नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आजूबाजूचं सौंदर्य नजरेने टिपत असताना काही मिनिटातच एकदम आरडाओरडा ऐकायला आला. समोर बघितलं तर मी सोडून दिलेली ‘गोंदोलो बोट’ पाण्यात पूर्णपणे उलटली होती. सर्वजण गंटागळया खात होते. जीवाच्या आकांताने ओरडत होते.
September 6, 2020
सन १९९८ मधला श्रावण महिना...नुकत्याच भात लावण्या संपलेल्या होत्या.शेतकरी वर्ग थोडा निवांत झाला होता.शेताची उरलेली कामे,जनावरासाठी हिरव्या गवताच्या पेंढ्या कापुन आणने जनावरे सांभाळणे येवढीच काय ती कामे करायची.बाकी निवांत....
ग्रामीण भागात श्रावण महिन्यातील अतिशय सुंदर व मनमोहक वातावरण असते.सगळीकडे हिरवेगार डोंगर..व डोंगर द-यातुन पांढरेशुभ्र खळखळणारे ओढे- नाले,ओहळ आणि दुथडी भरून वाहणारी नदी..मधेच एखादी पावसाची जोरदार सर तर थोड्याच वेळात पडणारे उन व साथीला पडणारे इंद्रधनू असे विलोभणीय दृश्य असते..
गावात अनेक ठिकाणी ग्रंथ.पोथ्या- पुराणांचे पारायण असायचे.सोमवार,गुरूवार,शनिवार उपवास..असायचा.
त्या दिवशी सोमवार होता..मी आँफिसमधून नुकताच घरी येऊन हातपाय धुऊन बसलो होतो.दिवसभर उपवास असल्यामुळे कधी एकदा जेवण करतो असे झाले होते..
आणिअचानक आमच्या घरी गावातील श्री.गणपत मोहन आले.आणि म्हणाले..कपडे घालुन तयार व्हा..दामू मोहन यांच्या बायकोला सर्पदंश झाला आहे.ताबडतोब चला...दामू मोहन व त्यांचे कुटुंब म्हणजे गावातीलआदर्श कुटुंब..सर्वाबरोबर मिळुनमिसळून राहणारे कुटुंब..विशेष म्हणजे आमच्या वडीलांचे दामू मोहन हेअत्यंत
जवळचे मित्र ...
सर्पदंश म्हटल्याबरोबर कपडे घातले व जेवण न करताच लगेचच मोटार सायकल घेऊन श्री,गणपत मोहन यांना घेऊन त्यांच्या घरी निघालो.
तेथे संपुर्ण गावातील व वाड्या वस्त्यांतील खुप लोक जमा झालेले..
दामू मोहन यांची पत्नी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत झोपलेली..खुप लोकांचे म्हणने असे की तीला डाँक्टर कडे घेऊन न जाता गोट्या कातक-याकडे न्या.तो औषध देईल..तेथे देवीची भक्तीन पण आहे.ती काहीतरी अंगारा देईल...मी म्हणालो..आपण डेहणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊया..परंतू खुप लोकांनी विरोध केला..त्यांचे म्हणने असे की दवाखान्यात डाँक्टर नसतात.औषधे नसतात.डेहणे थोडे लांब आहे...विष शरीरात भिनत चालले आहे..तीथ पर्यत पेशंट जगला पाहिजे....त्यापेक्षा विठ्ठलवाडी हे अंतर जवळ आहे..
लोकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यापेक्षा पेशंटला उपचार मिळणे अतिशय महत्त्वाचे होते..मी माझ्या मोटारसायकलवर मी, संर्पदंश झालेल्या काकू,माझा चुलत भाऊ मारुती धर्मा तळपे व गावातील समाजसेवेची आवड असनारे व गावच्या धार्मिक कार्यात भाग घेणारे श्री.कमाजी (म्हतारबा) हुरसाळे असे चौघे निघालो.शिरगावला आल्यावर डेहण्याला जायचे की विठ्ठलवाडीला असा संभ्रम पडला..मारुती म्हणाला विठ्ठलवाडी तर कमाजी म्हणाला डेहणे..शेवटी मी डेहण्याकडे गाडी वळवली....
धुओली गावाजवळ गेल्यावर काकुंनी मान टाकली..नाडीचे ठोके थांबले...मारुती म्हणाला..गाडी मागे वळव...पेशंट संपला...माझ्या हृदयात चर्रर्र झाले...गावातील लोक आता आपल्याला खुप बोलतील व पेशंट गेल्याचा बधूपणा आपल्यावर येईल.याचे शल्य टोचत राहणार.असा विचार येऊन गेला विचाराच्या.तंद्रीत.तशीच गाडी घेऊन रात्री ८.३० वा. डेहणे गाठले..दवाखान्यात गेलो तर तेथे कुनीच नव्हते...त्यातच लाईट गेलेली..त्यामुळे अजुनच अस्वस्थ वाटू लागले.नको ते विचार मनात येऊ लागले.आणि अशातच एका स्रीचा आंधारातुन आवाज ऐकू आला..कोण आहे..?..बहुदा त्या रात्रपाळीच्या नर्स असाव्यात...
या बाईला सर्पदंश झालाय...
डाँक्टर आहेत का? मी विचारले..
हो आहेत...
थांबा मी बोलावते..
असे म्हणून नर्सबाई गेल्या.व लगेचच डाँक्टर व नर्सबाई भलीमोठी इमर्जन्सी ट्युब (विजेरी) घेऊन आल्या..
पेशंटला काँटवर झोपवण्यात आले.
डाँक्टरांनी काकूंना तपासले..तपासुन झाल्यावर डाँक्टर बोलले.पेशंट जगण्याची फक्त ५% खात्री आहे.खुप उशिर झाला आहे,. तरीही मी प्रयत्न करतो.बघुया..
तेवढ्यात कमाजीने प्लँस्टिक पिशवी डाँक्टरांकडे दिली.त्यामध्ये काकूंनी मारलेला साप होता..
डाँक्टरांनी साप निरखून पाहिला.व बोलले.Good,आता आपल्याला उपचार करणे खुप सोपे झाले..
तात्काळ काकूंना सलाइन लावण्यात आले.व त्यामध्ये इंजेक्शन भरले.सलाइन.संपल्यावर पुन्हा दुसरे..अशा प्रकारे तीन-चार सलाईन लावली.तो पर्यंत गावातील खुप लोक आले होते.व वेगवेगळ्या चर्चा करत होते..थोड्याच वेळात काकुंनी डोळे उघडले..सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.नववे सलाईन व औषध संपल्यावर काकू बोलू लागल्या..
त्यानंतर मला भुकेची तीव्र जाणीव झाली..तो पर्यंत उपवास असुनही भुकेची साधी आठवणही आली नाही हे विशेष..।
-- श्री.रामदास तळपे (मंदोशी ) ता.खेड जि.पुणे
June 4, 2024
सुमारे ५ अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सूर्याचा जन्म झाला व त्याचेच एक अपत्य म्हणजे आपली पृथ्वी. पृथ्वीसुद्धा सूर्यासारखीच लालभडक रसरसलेली होती. त्यावेळी पृथ्वी म्हणजे तप्त द्रवरूप, वायुरूप असा सूर्याभोवती फिरणारा एक गोळा. काळ कुणासाठीच थांबत नाही. वर्षांमागून वर्षे सरत होती. पृथ्वीचा हा गोळा थंड होऊ लागला. पृथ्वी बाह्यतः थंड झाली. पण अंतरंगात मात्र धगधगत राहिली. पण थंड होत असताना तिच्या पृष्ठभागावर कवच निर्माण झाले. जणू दुधावरची साय. तिचा पृष्ठभाग थंड झाला, घन बनला. कवच्याच्या खोलगट भागात पाणी साचले. तिथे महासागर निर्माण झाले. उरलेला भाग म्हणजे भूखंड. थोडक्यात कवचावर जमीन आणि पाणी अशी वाटणी झाली. जमीन असलेले शिलावरण आणि पाणी असलेले जलावरण! शिलावरणाचे नाव होते पांगेआ (Pangea). तर आजही पृथ्वीचा अंतर्भाग शिलारसाने भरलेला आहे.
आणि एके दिवशी भूगर्भातील अनाकलनीय घटनेमुळे ह्या भूकवचाचे दोन तुकडे झाले. परत ह्या तुकड्याचे आणखी सहा मोठे व बारा-तेरा लहान तुकडे झाले. हे तुकडे हालचाल करू लागले. एकमेकांपासून दूर सरकू लागले. त्यामुळे आताचे ऑस्ट्रेलिया व भारत हे देश आफ्रिकेपासून सुटून दूर गेले. भारत ज्या भूकवचावर आहे त्या कवचाचे नाव गोंडवन. हा गोंडवन उत्तर दिशेला असलेल्या युरेशियन ह्या भूकवचाच्या तुकड्याकडे सरकू लागला.
सुमारे ९० कोटी वर्षांपूर्वी युरेशियन व गोंडवन ह्यांच्या सीमा ‘टेथिस' समुद्राने निश्चित केल्या होत्या. ह्या दोन्ही भूखंडावरून येणाऱ्या नद्या आपल्या बरोबर गाळ आणत होत्या व टेथिस समुद्रात आपल्या बरोबर आणलेला गाळ समर्पित करत होत्या. शेवटी एके दिवशी ह्या गाळाने हा समुद्र उथळ झाला.
गोंडवन उत्तरेकडे सरकतच होते आणि ५-६ कोटी वर्षांपूर्वी लाव्हारसाच्या प्रचंड शक्तीने हे दोन्ही भूखंड दोलायमान झाले. भारत ज्या भूखंडावर आहे तो भूखंड उचलला गेला व युरेशियन भूखंडावर आदळला. बिचारा टेथिस समुद्र या भूखंडांच्या मधे चिरडला गेला. तळाच्या गाळासह टेथिस समुद्र दुमडला व त्याचा तळ उचलला गेला. त्याच्या तळाला असंख्य वळ्या पडल्या आणि हिमालयाचा जन्म झाला. ह्या वळ्या म्हणजेच हिमालयाच्या पर्वतरांगा! आजही हा तळ दुमडला जात आहे. त्यामुळे वर्षास ९ ते १५ सें.मी. वेगाने पूर्व दिशेला हिमालयाची वाटचाल सुरू आहे तर दरवर्षी १.५ ते ५ सें.मी.ने त्याची उंची वाढत आहे.
दिवसामागून दिवस, वर्षांमागून वर्षे उलटत होती. वातावरणात बदल होत होते. हिमालयाचे रूप बदलत होते. पर्वत शिखरे बर्फात हरवू लागली. उन्हाने बर्फ वितळून प्रवाह वाहू लागले. उंच कड्यावरून खोल दऱ्यात ते झेपावू लागले. वृक्ष-वल्लीत परिसर नटू लागला. हिरवाईत हरवू लागला तर निरनिराळ्या फुलात खुलू लागला. ह्या सौंदर्याचे वर्णन सर्वांना सांगण्यासाठी झरे, नद्या वाहू लागल्या. पृथ्वीवर जणू स्वर्गच उतरला.
आणि एके दिवशी मानवाची पावले ह्या परिसरात पडली. निसर्गाचे हे वैभव पाहून तो थक्कच झाला. एका वेगळ्याच अनुभूतीने त्याला भारून टाकले. त्याची प्रतिभा खुलू लागली. विचारात प्रगल्भता आली. त्याने राहण्याची, विचार करण्याची, आचाराची, उच्चाराची एक धारा निश्चित केली व एका संस्कृतीचा उदय झाला. एका धर्माचा उदय झाला. सिंधू नदीच्या खोऱ्यात हिंदू धर्माचा उदय झाला. आपले प्रगल्भ विचार, कल्पना त्याने हिमालयाच्या कुशीत वेद, उपनिषदे, पुराणाच्या रूपात सर्वांना सांगण्यास सुरुवात केली. पण त्यावेळी तो हिमालयाला विसरला नाही. वेदात तर तो हिमालयाची केवळ स्तुती करून थांबला नाही तर त्याला देवत्व दिले आहे व हवी अर्पण करून त्याची आराधना केली आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात म्हटले आहे की, ज्याचा महिमा विशाल हिमवान म्हणून गायला जातो त्याचे महानत्व समुद्र व धरती गात आहे. अनंत दिशा ज्यांचे विशाल बाहू आहेत, असा हा हिमालय आहे.
काही ऋचांवरून किंवा संदर्भातून एक निष्कर्ष निघतो की हिमालय हे अनेक औषधी वनस्पतींचे आगर आहे. अथर्ववेदातील काही ऋचांचा अर्थ हिमालयात उगम पावून समुद्राला मिळणाऱ्या अनेक नद्या आम्हाला औषधी वनस्पती देतात, असा निघतो. रामायणातील एका प्रसंगी लंकानिवासी वैद्यराज सुर्पणानेही 'संजीवनी १४/ हिमशिखरांच्या सहवासात औषधीचे स्थान' म्हणून हिमालयाचा उल्लेख केला आहे. वस्तुतः हिमालय ही अगणित औषधी वनस्पतींचा खजिना आहे.
वेदात, उपनिषदात तसेच वायुपुराण, ब्रह्मपुराण, पद्मपुराण इ. जवळ जवळ सर्वच पुराणात हिमालयाचा उल्लेख खूप ठिकाणी आढळतो. मार्कंडेय पुराणात हिमालयाचे वर्णन करताना, 'हा पर्वत पूर्व व पश्चिम समुद्रापर्यंत धनुष्याच्या खेचलेल्या दोरीसारखा दिसतो.' असे केले आहे. तर विष्णुपुराणात भारतीयांची ओळख करून देताना पुराणकारांना हिमालय आठवला आहे तो असा:
उत्तरे यत्समुद्रस्य हिमाद्रे श्चैव दक्षिणम् ।
वर्ष तद भारतं नाम भारती यत्र सततिं ।।
स्कंदपुराणाच्या केदारखंडात तर हिमालयातील नदी-नाले, सरोवरे, पर्वत-शिखरे व गुहांची तसेच अनेक स्थानांची पवित्रता सूचित करण्यासाठी विविध कथा कथन केल्या आहेत व शेवटी सांगितले आहे की ह्या भागाची यात्रा करणारा जन्म-मृत्युच्या चक्रातून मुक्त होतो. त्याचा परत जन्म होत नाही. उलट त्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. पुराणात हिमालयाची व्याप्ती पाच खंडात झाल्याचे म्हटले आहे.
खण्डा: पंच हिमालयस्य कथिता नेपाल कुर्माचलौ ।
केदारोऽथ जलोधरोऽथ रुचिर: काश्मीर संज्ञोऽन्तिमः ।।
प्रथम खंड म्हणजे नेपाळ तर दुसरा खंड म्हणजे कुर्माचल (आताचा कुमाऊ). तिसरा खंड म्हणजे केदारखंड (आताचा गढवाल) चौथा खंड म्हणजे जालंधर-पंजाब (आताचा हिमाचल प्रदेश) तर पाचवा खंड म्हणजे काश्मीर.
-प्रकाश लेले
July 4, 2022
माझे शिक्षण गिरगावातील आर्यन शाळेत झाले. आमच्या चाळीतील काही मित्र गिरगाव अन्ग्रेवाडीतील हिंद विद्यालय शाळेत शिकत होते. मित्राच्या घरच्यांचे आणि त्या शाळेतील आपटेबाईंचे घरघुती संबंध होते. त्यावेळेस शिक्षक पालकांना निरोप देऊन पालकांना शाळेत भेटण्यासाठी बोलावून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा चालला आहे याबद्दल खरी माहिती देत असतं.
November 20, 2014
आता तुम्ही म्हणाला, सकाळ तर रोजच उगवते आणि चांगले शिष्टाचार असलेले लोक परस्परांना भेटल्यावर रोजच गुड मॉर्निंग म्हणतात. मग हे नवे ‘गुड मॉर्निंग’ काय प्रकरण आहे? तर त्याचं असं आहे की, सहाव्या शतकात होऊन गेलेला हेरॅक्टलिटस् (HERACTLITUS) नावाचा तत्त्वज्ञ या नवीन प्रकरणाचा गुरू आहे.
January 24, 2023
आज सकाळी चहा घेत बसले होते.. गॅस वर कुकर लावला होता.. या कुकर चं काय एवढं असं विचाराल.. तर हा कुकर माझ्या सासुबाईंचा अत्यंत लाडका बरं का.. 20 एक वर्ष तर नक्कीच झाली असतील त्याला..अहो बरोबरच आहे !.. आपण आपल्या कष्टाने घेतलेल्या वस्तू किंवा भेट म्हणून मिळालेली वस्तू जपून वापरतोच.. वय झाल्यावर जसे म्हाता-या माणसांचे दात त्यांना अच्छा करतात तसंच या कुकर चे स्क्रु एक एक करून याला टाटा करत करत साश्रू नयनांनी निरोपही देतात.
March 7, 2021
संत तुलसीदासाच्या काळातच रैदास नावाचे एक संतकवी होऊन गेले. त्यांचे खरे नाव रविदास. मात्र रैदास या नावानेच ते ओळखले जातात.
संत तुलसीदासांनी 'तुलसीरामायण' लिहिले तर संत रैदासाने अनेक भक्तिगीते लिहिली. ते वाराणसीत गंगेच्या किनाऱ्यावर एका झोपडीत राहत असत. आपल्या झोपडीच्या बाहेर बसून ते वहाणा शिवत असत. त्याच्यातून जेवढे उत्पन्न मिळायचे त्यावरच त्यांची गुजराण व्हायची.
त्यांची पत्नीही अतिशय समंजस होती. रैदास जेवढे काही मिळवून आणायचे त्यातच ती सुखासमाधानाने संसार चालवित असे. वहाणा शिवताशिवताच रैदास भक्तिगीते करीत असे त्यामुळे हातात काम व ओठात ईश्वराचे नाम असाच त्यांचा दिनक्रम चालत असे.
एकदा एक साधू वहाणा दुरुस्त करण्याच्या हेतूने संत रैदासाकडे आला. त्याच्या वहाणा दुरुस्त केल्यावर त्याने त्याच्या झोळीतून एक वेगळ्या रंगाचा दगड काढला आणि तो रैदासांना म्हणाला, '' हा परीस आहे. त्याला लोखंड लावल्यास त्याचे सोने होऊ शकते. त्यामुळे हा परीस तुझ्याकडे ठेव म्हणजे तुझे जन्माचे दारिद्र्य मिटेल.''
साधू एवढेच बोलून थांबला नाही. त्याने तेथलाच एक लोखंडाचा तुकडा घेतला. त्याला परीस लावताच त्याचे सोन्यात रूपांतर झाले. हा सोन्याचा तुकडा साधूने रैदासाला देऊ केला. मात्र रैदासाने तो सोन्याचा तुकडा नाकारला.
रैदास साधूला म्हणाला, 'मी दिवसभर कष्ट करतो.. त्यातून पोटापाण्यापुरते जे काही मिळते, त्यात मी व माझी पत्नी मुखी व आनंदी. आहे. सोन्याचा हा तुकडा घेऊन मला माझा नेहमीचा आनंद हरवायचा नाही. कारण माझी सुखासमाधानाची व्याख्याच वेगळी आहे. तुला हा परिसाचा तुकडा कोणाला द्यायचाच असेल तर तो जे रात्रंदिवस पैशाच्या मागे लागले आहेत त्यांना दे.'
असे म्हणून रैदास पुन्हा आपल्या वहाणा शिवण्याच्या कामात मग्न झाले व तो साधू संत रैदासापुढे नतमस्तक होऊन तेथून निघून गेला.
January 31, 2017
एका गावात एक सावकार राहत असतो. त्याने गावातल्या एका माणसाला कर्ज दिलेले असते. बरीच वर्षे लोटतात. कर्ज घेणारा माणूस यथाशक्ती सावकराचे कर्ज फेडत असतो. तरीही बरीच रक्कम शिल्लक असते. सावकार त्याला कर्ज फेडण्याबद्दल सारखा तगादा लावत असतो. शेवटी तो अटीतटीला येतो.
May 17, 2024

अगदी ढोबळ मानाने पाहिले तर व्यंगचित्रा ( cartoon ) मध्ये एखाद्या व्यक्तीमधील न्यून अधिक प्रकर्षाने दाखविले जाते तर व्यक्तिचित्रा ( portrait ) मध्ये चांगल्या गोष्टी प्रामुख्याने दाखविल्या जातात आणि एखादे न्यून असलेच तरी ते दुय्यम ठरते. तर अर्कचित्रात ( caricature ) मुख्य वैशिष्ठ्ये अधोरेखित केली जातात.
April 25, 2017
आकाशवाणी जळगाव केंद्राचे कार्यक्रम ९६३ किलोहटर्र्झ म्हणजेच ३११.५५ मीटरवर प्रक्षेपित केले जातात. हे कार्यक्रम जवळपास २०० किलोमीटरच्या परिक्षेत्रात रेडिओवर ऐकले जातात.
October 16, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti