(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • फणस (लघु कथा)

    डोंगरे डॉक्टरांचे म्हणणे लोकांना किती पटले कोणाक ठाऊक.कारण गाव तसे अंधश्रद्धाळू. भुता खेतांचे अस्तित्व मानणारी बहुतेक माणसे. महादूची ही हकीगत गावात सगळीकडे पसरली,  त्याला तिखट मीठ लाऊन शेजारच्या गावात पण पोचली आणी त्यानंतर जयरामचे भूत नंतर अनेकांना त्या रस्त्यावर वडाच्या झाडा जवळ सगळ्यांना दिसू लागले.

      March 24, 2019


  • ००७ जेम्स बॉन्डला सर्वप्रथम पडद्यावर आणणारा….

    ००७ जेम्स बॉन्डला सर्वप्रथम पडद्यावर आणणारा….

    तुम्हा सर्वानाच जेम्स बॉन्ड साकारणारे सर्वच अभिनेते माहित आहेत. मात्र “शॉन टेरेन्स यंग‘’ हे नाव कदाचित आठवणार नाही. यंग हा सुरूवातीच्या तिनही बॉन्डपटाचा दिग्दर्शक होता. डॉ. नो(१९६२), फ्राम रशिया विथ लव्ह (१९६३ ) आणि थडंर बॉल(१९६५) हे तिनही बॉन्डपट तुफान गाजले.

      September 9, 2018


  • गॅदरींग….

    कॉलेजच्या नोटीस बोर्डावर गॅदरींगची नोटीस लागली होती.हे जस समजल तसं गण्यानं टुन्नकन उडीच मारली.गण्या कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमीच पुढं पुढं करायचा.गण्यालं नाटकात काम करायची लय हौस होती.तसं पाहिलं तर लहान पणापासुनच गण्याच्या अंगात अभिनयाची गोम वळवळ करायची.

      July 27, 2024


  • माझे आवडते पुस्तक मृत्युंजय

    लहानपणापासून मला पुस्तकवाचनाची आवड लागली आणि उत्तरोत्तर ती वाढत गेली. कथा,कादंबऱ्या, कविता, भयकथा, रहस्यकथा, नाटकं,प्रवासवर्णने आणि असंख्य प्रकारची पुस्तके असा माझा वाचनाचा जबरदस्त कॅनव्हास आहे. पु ल देशपांडे यांच्यापासून ते दया पवार ,अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या असंख्य अभिजात साहित्यिकांची आणि लेखकांची अगणित पुस्तकं वाचताना मी झपाटून गेलो.विविध लेखकांच्या प्रतिभाविलासाने मी थक्क होऊन गेलो.

      April 26, 2023


  • नू’चे नाणे

    फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चीनमधील ‘ताओन लिन’ या गावी एक पुजारी होता. त्याचं नाव होतं ‘वान चिंग.’ देशभर भ्रमण करून तो आपल्या गावी परतला. फावल्या वेळेत तो गावकऱ्यांना आपल्या भटकंतीतील अनुभव ऐकवत असे. गावकरी मोठ्या उत्सुकतेने त्याच्या गोष्टी ऐकत असत. विशेषतः चीनमधील भव्य आणि प्रसिद्ध अशा बुद्ध मंदिरांची जेव्हा तो वर्णने करीत असे तेव्हा लोक ती वर्णने ऐकून स्तिमित होत. ही वर्णने ऐकून ऐकून आपल्या गावातही एखादं भव्य मंदिर उभारावं असं गावकऱ्यांना वाटू लागलं.

      November 15, 2025


  • मराठी मराठी असा घोष कंठी

    27 फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिन‘ असतो. त्या निमित्ताने समस्त मराठी जनांना मराठीचा पुळका येत असतो. कार्यक्रमांची तर रेलचेलच असते. पण ‘बहुत राजकीय धुमाळी जाहली ऐजी जे‘ अशा बातम्याही 28 तारखेच्या पेपरांमधून वाचायला मिळतात.

      December 22, 2023


  • भूमिका’ आजोबांची !

    रोज संध्याकाळी मी फिरावयास जात असे. कधी कधी नातव बरोबर येत असत. मी कपडे घालून निघालो. लहान पाच वर्षाचा नातू, पळत आला व मला बिलगला.
    ” आजोबा मला पण यायचं आहे बागेत तुमच्या बरोबर.”  मजसाठी ती हृदयद्रावक घटना होती.

      May 8, 2020


  • शाळेचा रस्ता

    शाळेस रोज जाताना ।
    मज विघ्ने येती नाना !

    किती पक्षी गाती गाणी
    झाडावर म्हणती बसुनी

    “ये मुला, खेळु या मिळुनी !”
    परि उशीर टाळायाला ।
    मी निघे तडक शाळेला ।।१।।

    टोळ कसे गवतावरती
    आनंदे टुणटुण उडती !
    खेळाया बोलाविती
    परि उशीर टाळायाला ।
    मी निघे तडक शाळेला ।।२।।

    गारुडी वाजवुनि पुंगी
    बोलावी झणी मजलागी !
    बहु जमती जन त्या जागी
    परि उशीर टाळायाला ।
    मी निघे तडक शाळेला ।1३॥।

    बाजूस खेळणीवाला
    वाखाणुनि अपुल्या माला
    वेधितसे नकळत बाळां
    परि उशीर टाळायाला ।
    मी निघे तडक शाळेला ।।४।।

    वाटेतिल झाडें वेली,
    हालविती पानें अपुली,
    बोलाविती मजला जवळी !
    परि उशीर टाळायाला ।
    मी निघे तडक शाळेला ।।५।।

      June 24, 2026


  • मंगळाचे मंगल…..!!!

    “मंगळ”यानाच्या प्रज्वलनाने,

    “मंगळास” “मंगलमय” केले आहे,

    “अमंगल” “मंगळाचे”,

    चांगलेच “मंगळ” झाले आहे I

      September 24, 2014


  • एक परीस स्पर्श – भाग २

    त्या पूजेच्या होमातील अंगारा दिला होता गुरुजींनी तीन महिने नित्य नियमाने लावायला. विजयनेही तो नित्य नियमाने लावला. पण विजयच्या मनात काही लग्नाचा विचार येत नव्हता कारण विजय कोणाच्यातरी प्रेमात पडलेला होता !

      January 21, 2022