(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शरयू नदीच्या भावना….

    अयोध्येत आपल्या श्रध्दास्थानाचं , श्रीराम मंदिराचं निर्माणकार्य लवकरच सुरू होईल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलाच आहे, पण ज्या शरयू नदीच्या तीरावर हे मंदिर होणार आहे, तिच्या भावना आपल्याला माहिती आहेत का ? तिनं किती , काय सोसलय , काय काय पाहिलंय , महित्येय का ?

      December 30, 2019


  • वेळेचे महत्त्व

    कोणतेही काम वेळच्या वेळी केले तरच त्याचे फळ चांगले मिळते. संत कबीरांनी म्हटले आहे, 'कल करे सो आज कर, आज करे सो अब! पल मे परलय होगी बहुरि करेगा कब ?' ' चांगल्या कामाच्या बाबतीत तर मुळीच चालढकल करून चालणार नाही, कारण ' उद्याच्या भविष्यात काय दडले आहे हे कोणीच सांगू शकत नाही. एक शेतकरी होता. त्याला एकच मुलगा होता. मुलाच्या मदतीने तो आपली शेती करायचा. आपले अनुभव अनेकदा मुलाला सांगून त्याच्याकडून योग्य ती कामे करून द्यायचा. एके वर्षी पावसाळा जवळ आला. शेतकऱ्याने मुलाच्या मदतीने शेताची नांगरणी केली. त्यानंतर चांगला पाऊसही झाला. शेतकऱ्याने पेरणी केली. त्यानंतर शेतात वेळेवर निंदणी नि खुरपणीही केली. पाऊस त्यामानाने बरा पडला होता. त्यामुळे पीक चांगले आले. शेतकरी व त्याचा मुलगा दोघेही सुखावले. काही दिवसांनी पीक काढायचे ठरविले. शेतात खळे पडले. त्या दिवशी शेतात सकाळपासूनच शेतकरी व त्याचा मुलगा राबत होते. सायंकाळपर्यंत धान्याची चांगली रास पडली. फक्त ते गोळा करून घरात ठेवायचे होते. सकाळपासून काम करत असलेला मुलगा कंटाळला. तो म्हणाला, बाबा, आता हे काम आपण उद्या करू. त्यावर शेतकरी म्हणाला, नको हेही काम आजच करू. वाटल्यास तू थोडी विश्रांती घे आणि नंतर माझ्याबरोबर कामाला ये. मुलाला ते योग्य वाटले नाही, तो शेतकऱ्याबरोबर कामाला लागला. सगळे धान्य भरून झाल्यानंतरच ते थांबले. काही वेळाने अचानक आकाशात ढग जमून आले. पाठोपाठ सोसाट्याचा वाराही सुटला. पाहता पाहता मुसळधार पाऊससुरू झाला. तेव्हा मुलगा शेतकऱ्याला म्हणाला, बाबा, आपण जर काम अर्धवट सोडून उद्यावर टाकले असते तर संपूर्ण धान्याची नासाडी होऊन आपले खूप नुकसान झाले असते. शेतकरी म्हणाला, म्हणून तर तुला सांगत होतो हे काम आजच करून टाकू. कारण उद्यावर जो कोणी विसंबून राहील त्याला कोणते फळ मिळेल याची हमी देता येत नाही.

      January 25, 2017


  • शाईपेन,, लेखणी

    ..... हे शाईचे पेन पहिले की मनाला फार आनंद होतो व असे सुंदर सुंदर पेन पाहिले की डोळ्याचे पारणे फिटते. पूर्वी शाळेला होतो तेव्हा टाक दौत बरु अशा वस्तू असायच्या पण पुढे पुढे टाक व दौत जावूनशाईपेन आले. त्यावेळी अनेक कंपन्या पेपर क्विन या नावाचा पेन बाजारात येत होता. तशा अनेक कंपन्या शाईचे पेन विक्रीसाठी काढत होत्या. सध्या तर रंगीबेरंगी बॉल पेन बाजारात पहावयास मिळतात मी लेखक असल्यामुळे शाईपेन वर माझे फार प्रेम आहे. बाजारात शाईचा पेन आला म्हणजे मी खरेदी करणारच इतकं प्रेम. शेवटी काय आहे पेन कोणताही असो लिहिण्याची प्रतिभा मोठी असली पाहिजे त्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही हे मात्र निश्चित. मध्यंतरीच्या काळामध्ये एअर पेन कंपनीचा पेन हुबळी ऑफिस मध्ये एका क्लार्क च्या हातात मला दिसला. माझा जोडीदार रेल्वे कर्मचारी गुंडाप्पा हा हुबळी डिव्हिजन मध्ये शिपाई म्हणून काम करत होता. क्लार्क च्या हाता मधील हिरव्या रंगाचा शाईपेन पाहून माझं मन म्हणू लागले. हा शाईपेन माझ्या मनात भरला आहे तो मला मिळाला पाहिजे म्हणून मी गुंडाप्पा जवळ आग्रह धरला व मी म्हणालो माझं लक्ष त्या शाईच्या पेन वर गेले आहे. तो क्लार्क मला पेन देईल का काहीही करून मला तो पेन फार आवडला आहे आपण त्याला पैसे देऊ. हुबळी हा भाग कर्नाटक मध्ये असल्यामुळे तेथील मूळ भाषा कन्नड आहे गुंडाप्पा ला कन्नड येत होते. माझा हट्ट पाहून तो त्या क्लार्क जवळ गेला आणि कन्नड मध्ये सांगू लागला. हा रेल्वे कर्मचारी आहे त्याने माझ्यासोबत किर्लोस्करवाडीला काम केले आहे. शिवाय तो मराठी रायटर आहे त्याला तुमचा पॅन फार आवडला आहे तो क्लार्क मनाला ठीक आहे त्याने लगेच पैसे दिल्या बरोबर मला हिरव्या रंगाचा पिल दिला. माझ्या मना ला फार आनंद झाला आणि एका क्षणात तो पेन मी आनंदाने खिशाला लावला. इतकं प्रेम माझेपेनवरतीआहे परवा तर मी कराडला सहज गेलो असता प्रथम पेन दुकान कोठे आहे याची चौकशी करतो कराड सिटी मध्ये शालीनी बुक दुकान मी शोधून काढले. पाठीमागे एकदा याच दुकानातून शाईचा एअरमैल पेन खरेदी केला होता. तोपेन भरपूर जाड व त्या पेनला आठ नंबरची मोठी निफ दिसायला पेन बहारदार असा सध्या माझ्याजवळ शाईपेन भरपूर आहेत. मी माणसापेक्षा पेन वर पुस्तकावर अतिशय प्रेम करतो हा माझा स्वभाव आहे. बाजारामध्ये एखाद्या नवीन लेखकाचे पुस्तक आले म्हणजे खरेदी करणारच इतकं प्रेम. मला काही लेखक लोक म्हणतात तुमची शाळा कमी इतके साहित्य कोणत्या पेन ने लिहिले मी त्यांना म्हणतो कोणताही पेन असो लेखका जवळ प्रतिभा असावी लागते. तर काहीजण म्हणतात रेल्वेची बारा तासाची ड्युटी करून तुम्ही साहित्यनिर्मिती कशी करता. या सार्‍या प्रश्नांची उत्तरे मला द्यावी लागतात एवढे मात्र निश्चित. पेन मधून जिभळी च्या साह्याने काळी किंवा निळी साई उतरते त्याप्रमाणे डोक्यातील विचार पेनच्या साह्याने ऑटोमॅटिक उतरतात हा माझा अनुभव आहे. मी फक्त एकदाच लिहितो त्या साहित्यामध्ये खाडाखोड अजिबात नसते. इतका विश्वास माझा शब्दावर आहे म्हणूनच काही पुस्तकाचे लेखन मी करू शकलो. आमच्या घरामध्ये पूर्वी कोणाचाच वारसा लेखक म्हणून नाही तो माझ्याकडे कसा आला हे सुद्धा मला माहीत नाही. सातत्याने लिहित गेलो अजूनही लिहितोय हा माझा एक वेगळा आगळा छंद आहे. कधी पुरस्कारासाठी कुठेही अर्ज केला नाही पुरस्कार संस्थासुद्धा मला माहीत नाहीत. माझ्या बाबतीत वर्तमानपत्रातून व माझ्या साहित्यातून महाराष्ट्राला समजले यातच मी माझा आनंद व्यक्त करतो. शब्द भांडवल समाजाचे आहे मी यात कुणीही नाही समाजाकडून शब्द भांडवल घेतले व साहित्याच्या रुपाने मी त्यांना परत केले आहे. लेखक होऊन होत नाही प्रतिभा व वास्तव याचा मेळ झाल्याशिवाय साहित्य निर्मिती होत नाही. हल्ली कथा कादंबरी कशी लिहायची याची कार्यशाळा निघत आहे परंतु पुढे घडलेली कथा किंवा कादंबरी त्यावेळचा परिसर कथेतील किंवा कादंबरीमध्ये येऊन गेलेली पात्रे. ही पात्रे कादंबरी किंवा कथेशी निगडीत असतात त्याच्यासाठी कार्यशाळेची काय गरज परंतु हल्ली तर कार्यशाळा निर्माण होत आहेत याचा आनंद मानू बस इतकच...।

    -–दत्तात्रय पांडुरंग मानुगडे,

    ग्रामीण कथा लेखक...।

      September 19, 2022


  • माझ्या प्रोफाईल फुटुची गोष्ट

    मी फेसबुकला कधीच माझा प्रोफाईल फोटो लावत नाही..
    नाही..नाही..गैरसमज करून घेऊ नका..कोणी फोटोचा गैरवापर करेल असला विचारही माझ्या आसपास फिरकत नाही.कारण तसं करायला सुंदर तर सोडाच पण जरा बरा चेहरा लागतो..माझा तो आजिबात नाही..
    दोन चार महिन्यांपूर्वी आपणही जरा बरं दिसावं असं उगीचच मनानं घेतलं..म्हटलं छानसा हेअर-कट केला तर कदाचित वय दोन-पाच वर्षे कमी दिसेल.
    म्हणून लेक पुण्यात असताना (तिला आल्यावर सर्प्राइज द्यावं म्हणून) केस कापायचा घाट घातला.
    माझ्या "बॉयकटच्या" मागणीला धुडकावून ब्युटिशियने "छान वेगळाच हेअरकट करते "च्या नावाखाली पाचशेची नोट खरी केली..
    आरशात पाहिल्यावर ब्युटिशयनशी "मी पूर्वी कधी फार वाईट वागले होते का" हे अनेकदा आठवून पाहिलं पण आठवेना..आणि तरीही तिने असा माझा सूड का घेतला असावा हे समजेना.
    नव-याची हेअर-कटला डायरेक्ट नावे ठेवण्याची हिम्मत झाली नाही.पण त्या दिवसापासून तो घरी आलेल्यांना मी घरात नाहीये ,असं परस्पर सांगून टाकतो. डोक्याला रुमाल किंवा ओढणी बांधल्याशिवाय त्याच्याबरोबर गाडीतून बाहेर नेतच नाही..!!
    " आई हा प्राणी बावळट असतो " ही समजूत ज्या वयात पक्की होते त्या वयात असलेल्या लेकीने पुण्याहून आल्यावर माझा हेअर-कट पाहून गोंधळ घातला नि " आपली आई बावळटपणाच्याही पुढे गेलीय " अशा तिच्या समजुतीवर शिक्कामोर्तब झालं..!
    " आईला काय झालं गं?" असं जेंव्हा तिच्या घरी आलेल्या मैत्रिणीने तिला सहानुभूतिपूर्वक विचारलं तेंव्हा तर तिने मला " डिस्ओन" करायचं ठरवलं होतं..
    आता अशी परिस्थिती असताना फोटो फेसबुकच्या प्रोफाईलला लावणं बरं दिसतं का?
    आणि अगदी लावायचा म्हटलं तरी लावता आला पाहिजे नं?
    आपली धाव एखादा लेख लिहून तो स्वत:च्या वॉलवर किंवा एखाद्या ग्रुपवर शेअर करण्यापुरती!
    परवा काय झालं..नेहमीप्रमाणे पहाटे दोनला जाग आली..( झोपेच्या बाबतीत मी घुबडाची वारस आहे)
    आता पहाटे दोनला आपल्याला फेसबुकशिवाय दुसरा सहारा नसतो.

    मग लेख वाच,कविता वाच,बायांनी टाकलेल्या पदार्थांचे फोटो बघ आणि त्यावर कमेंट कर..असा कार्यक्रम असतो..
    हे झालं की स्वामी समर्थ,गोंदवलेकर महाराज,निरनिराळे देव, देव्या ..यांचे फोटो येऊ लागतात.
    " स्वामी समर्थ " लिही तुला चांगली बातमी मिळेल ..असं वाचलं की कुठंतरी चांगल्या बातमीचा मोह पडतो नि बोटं "श्री स्वामी समर्थ" लिहितात. मग अनेक महाराज,देव यांची नामे लिहून मी मधमाशीनं मध गोळा करावा तसं पुण्य गोळा करत सुटते..
    मन अगदी प्रसन्न होतं आणि सकाळ सकारात्मक होते.
    काल असच झालं.
    श्री स्वामी समर्थांचा फोटो आला.मी नेहमीप्रमाणे " श्री स्वामी समर्थ ??? " असं लिहिलं . लगेचच नोटिफिकेशन आलं " Your comment is declined ".
    मला काही समजेनाच. माझी कमेंट का नाकारली गेली?
    म्हटलं काहीतरी टाईप करण्यात चूक झाली असेल.पुन्हा टाईप केलं.पुन्हा तसच नोटिफिकेशन आलं..Comment declined.त्याचवेळी इतरांच्या कमेंट्स मात्रं accept होत होत्या.
    आता गोंदवलेकर महाराजांच्या फोटोवर " जयश्रीराम ???" लिहिलं ..
    लगेच " Your comment is declined " नोटिफिकेशन..
    आतामात्रं मी पुरती खचले.
    माझा नमस्कार स्वामी समर्थ,गोंदवलेकर महाराज का स्वीकारत नसतील? माझ्या हातून काही पाप घडलं असेल का?
    हं ,म्हणजे मी देवाचं खूप काही करत नाही..पूजाही अगदी षोडशोपचारे वगैरे नाही..सवाष्णी घालणे वगैरे तर लांबच..हे स्वामी आणि महाराजांना कळलं असेल का? म्हणून ते रागावले असतील ?
    पण मी रामनाम आणि समर्थांचा जप तर मनापासून करते ....मग असं का व्हावं?
    आता लेकीच्या फेसबुक अकाऊंटवरून लिहिलं ...मान्य झालं..
    नव-याचा मोबाईल पळवला..
    बराच वेळ खपून अन्लॉक केला.

    आणि वरकरणी नास्तिक असलेल्या आणि कामालाच ईश्वर मानणा-या नव-याचं नामही चक्क कबूल झालं..
    आता मात्रं माझ्या अस्मितेचा,माझ्या श्रद्धेचा प्रश्न होता..
    सगळ्या कमेंट्सचं नीट निरीक्षण केल्यावर लक्षात आलं की सगळ्या कमेंट्सकर्त्यांच्या प्रोफाईलला फोटो आहे नि मला नाहीये..
    तो ये बात है!
    आता मी इरेला पेटले.
    प्रोफाईलला फोटो टाकायचा नि नाम लिहायचं.
    पण फोटो कसा टाकायचा ते कुठं माहीत होतं?
    शेवटी गुगलमामांची मदत घेतली..
    आता फोटो कुठला टाकायचा हा प्रश्न होता..
    शेवटी हेअरकट केल्यावर "किती भयानक दिसतो" हे पहायला काढलेली सेल्फी हा एकमेव फोटो मदतीला आला..
    प्रोफाईलला फोटो लावू , नाम लिहू आणि मग लगेच फोटो परत काढून टाकू ... रात्रीची वेळ असल्याने असला फोटो कुणी पहाणार नाही..या विचाराने एकदाचा फोटो आणि प्रोफाईल यांची मोट बांधली..
    लगेच समर्थांच्या नि गोंदवलेकर महाराजांच्या ग्रुपवर कमेंटही केली नि चक्क ती कमेंट मान्य झाली..
    मी स्वत:ची पाठ थोपटली..
    आता तो दिव्य फोटु काढून टाकायचा म्हणून " वॉलवर " आले..
    तर तेवढ्यात अमेरिकेतल्या मैत्रिणीची फोटोचं कौतुक करणारी " काव्यमय" कमेंट आलेली..
    जीव लाजेनं अगदी चूर झाला..
    तेपर्यंत अमेरिकेतल्याच तिच्याच बहिणीची कमेंट..
    आतामात्रं लाजेनं जीव अर्धमेला झाला..
    अजून इतरांनी हा फोटो पहायच्या आत काढून टाकला पाहिजे..
    पण फोटो काढायचा कसा?
    पुन्हा गुगलची झडती घेतली..
    त्याच्या सूचनेनुसार गॅलरीतल्या माझ्या " त्या " फोटोवर गेले नि क्लिक् केलं..पण प्रोफाईलचा फोटो काही जाईना..
    पुन्हा तीन-चार वेळा तसच केलं.पण फोटोकाही जाईचना ..झुकुमामांना फोटो फारच आवडलेला दिसत होता..
    एवढ्यात मेसेंजरवर अमेरिकेतल्या मैत्रिणीचा, बाळीचा मेसेज आला..
    " कौतुक केलं म्हणून किती फोटो टाकतीयस? तोच फोटो पाच -सहा वेळा आलाय ..एकच पहिला फोटो ठेव ,बाकीचे काढून टाक.."
    म्हणजे मी फोटो काढायला बघत होते नि तोच फोटो पुन्हा नवीन म्हणून पडत होता..!!
    वॉलवर माझ्या फोटोंची एकामागून एक बरसात होत होती..
    " फेसबुकफ्रेंड काय म्हणतील" ,या विचाराने जीव अर्धमेला होत होता.
    अभिमन्युसारखी अवस्था झालेली होती..
    फोटो घालण्याच्या चक्रव्यूहात शिरता आलं होतं पण आता बाहेर पडता येत नव्हतं..
    लेकीची मदत घ्यावी तर आदले दिवशीच तिच्याशी भांडण झालेलं..
    " तुझं कोणतंही काम यापुढे करणार नाही " ही धमकी मिळालेली..तिच्यापुढे हात कसे पसरणार ?
    शेवटी फोन बंद करून लांब ठेऊन दिला..
    दुसरे दिवशी घाबरत घाबरत फोन उघडला तर फेसबुक फ्रेंड्सच्या फोटोचं कौतुक करणा-या केवढ्या तरी कमेंट्स आलेल्या..
    लागोपाठ चार-पाच फोटो टाकल्यावर कौतुक करण्यावाचून त्यांना पर्यायच राहिला नव्हता..
    जीव थोडा-थोडा झाला..
    कमेंट्सना उत्तर द्यायचं धाडसही झालं नाही..
    काल रात्री लेकीशी सलोखा झाला..
    " आई , तू कधीकधी लाज आणतेस बघ ...प्रोफाईलला कसला बेकार फोटो टाकलायस ...बरं तोही एखादा टाकावा...चार-पाच फोटो
    एकामागून एक?
    दे तुझा मोबाईल ...काढून टाकते सगळे..."
    आता लेक ते सगळे फोटो कधीही काढून टाकेल..
    त्यापूर्वी येड्यागबाळ्या माझ्या फोटोचं मनापासून कौतुक केल्याबद्दल सगळ्यांना "खूप खूप धन्यवाद "!

    नीला महाबळ गोडबोले
    सोलापूर

      January 16, 2024


  • गावाकडची अमेरिका – अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे चित्रण

    सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्‍या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्‍या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल.

      July 16, 2011


  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १३)

    कुणी मला म्हणाले तुम्ही अष्टपैलु आहात ! कुणी म्हणाले तुम्ही अष्टावधानी आहात ! कुणी म्हणाले तुम्ही हरफ़न मौला आहात ! तर कुणी म्हणाले तुम्ही म्हणजे एक कलंदर व्यक्तिमत्व आहात ! ….पण अगदी खरं सांगायचं झालं तर आजही मी सर्वसामान्यच आहे … *इदं न मम*…आहे तितुके देवाचे ..! एवढेच मी म्हणेन ! हे सर्व सहवासाचे फलितदान आहे !….

      June 6, 2021


  • सफर

    हिंदीतल्या “सफर”ला इंग्रजीत “SUFFER “कां म्हणतात हे काल नव्याने कळलं !

      May 28, 2022


  • ख्याली – खुशाली

    साधे -सुधे पोस्त कार्ड , आंतरदेशीय-पत्र  आणि पाकिटे ” यातून एकमेकांना ख्याली-खुशाली “कळवली जात असे. घरातील वडीलधार्या व्यक्तींनी पत्रातील मजकूर वाचून सगळं खुशाल आहे बरं का ! असे भरल्या आवाजात सांगितले की ..भरलेले डोळे पदराने कोरडे करून मोठ्या समाधानाने ..घरातली  बाई-माणसं पुन्हा कामाला लागत .

      January 16, 2019


  • अवघा रंग एक झाला !

    किशोरीताई गेल्या..... यानंतर मनात बरेचसे प्रश्न उपस्थित झाले..... अाज माझ्यासकट सगळेच सौजन्याने अादरार्थी संबोधतो , पण सहेला रे मधली एखादी तान वा रंगी रंगला ची तान कानावर पडली की अापसूकंच काय गळा अाहे हिचा! असंच वाक्य येतं ना ? लता , अाशा काय गाते असंच येतं ना ? या सगळ्या थोर कलाकारांशी अापण अापली तुलना करुच शकणार नाहि , पण तरीहि ते सगळे एकेरी संबोधण्याएवढे जवळचे वाटतात , हो ना ?
    अापल्या नेहेमीच्या अायुष्यात बर्‍यावाईट प्रसंगानुरुप एक निसर्ग वगळता कुठलंच पार्श्वसंगीत नसतं , तरीही संगीताच्या साथीने अालेले सूर अायुष्य व्यापून टाकतात..... रात्री एकटं असताना मुकेश सखा असतो , दुपारी माध्यान्ह समयी कुमार गंधर्व झुळुक बनून येतात , माहौल विशिष्ट असेल तर पंकज उधास असतो , अाणि २४ तासांत कधीही तानपुर्‍याचा रेंगाळणारा सूर अाणि किशोरीसारखा कुणाहि शास्त्रीय संगीताशी निगडित अावाज अापल्याला अंतर्मुख करून जातो.....

    असं म्हणतात की चौर्‍यांऐंशी लक्ष योनीपैकी शेवटचा जन्म माणसाचा अाणि तेंव्हा ईश्वराकडून मोक्ष मागून घ्यावा..... पण अापण सारेच इतके भाग्यवान अाहोत की अारक्षणामुळे बरबटलेला असला , कितीहि समस्या असल्या तरी अापण भारतात जन्मलो याचा कुणीहि हेवा करावा ! अगदी अंगावरच्या कपड्यांपासून ते खाण्यापर्यंत अाणि अायुष्य व्यापून उरलेल्या अभिजात भारतीय गाण्यापर्यंत अापण किती भाग्यवान अाहोत याची जाणीव होते !
    १४ जानेवारी २००८ ला अाम्हि मित्र शिवरायगडवर होतो अाणि काहि मित्रांनी खवचटपणे "तू कवी अाहेस ना , मग अात्ता एक कविता करुन दाखव बघू!" असं म्हटलं , तेंव्हा मी म्हटलं अरे कविता सुचणं हे त्याची किमया अाहे , मी कविता *पाडंत नाहि!पण प्रयत्न करतो !" असं म्हणून केलेली एक चारोळि ऐकवतो :

    शिवरायगड.....

    तुमच्या ३६० किल्ल्यांपैकी प्रत्येक किल्ला सर होताना मला पहायला अावडलं असतं ,
    पण त्याहिपेक्षा जास्त , रायगडाच्या पायरीचा चिरा होऊन रहायला मला अावडलं असतं !
    माझ्या मनुष्य जन्मावर मग मी हत हसंत पाणी सोड असतं ,
    कारण येता जाता शिवराय , तुमचं पाऊल माझ्यावर पडलं असतं!

    याच धर्तीवर अाज असं वाटतंय ,

    किशोरीताईंच्या तानपुर्‍याची खिट्टी म्हणून जरी जन्म मिळाला असता ना , तरी अायुष्य सफल झालं असतं , गानसरस्वतींनी हाताळणं अाणि मग त्यांच्या गळ्यातून येणार्‍या अविरत सुमधूर स्वरांनी चिंब होणं यापरतं मोठं भाग्य कुठलं महाराजा !

    किशोरीताई , माझ्यासारख्या { शास्त्रीय संगीतातील ठोंब्या } तमाम संगीतप्रेमींना सुरांनी चिंब भिजवलंत अाणि अाज जाता जाता डोळे तुडुंब पाण्याने भरून अामच्याच अासवांनी अाम्हाला भिजवलंत ! दाटलेल्या कंठानी एवढंच म्हणतो : अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग.....

    उदय गंगाधर सप्रे(म)
    ठाणे

      April 4, 2017


  • डी.पी.

    तिसर्‍या पहारची येळ व्हती. अजून शिरू झोपडीकडं आला नवता.त्याची कारभारीन ईमली भाकर आन कोरड्यासं घेऊन केधोळची आलती .

      February 4, 2026