नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
एक
प्रवासाने थकलेल्या आईला सांगितले. आई मी बाहेरुन Do not disturb चा बोर्ड लावतो तू रूममध्ये निवांत विश्रांती घे.
आईला क्षणभर वाटले घरच्या बेडरुमला असा बोर्ड लावता आला तर किती बरे झाले असते.
दोन
हॉटेलात रुम सर्व्हिसला चहा ऑर्डर केला. 15 मिनिटे वाट पाहिल्यावर. एका किटलीत दिमाखात चहा आला. किटली छान होती पण चहा मेला गार गुट्ट. बाईंच्या मनात विचार आला 15 मिनिटात 25 माणसांना गरमगरम चहा पाजून कपबश्या विसळून जाग्यावर ठेवल्या असत्या.
तीन
घरी एकेकाला ब्रेकफास्टला बोलावून जीव थकून जायचा. एकाला एक आवडत तर एकाला एक. इतके करून काही उरले तर आपण खायचं, नाहीतर चहावरच भागवायचे. सगळ्यांचे झाले की एकटीने आवारायचे. हॉटेलात मात्र आजी तू निवांत बस एका जागी आम्ही तुला आणून देतो जाग्यावर. घरी कुणाचीच मदत नाही आणि इथे! सगळे मदतीला पुढे. स्थान महात्म्य दुसरे काय?
चार
गाडी हॉटेलच्या पोर्चमध्ये थांबली. दरवानाने अदबीने दार उघडले लवून नमस्कार केला. सगळे त्याकडे दुर्लक्ष करून सफाईने आत शिरले. तिने मात्र उलटा नमस्कार करून प्रतिसाद दिला. सुनेचे लक्ष गेलेच. तिच्या चेहर्यावर एक त्रासिक लकेर उमटली. कुणीतरी आपले स्वागत करतंय हेच तिला नवीन होते.
पाच
इतक्या गोष्टी प्लेटमध्ये होत्या. काटा चमच्याने घेताना गोंधळ उडाला. एक चमचा जमिनीवर पडला. शांत अशा रेस्टॉरंटमध्ये मोठ्ठा आवाज झाला. चमचा उचलण्यास लागली. नातू ओरडला आजी राहू देत कुणीतरी उचलेल. तू दुसरा चमचा घे. तिच्या मनात क्षणभर आले. घरी खरकटे सांडले की तिला अजिबात खपत नसे. लगेच रागवून पुसून घेई. इथे मात्र अगदी कावरीबावरी झाली. चार लोकांत असे व्हायला नको होते.
सहा
बाथरूममध्ये बादली नव्हती. गरम पाणी कसे येते हे कळेना. शेवटी नातीला बोलावली तिने आजीची चेष्टा करत पाणी सुरू करून दिले. अंग धुवायची सवय असलेल्या तिला शॉवर घेणे जमेना. ही मुले जन्मतःच शहाणपण घेऊन येतात की कोण जाणे.
श्रीकांत कुलकर्णी
9850035037
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक श्रीकांत कुलकर्णी ह्यांनी लिहिलेला हा लेख
February 28, 2024
लहानपणी आई जवळ नसली की भिती. अंधाराची भिती. गोष्टीतील चोराची. भूताची भिती. शाळेत जायला लागल्यावर शिक्षकांची भिती. वर्गातील व्रात्य मुलांची भिती. आणि जसे जसे वय वाढते तसे तसे भिती कमी व निडरपणा येतो.
February 12, 2022
काळाप्रमाणे शिक्षण पद्धतीत, क्लासच्या संकल्पनेत बदल होत गेले. मुलांना शिकावं तर लागणारच आहे. नवीन पिढी शिक्षणामध्ये होणाऱ्या बदलांशी जुळवून घेते आहे.
December 11, 2021
खरं म्हणजे ते अभिनयाच्या क्षेत्रात आले असते तर त्यांनी धमाल उडवली असती. सावळाच पण देखणा चेहरा, गांभीर्य आणि स्मितहास्य याचं त्या चेहऱ्यावर विलसणारं मिस्कील अजब मिश्रण, संपूर्ण व्यक्तिमत्त्वात असलेली ऋजु उत्कटता आणि ती पेलण्याचं सामर्थ्य असलेला आंतरिक कणखरपणा.
July 15, 2022
फार प्राचीन काळी धौम्य या नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. ते आपल्या शिष्यांना केवळ ज्ञान देत नसत, तर ज्ञानाच्या जोडीला व्यवहार शिकवीत असत. त्यासाठी शिष्यांना आश्रमात पडतील ती कामे करावी लागत.
November 25, 2025
जयंतीलाल ठाणावला एक नाव नव्हते तर खऱ्या अर्थाने ते ठाण्याचे भूषण होते, खरे ‘ ठाणावला ‘ होते. ठाण्याची तलावपाळी सर्वानाच माहीत आहे परंतु सध्या बोटींग क्लब समोरील चढण आहे त्यापासून पुढे दत्तमंदिर पर्यंतचा भाग लालबाग म्हणून ओळखला जातो, तेथील जयंतीलाल ठाणावला यांची प्रॉपर्टी होती
January 5, 2020
पाच-दहा मिनिटांतच एक उंचीपुरी, गौरवर्णी, तरतरीत मुलगी आत आली. वेळेवर पोचतो की नाही यामुळे येणारा एक प्रकारचा अस्वस्थ भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला होता. ती घाईने क्लार्ककडे आली आणि तिने विचारलं, “का हो, कुणी केदार देशपांडे आले आहेत का?”
March 10, 2022
एकदा एक वाघ आणि वाघीण पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली.
May 31, 2017

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ताईने राहिलेल्या दुधाचा चहा करून घराची आवरा आवर आणि साफ सफाई करायला घेतली. डिसेंबर चा काळ असल्याने थंडी पडली होती. समुद्र जरी जवळ असला, उष्म वातावरण असले तरी थंडीत हवामान त्या उष्म्याला जुमानायचे नाही.
October 24, 2021
बा ल विकास मंडळ या शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेऊन पाचवीसाठी माझा प्रवेश डॉ. बेडेकर विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत झाला. या शाळेतच माझे गाणे, वक्तृत्व, अभिनय अशा अनेक गोष्टींना सुरुवात झाली. याचे प्रमुख कारण आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक चिटणीस सर. ते स्वतः उत्तम लेखक आहेत. त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध झाली होती. शाळेत अभ्यासाबरोबरच मुलांच्या कला गुणांचाही विकास व्हायला हवा असे त्यांचे मत होते. या सर्वांसाठी ते मुलांना प्रोत्साहन देत. साहित्य आणि कलावर्तुळात त्यांची ओळख असल्याने अनेक ख्यातनाम साहित्यिक आणि कलाकार आम्हा मुलांना प्रत्यक्ष पाहता आणि ऐकता आले. शाळेच्या अनेक कार्यक्रमांसाठी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते या नात्याने अनंत काणेकर, व.पु. काळे, वि. आ. बुवा, संगीतकार सुधीर फडके, यशवंत देव, कवी शंकर वैद्य, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, व्यंगचित्रकार म्हणून शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे अशी अनेक नावे मला सांगता येतील. अशी आदर्श व्यक्तिमत्त्वे मुलांना भेटवण्यासाठी आजही अनेक कार्यशाळांचे आयोजन केले जाते. चिटणीस सरांनी हे काम आमच्या शाळेच्या माध्यमातून मोफतच केले. तसेच सौ. शशिकला जोशी, सौ. दाते, सौ. मेहेंदळे, सौ. ओक, श्री. ठक्कर, श्री. खरे, श्री. सहस्त्रबुद्धे, श्री. वैद्य असे अनेक शिक्षक व शिक्षिका यांनी माझा शालेय प्रवास अत्यंत आनंदाचा केला. अनेक चित्रपटांसाठी ज्यांनी गाणी लिहिली, असे श्री. मुरलीधर गोडेसर यांच्या दिग्दर्शनाखाली सतत सहा वर्षे मी अभिनय केला आणि एकांकिका स्पर्धेची ढाल सतत सहा वर्षे आम्ही मुलांनी शाळेला मिळवून दिली. अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि गाण्याच्या अनेक आंतरशालेय स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली. शाळेचा आदर्श विद्यार्थी म्हणून पारितोषिक मिळवले. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे तर आनंदाची परमावधी असे. आमच्या शाळेत 'पारिजातक' नावाचे मासिक दरवर्षी प्रसिद्ध होत असे. यात मुलांनी लिहिलेले लेख आणि कविता असत. ही कल्पनाही चिटणीस सरांचीच. या मासिकात मी अनेक कविता लिहिल्या. मुलांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात शाळेचा आणि शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो. त्यावेळचे शिक्षकांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन फार महत्त्वाचे असते. याबाबतीत मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. आपल्या शाळेबरोबर कायम संबंध रहावे असे अनेकांना वाटते. पण दहावीनंतर आपण शाळा सोडून जातो आणि तो संबंध तेथेच संपतो. याबाबतीतही मी भाग्यवान ठरलो. कारण नंतर याच शाळेच्या विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीचा सभासद होण्याची संधी डॉ. विजय बेडेकर यांच्यामुळे मिळाली. त्यामुळे आजदेखील शाळेबरोबरचा माझा संबंध टिकून आहे, याबद्दल मी डॉ. विजय बेडेकरांचा कायम ऋणी राहतो.
- अनिरुद्ध जोशी
June 27, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti