नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
प्रत्येक साहित्य हे कोणत्या ना कोणत्या प्रेरणेतूनच निर्माण झालेले असते. ती प्रेरणा कधी रागातून, प्रेमातून, तिरस्कारातून अथवा अहंकारातूनही मिळालेली असते. काहीचे व्यक्तीगत आयुष्य त्या आयुष्यात आलेले चांगले – वाईट अनूभवही काहींच्या साहित्याची प्रेरणा ठरत असतात. त्यामुळे ढोबळ्मानाने विचार करता एखाद्या प्रेरणेतून निर्माण झालेले साहित्य वाचकांना कोणती ना कोणती प्रेरणा देतच असतात चांगली अथवा वाईट. त्यामुळे आजचे साहित्य ही प्रेरणादायी आहे असेच म्ह्णावे लागेल नाही का ?
एखादे प्रेमावर आधारित साहित्य वाचून प्रेमात धोका खाल्लेल्याला आत्मह्त्या करण्याची प्रेरणा मिळाली तर त्या साहित्याला प्रेरणादायी साहित्य म्ह्णता येईल का ? नाही म्ह्णता येणार. जे साहित्य मणूष्यास उच्चतम ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरीत करते अथवा समाजासाठी, देशासाठी अथवा जगासाठी काही मोठे कार्य करण्यासाठी प्रेरीत करते ते साहित्य प्रेरणादायी मानले तर आजचे साहित्य किंचितही प्रेरणादायी नाही असच म्ह्णावं लागेल. मागच्या काही दशकात एक – दोन पुस्तके सोडली तर ज्याला फार प्रेरणादायी म्ह्णावे असे पस्तक वाचनात आले नाही. ज्याला अल्प प्रमाणात प्रेरणादायी म्ह्णावे असे साहित्य निर्माण झाले ही असेल पण त्यातून प्रेरणा घेऊन कोणी फार मोठे कार्य केल्याचे वाचनात अथवा पाहण्यात आले नाही.
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि ही स्पर्धा फक्त पैसा, धन-संपत्ती आणि सुखसाधने मिळविण्यासाठीच चाललेली आहे. या स्पर्धेतून वेळ काढून आजची पिढी स्वतःच मनोरंजन करण्याचा थोडासा प्रयत्न करते. त्यासाठी त्यांना आवश्यक असते मनोरंजन करणारे साहित्य. आजच्या जगात प्रेरणादायी साहित्य वाचण्याची गरज पडते ती जीवनात अपयशी ठरलेल्या लोकांना . अशाही लोकांना झटपट पैसा मिळविण्याचे मार्ग सांगणारे साहित्य हे प्रेरणादायी साहित्य वाटते. सर्वाधिक लोकांचा मनोरंजनाकडे कळ लक्षात घेता आता जगभरात साहित्यनिमिर्ती ही मनोरंजनाला डोळ्यासमोर ठेऊनच होऊ लागली आहे. सध्या आपल्या देशात प्रकाशित होणारे साहित्य पाहिल्यास ते सहज लक्षात येते. खर्या अर्थाने प्रेरणादायी साहित्य निर्माण करणारे तुरळ्क आहेत आणि त्यांचाही असं साहित्य निर्माण केल्यामुळे आर्थिकदृष्ट्या कंबरटा मोडलेला आहे. अगदी इंटरनेटवरही एक प्रेम कविता शेअर केल्यावर तिला हजारो लाईक मिळतात पण त्याउलट प्रेरणादायी कवितेला मोजून दहा- वीस लाईक मिळतात. आज प्रेरणादायी साहित्य वाचण्याची वाचकांचीच इच्छा नाही त्यामुळे ते निर्माण करण्याच्या भानगडीतच हल्ली कोणी पडताना दिसत नाही. पूर्वी लिहिल्या गेलेल्या प्रेरणादायी साहित्यालाच आजही बाजारात बर्यापैकी मागणी असल्याचे दिसते. त्यामुळे आजचे साहित्य प्रेरणादायी आहे का ? या प्रश्नाचे ठोस उत्तर आज कोणालाही देता येणार नाही.
-- निलेश बामणे
February 4, 2014
काशी मधी गेली
दिल्लीची बिल्ली. ….
May 24, 2014
आज मला वेगळेच समाधान व आनंद मनास वाटू लागला होता. ऋणमुक्ततेचा आनंद. उपकाराची परत फेड व्हावी आणि त्यासाठी एखादी नैसर्गिक घटना घडावी ह्यासारखी समाधानाची दुसरी गोष्ट असू शकत नाही. कृत्रिमरित्या व आपल्या प्रयत्नाना आपण एखद्या गोष्टीचे ऋण फेडणे, वेगळे. ते फेडण्यासाठी निसर्गाने तुम्हास मदत करणे ह्यात खूप फरक पडतो. तुमच्या अपेक्षित अंतर्मनाची तगमग ह्याची निसर्गाने दाद घेतली हा त्याचा अर्थ बनतो. ह्या ऋणमुक्तीच्या व्यहारात कुणी किती उपकार केले, आर्थिक शारीरिक वा भावनिक हा प्रश्न गौण असतो. त्याची फक्त प्रासंगिक मदत असते, त्याच्या योगदानाची कदर व्हावी हा तुमच्या वागणुकीतील मोठेपणा.
मी माझ्या नांवाचे लेटरहेड आणि विजिटिंग कार्ड ह्यांची छपाई करून घेण्यासाठीचा मजकूर श्री फडके यांच्या मुद्रणालयांत देऊन आलो. चार दिवसांनी त्याचे व्यवस्थित गठ्ठे व छपाई केलेले साहित्य त्यांनी माझ्याकडे पाठून दिले. त्याचे बिल त्यावेळी मात्र पाठविले नव्हते. अर्थात ती रक्कम मला माहित होती. मी नंतर त्यांना भेटून छपाईचे पैसे नेऊन देणार होतो. अचानक एका प्रसंगात मला गांवी जावे लागले. मला तेथेच तीन महिने राहवे लागले. त्यामुळे त्यांचे बिल देण्याचे राहून गेले. परत आल्यानंतर मी ते बिल देण्यासाठी गेलो. एक गोष्ट बघून मी चकित झालो. फडक्यांनी मधल्या काळांत मुद्रणालय बंद करून त्यांचा व्यवसाय दुसरीकडे नेला होता. त्यांचे तेथे कुणीच नव्हते. ते कोठे गेले हे ही कळू शकले नाही. मनाला रुख रुख लागून गेली की त्यांचे पैसे देण्याचे राहून गेले. उपाय नव्हता.
जवळ जवळ तीस वर्षाचा काळ निघून गेला. निसर्गाच्या चक्रामध्ये अनेक प्रसंग, त्यांचे चांगले वाइट परिणाम हे सारे पडद्या आड होत असतात. आठवण विसरणे ही निसर्गाची एक अप्रतिम देणगी असते. मनाच्या शांततेसाठी हे फार महत्याचे असते. मनुष्य ती घटना व त्याचा आशय विसरत असला, तरी म्हणतात की हे सारे त्याच्या दैवी खात्यात नोंदविले जाते. कोणत्याही कर्म केलेल्या गोष्टीची परत फेडकरावी वा तो भोग भोगावा ही निसर्गाची अपेक्षा असते.
मुलीच्या लग्नासाठी एका गांवी जाण्याचा योग आला होता. लग्न पत्रिकेचा मजकूर घेवून एका मुद्रनालयात गेलो. ते वाचून मालकाने विचरले ” आपण ठाण्याचे कां? ” पूर्वी माझ्या वडिलांचे तेथेच मुद्रणालय होते. क्षणात साऱ्या गोष्टीचा उलगडा झाला. त्यांचे वडील आजारी असल्याचे कळले. जांच्या कडून मी तीस वर्षपूर्वी माझे छपाईचे काम करून घेतले होते, तेच हेच गृहस्त होते. त्यांचे त्यावेळचे पैसे देण्याचे राहून गेले होते. ते कर्ज अर्थात अलिखित ऋण म्हणून माझ्या कपाळी शिक्का मोर्तब झाले होते. मला ते फेडण्याचा निसर्गानेच योग दिला होता. त्या प्रसंगाची पुनरपि आठवण जागृत करीत मी हे करू शकलो.
फडके तर हे सारे विसरून गेले होते. मी मात्र त्या ऋण मुक्त तेचा आनंद व समाधान घेत होतो. जागृत राहून, सतर्कतेने प्रत्येक कर्माचे फळ त्याच जन्मी भोगून सदा ऋणमुक्त असावे हाच गीतेमधला उपदेश नव्हे कां? आत्म्याचा बंधनमुक्त होण्याचा हाच संदेश असेल.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 4, 2016
आजच्या आधुनिक युगाने आणि संगणकासारख्या इलेक्ट्रोनिक माध्यमांनी सुध्या ओळख माण्यतेसाठी अंगठ्याचा ठसा हाच एकमेव प्रभावी साधन असल्याचे मान्य केले आहे. त्याच्या समोर अंक, शब्द, खुणा, प्रतिमा, इत्यादी दुयमच ठरतात. त्या अनामिक अशिक्षित परंतु अनुभव संपन्न मावशीला अभिवादन करून मी घरी आलो.
February 22, 2020
जनतेला त्रास देणार्या सर्पाना भक्षण करण्यासाठी राजा हा गरुड़ हवा जर राजा राजहंस असेल तर ….
February 4, 2011
दैनिक ‘रोजची पहाट’चे संपादक सूर्याजीराव रविसांडे अत्यंत अस्वस्थ होते. त्यांचे प्रमुख वार्ताहर काका सरधोपट दिवाळीची सुट्टी घेऊन जे गायब झाले होते ते अजूनही उगवलेले नव्हते. रोजची पहाट होत होती, पण काका नसल्यामुळे दूरदर्शन मालिकांवर विशेषांक काढायचे काम रखडलेल होते. प्रसिद्ध ‘दूरदर्शन मालिका’ लेखिका ज्यांना ‘मालिका मल्लिका’ म्हणत त्या कादंबरीबाई गुंडाळे यांची मुलाखत घ्यायचे काम काकांना दिले होते. पण ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ तसे हे भरवशाचे काका, सूर्याजीरावांच्या काळजाचा ठोका चुकवित होते. त्यामुळेच ते बेचैन होते, तेवढ्यात काका आले.
March 29, 2022
प्रत्यक्ष मृत्यूवर विजय मिळवून मृत्युंजय ठरलेले मार्कंडेय ऋषी. पदमशाली समाजाचे दैवत आहे. त्यांचे जीवन व कार्य, देशभरातील त्यांची स्थाने, मंदिरे, यात्रा आदीबद्दल प्रथमच सर्वंकष माहिती एकत्र ओघवत्या भाषेत लिहिली आहे.
June 17, 2014
मुंबईच्या दौऱ्यात एक दिवस रिकामा होता. खूप दिवस झालेत, दिवस काय वर्षं झालीत विठूला भेटलो नव्हतो. ठरवलं, जमलं तर भेटायचं. खूप ऐकलं होतं त्याच्या गरुड भरारीबद्दल. त्यामुळे खूप बोलायचं होतं. बरंच काही जाणून घ्यायचं होतं.
March 23, 2022
“काल “ची असा शब्द वापरण्याऐवजी या शब्दसमूहात “पूर्वाश्रमीची” असा शब्द वापरलाय, बहुधा “महत्वाची” असावीत म्हणून ! महत्व लोप पावल्याने/ निरुपयोगी असल्याने हळूहळू गृहीत धरली जाणारी, काळाच्या ओघात विसरली जाणारी, एका कोपऱ्यात ढकलली गेलेली माणसे यांच्या संदर्भात नुकतेच काही वाचनात आले.
September 30, 2022
बाबांचा (डॉ. बाबा आमटे) परमेश्वरावर विश्वास नव्हता. त्यांनी आपल्या कामातून प्रेरणा देणारे अनेक पर्याय निर्माण केले. अगदी तरुण वयात मी या कामात ओढला गेलो. बाबांच्या मुशीत तयार झाल्याने मीसुध्दा परमेश्वर नावाची कोणी अदृश्य शक्ती आहे ही संकल्पना मानत नाही.
April 19, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti