(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शब्दांची पालखी – भाग एक

    मला अगदी मी वाचायला शिकलो, त्या वेळेपासूनच वाचायची आवड लागली होती. तेंव्हा परिस्थिती यथातथाच. आमचीच नव्हे, तर बहुतेक सर्वच कुटूंब गरीब म्हणता येतील अशीच. वाचायची आवड शाळेच्या पुस्तकांवर भागवायची कारण इतर पुस्तकं मिळणं अशक्यच होतं. संस्कृतीत सण ही एकच गोष्ट असायची, वाचन वैगेरेही संस्कृतीचा भाग आहे, हे कुणाच्या गांवीही नसायचं. पुस्तकं सोडा, रोजचा पेपर मिळणंही दुरापास्त असायचं. पेपर न घेणं यासाठी, परवडत नाही हे एकच कारण असायचं.

      January 12, 2018


  • काळ्या मातीशी करी हितगुज

    श्रावण म्हणजे काळ्या मातीला पडलेलं हिरवं स्वप्न. वृक्षवेलींनी टाकलेली कात म्हणजे श्रावण. काळ्या मातीशी गूज सांगणारा ऋतु म्हणजे श्रावण…. नव्या उल्हासाला उधान आणणारा ऋतु म्हणजे श्रावण…या श्रावणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच…

      August 18, 2024


  • सप्तपदी – लघुकथा

    हसता हसता रमाकांतांनी सप्तपदीची शेवटची सुपारी ढकलली ती शेवटचीच ठरली. अवघ्या महिन्याभरात सगळा खेळ संपला होता.

      December 7, 2019


  • भारताचे एडिसन -डॉ. शंकर आबाजी भिसे

    विसाव्या शतकाच्या प्रारंभी अनेकानेक लोकोपयोगी वैज्ञानिक शोध लावणारे, तसेच मुद्रण तंत्रज्ञानातील आपल्या युगप्रवर्तक शोधाने ‘भारतीय एडिसन’ हे बिरुद प्राप्त करणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबईतील एका चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सी.के.पी.) कुटुंबात २९ एप्रिल १८६७ रोजी झाला.

      May 18, 2024


  • अष्टपैलू आचार्य

    एकोणीसावं शतक संपताना पुण्याजवळील सासवड येथील कोडित खुर्द गावात १३ ऑगस्ट १८९८ साली, एक ‘सरस्वती पुत्र’ जन्माला आला.. ज्यानं अवघ्या ७१ वर्षांच्या आयुष्यात साहित्य, नाट्य, चित्रपट, पत्रकारिता, राजकारण, शिक्षण, इ. क्षेत्रात मोलाची कामगिरी केली.. त्यांचं नाव, प्रल्हाद केशव अत्रे!

      June 27, 2022


  • भंगारातली बांगडी – Part 1

    इन्स्पेक्टर शामराव साळुंकेनी वागळे इस्टेट पोलीस ठाणे, ठाणे याचा नुकताच चार्ज घेतला होता. पोलीस ठाण्याची, गुन्ह्यांची वगैरे जुजबी माहिती त्यांना मिळाली होतीच परंतु तेवढ्याने साळुकेचं समाधान झालं नव्हतं. सर्वसामान्यपणे ठोकपीट मेथडचा अवलंब करून गुन्ह्याची उकल करण्याकडे त्यांचा कल नव्हता. गुन्ह्याचे सूक्ष्म विश्लेषण करुन, बारीक सारीक धागे जुळवून बुध्दी कौशल्याने त्याची उकल करण्यात त्यांना रस होता. फारच क्वचित, ठोकपीट मेथड ते वापरीत. बहुधा नाहीच. आढावा घेता घेता ते दिनकर मोरेच्या केसकडे वळले. त्या दिनकरची बायको गायब झाली अशी त्याने आठवड्यापूर्वी तक्रार नोंदविली होती. पण आजपर्यंत तिचा शोध लागला नव्हता. त्यांनी त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांना लगेच बोलावून घेतले.

      March 22, 2022


  • कोलीडोस्कोप

    नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे. प्रत्येक डिझाईन तसेच मनोहर व आकर्षक. फक्त एक गोष्ट प्रखरतेने लक्षांत आली की "दृष्य " सतत बदलत, मनोहर असे परंतु एकदा बघीतलेले दृष्य पून्हा तेच व तसेच म्हणून केव्हांच दिसले नाही. दिसू शकणार नव्हते. रंग संगतीची सतत उधळण होत असे. विविधते मधला तो आनंद टिपला जाई. ज्यांत केव्हांच नव्हती स्थिरता. तोच तोपणा. अस म्हणतात की "आनंद " हेच फक्त ईश्वरी सत्य आहे. आनंद म्हणजेच ईश्वरी दर्शन. आनंद हा भावनेचा सर्वात उच्य असा अविष्कार असतो. त्यांत इतर भावने प्रमाणे कोणताही विरोधाभास नसतो. आनंद हा चेतना स्वरुपांत व्यक्त होतो. कोणत्याही सभोवतालच्या दृष्य अदृष्य वस्तूमधून जाणीव देणाऱ्या, मन उल्हासीत करणाऱ्या चेतनेमध्ये आनंद असतो. कोलीडोस्कोप मधून क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या परंतु प्रत्येक प्रक्षेपित दृष्यामध्ये आनंद समावलेला आहे. बदलते स्वरुप ही चिंतेची बाब वाटते. कारण ज्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित होते. आनंदाचा ठेवा हाती लागतो. ज्याच्यात आनंद अर्थात ईश्वरी रुप बघीतले जाते. तो ढगांच्या हालचालीप्रमाणे स्वरुप बदलत जातो. मग स्थिरता समोर नसेल तर एकग्रता कशी होणार. ह्यातच त्याला समजले पाहीजे. कारण "आनंद " याचे स्वरुप लहरी, लाटा, छटा ह्यानी अनुभवण्याचा, जाणण्याचा प्रकार आहे. ज्यांत बदलणारी संकल्पना आहे. परमेश्वरला जेव्हां निर्गुण रुपांत समजले जाते. त्याच वेळी कोणतेही रुप, कोणताही आकार, कोणते ही मोजमाप, कोणतेही वर्णन त्याला लागु पडत नाही. ज्या ठीकाणी असा प्रयत्न होतो तो निर्णय केलेला विचार असतो. असत्यात तो जाऊन बसतो. म्हणूनच असे मान्य झालेले आहे की परमेश्वर अनुभव येणे, जाणीव होणे हे शक्य आहे. परंतु प्रत्यक्ष बघणे कदापीही, केव्हांही सत्य असून शकत नाही. कारण तो फक्त आनंदमय आहे. सतत बदलणाऱ्या छटांत, गुणधर्मांत, एक उर्जा शक्तीच्या रुपांत

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 8, 2017


  • बग्या 

    खरंच बग्या सारखी माणसं हि आलेपाकाच्या वडी सारखी असतात, अत्यंत गुणकारी, थोडी गोड, थोडी तिखट , पण जिभेवर ठेवल्या शिवाय कुठल्याच पदार्थाची खरी चव कळत नाही हेच खरं.

      August 14, 2022


  • शिवाजी ‘दी बाॅस’

    जॅकी चेन या आशिया खंडात चित्रपटाचे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यानंतर रजनीकांतचा दुसरा नंबर लागतो. २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिवाजी दी बाॅस’ या चित्रपटासाठी त्याने सर्वाधिक म्हणजे २६ कोटी रुपये मानधन घेतले होते. गेली पंचेचाळीस वर्षे सलग चित्रपट सृष्टीमध्ये टिकून राहणे हे रजनीकांतच करु जाणे.

      April 2, 2022


  • सांग ना असावे की नसावे?

    सांग ना.....असावे की नसावे?
    असून नसण्यापेक्षा नसावेच?
    नसण्यापेक्षा नावापुरते तरी असावे?
    किती ना हा भावणाकल्लोळ.....!!

    तुझं वीन झुरावे की तुझ्या साठी?
    विरहात तुझ्या मरावे की मरून तुला विरहात लोटावे?
    तुझ्या आसक्तीचा आग्रह की तुझ्याविना विरक्ती ?
    किती ना ही समभ्रमावस्था......!!

    तुझ्या बाहुपाशात मोहरावे की स्वतःला चुरगळुन घ्यावे ?
    तुझ्या प्रीतसागरात डुंबावे की बुडून जावे?
    आपण साथीने चालावे की तुझ्यात एकरूप व्हावे?
    किती ना ही समर्पणता.....!!

    तुला चिंतावं की तुझ्या चिंतेत जगावं?
    तुला पूजावं की पूजेत तुला मागावं?
    तुझ्या साठी जगावं की जगण्यात तू असावं?
    किती ना ही एकरूपता.....!!

    माझ्या जगात तू असावं की माझं जगच तू असावस?
    माझ्या मनात तू असावं की माझं मनच तू असावस?
    माझ्या श्वासात तू असावं की माझा श्वासच तू असावस?
    किती ना ही समरसता....!!

    सांग ना....... असावे की नसावे?
    आपण भिन्नतेत एक असावे ?
    की आपण भिन्न नसावेच?
    किती ना ही अढळता ......!!

    तुझ्या वीन काही नसावे
    तू असल्यास बाकी काही नसावे
    आपण असावे..........
    फक्त अन फक्त आपणच असावे
    सांग ना .........असावे की नसावे????

    विशाल झावरे पाटील
    01/02/2023

      February 12, 2024