नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो मोठा होऊन कर्ता पुरुष होईपर्यंत, त्याचं कुटुंबातील सर्वजण ऐकत असतात. त्यावेळी तो म्हणेल ते ऐकणाऱ्यांचं प्रमाण, हे १००% असतं. त्यात कुणाचीही भागीदारी नसते. त्याला घरात मानाचं स्थान असतं. आई-वडिल, भाऊ-बहीण त्यांच्या म्हणण्याला मान देत असतात.
June 14, 2022
स्वाईन फ्लूचा भस्मासुर ! सकाळची देवपुजा आटोपून, दारात टाकलेले वर्तमानपत्र उचलून वाचू लागलो. प्रमुख बातम्यांनी मन विचलीत केले. स्वाईन फ्लू नावाच्या नवीनच उद्भवलेल्या रोगाने सर्व देशात आणि परदेशातही थैमान घातले होते. अनेकांचे बळी घेतले गेल्याचा वृतांत होता. खिन्न मानाने खिडकीतून उगवणाऱ्या सूर्य प्रकाशाकडे बघत होतो. एक विचार मनामध्ये डोकावला.
September 13, 2012

अश्वत्थानं गोष्ट संपवली आणि सावलीत बसलेल्या त्या तरुणाकडे पाहिलं . त्याच्या डोळ्यातून पाणी वहात होतं . नेहमीप्रमाणं संधिप्रकाशातील सावल्या घनदाट होऊ लागल्या होत्या . सगळी झाडं , क्षितिजाकडे नजर रोखून सूर्य अस्ताला जाण्याची वाट पहात होती .
July 11, 2021
वाणी तिच्याकडे नखशिखांत पहातो. ती बाई तशी फाटकीच दिसत असते. हिचा नवरा लवकर बरा नाही झाला किंवा आजारपणातच दगावला तर माझे पैसे परत मिळण्याची काहीच शक्यता नाही असा विचार करुन तो त्या बाईला फटकारतो. “माझ्या दुकानाच्या बाहेर हो. तुला मी काही देणार नाही. तू माझे पैसे परत करु शकशील असे मला वाटत नाही.”
June 24, 2024

मागील भागात मी साहित्यिक देवेंद्रजी वधवा यांचा उल्लेख केला आहेच. पुन्हा एकदा नगरला एका कार्यक्रमाला योग आला. पुण्यातील ज्येष्ठ कवयित्री ऍड. संध्याताई गोळे, काव्यशिल्प पुणेच्या अध्यक्षा कवयित्री ऋचा कर्वे, सुनेत्राताई गायकवाड, विद्याताई देव यांच्या पु.ल. एक साठवण या कार्यक्रमासाठी नगरला निमंत्रण आले होते. या सर्वच कवयीत्री माझ्या सुपरिचित होत्या.
June 25, 2021
डोगरी ही जम्मूभागातील भाषा आहे. या भाषेतील, पद्मा सचदेव या एक श्रेष्ठ कवयित्री आहेत ; व त्या डोगरीरोबरच हिंदीतही लेखन करतात. त्याच्या एका काव्यांशाचें भाषांतर पाहूं या
August 3, 2017

सकाळी सकाळी प्रधानजीकडे महाराज धावतच पोहचले.हे दृष्य उभ्या आयुष्यात प्रधानजींनी बघितले नव्हते.कारण धावायची पाळी त्यांचीच असायची.राजाकडे सगळयांनी धावायचे.राजाने नव्हे.त्यामुळे महाराज दिसताच प्रधानजींनी नैऋत्य दिशेकडे बघितले.आज सूर्य तिकडून तर निघाला नाही ना,याची खात्री करुन घेतली.
October 28, 2013
राजकीय रंग चढलेल्या धर्माच्या अनागोंदी कारभाराचा समाचार घेणारी सॅक्रेड गेम्स ही विक्रम चंद्राच्या 2006 मध्ये आलेल्या त्याच नावाच्या इंग्रजी कादंबरीवर आधारित असणारी वेबसिरीज ‘सॅक्रेड गेम्स’चा दुसरा सीझन 15 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. अनुराग कश्यप व नीरज घायवान यांनी हा सीझन दिग्दर्शित केलेला असून कथा वरूण ग्रोवरने लिहिलेली आहे.
September 25, 2019
आजपर्यंत ज्या ज्या लेखकांनी मराठी भाषेत गड किल्ल्यांच्या माहितीवरील ग्रंथ प्रकाशित केले आहेत त्यामध्ये चिं. ग. गोगटे यांचे नांव सर्वप्रथम येते. त्यामुळे चिंतामण गंगाधर गोगटे यांना आद्य दुर्ग अभ्यासकच म्हणले पाहीजे. इ.स. १८९६ पर्यंत महाराष्ट्रातील किल्ल्यांविषयीच्या माहितीचे कोणतेही मराठी भाषेतील पुस्तक लिहिले गेले नव्हते. गोगटे यांच्या ग्रंथाचा काळ हा इतिहासाचार्य राजवाडे यांचे ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीचा होता.
May 14, 2019
“माझ्या एकट्यासाठी आपल्या गावात शाळा सुरु होणार आहे “., रावसाहेब -मालकांनी स्वत: मला सांगितलाय “, ही गोष्ट भेटेल त्याला चंदर सांगत होता.
January 19, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti