(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ना शिव्या, ना ओव्या!’

    गदिमांनी १९७७ साली ललित मासिकाच्या दिवाळी अंकात 'ए.क.कवडा' या टोपण नावाने मराठीतील २० सुप्रसिद्ध लेखकांवर विनोदी बिंगचित्रे लिहिली होती,त्या वेळच्या प्रसंगानूसार किंव्हा एकूण त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार दोन-चार विनोदी ओळी व त्या लेखकाचे व्यंगचित्र असे त्याचे स्वरुप होते,ती खूप गाजली व हा 'ए.क.कवडा' नक्की कोण अशा चर्चा रंगायला लागल्या होत्या,संपादकांना विचारणा झाल्या,पण नाव काही कोणाला कळाले नाही,डिसेंबर १९७७ मध्ये गदिमांचे निधन झाल्यावर संपादकांनी शोकसभेत जाहिर केले की 'ए.क.कवडा' म्हणजे ग.दि.माडगूळकरांचे हे लेखन होते.यातली काही स्मरणात असलेली निवडक बिंगचित्रे तुमच्यासाठी खास!.

    पु.ल.देशपांडे मराठीतील एक दिग्गज लेखक,त्यांचे बंगाली भाषेवर पण तितकेच प्रेम होते,त्यावर गदिमा भाष्य करतात

    "पाया पडती राजकारणी,करणी ऐसी थोर
    मराठीतला तू बिनदाढीचा रवींद्र टैगोर"

    गो.नी.दांडेकर तर दुर्गप्रेमी,चालायची पण त्यांना विलक्षण आवड होती,त्यांच्या बद्दल

    "चाले त्याचे दैव चालते,चढतो,त्याचे चढते

    माळ तुळशीची आणि दाढी कोठे कोठे नडते!"

    कविवर्य मंगेश पाडगावकर,काव्यवाचनाची त्यांची एक वेगळीच शैली आहे,त्याकाळात त्यांच्या काही कविता लिज्जत पापडाच्या जाहिरातीत झळकत असत त्यावर गदिमा चिमटा काढतात

    "तुझ्या वाचने काव्यच अवघे वीररसात्मक झाले

    घेऊ धजती इज्जत कैसी 'लिज्जत पापडवाले'"

    दुर्गाबाई भागवतांबद्दल...

    "जागविले तू शांत झोपल्या वाड़मयीन जगतां

    दुर्गे,दुर्गे,सरले दुर्घट,आता हो शान्ता"

    गोमंतक निवासी कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या ज्येष्ठ कन्येने एका मद्रासी युवकासी प्रेमविवाह केला होता,त्यावर

    "बोरीच्या रे बोरकरा,लेक तुझी चांगली

    गोव्याहून मद्रदेशी सांग कशी पांगली?"

    राजा निलकंठ बढे उर्फ कवि-गीतकार राजा बढे यांची एक कविता गदिमांच्या वाचनात आली सुंदर कविता होती पण खाली लेखकाचे नाव होते 'रा.नि.बढे' आधी गदिमांना लक्षात येईना की हे कोण लेखक,मग आठवले की अरे हे तर आपले 'राजा बढे',पुढे त्याच सुमारास राजा बढे पंचवटीत आले,त्या वेळी गजाननराव वाटव्यांचे 'राधे तुझा सैल अंबाडा' हे गाणे गाजत होते त्या चालीवर त्यांना बघताच गदिमा गमतीदार पणे मान डोलावत म्हणू लागले...

    "कुणी ग बाई केला? कसा ग बाई केला?

    आज कसा राजा बढे,रानी बढे झाला?"

    रविकिरणी कवितेची थट्टा करीत गदिमा म्हणत

    "गिरीशांची ही गर्द 'आमराई'

    त्यात उघडी यशवंत पाणपोई"

    स्व:तालाही त्यांनी सोडले नाही!,गदिमांना गीतरामायणामुळे 'आधुनिक वाल्मिकी' म्हणत असत,शेवटच्या काळात ते कर्करोगाने आजारी होते,त्यांच्या हातून फारसे लिखाण होत नव्हते,म्हणून स्वतः बद्दलच त्यांनी बिंगचित्र लिहिलं,गदिमांच्या हातात कुर्‍हाड घेतलेल्या व्यंगचित्राखाली लिहिले होते..

    "कथा नाही की कविता नाही,नाही लेखही साधा

    काय वाल्मिके,स्विकारिसी तू पुन:श्व पहिला धंदा?"

    -- सुमित्र माडगूळकर

      June 1, 2016


  • हितसंबंध आणि कर्तव्य

    वर्षापूर्वीची गोष्ट. आर्थिक व्यवहारात फसल्याने माझ्या एका मित्राला कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागला. `खरे तर कोर्टाची पायरी नको रे बाबा' हे सगळ्याच सामान्य माणसांचे सूत्र. तर हे महाशय कोर्टात गेले. न वटलेल्या चेकची ती केस. अर्थातच फौजदारी. प्रतिपक्षही काही कमी नव्हता. त्यांनी माझ्या मित्रावर फसवणुकीचीच फिर्याद ठोकली. `एक तर कोर्टाची पायरी चढू नये; अन्यथा सर्व काय ते सहन करावे.' हे सांगण्यासाठी सोपे आहे; पण प्रत्यक्षात अशा प्रसंगाने काय होते, याचा अनुभव मी या माझ्या मित्राबरोबर घेतला. आपण फसवणूक केलेली नसताना आपल्यावर आरोप? आपले पैसे अडकलेले असताना हा मनस्ताप? या आणि अशा प्रश्नांनी मित्राचे सारे कुटुंबच अस्वस्थ झालेले. आता काय करावे? काय करायला हवे? आपल्याला कोण, कसे प्रश्न विचारतील? लोक काय म्हणतील? समाजातल्या माणसांचा माझ्याबद्दल काय ग्रह होईल? कोणता वकील द्यावा? की दोन द्यावेत? आपल्याला जो ताण येतो तो वकिलांना नाही का? ते पैसे घेऊन मोकळे? असे अनेक प्रश्न सर्वच अस्वस्थ करणारे, ताण वाढविणारे, झोप उडविणारे...त्या घटनेनंतरची ही गोष्ट. न्यायालयीन कामासाठी मी विदर्भात गेलो होतो. प्रकरण फौजदारी होते. कोर्टाने कळवूनही मी हजर राहू शकलो नव्हतो. आता हजर राहणे आवश्यकच होते. वॉरंट काढले गेले होते. हजर राहून ते रद्द करून घेणे आवश्यक होते. पुढील तारखांना हजर न राहण्याची परवानगीही मिळवायची होती. प्रकरण फौजदारी आणि वेळ अटक होण्यापर्यंत आलेली; पण माझ्या मनात तणावही नव्हता किंवा अस्वस्थताही! न्यायालयाचे काम सुरू असताना आणखी एक लक्षात आले, की आणखी एका फौजदारी प्रकरणातही मी `वॉन्टेड' होतो. त्याचे समन्स आजच बजावले जाण्याची शक्यता होती. तसे ते झालेही. त्याचा स्वाभाविक अर्थ होता तो तातडीने जामीन घेणे, तो नसेल, तर रोख रकमेची हमी घेणे, वगैरे.

    अखेर कोर्टातील माझी दोन्ही कामे आटोपली. जामीन मिळाला आणि अन्य तारखांना अनुपस्थित राहण्याची संमतीही. न्यायालयात येतानाही मी तणावरहित होतो आणि जातानाही. प्रवासात एकच विचार येत होता. मित्राच्या प्रकरणात मित्रच नव्हे, तर त्याचे सारे कुटुंब अस्वस्थ होते. काही काळ का होईना, मीही अस्वस्थ होतो. मग या आपल्या प्रकरणात ती अस्वस्थता, तो तणाव का येऊ नये? तो का नसावा? उत्तरेही पटापट येत होती. हे न्यायालयीन प्रकरण माझ्या कार्यालयीन कामाचा, कर्तव्याचा एक भाग होता. त्यात काहीही झाले, तरी त्याचा माझ्यावर परिणाम होणार नव्हता. या प्रकरणात जो शारीरिक त्रास अपेक्षित असतो, त्याबद्दलही अस्वस्थता नव्हती, तोही तुमच्या कर्तव्यपालनाचा भाग असतो. त्यात स्वार्थ किंवा हितसंबंध नाहीत आणि स्वाभाविकपणे त्याच्या वेदना, अस्वस्थताही नाही. या उलट मित्राच्या प्रकरणामध्ये मात्र हा तणाव, यातना, अस्वस्थता होती. मित्राला ती असणे हे स्वाभाविक होते; कारण त्याची मोठी रक्कम अडकलेली होती. ती मिळेल ना? त्रासाशिवाय मिळेल का? आणखी काही गुंतागुंत होईल का? या त्याच्या चिंता व्यक्तिगत हितसंबंधातून निर्माण झालेल्या होत्या. याच स्थितीत वर्तमानाचा स्वीकार केला, तर या यातनांचा प्रभाव, परिणाम आणि कालावधी कमी होण्याची किंवा या यातनाच न होण्याचीही शक्यता असते. अर्थात, त्यासाठी तुमची अवस्था जीवनमुक्त असायला हवी. त्या अवस्थेत राहतो तो केवळ आनंद आणि निखळ आनंद. आपले काय अन् किती पणाला लागले आहे? त्यासाठी किती किंमत मोजायची आणि त्यासाठीचे मार्ग, उपाय काय, हे कळणे, हाही जीवनमुक्ततेचाच टप्पा आणि कर्तव्ये. म्हणून, कर्म करीत जाणे आणि फळासाठी त्या परमेश्वरावर अवलंबून राहणे ही जीवनमुक्त अवस्था. साध्या भाषेत सांगायचे, तर एखाद्या प्रश्नाचा वस्तुनिष्ठ विचार करणे आणि त्याच्या हितसंबंध-स्वार्थ यांच्या वलयापासून दूर राहण्यातच खरे समाधान लाभत असावे. मी विचार करू लागलो. कर्तव्यपालनात माझ्यावर आलेला प्रसंग स्वार्थातून आला तर? माझ्या मित्राने त्याच्यावर आलेला प्रसंग कर्तव्यभावनेने पाहिला तर?

    -- किशोर कुलकर्णी

      April 20, 2006


  • गुलकंदी’ शरद गटणे

    व्यक्ती आणि वल्ली’ मधील ‘पुलं’चा सखाराम गटणे सर्व रसिक वाचकांना परिचित आहे. तो ‘पुलं’चा आज्ञाधारी शिष्य होता, मला भेटलेल्या शरद गटणेंचा मी आज्ञाधारी ‘शिष्य’ आहे!

      August 27, 2021


  • नकोशी (कथा)

    मी जेमतेम पाच वर्षांचा होतो. शेजारपाजारच्या काकू, आजी, आत्या म्हणायच्या, ‘या वक्ताला पोर्गी होऊ दे मंजी शिवा ले राखी बांधाले भन भेटल.’ मलाही ते ऐकून वाटायचं की आपल्या घरात लहान बाळ आलं की किती मज्जा येईल. मला ती राखी बांधेल, भाऊबीजेला ओवाळेल, असा विचार मनात आला की सतत आईभोवती फिरायचो.

      May 11, 2022


  • होळी

    घड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …

      December 8, 2024


  • झडी आठवणींची

    आठवणींच्या झडीत चिंब झालेलं मन.. हरखुन गेलेलं असतं.. स्वत:ला, भोवतालाला विसरलेलं असतं. त्याला आठवत राहतं.. लहानपणापासुन आईनं केलेलं संस्कार.. बाबांनी दिलेली लढण्याची जिद्द… शाळेत गेल्यावर पाटीवर काढलेलं पहिलं वेडवाकडं अक्षर.. चुकल्यानंतर गुरूजींनी पाठीत हाणलेला धपाटा.. पाठीवर वळ उमटला तरी त्यातही गंमत असल्याची जाणीव नंतर होऊ लागते.

      April 4, 2020


  • त्याची ‘राधा ‘ आणि राधेचा ‘तो ‘

    त्या दिवशी राधा सैरावैरा झाली होती . कोठे भटकतोय कोणास ठावूक ? असाच भटकत असतो डोंगर दऱ्यात ! काय तर म्हणे ट्रेकिंग ! पण इतके दिवस नाही रहात माझ्या पासून दूर !

      May 21, 2018


  • हॅप्पी न्यू Ear

    रोज प्रमाणे एकीकडे दूध कपात ओतत, तर दुसरीकडे सँडविच टिफीन मध्ये भरत रश्मीच्या तोंडाचा पट्टा अखंड सुरू होता . सेंट पीटर्स शाळेत चौथीत शिकणाऱ्या मुलाला अर्थात विहानला आणि ही सगळी हातघाई सुरू असताना सोफ्यावर शांतपणे बसूंन पेपर वाचत बसलेल्या नवऱ्याला म्हणजेच राघवला हे काही नवीन नव्हतं .. कडाक्याच्या थंडीचे दिवस होते त्यामुळें गरम गरम पाण्याचा शॉवर सोडून बाहेर यायचं विहान ला जीवावर आलं होतं.

      November 17, 2024


  • पद्य आणि मृत्युविचार : भाग-७-अ /११

    हिंदुस्तानी ख़याल-गायकीचा संदर्भ देत एका हिंदी बंदिशीचे शब्द पाहूं या. शास्त्रीय संगीतात जरी काव्याला सुरांपेक्षा दुय्यम स्थान असलें तरी, त्यात बंदिशीतील शब्दांचा आधार घेतला जातो. म्हणून हें एक उदाहरण. ही बंदिश पंडित रातंजनकर यांनी रचलेली आहे

      August 4, 2017


  • उकळता प्रयोग

    काल हस्तकलेचा तास होता. वर्गातल्या मुलांनी रंगीबेरंगी जाड कार्डशीटचे कागद आणले होते. मुले म्हणाली आज आम्ही या कागदाचा ट्रे करणार आहोत. तर काही मुले म्हणाली आम्ही कागदाचं छोटसं भांडं करणार आहोत. इतक्यात सिमरन म्हणाली, “या कागदातून तुमच्यासाठी काय करू?” आता बाकीची मुलेपण चिवचिवू लागली. “सर्वांनी मिळून माझ्यासाठी, काडेपेटीच्या आकारापेक्षा थोडसं मोठं असं कागदाचं भांडं तयार करा. पण लक्षात ठेवा हे भांडं करताना कुठेही गोंद वापरायचा नाही. कागदाच्या घड्या घट्ट घालायच्या आणि गोंदाऐवजी दोन पेपरक्लीप वापरायच्या. असं म्हणताच मुले म्हणाली, ‘नक्की!’ पण तरीही हात उंचावत रोहन म्हणाला, “पण गोंद वापरला तर काय होईल?” या प्रश्नावर वर्गात शांतता पसरली.

      July 10, 2015