(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • उगाच काहीतरी – १

    काल बऱ्याच वर्षांनी शाळेतला मित्र भेटला. फॉर्मालिटी प्रमाणे जुन्या गोष्टी, आठवणी झाल्या. बऱ्याच गप्पा झाल्या.
    त्याला विचारलं
    " काय करतोस आजकाल?"
    " आय हॅव क्वाईट ए फिव व्हेंचर्स ऑफ माय ओन"
    " हं..ग्रेट. म्हणजे एंटरप्रेन्युर झालायेस एकुण. " - मला कौतुक वाटलं.
    "आंत्रप्रन्योर...आंत्रप्रन्योर"
    " ते शरद तांदळे यांचं पुस्तक ना. त्याची पण एजन्सी आहे का तुझी. वाह! छान"
    " अरे बावळट ( खरं म्हणजे त्याने त्याच अर्थाचा शुद्ध तुपात तळलेला आणि साखरेत घोळलेला ' च ' च्या बाराखडीने सुरु होणारा शब्द वापरला होता पण इथे तो देता येत नाही. ) इट्स आंत्रप्रन्योर, नॉट एंटरप्रेन्युर . डोन्ट स्पॉइल द वर्ड्स मॅन"
    " अच्छा. ओके. लक्षात ठेवेन यापुढे"
    हा माणूस सतत इंग्रजीतच बोलत होता पण शिव्या मात्र मराठीतूनच देत होता. एक मात्र नक्की, इंग्रजीतल्या चित्रपटातून ऐकलेल्या ‘२- ४ शिव्या कुठे आणि मातृभाषेतला शिव्यांचा खजिना कुठे. कोणी कितीही इंग्रजाळलेला असो पण जेव्हा सिरीयसली शिव्या घालायची वेळ येते तेव्हा मातृभाषेशिवाय दुसरा पर्याय नाही.
    असो.. मग बोलत बोलत आम्ही त्याच्या कार पर्यंत आलो.
    " विच वन इज युवर्स? "
    " दॅट वन देअर" - मी माझी बाईक दाखवली
    " ओह..यु आर युजींग अ बाईक" - त्याला झालेली निराशा आणि आनंद एकत्र स्पष्ट दिसत होता.
    आम्ही त्याच्या गाडी कडे आलो.
    " वोक्सवेगन जेट्टा का?
    " अरे बावळटा ( या वेळेस त्याने पुन्हा Y आणि Z या अद्याक्षराने सुरु होणारा समानार्थी शब्द वापरला.) इट्स फॉक्स वॅगन नॉट वोक्सवेगन. डोन्ट स्पॉइल द वर्ड्स मॅन"
    आता आलेली जिवावर लपवत मी विचारलं
    " अजुन तिथेच राहतोस का?"
    " नोप! हॅव मुव्ह्ड तो वेस्टर्न लॉंग बॅक. नाऊ अॅम इन बॅंड्रा "
    " वेट अ मुमेंट. व्हॉट डिड यु से? अरे बावळटा ( मी पण मग इथे 'भ' च्या बाराखडीतला शब्द वापरला)
    इट्स वांद्रे नॉट बॅंड्रा. डोन्ट ब्लडी स्पॉईल द वर्ड्स"
    आणि गाडीला किक मारून निघून गेलो.

    – अमोल पाटील.

      August 4, 2022


  • आव्हान चिनी ड्रॅगनचे – पुस्तक परिचय

    चीनचे आव्हान दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. या आव्हानाचे सर्वंकष स्वरूप स्पष्ट करणारे तसेच या संदर्भात वस्तुस्थिती उलगडणारे तसेच देश व सहकार म्हणून आपण भोगती भूमिका घेऊन कशी पावले उचलायला हवी, यांचे सोपे मार्गदर्शन करणारे मराठीतील एकमेव महत्वपूर्ण पुस्तक.

      June 12, 2014


  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १८)

    व्यवसायानिमित्त रोज माझी महाराष्ट्रात जिथे काम असेल तिथे भ्रमंती असे. एक दिवस कामानिमित्त मी कोल्हापूरला होतो. तिथे गुरूराज प्रिंटर्स कोल्हापूरचे श्री. सतीश शिवदे यांचेकडे माझे काम सुरू होते. नातेवाईकच होते. संध्याकाळी वेळ होता म्हणून आम्ही दोघेही रंकाळ्यावर चाट (भेळ) खाण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा मला शिवदे म्हणाले ” आप्पा समोरून कोण येत आहे त्यांना ओळखले कां.? मी ओळखत नाही म्हणालो, तेंव्हा शिवदे यांनी त्या व्यक्तीला ” अहो नानासो . म्हणून हाक मारली व म्हणाले अहो आप्पा हे नाना म्हणजे ख्यातनाम विख्यात गीतकार जगदीश खेबुडकर आहेत.

      June 11, 2021


  • जनस्थान : नाशिकविषर्या लोककथा

    अगस्ती मुनी यांना दक्षिण भारतातील प्रबळ राक्षसांचा नाश करण्यासाठी व ऋषीमुनींना आश्रय देण्यासाठी उत्तर भारतातून ब्रह्मा, विष्णू महेश यांना दक्षिण भारतात पाठवतात. तेव्हा महादेव म्हणतात की, “मी गोदाकाठच्या पंचक्रोशीत जनस्थान या ठिकाणी ‘कपालेश्वर’ या नावाने प्रकट होईन” आणि विष्णूने वचन दिले की, “मी रामअवतारी तुमच्या भेटीला येईन.

      November 15, 2025


  • बालकाच्या बुद्धीचा विकास कसा व केव्हां !

    रस्त्याने एक फलक बघीतला. चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले होते. निरनिराळे वयोगट व त्यानी रेखाटलेली चित्रे यांची यादी …..

      October 25, 2012


  • ही गुलाबी हवा (ललित)

    ही गुलाबी हवा साक्षात चराचराला मोहजालात फसवू लागली.तिची माया प्रेमी युगलांना मोहजालात फसवूू लागली. रजईची उब,शेकोटीची उब,मायेची उब,दोहडची उब . सारं सारं फिके पडले. सगळीकडे एकच एक नशा होती ती या ,”गुलाबी हवेची”

      December 30, 2019


  • रि युनियन

    संध्याकाळी एका हॉलमधे जमून, आमच्यातील वयाने सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात लहान अशांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्वप्रथम दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर आमच्या बॅचमधील एकूण तिघांपैकी, जे PSI झाल्यावरही पुढे स्पर्धा परीक्षा देऊन, आय पी एस होऊन Additional Director General of Police या अतिउच्च पदावरून निवृत्त झाले, त्यापैकी उपस्थित दोन, त्याचप्रमाणे बॅचमधील पदक विजेते अधिकारी, यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. त्यानंतर हॉटेलच्या lawn वर टेबल्स लाऊन snacks, Karaoke, गप्पा, थट्टामस्करी, रात्रीचे जेवण इ. ११.३० पर्यंत चालले.

      June 4, 2022


  • आज मात्र माझी सटकली.. (मी आणि ती)

    आज मात्र माझी सटकली.. आमचे लग्न ठरत होते, सांगून आली होती.. म्हटले आधी भेटावे आमचीच जातवाली मच्या घरी जातवालीच हवी ना.. मिळाली एकदा

      July 4, 2021


  • ००७ जेम्स बॉन्डला सर्वप्रथम पडद्यावर आणणारा….

    ००७ जेम्स बॉन्डला सर्वप्रथम पडद्यावर आणणारा….

    तुम्हा सर्वानाच जेम्स बॉन्ड साकारणारे सर्वच अभिनेते माहित आहेत. मात्र “शॉन टेरेन्स यंग‘’ हे नाव कदाचित आठवणार नाही. यंग हा सुरूवातीच्या तिनही बॉन्डपटाचा दिग्दर्शक होता. डॉ. नो(१९६२), फ्राम रशिया विथ लव्ह (१९६३ ) आणि थडंर बॉल(१९६५) हे तिनही बॉन्डपट तुफान गाजले.

      September 9, 2018


  • नक्षत्रांची वेल

    नेहमीच्या सवयीनं डोअरबेल वाजवण्यासाठी , नंदिनीनं हात वर केला , पण बेल न वाजवता ती तशीच उभी राहिली . बेल वाजवावी की पुन्हा लिफ्टनं खाली जावं ? तिनं गोंधळलेल्या मनालाच प्रश्न विचारला .

    आणि तसंही आता खाली जाऊन काय उपयोग ? तो रिक्षावाला एव्हाना गेटमधून दूर गेलासुद्धा असेल. आपण उगीच बोललो त्याला. तो काय म्हणत होता हे ऐकून घ्यायची आपल्या मनाची तयारीसुद्धा नव्हती. अक्षरशः हाकलून दिल्यासारखं केलं आपण . असला कसला आपला संताप ? समोरच्याचं ऐकून न घेण्याइतका संताप ? छे ! चुकलंच आपलं . नंदिनी अस्वस्थ झाली .

      November 8, 2021