(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माझे आजोळ – भाग १ – पणजोबांचे घर (आठवणींची मिसळ २९)

    नशिबाची परीक्षा घ्यायला कोल्हापूरांत आले. ते धर्मशाळेत रहात असतांना योगायोगाने त्यांना शाहू महाराजांनी पाहिले. त्यांची चौकशी केली. पणजोबांनी आपण कुठून आलो, काय उद्देश आहे ते सांगितले. शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरांत वकिली करायची परवानगी दिली. त्यांची वकिली उत्तम चालली. कोल्हापूरांत राजकृपा आणि लक्ष्मीकृपा दोन्ही त्यांना लाभली. शाहू महाराजांच्या घरांतील कोणत्याही समारंभासाठी काव्य करण्याचे काम पणजोबांकडे होते. ते शीघ्रकवी होते. नातेवाईक-मित्र यांच्याकडील विवाहासाठी मंगलाष्टकेही ते रचत. शाहू महाराजांचा सुधारणावादी दृष्टीकोन त्यांनी लगेचच स्विकारला आणि अंमलातही आणला. त्यांनी आपल्या घरीच सर्व जातीच्या लोकांसाठी सहभोजनं घालायला सुरूवात केली. भोजनाला दरबाऱ्यांनाही आमंत्रण असे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला ही गोष्ट तितकी सोपी नव्हती. पण शाहूमहाराजांच्या कोल्हापूरांत ती शक्य झाली.

      September 24, 2022


  • मी पाहिलेला होक्काइदो – दाइसेत्सुझान (जपान वारी)

    होक्काइदो मधील पर्वतांची दुनिया ! जपानमधील सर्वात मोठे नॅशनल पार्क म्हणून प्रसिद्ध असणारे हे दाइसेत्सुझान. साधारण २ हजार मीटर (६६०० फूट) पेक्षा जास्त उंच भव्य बर्फाच्छादित पर्वत (Great Snowy Mountains) येथे पाहायला मिळतात.

      June 25, 2020


  • घरौंदा

    समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर लहान मुलं आपल्या पावलावर ओलसर वाळूचा मोठा थर थापतात. मग हळूच पाऊल काढून घेतल्यावर पावलाच्या पोकळीचं छान घरटं तयार होतं व एक ‘घर’ तयार केल्याचा त्यांना अवर्णनीय आनंद मिळतो.

      June 18, 2021


  • प्रेरणा कसदार कवितांची

    मला पहिल्यापासूनच कलेची आवड होती. विशेषतः, चित्रपट, चित्रकला आणि कविता याबद्दल मला विशेष आकर्षण वाटायचं. वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षांपासून कविता सुचायला लागल्या. तेव्हा मी आचार्य अत्रेंचे मी कसा झालो? ‘ हे पुस्तक वाचले.

      January 24, 2024


  • उगवतीच्या कळा : १

    परिस्थितीचा रेटा असायला हवा. त्यात गरिबी हवी. आत खोलवर जाऊन पोहोचलेली स्वाभिमानाची जाणीव हवी. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ईर्ष्या हवी. अडथळ्यांना न जुमानता वाट शोधण्याची दृष्टी हवी. त्यासाठी सभोवतालचा अंदाज घेत कल्पकतेनं उडी मारण्याची आणि उभारी घेण्याची मनाची तयारी हवीच हवी. मग काय होतं?

      October 11, 2020


  • एक परीस स्पर्श ( भाग – २० )

    आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे विजय सूक्ष्म निरीक्षण करत असल्यामुळे त्याला कळले की बऱ्याचदा त्याच्या आयुष्यात अचानक काही गोष्टी घडतात आणि त्याच्यावर येणारे संकट टळते. कारण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी देवाला नाही तर आपल्या प्रारब्धाला गृहीत धरले. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी विनाकारण घडत नाहीत यावर विजयचा आजही विश्वास आहे म्हणूनच तो कोणत्याही परिस्थिती स्थिर असतो.

      February 26, 2022


  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ७ )

    कै. आनंद यादव सरांना मी ओळखत होतो पण त्यांची प्रत्यक्षात कॉलेज संपल्यावर कधी भेट झाली नव्हती. पुण्यात मराठी साहित्य परिषदेत एका कार्यक्रमात मी मुद्दाम कै. प्रा.आनंद यादव सरांची आवर्जून भेट घेतली. सातारच्या जुन्या आठवणींची उजळणी झाली.

      May 31, 2021


  • ठाणे ते कल्याण

    तो तरूण त्याच्याच तंद्रीत होता, कल्याण आलंय आता ऊठुन उतरायला पाहिजे याचे त्याला भानच नसल्यासारखा तो बसून होता. त्याच्या खांद्यावर थाप मारून मित्रा कल्याण आलेय उतरायचे नाही का असं बोलावंसं वाटलं. त्याच्या दिशेन पुढे जाणार इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली.

      December 31, 2021


  • बदलत्या चलनाच रूप

    एकदा पहाटे लवकर जाग आली आणि पाहतो तर समोर साक्षात भगवंत, म्हणालो पावलो रे भगवंता. भगवंत म्हणाले तुझी फालतू बडबड ऐकायला आलेलो नाही कायम रडत असतोस धर हे कार्ड, तुला काय हवे ते तू खरेदी कर पण तुझ्या कष्ठाच्या पैशानेच. मग म्हटलं असेल स्वप्न पण कार्ड हातात होत नंतर भगवंत निघून गेले.

      August 7, 2010


  • एका चिमण्याची गोष्ट

    (काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह झालेल्या पाऊसात एक झाड जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. सहज निरखून पहिले, एक चिमणा हि जमिनीवर पडलेला दिसला. मनात विचार आला, कसे गेले असेल त्याचे आयुष्य ....

    वासंतिक वार्यात एका अनामिक गंधाने बैचैन होऊन चिमण्याणे घरट्यातून उड्डाण भरली. आकाशात विहरताना त्याला त्याची चिवताई भेटली. दोघांनी एका दुसर्याकडे पहिले. चिमण्याला पाहून चिवताई गालात हसली. जणू जादूच झाली. क्षणभरातच ते जगाला विसरले. एका दुसर्याच्या पंखात पंख घालून आकाशात विहार करू लागले. आकाशात विहरताना त्यांना एक वडाचे झाड दिसले. वडाच्या झाडने हि पाने हलवीत त्यांचे स्वागत केले. वडाच्या झाडाच्या एका फांदीवर त्यांनी एक घरटे बांधले. अश्यारितीने चिमणा चिमणीचा संसार सुरु झाला.

    पण संसार काही पोरखेळ नव्हे. कित्येकदा वादळामुळे त्यांचे घरटे नष्ट झाले. चिवताईने दिलेली अंडी नष्ट झाली. तर कधी-कधी आकाशात उडणार्या ससाण्याची नजर त्यांच्या घरट्यावर पडली. डोळ्यांदेखत त्यांच्या छोट्या पिल्लांची कत्तल झाली. सर्व संकटांमध्ये एका-दुसर्याची साथ देत मोठ्या जिकरीने चिमणा संसाराची गाडी पुढे रेटू लागला. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. चिमण्याचे घरटे पिल्लांच्या चिव-चिवने गुंजायमान झाले. चिमणा दूर-दूर जाऊन पिल्लांसाठी जेवण घेऊन येत असे. घरट्यात चिवताई हि डोळ्यांत तेल घालून पिल्लांची देखरेख करीत असे. पिल्लांच्या लालन-पालन करण्यात त्यांचा वेळ कसा गेला त्यांना हि कळले नाही. काळ पुढे सरकत गेला. त्यांची पिल्ले मोठी झाली. त्यांना पंख फुटले. शेवटी त्यांच्या अथक कष्टाचे फळ त्यांना मिळाले, असे चिमण्याला वाटले.असेच एका वासंतिक दिवशी त्यांची पिल्ले घरटे सोडून नेहमीसाठी उडून गेली. आता घरट्यात चिमणा आणि चिवताई दोघेच उरले. संसाराच्या कडू आणि गोड त्यांच्या सोबत होत्या. एक दिवस अचानक चिवताई हि चिमण्याला नेहमीसाठी सोडून गेली.

    वडाचे झाड हि आता म्हातारे झाले होते. झाडाचा बुंधा हि वाळवींनी पोखरून टाकला होता. उरल्या होत्या फक्त काही वाळक्या फांद्या. सर्व पक्षी झाडाला सोडून निघून गेले होते. फक्त चिमणाच त्या झाडावर उरला होता. एक दिवस वडाचे झाड चिमण्याला म्हणाले, तू हि येथून निघून जा, माझा काही भरवसा नाही. पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे, आकाशात विजा चमकतात आहे. या वयात वादळ-वार्या समोर माझा टिकाव लागेल, काही सांगता येत नाही. चिमणा म्हणाला, याच झाडावर माझी पिल्ले लहानाची मोठी झाली. झाडाच्या फांदी-फांदीवर संसाराच्या आठवणी दडलेल्या आहेत. चिवताईच्या सोबत घालविलेल्या सुखद आठवणी... कसा सोडून जाऊ मी तुला.

    त्याच रात्री जोरात वादळ आले, मुसळधार पाऊस सुरु झाला. झाड उन्मळून खाली पडले. त्या सोबत चिमणा हि खाली पडला. त्याने डोळे बंद केले. दूर आकाशात चिमण्याची चिवताई त्याला बोलवीत होती. किती वाट पहिली तुझी.... चिमणा तिच्याकडे बघून हसला आणि त्याने डोळे बंद केले. काही क्षणात दोघे पुन्हा एका दुसर्याच्या पंखात पंख घालून आकाशात विहार करू लागले. कधी न विलग होण्यासाठी.....

      August 25, 2016