नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
गेल्या तीन वर्षापासून माझा संपादकीय भूमिकेतून वाचकांशी आणि लेखकांशी थेट संपर्क येत आहे. मी वाचकांच्या रुची बद्दल काही गोष्टी सांगू इच्छितो पण त्या माझ्या व्यक्तीगत अनूभवातून सांगत आहे हे येथे लक्षात घ्यावे.
‘प्रेम’ या विषयावरील साहित्य आणि त्या भोवती गुंफलेल्या साहित्य वाचण्यात मराठी वाचकांना रुची अधिक दिसते. त्यानंतर आरोग्याशी निगडीत साहित्य वाचण्यात वाचकांना रुची दिसते कारण आता आपल्या आरोग्या बाबतची जागरूकता लोकांच्या मनात वाढू लागली आहे. त्यानंतर चित्रपट, नाटक , क्रिकेट, आणि सध्याच्या दैनदिन मालिका यांच्या विषयी वाचण्यात वाचकांना रुची दिसते. त्यानंतर उरलेल्या वाचकांना राजकारण वगैरे विषयांवर वाचण्यात रुची दिसते. आर्थिक, सामाजिक वगैरे विषयांवरील साहित्य वाचण्यात रूची असणारा एक वेगळाच गट आहे.
संपादकीय भूमिकेतून मला आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्ह्णजे आज लोकांना भरमसाठ वाचायला नाही आवडत. लोकांची आज थोडक्यात बरच काही सांगणारे आणि शिकवून जाणारे साहित्य वाचण्यात अधिक रुची दिसते. वेळेचा अभाव हे एक कारण असेलही कदाचित त्या मागे. मराठी वाचकांना आजकाल शंभर लेखकांचे शंभर विषयांवरील शंभर लेख वाचायला आवडतात पण एकाच लेखकाचे एकाच विषयावरील शंभर पानांचे विचार वाचायला काही मोजक्याच वाचकांना आवडतात त्यामुळेच तर मराठी साहित्यात मराठी दिवाळी अंकाचे महत्व दिवसेन दिवस वाढत आहे.
लघूकथा लोकांना वाचायला आवडत नाहीत अशी ओरड होते पण तस नाही आज वाचकांची रुची डोळ्यासमोर ठेऊन कथा लिहल्या जात नाही हेच कारण असावं कदाचित. बोध देणारे साहित्य वाचकांना वाचायला आवडते पण ते एका मर्यादेपर्यत. त्या साहित्याकडे कोणीही वाचक मनोरंजन या दृष्टीने पाहत नाही. आजच्या वाचकांची मनोरंजन करणारे साहित्य वाचण्याकडे रुची अधिक दिसते. ती रुची लक्षात घेऊनच बोध दाखवणार्या साहित्याची निर्मिती भविष्यात करावी लागेल.
लहान मुलांची वाचनाची रुची लक्षात घेता लहान मुलांनीच् लिहले साहित्य येत्या काळात लहान मुलांना वाचायला आवडेल असं मला व्यक्तीशः वाटत.
वाचकांची जशी रुची असते तशी रुची काही बाबतीत काही संपादकांनाही असते. त्यांना वाचकांना बोध देणारे, त्यांच्या फायद्याचे, त्यांच्या हिताचे ,एकूणच समाजाच्या हिताचे आणि देशाच्या हिताचे रक्षण करणारे साहित्याला प्रोत्साहन देण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्या हया रुचीचा वाचकांनीही सन्मान करायलाच हवा !
भविष्यात वाचकांची रुची सांभाळत – बोधपर साहित्य निर्माण करणारे संपादकच पुढे दिसतील असं चित्र आज तरी स्पष्ट दिसतय.
-- निलेश बामणे
February 10, 2014
लांबलचक रस्ता, आजूबाजूला फक्त आणि फक्त गर्द हिरवी झाडे आणि वर ढगांमध्ये लपलेला सूर्य आणि त्याने झालेले शांत आणि कुंद वातावरण! सुरवातीला तर चालायला मजा वाटत होती. पण बराच वेळ झाला तरी सेंटर कोर्टचा मागमूस नाही कुठे!
January 25, 2022
हुकूमशाहीला किंवा एकाधिकारशाहीला समाजवाद समजलं गेल्यामुळे भारतात लोकशाही हा मोठ्ठा विनोद झाला.
माणसाच्या डे टु डे गोष्टींमध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप होऊ लागल्यामुळे, राजकारणी आणि प्रशासन हा लोकांच्या टीकेचा विषय झाला. निवडून येणे हा सर्वोच्च असण्याचा निकष झाला, शिक्षण अनुभव ज्ञान हे दुय्यम झाले. सत्ता एकवटली गेली, अभिव्यक्ती हरवली गेली.
September 7, 2022
आमच्या शेजारी वयोवृद्ध ताराबाई, ज्याना आम्ही मावशी म्हणत असू,रहात होत्या. निवृत्त शिक्षिका, वय ९८ पूर्ण. जीवनाचे शतक पूर्ण करण्याचा आत्मविश्वास. ह्या वयांत देखिल आनंदी व समाधानी राहण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. स्मरणशक्तीपण त्याना साथ देत होती. वर्तमानपत्रातील फक्त ठळक हेडलाईन्स त्या वाचीत असे.
मी अनेक वर्षे पूजाअर्चा व ध्यानधरणा ह्या दैनदिन विधी करीत असतो. ईश्वरी साक्षात्कार म्हणजे काय ? त्याची अनुभूती, व फळ हे सारे संस्काराने मनावर बिंबवलेले विचार होते. बालपणीच संस्कारांनी रक्तांत शिरकाव केला व शरीराचे एक गुणधर्म म्हणून स्थित झालेले होते. फळाची आशा करु नकोस. कर्म करीत रहा. हा भगवंताचा संदेश तंतोतंत पाळण्याचे व्रत अनुसरीत होतो. पण चंचल मन हे जेवढे संशयी आणि दृढनिश्चयाला बाधा आणते, इतके बाह्य जगांतले कोणतेच विचार कार्य करणार नाही.
एकदा तारामावशी आल्या. त्यावेळी मी पूजा करीत होतो. एक विचीत्र व अफलातून विचार मनात चमकून गेला. मन जसे चपळ, तसेच संशयी पण असते. ते काय व कसा विचार करील हे कुणालाही सांगता येत नाही.
"हे आई जगदंबे, श्रीमती तारामावशी वयाची ९८ वर्षे जगल्या. अत्यंत सरळ व साधी बाई. त्यांच्या जीवनांत अद्यापी कोणतीही घटना अशी ऐंकवांत नाही, की ज्याचा विचार करतां तुझ्या अस्तित्वाची कल्पना मनाला वाटू शकेल. पण तू असे छोटेसे कां होईना, कांही तरी करून दाखव की ज्यामुळे ताराबाईना धन्यता वाटेल. व इतकी आयुष्याची वर्षे घलविली त्याचे समाधान होइल. "
हे जग ईश्वराच्या श्रद्धेसाठी, विजेच्या चमकण्याप्रमाणे एखाद्या चमत्काराची का अपेक्षा करते हे कळत नाही. दुसरय़ाच क्षणी मी माझ्या तंद्रितून जागा झालो. मला हंसू आले. श्रद्धा ठेवत जा. चमत्कार वा कांही प्राप्त होईल हा स्वार्थ तुझी तप साधना कवडीमोल करेल. मी चंचल मनाला आवरत ईश्वराची क्षमा मागीतली.
कांही दिवस गेले. अचानक दोन प्रतिष्ठीत माणसे माझ्या घरी आली. त्यांत एक ठाणे जिल्हा पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष, जे माझे जवळचे मित्र होते. व दुसरे नवोदित ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे याचे संस्थापक/संचालक होते. जे माझ्या परिचयाचे नव्हते. त्यांच्याकडून कळले की ठाण्यामध्ये १५० कोटीहून जास्त बजेट असलेल्या ज्युपिटर रुग्णालयाची संकल्पना पूर्ण झालेली आहे. सामुग्रीने सुसज्ज व ज्येष्ठ डॉक्टर्स तज्ञ मंडळीनी परीपूर्ण असे अद्यावत हॉस्पिटल उभारले गेले आहे. त्यांच्या मँनेजमेंटने सामुहीक सल्ल्याने असे ठरविले आहे की ठाण्यातील जी सर्वांत वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्ती असेल, तीच्याकडून त्या हॉस्पिटलच्या उदघाटनाची फित कापली जावी. त्या व्यक्तीचे प्रथम पाऊल तेथे पडावे. हाती असलेल्या यादी प्रमाणे, श्रीमती ताराबाई यांचे नांव आम्हास कळले. त्या ठाण्यामध्ये ५० वर्षाहून अधीक काळ आहेत. सध्या त्या तुमच्या शेजारी राहतात. कृपया त्यांची अनुमती घेऊन द्याल कां ? त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, ह्याची काळजी घेतली जाईल.
आश्चर्य आणि कौतूकाने माझे ह्रदय भरुन आले.स्वप्नांत देखील ज्याचा विचार मनाला स्पर्ष करणार नाही, ती अघटीत घटना घडू पहात होती. अशा भव्य आणि दिव्य वास्तूचा उदघाटन सोहळा कदाचित् राष्ट्रपती यांच्या हस्ते पार पडेल हे ऐकत होतो. कारण त्या महाराष्ट्राच्याच म्हणून. अथवा पंतप्रधान वा मुख्यमंत्री यांच्या हस्ते. परंतु विधात्याने साऱ्याना एका वैचारीक लाटेमध्ये सहज बाजूस सारुन, श्रीमती ताराबाई ह्या ९८ वर्षाच्या शिक्षिका, एक सामान्य ज्येष्ठ नागरीक म्हणून त्यांच्या हाती उदघाटनाची फीत कापण्याची कात्री द्यावी, हे परम भाग्य सोपवावे, ह्याला काय म्हणणार ? एक दैवी चमत्कारच नव्हे ?
सारे ऐकून ताराबाईंच्या डोळ्यांत पाणी आले होते. आणि त्यांच्या भावना बघून, माझे ह्रदय भरुन आले. मी पाणावलेल्या डोळ्यानी देव्हाऱ्यातल्या मुर्तीकडे बघूं लागलो. पुन्हा मनाने संदेश दिला. श्रद्धा ठेवीत जा, फळाची अपेक्षा करु नकोस. माझा प्रत्येक क्षण मुळी चमत्कारानी भरलेला असतो. त्याला फक्त जाणत रहा. ईश्वरी प्रचिति तेथेच येईल.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
August 25, 2011
गावाबाहेर नदीच्या काठावर एका झोपडीत एक सत्पुरुष राहात होते. ही झोपडी त्यांनी स्वतःच बांधली होती. नदीच्या काठावरच शंकराचे देऊळ होते. तेथे दर्शनासाठी बरेच लोक येत. सर्व लोक निघून गेल्यावर हे सत्पुरुष त्या मंदिरात जायचे व त्या मंदिराची स्वच्छता करायचे. त्यांचा हा दिनक्रमच होता. काही लोक त्यांच्या दर्शनाला यायचे मात्र ते सत्पुरुष कोणाकडे काही मागायचे नाहीत वा कोणी दिले तरी ते घ्यायचेही नाहीत. स्वतः कष्ट करून पोटासाठी लागेल तेवढीच ते कमाई करायचे. एकदा त्यांच्याकडे एक तरुण आला व त्यांना म्हणाला की, मी आतापर्यंत जे जे केले त्यात मला अपयश आले. त्यामुळे नैराश्य आले असून, मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ जाताना तुमच्यासारख्या सत्पुरुषाला भेटावे म्हणून आलो आहे. त्या सत्पुरुषाने त्याची सर्व हकीकत ऐकून घेतली व त्याला आपल्या झोपडीत नेले. ते त्याला म्हणाले की, तुझा निर्णयच झाला असेल तर तू अवश्य आत्महत्या कर. फक्त आता मला भूक लागली आहे. मी जे काही करेन ते तूही खा व नंतर तू तुझ्या मनाप्रमाणे वागू शकतोस. असे म्हणून त्या सत्पुरुषाने घरात जे काही किरकोळ सामान होते, त्याचा उपयोग करून गव्हाची छान खीर केली. ती खीर शिजताना तिचा सुवास दरवळत होता. त्यामुळे तो तरुण सुखावला होता. खीर तयार झाल्यानंतर त्या सत्पुरुषाने खिरीचे भांडे त्या तरुणाच्या हातात देत म्हटले हे बाहेर घेऊन जा व तेथे बाहेर उकीरड्यावर फेकून दे. सत्पुरुषाचे हे बोलणे ऐकून त्या तरुणाला फारच आश्चर्य वाटले. तो म्हणाला एवढी चांगली सुंदर खीर तुम्ही बनवलेली व ती न खाता बाहेर उकीरड्यावर फेकून द्यायला सांगता. त्यावर सत्पुरुष त्याला म्हणाले की, तू जे काही करतोस तेच मीही करतो आहे. तुझे जीवन या खिरीसारखेच छान व सुंदर आहे. परंतु, तू आत्महत्या करून ते नष्ट करीत आहेस. त्या तरुणाला सत्पुरुषाच्या उपदेशातील मर्म कळले व आत्महत्येचा विचार सोडून तो त्यांचे आशीर्वाद घेऊन तेथून गेला.
December 30, 2017
तुमच्या आमच्या साऱ्यांच्या जीवनात कितीतरी महत्वाची भूमिका बजावणारी ही टपालपेटी आता फारशी दिसत नाही. पूर्वी ती अशीच कुठेतरी शहराच्या मध्यवर्ती चौकात, झाडाच्या खोडाला, गावात कुणाच्या तरी दारात तरी लावलेली असायची. ठराविक वेळेला ती पेटी उघडण्यासाठी टपाल खात्याचा कर्मचारी यायचा आणि गाठोड भरून पत्र, पाकिट घेऊन जायचा.
May 24, 2020
दोन भाऊ सख्खेच. पण दोघांच्या दोन तन्हा होत्या व्यवसायाच्या मोठा “होना” पाण्यात गळ टाकून मासे पकडून विकत असे, तर धाकटा “होकी” हा डोंगरदऱ्यात हिंडून धावून शिकार करणारा. पक्षी मारणारा फासेपारधी म्हणून लोक त्याला ओळखीत असत.
October 5, 2025

परो मध्ये बीपींचे जीवन मृणालमय झाले होते. त्याच्या आयुष्यात मौशुचे स्थान नगण्य झाले होते. एके दिवशी मृणालला तो घरी घेऊन आला त्याने आपल्या मुलीची जुजबी ओळख करून दिली. प्रेम इतके आंधळे असते की त्यापुढे मागील जीवनात घडलेल्या सर्वच घटना तुच्छ असतात.
January 6, 2022
इतक्यात घड्याळाचा टोल वाजतो आणि त्यामुळे आदित्य दचकतो. काही क्षणातच पुन्हा त्याला, त्याच्या आरामखुर्ची हलण्याचा आवाज येतो. इतक्यात थंडीतही आदित्यच्या कानामागून घाम ओघळू लागतो. आदित्य हळूहळू आरामखुर्चीच्या दिशेने निघतो आणि समोर जे काही बघतो, ते बघून त्याची पाचावर धारण बसते.
February 4, 2026
आफ्रिका खंडात पर्यटनाला जाण्याची कल्पना आपल्याला युरोपात जाणे इतकी आकर्षक वाटत नाही मात्र डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या या पुस्तकातील केनियाच्या सफरीचे वर्णन वाचून आफ्रिकेत जाण्याचे वेध लागले नाहीत तरच नवल!
August 11, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti