(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ८ वी ड – भाग ७ – कार्ट आणि मुलगा

    संघर्ष! कुणाला चुकला आहे मुंगी पासून माणसापर्यंत सर्वांना आहे. अगदी लहान शाळकरी मुलांना देखील करावा लागतो. याचा अंदाज शिक्षकांना, पालकांना खरोखर आहे का?

      April 12, 2021


  • आभाळाचे खांब : १

    अन्यथा जात, पात, धर्म, पंथ, राजकारण आणि स्वार्थ यात गुंतून गेल्यानं नव्या पिढीच्या डोक्यावरचं आभाळ हरवून जायला वेळ लागणार नाही आणि मग काळ कुणालाही क्षमा करणार नाही!

      October 22, 2020


  • भारताचे एडिसन -डॉ. शंकर आबाजी भिसे

    विसाव्या शतकाच्या प्रारंभी अनेकानेक लोकोपयोगी वैज्ञानिक शोध लावणारे, तसेच मुद्रण तंत्रज्ञानातील आपल्या युगप्रवर्तक शोधाने ‘भारतीय एडिसन’ हे बिरुद प्राप्त करणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबईतील एका चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सी.के.पी.) कुटुंबात २९ एप्रिल १८६७ रोजी झाला.

      May 18, 2024


  • नमू’ तुझ्या येण्यानं ‘जत्रा’ भरली!!

    नमानं वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत, त्यातील ‘लाॅली’नं अफाट लोकप्रियता मिळवलेली आहे.

      October 4, 2021


  • जे न देखिले कैसें (सुमंत उवाच – ८०)

    सुमंत जयंत परचुरे. 

    भिंतींनाही कान असतात म्हणे, जरा हळू बोलावे असे म्हणणारे पेपर मधे कोण ड्रग्स घेतो, कोण पैसे खातो, कोण कोणाच्या आड येतो या विषयांवर मात्र संध्याकाळी पारावर बसून जोरदार भाषण देत असतो.

      November 27, 2021


  • जेल मधी जाऊ या आणि दिल्लीची बिल्ली

    काशी मधी गेली

    दिल्लीची बिल्ली. ….

      May 24, 2014


  • किती कोण हा मोठा पंडित (सुमंत उवाच – १७)

    सुमंत जयंत परचुरे. 

    मला किती कळतं किंवा मलाच सारं कळतं या भावनेच्या पोटी जर एखाद्या विषयातील व्यक्ती राहू लागला तर हा समाज त्याच्या तोंडावर चांगलं तर पाठीमागे वाईट बोलू लागतो.

      September 8, 2021


  • कर्म, धर्म करावे जरूर (सुमंत उवाच – ५६)

    सुमंत जयंत परचुरे. 

    दैनंदिन आयुष्यात आपण वेगवेगळ्या प्रकारची कामे करत असतो. कोण नोकरी करतो, कोण व्यवसाय, तर कोण धर्माची कामे देखील करतो.

      October 17, 2021


  • नारदमुनींची महाराष्ट्रभेट

    नारदमुनी म्हणजे आद्यपत्रकार ! पंचमहाभूतांमधील बातम्या मिळवून वर्तमान गरजेप्रमाणे त्या-त्या देवाच्या कानावर घालायची अलिखीत जबाबदारी त्यांच्यावर. कधी ब्रह्मा, विष्णू तर कधी महादेव, इंद्र… त्या-त्या देवाच्या दरबारात कळ लावली की पुढचे रामायण कसे सोपे जायचे.

      February 15, 2024


  • नेत्रहीनता !

    ठाण्याहून नाशिकला महत्वाच्या कामासाठी चाललो होतो. हायवेवर गाड्यांची प्रचंड प्रमाणात जा ये चालू होती. लवकर पोहचणे जरुरी होते. त्यामुळे गाडी वेगातच चालली होती. अचानक माझी नजर दूर अंतरावरील एका गाव फाट्यावर गेली. एक माणूस हलके हलके मुख्य रस्ता ओलाड्ताना दिसला. तो एकटाच असून, बेफिकीर भासत होता. कोणत्या क्षणी एखादे वाहन जवळ येऊन धडकेल ह्याचा भरवसा नव्हता. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती हायवे क्रॉसिंग करताना डावीकडे उजवीकडे बघेल, स्वत:ला विश्वासात घेईल, व मग रस्ता ओलांडेल. परंतु हा कसलीही तमा न बाळगता शांतपणे इकडे तिकडे नजर न टाकता, रस्ता ओलांडत होता. दररोज पेपरमध्ये अनेक अपघतांच्या बातम्या वाचण्यात येतात. अशाच बेफिकीर वृतीमुळे व वाहन चालकाच्या नजर चुकामुळे त्याक्षणाला काहीही होण्याची शक्यता असते. काळजी अर्थात दोघानीही घ्यावयाची असते. क्षणार्धात अनेक विचारांचे काहूर मनांत येऊन गेले. मला भासणाऱ्या त्या मूर्ख माणसाला चांगलीच हडसून खडसून समज द्यावी, झापावे, हा विचार आला. एकदम मी ब्रेक दाबून गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. अगदी मुठ वळून त्या माणसाच्या पाठीमागे घावलो. प्रथम त्याला ग्राम्य भाषेत एक शिवी हासडली. ” ये साले तुमको क्या मरना है हायवेपर. शरम नही आती, इस बेफिकीर ढंगसे रस्ता क्रॉस करते हो.” मी त्याचा जवळ धाऊन गेलो. त्याला एक लाफा देण्याच्याच पोज मध्ये होतो. माझा आवाज एकूण ऐकून तो थांबला. त्याने माझ्या आवाजाच्या दिशेने मान वळविली. मला एकदम धक्का बसला. तो माणूस नेत्रहीन होता. क्षणात माझा राग पूर्ण विरघळून गेला. आपल्याच विक्षिप्त विचारांची लाज वाटू लागली.

    प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असतेच. नेत्रहीन असला, द्रीष्टीहीन असला तरी मनाने केव्हांच जगण्याच्या प्रक्रीयेमध्ये बेफिकीर नसतो. आपण डोळस असूनही आपल्या विचारीनी अंध असतो. ही जाणीव झाली. मी चटकन शंभर रुपयाची एक नोट त्याचा हाती ठेवली.

    ” हे काय आहे?” हे तो विचारत असतानाच मी त्याचा द्रीष्टीहीनतेचा फायदा उठवत हळूच माघारी फिरलो.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      September 10, 2015