one form to another.’

    समीरला हे तर्कशुद्ध विवेचन पटत होते आणि त्याचे कुतूहल अजून वाढले. मधेच कॉफीचा एक घोट घेत सरांनी छोटा पॉज घेतला. मग ते पुढे बोलू लागले, आपण बिग बँग थियरीला आधार मानलं तर हे विश्व वाढतयं आणि ते अमर्याद आहे. एक तारा, त्यातून अनेक तारे, त्यातून आकाश गंगा, कृष्ण विवर ही विश्वची उत्पत्ती आहे. ताऱ्याचा स्फोट झाला की त्याच्या भोवती वलय निर्माण होते आणि त्या केंद्रभोवती अनेक ग्रह बांधले जातात. अशा अनेक आकाशगंगा मिळून हे विश्व बनले आहे. आणि ह्याही पुढे जाऊन शास्त्रज्ञ तपासात आहेत की अशी अजून विश्व आहेत का? ज्याला आपण ‘पॅरलल् युनिव्हर्स’ म्हणू शकतो.

    आत्तापर्यंत सर जे सांगत होते, समीरला कळत होते. पण ह्या सगळ्या गोष्टींचा, अध्यात्माचा आणि सरांच्या संशोधनाचा काय सबंध आहे हे अजून त्याच्या लक्षात येत नव्हते.

    मनातली शंका सरांनी लगेच ओळखली. चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणून सर म्हणाले, ‘कॉफी घे. गार होतीय. आणि घरातल्या फोनवरून तुझ्या घरी फोन कर. आई वाट बघत असेल तुझी!’

    समीरने घड्याळ बघितलं. रात्रीचे ८ वाजले होते. आई वाट पाहत असेल, हे लक्षात घेऊन, सर आणि समीर दोघेही सरांच्या बंगल्यात आले. समीरने घरी आईला फोन केला आणि आज मी सरांकडे थांबणार आहे त्यां च्या मदतीसाठी. माझी वाट बघू नकोस आणि काळजी करू नकोस असे आईला कळवले. आईलाही सरांबद्दल प्रचंड आदर होता आणि समीरवर विश्वास.त्यामुळे ती ही निर्धास्त झाली. मग सरांनी आणि समीरने थोडी थोडी खिचडी, लोणचं आणि भाजून ठेवलेला उडीद पापड खाऊन घेतले. कॉफीसाठी लागणारे सामान घेऊन ते परत प्रयोग शाळेत आले.

    सरांनी आपल्या लाडक्या आरामखुर्चीवर अंग टाकले. ते जरा सैलावून बसले. आता सर १५ मिनिटे पॉवर नॅप घेणार, ही त्यांची नेहमीची सवय समीरला माहीत झाली होती. मग समीरही बाहेर बागेत जाऊन पाय मोकळे करून आला. तोपर्यंत सरांची झोप झाली होती आणि ते फ्रेश झाले होते.

    सर पुढे बोलणार, इतक्यात समीरने त्यांना अडवले. ‘सर ! तुम्ही सुरू करण्यापूर्वी मी एक दोन प्रश्न विचारू का?’
    सर हसले.त्यांना थोडीशी कल्पना आली होती की समीर काय विचारणार आहे ते. ते म्हणाले, ‘विचार...’

    ‘सर, मगाशी तुम्ही म्हणालात की विश्व वाढतयं आणि ते अमर्याद आहे आणि एनर्जी इज कॉन्स्टंट. जर का ऊर्जा तेवढीच असेल तर विश्व वाढेल कसं? विश्व वाढण्यासाठी ऊर्जा लागणारं ना? आणि जर का काहीही नाश पावत नाही ह्या विश्वात, तर आपल्याला अन्कमर्फटेबल का वाटत नाही?

    आता उदाहरणच घ्यायचं झालं तर आपले संभाषण घ्या. It's a form of sound energy. आत्तापर्यंत आपण जे काही बोललो ते ह्याच परिसरात लहरींच्या रुपात असणार आहे. ते नाश नाही पावणार. मग त्या लहरी आणि आपण आत्ता बोलत असलेल्या लहरी एकमेकांना क्लॅश कशा होत नाहीत आणि वर्षानुवर्ष ज्या काही ध्वनी लहरी या पृथ्वीतलवार साठल्या आहेत त्यांचं काय होतं त्या कुठे जातात?’

    ‘ठीक आहे, तुझा दुसरा प्रश्नही विचार, मी माझ्या परीने दोन्ही प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो.’
    समीर पुढे बोलू लागला, ‘सर तुम्ही हे जे सर्व सांगत आहात त्याचा, अध्यात्माचा आणि तुमच्या संशोधनाचा काय संबंध असेल ही माझ्या मनात आलेली शंका तुम्ही कशी ओळखली?’

    ‘समीर, ह्या दोन्ही प्रश्नांवर आधारित माझ्या संशोधनाचा विषय आहे. आणि मी जो प्रयोग करत आहे त्यात जर यश मिळालं तर बऱ्याच गूढ अज्ञात गोष्टींची उकल होणार आहे.

    आपण मुख्य विषयाकडे वळूयात, आपण रोजच्या जीवनात टेलीपथी, योगायोग हे शब्द सर्रास वापरतो. पण गीतेमध्ये सांगितलेल्या तत्वज्ञान प्रमाणे, अचानक काही घडत नसतं. हे सगळं ठरलेलं असतं. तुमच्या पूर्व कर्माचे भोग असतात ते. खगोल शास्त्रावरून एकदम अध्यात्म?’

    समीर फारच अचंबित झाला आणि त्याला कळेना, नक्की काय म्हणायचं आहे सरांना?

    त्याच्या चेहऱ्यावर उडालेला गोंधळ पाहून, सर पुढे म्हणाले, ‘मी जे काही सांगतोय, ते नीट ऐक. आत्ता कदाचित तू सांगड घालू शकणार नाहीस, पण पुढे तुला लिंक लागत जाईल आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरे पण मिळत जातील.

    सुरवातीपासून सुरू करतो. माणसाला माहीत असलेला इतिहास हा काही हजारो वर्षांपूर्वीचा आहे. आदिमानवाच्या जीवन शैलीचे धागे दोरे १२००० वर्षांपूर्वीचे आहेत. पृथ्वीचा जन्म हा ४.५ अब्ज वर्षांपूर्वीचा आहे. त्या मानाने आदी मानव अगदीच अलीकडच्या काळातला म्हणावा लागेल.

    पुढे हळू हळू मानवाची प्रगती होत गेली, त्याने विविध शोध लावले आणि संस्कृती आणि विज्ञान ह्यांची उत्तम सांगड घालत प्रगती केली. तेंव्हापासूनचा मानवाच्या प्रगतीचा इतिहास शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे जो की आपणा सर्वांना माहीत आहे.

    आपला हिंदू धर्म हा सगळ्यात जुना धर्म म्हणून ओळखला जातो. त्याची पाळ मूळ ई.स.पूर्व. ४०००-५००० च्या काळात सापडतात. वेद हे हिंदू संस्कृतीचे अविभाज्य घटक.किंबहुना, हिंदू संस्कृतीचा उगम वेदांमध्ये आहे. ज्यांचा काळ कोणता, ते कधी आणि कसे निर्माण झाले हे अजूनही अज्ञात आहे. ब्रह्मदेवाने ज्ञानाच्या मोठ्या डोंगरातून चार मूठ ज्ञान काढून महर्षी वसिष्ठांना दिले, ते म्हणजे वेद अशी आख्यायिका आहे.

    आपल्या वेद, पुराण आणि इतर पौराणिक कथा मधून आपल्याला असे जाणवते की, त्या काळात माणसाला विश्व निर्मितीपासून मणासाच्या मृत्यू नंतरचे विश्व ह्या सर्वांचे ज्ञान होते. ऋषी मुनी सूक्ष्म रुपात ये-जा करत होते. जे विश्व आपल्या डोळ्यांना दिसत नाही अशा विश्वात सूक्ष्म रुपात जाऊन तिथले अनुमान घेऊ शकत होते. तू रोज म्हणतोस त्या गायत्री मंत्रामधे देखील प्रुथ्वीपासून अनंत कोटी ब्रह्मांडाचा ऊल्लेख आहे. किंबहूना त्यालाच नमन आहे. गायत्री मंत्र हा ऋग्वेदात सांगितला आहे.

    भूत काळ सांगणे, भविष्य सांगणे, वर्षानुवर्षे ताऱ्यांची स्थिती ओळखणे, हे सगळे ज्ञान कसे मिळवले असेल त्या काळी? आत्ताच्या काळात शोध लागलेल्या अनेक गोष्टी त्या काळी लिहून ठेवल्या गेल्या. हे कोडं उलगडण्याचा मी गेली काही वर्ष प्रयत्न करत आहे.

    ह्यात दोन शक्यता लक्षात घेता येतील, पृथ्वीचं वय लक्षात घेता, ह्या आधी पृथ्वीवर किंवा तिच्या आसपास अती प्रगत जीव सृष्टी होऊन गेली असावी आणि त्यातलं थोडंसं ज्ञान वेदांच्या रुपात आपल्यापर्यंत पोहचले असावे. पण पृथ्वीचं त्या वेळचं तापमान बघता ही शक्यता गृहीत धरता येत नाही. इतक्या अती प्रचंड तापमानात जीव जगणे मुश्किल वाटते.
    ‘दुसरी कोणती शक्यता असू शकते सर?’ समीरला ही ह्या गोष्टी पटायला लागल्या होत्या आणि त्याचं कुतूहल वाढलं होतं.
    ‘दुसरी शक्यता!!! असे म्हणत सरांनी एक दीर्घ श्वास घेतला. उठून थोड पाणी पिऊन दोन फेऱ्या मारल्या. आणि परत आराम खुर्चीत सैलावले.

    ‘आता तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे ह्यात सापडतील. मिती ज्याला आपण dimension म्हणतो, तुला माहितीच आहे. कुठल्या ही वस्तूचे विशेष पैलू म्हणजे त्याची मिती. आपल्या रोजच्या जीवनात आपण 3 मिती वापरतो. लांबी, रुंदी, उंची... 3D म्हणतात त्याला.

    शास्त्रज्ञांनी अजून काही मिती शोधून काढल्या आहेत. चौथी मिती म्हणजे काळ..बिग बँग थियरी ह्या TIME मितीला धरून derive केली आहे. जर का तेजस्वी कण हे झीरो अवर्स्ला धरले तर आज आपण किती तरी बिलीयन/ट्रिलीयन ईयर्स् ट्रॅव्हल केलं आहे. इतक्या लांब हे विश्व पसरलं आहे.किंबहुना त्याहून किती तरी पटीने जास्त.

    टाइम ट्रॅव्हल ही सध्याच्या अती प्रगत यानानेही अशक्य गोष्ट आहे. प्रकाश वर्ष हे वेगाचे साधन धरले तरी विश्वाचा अफाट पसारा किती तरी अब्ज प्रकाश वर्ष जास्त आहे. वेदिक काळात ही प्रगत साधने नसतील तर त्यांनी विश्वाचे कोडे उलगडण्याचा कसा प्रयत्न केला असेल?

    ह्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी नक्कीच काही तरी वेगळी मोज-माप लावली असावीत. गेले काही वर्ष मी ह्या सर्वांचा सखोलातेने अभ्यास करत होतो. अनेक जुने ग्रंथ, जुन्या काळी लावलेले खगोल शास्त्रीय शोध सर्व माहिती गोळा करून त्याची विशेष टिपणे काढली.

    मी विचार केला, सूर्याचा प्रकाश आपल्या डोळ्यांना दिसायला ८ मिनिटांचा अवधी जावा लागतो. पण मन मात्र निमिषात कुठेही पोहचू शकते.

    ह्या मनाच्या पैलूंचा अभ्यास करून, जर का मन ही एक मिती मानली तर आपण ह्या मनाच्या आधारे विश्वाच्या अफाट पसाऱ्यात कुठूनही कुठेही मुक्त संचार करू शकतो. नारद मुनींनी हेच साधले होते का? मनाच्या मितीवर नियंत्रण मिळवू शकलो तर किती तरी गोष्टींचा सहज उलगडा होईल. मनाच्या मितीचे परिमाण काय असावे?

    आता तू विचार कर, एखादी गोष्ट अस्तित्वात आहे पण मला ती दिसत नाहीये, तर आपण त्या नाकारु नाही शकत ना? फक्त त्या बघण्यासाठी ज्या विशिष्ठ साधनांची गरज आहे किंवा फ्रिक्वेंसीची गरज आहे, त्यासाठी आपले अवयव बनवलेले नाहीत. किंवा नैसर्गिक आपत्तीची चाहूल पशू पक्षांना आधी लागते, इथपासून ते, मृत्यू आसपास रेंगाळत असला की कुत्रे एका विशिष्ट पद्धतीने रडतात, अतृप्त आत्मा भोवताली घुटमळत असेल तर कावळा पिंडाला शिवत नाही का तर कावळा आत्म्याला सेंन्स करतो. आपल्या पूर्वजांची ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे. सामान्य माणूस हे सगळं सेंन्स नाही करू शकत. मग हा अभ्यास त्यांनी कसा केला?

    आता मात्र समीर खरोखर पूर्ण भारावला होता. पुढे झुकत सर त्याला म्हणाले, ‘कळतंय ना मी काय म्हणतोय ते? थोडी विश्रांती घेऊ चल.मी मस्त कॉफी करतो आपल्याला’ अस म्हणत सर खुर्चीवरून उठले.
    ‘मी करतो कॉफी सर, तुम्ही बाहेर पाय मोकळे करून या.’ असं म्हणत समीरने प्रयोगशाळेतील इंडक्शन शेगडी चालू केली.त्यावर चकचकीत सपाट बुडाचे पातेले ठेऊन, कॉफी तयार करत ठेवली. हात यांत्रासरखे काम करत होते पण मन वेगळ्याच विचारात गढले होते.

    कॉफीचा सुगंध दरवळला आणि सर आत आले. प्रयोगशाळेत असणाऱ्या गोल टेबलभोवती कॉफीचा एकेक घोट घेत ते शांतपणे बसले होते. बराच वेळ कोणी काहीच बोलत नव्हते. आत्तापर्यंत झालेल्या संभाषणाची सांगड घालत पुढे कसे जाता येईल ह्याच विचारात गढले होते.

    थोड्या वेळात समीरची तंद्री भंग करत सरांनी खाकरुन पुढे बोलायला सुरुवात केली. आपल्याला माहीत असलेली audible frequency range - 20hz te 20k hz. तसच डोळ्यांच... आपण एक ठराविक स्पेक्ट्रम मधला प्रकाश बघू शकतो. आपलं जडत्व / वजन हा अजून एक पैलू. जडत्व हे गुरुत्वाकर्षण शक्तीवर अवलंबून असते. त्याचा परिणाम आपण नल्लीफाय (nullify) करु शकलो तर आपलं शरीर खूप हलके होऊन तरंगायला लागेल. ह्या तीन पैलूंवर मी काम केलं.

    ऋषी मुनींनी तप करून ह्या पैलूंवर नियंत्रण मिळवले. मी ही त्याचा थोडा फार प्रयत्न केला आहे. आपण ह्याच्या पलीकडे ऐकू शकलो, बघू शकलो तर आपण सहज आपली मिती ओलांडून दुसऱ्या मितीत जाऊ शकतो.

    आता तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. ‘मला तुझ्या मनातली शंका कशी कळली? मी मगाशीच सांगितल्या प्रमाणे मी आपल्या दोघांच्या मनाच्या पैलूंचा अभ्यास करत होतो. एका क्षणी आपल्या मनातून निघणाऱ्या लहरी समान झाल्या आणि त्या माझ्या मनाने पकडल्या. हेच थोड्या फार फरकाने टेलीपथी, योगायोग ह्या बाबतीत घडतं असावे पण आपला तेवढा अभ्यास नसतो म्हणून कळत नाही.

    आपण आधी बोललो तसे एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते तशीच ती एका मितीमधून दुसऱ्या मितीमध्येही जाऊ शकते. आणि त्या ऊर्जेची जाणीव आपल्याला कधी कधी होते आणि आपण त्याला काही तरी अदृश्य/असंभव नावे देतो.

    ऊर्जा ही कधी विनाशी असते तर कधी कल्याणकारी असते. त्यालाच अघोरी आत्मा आणि पवित्र आत्मा असे म्हणत असावेत.

    इथे आपण शक्तीला आत्मा म्हणू. त्याचं नियोजित कार्य पूर्ण झालं की त्याला मोक्ष मिळतो नाही तर तो पुनः जन्म घेत राहतो. म्हणजेच जी मुक्त झालेली शक्ती आहे ती त्याच्यातील घटकानुसार कार्य करत करते. जेंव्हा ती एक विशिष्ट पातळीवर पोहचते तेंव्हा ती तिच्या मूळ रुपात जाते. तेंव्हा तिच्यातून एक नवीन विश्व तयार होते. अशी अनेक विश्व तयार होतात. हेच तर आपल्या गीतेमध्ये आहे. ‘श्रीकृष्णाचे विराट रूप.. अनेक विश्व सामावलेल.’ मला असं वाटतंय की, आपण थांबुयात इथे. तुला कदाचित हे सगळं त्रासदायक होईल. असं सरांनी म्हणताच समीर भानावर आला. घाई घाईत म्हणाला, नाही, नाही सर! हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे.मला ह्यात तुम्हाला मदत करायला आवडेल.

    ‘ ऐक तर मग, मी मनाच्या ह्या पैलूंचा वापर करून दुसऱ्या मीतीत जाण्याचा प्रयोग करणार आहे.’

    ‘सर, पण ते खूप रिस्की होऊ शकतं. ‘इति समीर..

    म्हणूनच मी तुला माझ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घ्यायचं ठरवलं आहे. जर का मी विशिष्ट वेळेत परत नाही येऊ शकलो तर तू मी तयार केलेला रिसेट प्रोग्राम रन करून मला परत आणायचं.’

    ‘पण सर आपण हे कसं साध्य करणार? त्यासाठी मी एक कॉम्प्युटर कोड तयार केला आहे. त्या कोडप्रमाणे मानवाच्या आवाक्याबाहेरची फ्रिक्वेंसी ह्या ट्रान्समिटरमधून ऊत्सर्जित होईल.

    हा आहे तो ट्रान्समिटर आहे. त्यांनी एका तबकडीवजा साधना कडे बोट केले. हे मी माझ्या शरीराच्या कुठल्याही भागाला बांधले की ह्याच्या लहरी माझ्या मनाच्या लहरींना कॅच करुन ट्रान्समिट करतील. आणि त्या लहरींचे दोन भागात विभाजन होईल. एक स्पेक्ट्रम ऑडियो फ्रिक्वेंसीचा आणि एक स्पेक्ट्रम व्हिजूअल फ्रिक्वेंसीचा. ह्यांच्या सामाईक बिंदूवर जी मिती असेल त्या मितिशी माझे मन कनेक्ट होईल आणि मी त्या मितीमध्ये घडणाऱ्या गोष्टींचा साक्षीदार ठरेन.कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मुळे काही क्षणात अब्जावधी कॉम्बिनेशन्स् होतील आणि त्यात कुठल्याही मितिमध्ये आपण जाऊ शकू.’ ह्यासाठी अजून काही साधने लागतील. मी सध्या त्यावर काम करत आहे. आता पहाटेचे ५ वाजले आहेत. तू आता घरी जा. पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा भेटूयात. ह्याची कुठेही वाच्यता होणार नाही, ही खबरदारी घे. तुला ही ह्यात काही नवीन सुचत असेल तर ते आपण शुक्रवारी बघूयात.'

    समीर प्राध्यापकांच्या घरातून बाहेर पडला, ते एका ध्येयाने झपाटूनच!!

    क्रमश:

    -- यशश्री पाटील.

      July 9, 2022


  • एक छान मैत्रीण हवी

    प्रत्येकाला जीवनात, ‘मैत्रीण’ लाभतेच असं नाही.. पूर्वी एकाच वाड्यात, चाळीत अनेक कुटुंबं रहायची.. त्यामुळे समवयस्क मित्र-मैत्रिणी भरपूर असत, त्यांच्या मैत्रीसंबंधावर पालकांचाही विश्र्वास असायचा.. त्यातूनही शाळा, जर मुला-मुलींची एकत्र असेल तर वर्गातील मैत्रीण घरी आल्यावर तिलाही पालक कुटुंबात सामावून घेत असत. काॅलेजमधील मैत्रिणी हा वर्गात व घरात, चर्चेचा विषय असे. ती जर सहज घरी आली तर तिला घरच्यांकडून, वेगवेगळ्या भूमिकांतून पाहिले जात असे.

      April 21, 2022


  • गोडांबा @ मांडवा, अलिबाग

    गोडांब्या कडे बघूनच कोणालाही डेरेदार वृक्ष प्रत्यक्षात कसे असतात हे लगेच लक्षात येईल. भरगच्च पानांनी नेहमी बहरलेल्या गोडांब्याच्या खाली मे महिन्याच्या गर्मीत सुद्धा थंडगार वाटते. त्याच्या शितल छायेत एकदा बसल्यावर पुन्हा संध्याकाळ होईपर्यंत उठायची इच्छाच होत नाही.

      August 1, 2021


  • एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – ब

    तुम्‍हाला नवल वाटेल की फक्‍त फारसीतूनच भारतीय भाषांमध्‍ये शब्‍द आले आहेत असं नाहीं, तर संस्‍कृतमधूनही फारसीत अनेक शब्‍द गेलेले आहेत. या विषयावरील श्री. राजेश कोचर यांचे लेख माझ्या वाचनात आले आहेत. मुंबईचे श्री. प्रकाश वैद्य यांनीही मौलिक संशोधन केलं आहे (आणि थोडंफार मी स्‍वतःसुद्धां ).

      March 9, 2019