नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
२० एप्रिल २०१६. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. प्रियांका, शर्वरी आणि केतकीला अनेक कामे करायची होती. मलाच कोणतेही काम नव्हते. अनेक विचार मनात येत होते. पण मी स्वतः ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो.
August 23, 2022
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे एकदा असेच रानावनातून चालत जात असताना, पुढे चालात असलेल्या ज्ञानेश्वरांच्या पायाशी त्यांना एक सोन्याची अंगठी दिसते. संन्यस्त असल्याने, सोन्याचा मोह आपल्या अजून "लहान" असलेल्या बहीणीला होवू नये म्हणून ज्ञानदेवांनी त्या अंगठीवर अगदी सहजपणे पायाने माती घातली आणि पुढे चालत गेले.
मागून येत असलेया लहानशा मुक्ताला संशय आला आणि तीने ते काय आहे ते माती बाजूला सारून पाहीले. तीला कळले की ज्ञानेश्वराचा आपल्यावर विश्वासा नाही.
ती शांतपणे म्हणाली की "ज्ञानदेवा, संन्याशाला सोने आणि माती समान असताना, तू या कृतीतून "मातीवर मातीच" नाही का टाकलीस? का सोन्यात आणि मातीत तुला फरक करता येत नाही?".
-- दीपक गायकवाड
March 16, 2017
अमेरीकेला कांही महीने राहण्याचा योग आला होता. मुलाकडे गेलो होतो. छोटेसे, सुंदर आणि अद्यावत शहर. नदीच्या तीरावर वसलेले सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य. फक्त एकच खंत जाणवत होती. ती म्हणजे मन मोकळे करुन गप्पा मारण्यासाठी कुणी मित्र नव्हते. येथील लोक त्यांच्या आपसांत देखील गप्पा मारताना दिसत नव्हते. बागेत एकटे वा एखादा लहानसा कुत्रा बाळगणे. कुणाशी ही न बोलणे. नजरा नजर झालीच तर हाय म्हणणे. एकदम एकलकोंडे. स्वतःमध्येच राहून मनाला बंदीस्त कप्यात ठेवण्याची, कुणीही कांही न बोलण्याची विलक्षण स्वभाव शैली, ह्याना जमलेली असते. आपण भारतीय गप्पा मारणे, मन मोकळे करणे, नको त्या चौकशा करीत समर्थानाचे मार्ग शोधण्यात तरबेज असतो. " एक हात लाकूड, त्याची दहा हात धलपी " ह्या प्रमाणे वेळ घालविण्याची कला साध्य केलेले.
निवृत्तीचे वय. सकाळ संध्याकाळ फिरावयास जाणे. अचानक बागेमध्ये माझ्याच वयाचे एक गृहस्थ डॉ. सुब्बुराज भेटले. दक्षिण भारतातले प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले. एकमेकाचा परिचय झाला. ते पण थोड्याश्या काळाकरीता त्यांच्या मुलीकडे आले होते. विचारांची देवान घेवन झाली. थोड्याच वेळांत लक्षांत आले की आमची वैचारीक बैठक, विषय आवडी निवडी बऱ्याचशा मिळत्या जुळत्या आहेत. वेव्ह लेंग्थ जमली म्हणतात तसे झाले. मुख्य म्हणजे दोघेजण भारतीय असून मित्र व मन मोकळे करण्यासाठी कुणाच्या तरी सहवासाची गरज पूर्ण झाली. दोघेही आनंदी व समाधानी झालो. वेळ ठरवून दररोज भेटू लागलो. वेळ खूप मजेत जात होता. दोघांजवळ पाठीशी जीवनामधल्या प्रचंड अशा अनुभवाचे गाठोडे होते. शिवाय अध्यात्म, समाजाची कुटूंबाची बदलत चाललेली रचना वा घडी ह्यावर बोलत असू. शिक्षण क्षेत्रामध्ये होत जाणारे बदल, राजकारण अर्थकारण ह्यात होणाऱ्या प्रचंड उलाढाली, वातावरणामधले बदल इत्यादी एक नाही अनेक विषय प्रसंगानुसार हाताळले जात होते. चर्चा होत होती. मतासाठी आग्रह होत होता. दोघांचे ही अनुभव मनाला चटका देणारे, रोमांचकारी, हसवणारे, राग आणणारे, निसर्ग वा ईश्वर अप्रतीम अस्तित्वाची जाणीव देणारे होते. आगदी थोड्याशा काळांत दोघानाही एकमेका बद्दल अस्था आदर व सहवासाचे प्रेम वाटू लागले. भेटण्याची वेळ ह्याची उत्सुकता होवू लागली. वेळेचे बंधन नसल्यामुळे पूर्ण आनंद उपभोगला जाई. कधी बागेत, कधी नदीकिनारी, जात असू. वृद्धापकाळी जे लागते ते मिळू लागले. चांगली हवा, चांगले जेवण, चांगली बौद्धीक चर्चा, शरीराला तजेले करणारे फिरणे, सारे आनंदी व समाधानी चालले होते.
अचानक कौटूंबीक वैयक्तीक कारणास्तव त्याना भारतात परत जावे लागले. ते माझा प्रेमाचा व निराशमय निरोप घेऊन ते निघून गेले.
नदीकिनारी खडकावर बसलो होतो. नदीला पूर आलेला होता. ती दुथडी भरुन वाहत होती. मन खिन्न झालेले होते. कसलीतरी निराशा मनाला बेचैन करीत होती. डॉ. सुबुराज ह्यांचा अचानक परीचय झाला. फार थोड्या दिवसाचा त्यांचा सहवास लाभला. त्या सहवासाची तिवृता, ओढ, आपूलकी, आदर, वैचारीक प्रेमाची देवाण घेवाण, ही हा छोटासा काळ आम्ही अनेक वर्षे एकत्र होतो ही जाणीव होत होती. सहवास किती काळ असावा ह्यापेक्षा कसा असावा हेच महत्वाचे ठरते.
माझे लक्ष वेधले गेले ते दुर अंतरावरावरुन दोन दिशानी पाण्यांत वाहात येणाऱ्या दोन लाकडाच्या ओंडक्याने. पाण्याच्या लाटांनी दोन्ही ओंडके जवळ आणले. एकमेका जवळ आले. प्रवाहा मध्ये बरेच अंतर ते एकत्र राहून वाहात होते. अचानक पाण्याच्या उसळणाऱ्या लाटेने त्यांना वेगळे केले. दोघांचीही दिशा व प्रवाह बदलले. ते वेगळ्या दिशेने निघून गेले. नजरेच्या टापू आड झाले.
निसर्ग, वातावरण, परिस्थीती ही अशीच आपल्याशी खेळ खेळत असते. जीवनाच्या टप्यावर प्रत्येकजण एकमेकास भेटतो. सह चालतो. आणि एक दिवस दुर निघून जातो. पाण्याचे अस्तित्व, लाटांचे वाहणे, आणि ओंडक्यांचे अवलंबून असणे, ह्याची जर खऱ्या अर्थाने जाणीव झाली तर जीवनचक्राचे ज्ञान झाले म्हणावे लागेल. त्यांत नसेल निराशा, न खंत, न दुःख. फक्त एक सत्य अनुभव—जीवनाचा मार्ग --- जीवन चक्र.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
November 30, 2014
एक होती “ही” आणि एक होती “ती”. दोघी समवयस्क आणि अनेक वर्ष शेजारी-शेजारी. म्हणजे तशी “ही” राहायची पहिल्या मजल्यावर आणि “ती” दुसऱ्या. पण शेजारधर्म मात्र कायमच होता.
February 4, 2026
‘कलासरगम’ नाट्यसंस्थेसाठी त्यांना राज्य नाट्यस्पर्धेत नाटक करायचं होतं. ठाणे नगर वाचन मंदिर येथे पी. सावळाराम आणि म. पां. भावे यांचा कार्यक्रम होणार होता. तो ऐकण्यासाठी मी जाणार असल्याचे विश्वासला समजलं. तो आणि विजय जोशी (दिग्दर्शक), जे आता सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, असे दोघं मिळून मला भेटायला म्हणून वाचन मंदिरात मागे हातात बाड घेऊन बसले होते. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी मला गाठलं आणि विचारलं, ‘तुमच्याशी बोलायचं होतं.’
September 2, 2022
स्वातंत्र्य चळवळीसाठी महात्मा गांधी यांनी केलेल्या कार्याला ज्यांनी तनमनधनाने मदत केली त्यात जमनालाल बजाज यांचा फार मोठा वाटा आहे. जमनालाल बजाज यांच्या पायाशी सारे वैभव लोळण घेत पडलेले असतानाही ते त्याच्यापासून अलिप्तच राहिले. आयुष्यात कोणी तरी चांगला गुरु लाभावा अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. त्या वेळी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून नुकतेच भारतात परतले होते व त्यांनी सत्याग्रही चळवळीचा श्री गणेशा केला होता. जमनालाल बजाज यांनी महात्मा गांधी यांच्याबरोबर आश्रमात राहून त्यांचे कार्य अगदी जवळून पाहिले व आपल्या मनात असलेली गुरुंची प्रतिमा ती हीच असे त्यांच्या मनाने पक्के केले. परंतु गुरुपेक्षा आपण त्यांना धमपिताच मानले तर? असा विचार त्यांच्या मनात आला व त्यांनी मला तुमचा पाचवा पुत्र माना, हा विचार गांधीजींना बोलून दाखविल्यावर त्यांनीही त्यास मान्यता दिली. त्याचा खूप मोठा आनंद जमनालाल यांना झाला व आपल्या धर्मपित्याचा वारसा पुढे चालविण्याचा त्यांनी निश्चय केला. एकदा मात्र मोठी गंमत झाली. महात्माजींनी जमनालाल बजाज यांना लिहिलेल्या एका पत्रात ' भाई जमनालाल' असा सरळ उल्लेख केला. ते पत्र वाचल्यानंतर जमनालालजींना तो उल्लेख खटकला. महात्माजींची भेट झाल्यावर ते त्यांना म्हणाले, '' तुम्ही दर वेळी मला चिरंजीव असे लिहिता मग याचवेळी ' भाई जमनालाल' असा उल्लेख का केलात? माझे काही चुकले का? पुत्रधर्माला न शोभेल असं वर्तन माझ्या हातून घडले काय?'' त्यावर महात्मा गांधी त्यांना म्हणाले, '' तुझे काहीच चुकले नाही परंतु मलाच शंका आली की, तुमचा धर्मपिता व्हायला मी लायक आहे की नाही? त्यामुळे तुम्हाला चिरंजीव म्हणण्याचा मला कितपत अधिकार आहे?'' गांधीजी हे सारे नम्रतेमुळे म्हणाले हे जमनालालजींना कळायला वेळ लागला नाही. त्यांनी त्यांना धर्मपिताच मागून पुढे प्रत्येक कार्यात त्यांना पुत्रासारखेच सहकार्य केले. त्यामुळेच जमनालालजींचे जेव्हा आकस्मिक निधन झाले तेव्हा ' असा दुसरा पुत्र मी आता कोठून आणू? असे भावोद्गार महात्माजींनी काढले.
January 31, 2017
बदलते भाव
कसा वागतो दोन प्रकारे, दिसून सर्वा येते
राग दाखवी क्षणात, आणि प्रेमळ ही वाटते....१
देहस्तरावरले प्रश्न सारे, सुख-दु:खानी भरले
अंतर्मनातील भाव परि, आनंदीच वाटले....२
देहाशी त्या येवून संबंध, राग लोभ दाखवी
केवळ त्यातील आनंद शोषण्या, अंतरात्मा शिकवी...३
जड होता पारडे एकाचे, भाव येई दिसून
भावांचे रंग बदलती, अंतर बाह्यावरून...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
September 23, 2015
एक सुंदर बाग होती. बागेत एक तळे होते. तळ्याकाठी दोन बेडूक रहायचे. दोघे अगदी जिवाभावाचे मित्र. एकाचे नाव राम, दुसऱ्याचे श्याम. राम शूर, तर श्याम भित्रा. आजुबाजूला थोडा खुट्ट आवाज झाला तरी श्यामराव तळ्यातल्या पाण्यात लपून बसायचे. श्यामरावांच्या या भित्रेपणाला तळ्यातले मासे, कासव हसायचे. ‘भित्रे मंडुकराव’ म्हणून चिडवायचे. रामने श्यामला भिऊ नको म्हणून खूप वेळा सांगून पाहिले. पण त्याचा काही उपयोग होईना. तळ्यातले इतर जलचर राम बेडकाला म्हणायचे, ‘माणूस लोकात मुलांनी भिऊ नये म्हणून त्यांना हनुमान चाळीशी म्हणायला शिकवतात. तसा हा राम बेडूक श्यामला ‘मंडुकोपनिषद” शिकवतो.
October 5, 2025
नुकत्याच एका बातमीने संपूर्ण मुंबईकरांना हादरुन सोडले. डासांची संख्या प्रचंड झालेली आहे. सर्वत्र मलेरीयाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मृतांची संख्याही खूप वाढलेली आहे. सर्व अधुनिक वैद्यकिय शास्त्र आपल्या शक्तिनीशी त्याचा प्रतिकार करताना दिसला. कांही दिवस यश, वा कांही दिवस अपयश अर्थात रोगाचा फैलाव जास्त झाल्याचे कळून येते. जागतीक आरोग्य संघटना
( World Health Organization ) हीने देखील मलेरीयाच्या प्रसारा बद्दल चिंता व्यक्त केली. आपल्यापरी मदतही देवू केली.
जगावर राज्य कुणाचे ? जो तो आपणच श्रेष्ठ असून आपलीच जगावर सत्ता चालते. ह्या एका विचारांत, अर्थात भ्रमात असतो. परंतु कित्तेक प्रसंग वा घटना अशा घडतात की त्यावेळी सर्व समुदाय हतबल झालेला जाणवतो. तेव्हांच प्रश्न पडतो की येथे राज्य कुणाचे ?
आफ्रिकन सफारीमध्ये गेलो होतो. सर्व कडेकोट तयारीनिशी होतो. बंद गाड्या, हत्यारबंद रक्षक सारे सारे मदतीला. प्रचंड व भयान वाटणारय़ा जंगलात शिरलो. आमच्या भिरभिरणारय़ा नजरा सर्व दिशेने बघत होत्या. त्या जंगलाचा राजा बघताना जेवढी उत्सुकता होती, तेवढीच प्रत्येकाच्या मनांत भिती देखील होती. झाडीत दूर अंतरावर त्या सिंहाची हलचाल दिसली. गाड्या थांबल्या. त्या प्रचंड शक्तिधारी सिंहाला बघून तो त्या जंगलाचा राजा आहे, ह्याची जाणीव झाली. त्याला आमने- सामने प्रतिकार करण्याची हिम्मत कोणत्याही मानवात असेल असे वाटत नाही.
आफ्रिकेत अनेक प्राण्यांचे बरय़ाच संख्येने कळप बघण्याचा योग आला. सिंहाचे, वाघाचे, हत्तीचे, गेंड्यांचे, हरिणांचे, झेब्र्यांचे, जिराफाचे, हिप्पोपोट्यामसचे, मगरीचे, सर्प अजगराचे, इत्यादी. हे कोणत्या प्राणी संग्रहालयांमध्ये नव्हे तर जंगल तलाव ह्या निसर्गरम्य परिसरांत. अगदी स्वैर, स्वतंत्र आणि निर्बंधरहीत, त्यांच्या त्यांच्या समुदायात वावरताना. आपापल्या कळपांत. प्रत्येक कळप स्वतःचे राज्य बाळगुन होता. खा, प्या, मजा करा. निसर्गाने जे देवू केले त्याचा आनंद लूटीत जगा. जीवनचक्रामध्ये संधर्ष झाला, धडपड करण्याची वेळ आली, तर तेही करा. बळी जा. नष्ट व्हा. परंतु तुम्हीच निर्माण केलेल्या सभोवतालच्या जगाकडे बघत डोळे मिटा. मी एक राजा म्हणून जगलो, ह्या भावनेत ह्या जगाचा निरोप घ्या.
समुद्रातील सहल करताना प्रचंड मोठ्या अशा व्हेल वा शार्क माशाच्या केवळ उसळी मारण्याच्या दर्शनाने सर्वजण हादरुन गेलो होतो. आम्हाला पूर्ण कल्पना आली की त्या जलमय वातावरणांत साम्राज्य जलचर प्राण्यांचेच असते. त्यांच्या समुहाचा एक राजा नसतो. तर प्रत्येकजण राजाच असतो. संघराजा म्हणा हवेतर. प्रत्येक प्राणी राजाच्या भूमिकेत वावरत असतो. जो शक्तिमान असेल तोच तथाकथीत राजा समजला जातो.
साम्राज्य कुणाचे ? ज्याची सत्ता सर्वत्र चालते, ज्याला सर्वजण भिऊन असतो त्याची. मानवासहीत सर्व प्राण्यांचा आढावा काढला तर त्यांची त्यांची सत्ता सिमीत असल्याचे, जाणवते. तो त्या प्रदेशाचा वा भागाचा वा वातावरणाचा राजा झालेला आहे हे कळते. परंतु आपला विभाग पार करुन, आपल्या शक्तिचे प्रदर्शन वा सत्ता जगभर कुणालाच स्थापित करता आलेली नाही.
फक्त एकच जीव ह्या जगांत असा आहे की तो आपली आबाधीत सत्ता हजारो वर्षापासून संपूर्ण जगावर गाजवित आलेला दिसतो. आणि तो म्हणजे मच्छर वा डास ( Mosquito ) ज्याला आपण क्षुल्लक प्राणी समजतो. अनेक जीवजंतू, किटाणू, आहेत. परंतु त्यांचा फैलाव मर्यादेत असतो. सर्वत्र नसतो. कांही प्रयत्न्याने नामशेष केले गेले आहेत. मच्छर वा डास ( Mosquito ) २ मात्र जगभर पसरलेला आपली सत्ता आणि धास्ती बाळगुन आहे. कदाचित् हस्यास्पद असेल. परंतु एक सत्य आहे. त्याच्या पासून पूर्ण बचाव करण्यांत माणसाला अजून यश मिळालेले नाही.
एक गमतीशीर वैज्ञानीक इतिहास आठवतो. ज्या जीवरोग शास्त्रज्ञाने प्रथम मच्छर वा डास
( Mosquito ) यांच्यामुळे उत्पन्न होणारय़ा रोगाचा शोध लावला, त्यानी याला मलेरिया
( Malaria ) असे नांव दिले. मराठीत याला आपण हिव-ताप म्हणतो.
त्या शास्त्रज्ञाची प्रथम अशी कल्पना झाली की डासामुळे सर्वत्र हवा दुशीत होते. त्याचा फैलाव सर्वत्र पसरतो. म्हणून त्याने त्याला डासामुळे होणारी दुषीत हवा अर्थात MAL- AIR संबोधिले. त्याचेच नंतर Malaria असे नांव प्रचलीत झाले.
खरे म्हणजे डासामुळे रक्त दोष होतो. हवेचा नव्हे. हवा हे जीवनाचे प्रमुख अंग, सर्वत्र पसरलेली. ते जीवन उध्वस्त करण्याची क्षमता बाळगणारे हे डास असतात. त्यांच्यामुळे होणारय़ा तापाला कदाचित् व्यापक अर्थाने व दूर दृष्टीने त्याला मलेरिया वा दुशीत हवा म्हटले असावे. असे हे मच्छरांचे साम्राज्य.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 7, 2016
गिरनार हा सौराष्ट्र मधला जंगल पर्वतमय भाग. येथील अभयारण्यात सहल …..
November 15, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti