नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नसा काढल्या मुळे, पायांना ही टाके लागलेले. संपूर्ण शरीलाला मुंग्या चावल्या वर जश्या वेदना होतात, तश्या वेदना. अश्या परिस्थितीत रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन ही झोप येणे शक्य नाही. सकाळची वाट पाहण्या शिवाय गत्यंतर काय?
July 23, 2014
देशभर मी कार्यक्रम करत होतो. पण परदेशातील कार्यक्रमांबद्दल सिंगापूर व्यतिरिक्त फार काही घडले नव्हते. काही आयोजकांकडून ऑफर्स आल्या पण त्यांच्या कार्यक्रमांचा स्तर मला पटत नव्हता. शिवाय त्यांना कमीत कमी तीन महिन्यांचा दौरा करायचा होता. इतके दिवस म्युझिक अॅकॅडमी बंद ठेवणेही मला शक्य नव्हते. एकूण काय हवे तसे काही घडत नव्हते. पण प्रयत्न मात्र मी करतच होतो. याबाबतीत टोमॅटो सॉस इफेक्ट मला पाहायला मिळाला. टोमॅटो सॉस आपण बाटलीतून डिशमध्ये घ्यायला गेलो की दोन-चार वेळा प्रयत्न करूनही एक थेंबही पडत नाही. पण पुन्हा पुन्हा प्रयत्न केला की एकदम भरपूर सॉस डिशमध्ये पडते. काही वर्षे प्रयत्न करूनही काही घडले नाही आणि एक दिवस ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न महाराष्ट्र मंडळातून फोन आला. या महाराष्ट्र मंडळाला पंचवीस वर्षे पूर्ण होत होती. त्यासाठी सप्टेंबरमध्ये त्यांना कार्यक्रम हवा होता. यासाठी माझ्या विद्यार्थिनी वंदना परांजपे आणि त्यांचे पती चंद्रशेखर परांजपे यांची मोलाची मदत झाली. हा ऑडिटोरियम शो म्हणजे जाहीर कार्यक्रम असल्यामुळे मला आर्टिस्ट व्हिसा ची गरज होती. यासाठी मला ऑस्ट्रेलियन एम्बसीच्या नवी दिल्ली येथील ऑफिसला जायचे होते. बऱ्याच कागदपत्रांची पूर्तता मेलबोर्न महाराष्ट्र मंडळाने केली होती. मला फक्त कागदपत्रांच्या आधाराने मी गायक कलाकार असल्याचे सिद्ध करायचे होते. काम कठीण होते. माझे गाणे त्यांना कळणार नव्हते. मी त्यांना सीडीचे कव्हर फोटोज दाखवले. तरी त्यांना फारसे पटत नव्हते. मग मी त्यांना ऑल इंडिया रेडिओची सव्वादोनशे आणि दूरदर्शनची शंभरपेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्टस दाखवली. मग त्यांची खात्री पटली आणि त्यांनी आर्टिस्ट व्हिसा देण्याचे मान्य केले. माझा ऑस्ट्रेलियातील कार्यक्रमांचा मार्ग मोकळा झाला. गिरीश कंदलकर हा माझा व्हिजेटीआयचा इंजिनीयर मित्र ऑस्ट्रेलियात होता. मी मेलबोर्नमध्ये त्याच्या घरी राहणार होतो. तेथील थंड वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्याने कार्यक्रमाआधी पाच दिवस येण्याचे सुचवले. त्यानुसार १८ सप्टेंबर २००५ रोजी मी ऑस्ट्रेलियाकडे निघालो. अनेक वर्षांच्या मेहनतीचे हे फळ होते. क्वांटाज या ऑस्ट्रेलियन एयरलाईनचे विमान भव्य होते. या विमानातच केंद्रीय अर्थमंत्र्यांचे वित्तीय सहाय्यक श्री. मॉनटेकसिंग अहलूवालिया प्रवास करत असल्याचे मला समजले. मी त्यांची भेट मागितली. आश्चर्य म्हणजे त्यांनीही लगेचच भेटायला बोलावले. ते एका कॉन्फरन्ससाठी सिडनीला चालले होते.
“तू काय करतोस?" त्यांनी विचारले.
“मी गायक आहे, गाण्याच्या कार्यक्रमांसाठी ऑस्ट्रेलियाला निघालो आहे." मी म्हणालो.
“मी काही कोणी फिल्मस्टार नाही. तू कसे काय मला ओळखलेस? " त्यांनी प्रश्न केला.
"सर, मी गायक असलो तरी एक इंजिनीयर आहे आणि शेअर मार्केटमधील एक इन्व्हेस्टर आहे. आपल्याला अनेक टीव्हीच्या चर्चासत्रांमध्ये मी ऐकले आहे. आपल्याला प्रत्यक्ष भेटतो आहे हे माझे नशीबच म्हणावे लागेल."
“कमाल आहे! एक गायक शेअर मार्केटमधील इन्व्हेस्टर आहे याचा अर्थ आपला देश प्रगतीपथावर आहे असेच म्हणावे लागेल." ते गमतीने म्हणाले. त्यांचा निरोप घेताना मी म्हणालो,
“दिल्लीच्या जमिनीवर आपली भेट केवळ अशक्यच होती. पण आकाशात ती शक्य झाली." ते हसून म्हणाले, "वेल सेड. माझा एक सल्ला लक्षात ठेव. गाण्याच्या किंवा शेअर मार्केटमधील यशामुळे कितीही वेळा आकाशात फिरलास तरी जमिनीवरचे पाय कधी सोडू नको. नियती कधी जमिनीवर आणेल ते सांगता येत नाही.”
सिडनीला विमान बदलून तब्बल सोळा तासांच्या प्रवासानंतर मेलबोर्नला पोहोचलो. एअरपोर्टवर माझा मित्र गिरीश कंदलकर याने माझे स्वागत केले. अनेक वर्षांनंतर आम्ही भेटत होतो. बॅग्ज घेऊन सुमारे एक तासाने त्याच्या घरी पोहोचलो आणि लक्षात आले की माझा पासपोर्ट, व्हिसा आणि ऑस्ट्रेलियन डॉलर्स असलेली बॅग मी घाईघाईने एअरपोर्टवरच विसरलो होतो. अनेक वर्षांनी जवळचा मित्र भेटल्यामुळे त्याच्याशी बोलण्याच्या नादात मी फार मोठी चूक केली होती. तातडीने आम्ही एअरपोर्टला पोहोचलो. सुदैवाने ट्रॉलीज जमा करणाऱ्या कर्मचाऱ्याने माझा पाऊच पोलिसांकडे दिला होता. पोलिसांनी आतील गोष्टींची छाननी केल्यानंतर माझा पासपोर्ट आणि पैसे परत मिळाले आणि माझा जीव भांड्यात पडला. मला विमानातील श्री. मॉनटेकसिंग यांचे शब्द आठवले. नियतीने मला विमानातून अक्षरशः जमिनीवर आणले होते. यापुढील सर्व परदेश प्रवासात मी पासपोर्ट आणि पैसे प्राणपणाने जपतो.
मेलबोर्नमध्ये एकाच दिवशी तीनही ऋतूंचा अनुभव येतो. सकाळी ऊन असते. दुपारी थोडा पाऊस पडतो, तर रात्री कडाक्याची थंडी असते. तेथील वातावरणाशी जमवून घेण्यासाठी कार्यक्रमापूर्वी काही दिवस तिकडे येण्याचा गिरीशचा सल्ला अगदी योग्य होता. शिवाय वादक कलाकार मला मेलबोर्नमध्येच मिळणार होते. तेथील लोक कोणती गाणी पसंत करतात याचाही आढावा मी घेतला. २५ सप्टेंबर २००५ रोजी मेलबोर्न महाराष्ट्र मंडळाच्या रौप्यमहोत्सवात एका भव्य सभागृहात मी कार्यक्रम सादर केला. गाणी सादर करताना त्या गाण्यांशी निगडित काही किस्सेही मी रसिकांना ऐकवले. एकूण कार्यक्रम खूपच रंगला. स्टेजवरील कार्यक्रमांची पोचपावती लगेचच मिळते. मला अनेक मैफिलींसाठी निमंत्रणे आली. ऑस्ट्रेलियाजवळील फिजी या बेटावरील अनेक मंडळी ऑस्ट्रेलियात राहतात. हे सर्व लोक हिंदी गझल आणि भजनांचे चाहते आहेत. त्यांच्या क्लबने लगेचच माझी गझल संध्या आयोजित केली. त्याचबरोबर श्री. अजित निमकर, शिरीष बागुल, डॉ. बेट्टीगिरी, समीर आणि विनिता हर्डीकर, अरुण आणि राजश्री साने यांच्यासाठी देखील मी कार्यक्रम केले. माझा मित्र गिरीश आणि त्याची पत्नी अल्पना यांनी उत्तम आदरातिथ्य केले. गिरीशबरोबर अनेक रात्री गप्पांत रंगल्या. उमा परांजपे आणि सुभाष परांजपे यांच्या घरीदेखील मी काही दिवस होतो. सुभाष परांजपे हे स्वतः क्रिकेटचे अंपायर म्हणूनही काम करत होते. त्यांच्याबरोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध रेस्ट ऑफ वर्ल्डची क्रिकेट मॅचदेखील मी पाहिली. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. भावे यांचादेखील मी आभारी राहीन. ऑस्ट्रेलियाला निघताना माझ्या हातात फक्त एक कार्यक्रम होता. पण मेलबोर्नमध्ये मी सात कार्यक्रम केले. नंतर सिडनीला गेलो. तेथेही एक कार्यक्रम करून मी मुंबईकडे निघालो. ऑस्ट्रेलियाचा माझा दौरा अपेक्षेबाहेर यशस्वी झाला. या दौऱ्याच्या गोड स्मृती माझ्या मनात कायम राहतील. लवकरच घरी परतलो आणि १४ ऑक्टोबरला माझा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा केला.
जवळजवळ महिनाभर मी ऑस्ट्रेलियात असल्यामुळे अनेक कार्यक्रमांच्या रिहल्सल्स माझ्यामुळे खोळंबल्या होत्या. त्या वेगाने सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात मी गझलच्या कार्यक्रमांसाठी इंदूर आणि दिल्लीला जाऊन आलो. संस्कार भारतीसाठी एक कार्यक्रम केला.
-अनिरुद्ध जोशी
August 3, 2022
दुपारची उन्ह करकर तापली होती. रेल्वे स्टेशनच्या दादऱ्याखाली, ते दोन मळक्या, फाटक्या कपड्यातले भिकारी सावली धरून बसले होते. नुकतीच बाराची प्यासिंजर निघून गेली होती. ‘धंद्याच्या’ दृष्टीने त्यांचा हा ‘भाकड’ पिरेड होता. त्या मुळे ते दोघे ‘सुख -दुःखाच्या’ गप्पा मारत असावेत असे, पहाणाऱ्यांना वाटत होते. आणि ते खरे हि होते. ज्यास्त कमाई(विना सायास ) म्हणजे ज्यास्त सुख हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते! हाच त्यांच्या गप्पांचा विषय पण होता.
July 16, 2019
सोशल मीडिया आल्यापासून काही नतद्रष्ट लोकांनी चंगच बांधलेला आहे की आपल्याला एक ही सण आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने करू द्यायचा नाही. हे लोक इतर वेळेस झोपलेले असतात पण एखादा सण आला की यांना जाग येते आणि मग पोस्ट सुरु होतात.
August 6, 2022
मराठी भाषेचं सौष्ठव अधोरेखित करण्याचं काम करणारी आणि मला कायम स्तिमित करणारी चार व्यक्तिमत्वं म्हणजे ज्ञानोबा माउली, समर्थ रामदास, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि श्री. दा. पानवलकर ! या मंडळींच्या लेखणीतून व्यक्त होणारी मराठी काही औरच ! तुम्ही -आम्ही बोलतो ती मराठी त्यांच्या भाषेपेक्षा वेगळीच वाटते.
January 4, 2021
त्या नंतर काही दिवसांनी माझा आवाज फुटायला लागला. म्हणजे लहानपणी मुलगे स्त्रियांच्या पट्टीत गातात. पण नंतर मुलांची पट्टी बदलते. त्यावेळी असे होते की, कोणत्याही सुरात नीट गाता येत नाही. सगळ्या मुलांना या अवस्थेतून जावे लागते. आपल्याला बहुतेक आता गाणे गाता येणार नाही की काय अशी गोंधळलेली अवस्था निर्माण होते. यावेळी नशिबाने एक अतिशय उत्तम घटना माझ्यासाठी घडवली. सुप्रसिद्ध कविवर्य पी. सावळाराम माझ्या वडिलांचे मित्र होते. अनेकदा ते आमच्या घरी येत असत. एकदा रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचा फोन आला आणि थोड्याच वेळात सुप्रसिद्ध गायक श्री. सुधीर फडके यांना घेऊन ते आमच्या घरी आले. ठाण्यात एका कार्यक्रमासाठी बाबूजी आले होते. घरात एकदम गडबड उडाली. झोपण्याच्या तयारीत असलेले आमचे घर खडबडून जागे झाले. मी तर झोपलोच होतो. आईने मला उठवून ही बातमी दिली. मला अत्यंत आनंद आणि अतिशय दुःख झाले. आनंद यासाठी की, मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ख्यातनाम अशा संगीतकाराला आणि गायकाला आता आपण प्रत्यक्ष भेटणार आणि दुःख यासाठी की, त्यांना आपण चार ओळीदेखील गाऊन दाखविण्याच्या परिस्थितीत नाही. तसाच धावत जाऊन त्यांना नमस्कार केला. पी. सावळाराम दादांनी मला गाणे येत असल्याचे सांगितले आणि बाबूजींनी लगेच एखादे गाणे म्हणायला सांगितले. मी काय गाणार? रडायलाच लागलो. आईने माझा आवाज फुटायला लागल्याचे सांगितले. बाबूजींनी मला जवळ बसवले. ते म्हणाले, “काळजी करू नकोस. माझाही आवाज त्या वयात फुटला होता. आता मी छान गातो की नाही? फक्त या काळातही जमेल त्या सुराच्या पट्टीत ‘सारेगमपधनीसां'चा रियाज सुरू ठेव. तुझा आवाज बदलला आहे. त्यावर ताण देऊ नकोस, पण रियाज मात्र करीत राहा. हळूहळू आवाज एका सुराच्या पट्टीत स्थिर होईल. एक लक्षात ठेव, आत्तापर्यंत केलेला रियाज फुकट जाणार नाही. किंबहुना त्यामुळेच पुन्हा चांगले गाता येऊ लागेल. तेव्हा रियाज सुरू ठेव." माझ्या गोंधळलेल्या अवस्थेतील मनामध्ये त्या महान गायकाने पुन्हा उत्साह भरला. त्यांची साधी राहणी, अत्यंत नम्र बोलणे माझ्या मनावर विलक्षण परिणाम करून गेले.
- अनिरुद्ध जोशी
June 25, 2022
टाइम मशीनची थिअरी तोवर सिद्ध होणार नाही किंवा आम्ही मान्य करणार नाही, जोवर मागील किंवा पुढील काळात गेलेली व्यक्ती आजच्या काळात परत येऊन तिचे अनुभव पुराव्यानिशी सादर करीत नाही.” टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. देवाशीष रॉय आपले भाषण संपवून प्रेक्षागृहातील श्रोत्यांवर अभिमानाने नजर फिरवीत आसनस्थ झाले.
January 27, 2024
चित्रपटाच्या जगात यशासारखे महत्वाचे आणि सुंदर अथवा मोलाचे असे काहीही नाही. तो ‘सेन्ट्रल पॉईंट’ (लक्षवेधक गोष्ट) आहे. अर्थात, सगळेच चित्रपट, सगळेच कलाकार यशस्वी ठरतात असे अजिबात नाही.
April 12, 2024
वृद्धापकाळी आईवडिलांचा सांभाळ करणाऱ्या मुलांना व्यवसायानिमित्त त्यांच्या पासून दूर राहण्याची गरज पडते. वृद्ध आईवडिलांची खरोखरीच मुलांनी काळजी घेतली तर “वृद्धाश्रम” चालवण्याची गरजच भासणार नाही. पण अशी मुले किती? स्वतःची मुले घरापासून दूर राहत असली की आईवडील त्यांची काळजी करत असतात, “काय करत असेल माझे मूल? अनोळखी गावी कुठे राहत असेल?” अशी चिंता आईवडील करतच असतात. परंतु मुले स्वतःच्या आईवडिलांची काळजी करतात का? संत पुनित महाराजांनी तर असे म्हटले आहे की, “बाकी सगळे विसरा, पण आईवडिलांना विसरू नका”.
November 30, 2016
एक राजा होता. तो फारच चिकित्सक होता. त्याला थोडी जरी शंका आली तरी तो ती शंका लगेच विचारी व शंकेचे निरसन झाल्याशिवाय तो स्वस्थ बसायचा नाही. त्यामुळे त्या राजाबरोबर गप्पा वा चर्चा करायला सहसा कोणीही तयार होत नसत. त्या राजाचे जे राजगुरू होते, त्यांना मात्र राजाची या स्वभावाची पूर्ण कल्पना होती. राजाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी अनेकदा तेच पुढाकार घेत असत. एकदा राजा धर्मगुरूबरोबर चर्चा करीत असताना परमेश्वराचा विषय निघाला. ईश्वर कसा सर्वत्र असतो व तो संकटकाळी आपल्या भक्ताला कसा प्रत्यक्ष येऊन वाचवितो हे धर्मगुरूंनी अनेक उदाहरणांसह राजाला पटवून सांगितले. त्यावर राजाने संकटसमयी परमेश्वर आपल्या भक्ताला कसे वाचवितो? तो नेमके काय करतो? याबद्दल निरनिराळ्या शंका व्यक्त केल्या. त्याच्या सर्वच शंकांना धर्मगुरुंना उत्तर देता आले
नाही म्हणून ते राजगुरुकडे गेले. राजाचे शंकानिरसन करण्यासाठी राजगुरूंनी प्रत्यक्ष कृतीच करायचा निर्णय घेतला. त्या राजाला एक नातू होता. तो फारच सुंदर व हुशार होता. त्यामुळे राजाचा फार आवडता होता. दुसऱ्या दिवशी राजगुरू राजाला घेऊन उपवनात फिरायला गेले. आजूबाजूला पहाऱ्याचे सैनिक होतेच. तेथे राजाला तलावाच्या ठिकाणी पाठमोरा बसलेला आपला नातू दिसला. म्हणून राजा घाईघाईने
तलावाकडे निघाला. तेवढ्यात त्याला त्याचा नातू तलावात पडल्याचे दिसले. नातवाला पोहता येत नाही, हे राजाला माहीत होते, त्यामुळे त्याने स्वतः पळत जाऊन तलावात उडी टाकली व आपल्या नातवाला बाहेर काढले. वास्तविक तो नातवासारखा दिसणारा मेणाचा पुतळा होता. परंतु राजाने त्याला खरा नातू समजून त्याला वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली होती. नंतर सर्व प्रकार समजल्यानंतर राजगुरू राजाला म्हणाले, परमेश्वर आपल्या भक्ताला म्हणजे आपल्या आवडत्या माणसाला संकटातून कसे वाचवितो याचे कोडे तुम्हाला पडले होते ना?
त्याचे उत्तर देण्यासाठी आम्हाला हे सर्व नाटक करावे लागले. उपवनात आजूबाजूला एवढे शिपाई असताना तुम्ही एकाही शिपायाला आदेश न देता नातवाला वाचविण्यासाठी तलावात स्वत: उडी मारली. यावरून परमेश्वर आपल्या भक्ताचे कसे रक्षण करतो हे तुम्हाला कळलेच असेल. राजाचे समाधान झाले व पुढे त्याच्या शंकेखोर स्वभावाला आळाही बसला.
December 29, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti