(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • शहर पुण्याचा कवी

    जाहिरातींच्या व्यवसायातील सुमारे चाळीस वर्षांच्या कालावधीत, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी आमच्या संपर्कात आली. साहित्य विषयाची तर मला शाळेपासूनच गोडी असल्याने, एखादा लेखक किंवा कवी भेटल्यावर, माझ्या आनंदाला पारावार रहात नाही..

  • अप्पा असे कां वागले ?

    अप्पा असे कां वागले ? खूप जुनी गोष्ट आठवली. मी शाळकरी विद्यार्थी होतो. माझा मित्र दिनू यांच्याकडे माझे जाणे-येणे सतत होते. बाहेर त्याची खोली. …..

  • युगमानव

    “तुमची मानव जमात अगदी भांडखोर, क्षुद्र आणि कोत्या मनोवृत्तीची आहे. हेवा, दावा, स्वार्थ मत्सर शी. हे सगळे वाईट गुण आम्हाला आमच्या ग्रहावर नको होते. या गुणांची लागण आमच्यातल्या काही कमकुवत देवांनाही झाली. ते कोपिष्ट होऊ लागले. ज्याला त्याला शाप देऊ लागले. शेवटी आम्ही सर्वांनी ठरवलं की तुम्हा मानवांचा सहवासच टाळला पाहिजे. म्हणून एकूण एक मानवप्राणी शोधून काढला आणि पृथ्वीवर पाठवून दिला. बसा भांडत. आम्ही तुमच्यावर नजर ठेवून होतो. किती तन्हांनी भांडता येतं. किती तन्हांनी मानवा मानवात भेद पाडता येतात आणि लोकांना आणि स्वतःलाही कष्टी करता येतं हे तुमच्यावरून आमच्या लक्षात येत होतं. तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आणि शक्ती नुसती भांडणात आणि दुसऱ्यांचं वाईट करण्यात जाते

  • प्रेम- अहंकाराचे अंकुरण

    संध्याकाळची वेळ होती. घराजवळच रेल्वे स्टेशन. तेथे रेल्वे रुळाच्या एका बाजूस असलेल्या दगडावर बसलो होतो. समोर रेल्वेचे ७-८ मार्ग आणि त्यावरुन जाणाऱ्या ….

  • प्रेम कविता/ प्रेमदिन स्पेशल

    प्रेमाच्या दिनी

    गुलाब भेट दिली.

    प्रेमाची ‘राजधानी’

    हृदयी धडधडली.??????

  • ए फुलों की रानी

    लव्ह इन सिमला’ चित्रपटापासून तिची कारकिर्द सुरु झाली. सुमारे ३५ चित्रपटात काम केल्यानंतर तिनं चित्रसंन्यास घेतला.

  • क्वालिटी : क्लॉक रेडिओची कथा

    त्या वेळेला आम्हाला क्लॉक रेडिओ डिझाईन करायचा अनुभव नव्हता. हा रेडीओ बाजारात [मार्केटमध्ये] लवकर आणता यावा म्हणून आम्ही आमच्याच कंपनीने परदेशात असाच एक क्लॉक रेडीओ डिझाईन करून त्याचे उत्पादन पण सुरु केले होते, त्याची मदत घ्यायची ठरवली. त्यांनी त्या रेडीओ मध्ये electric supply frequency ची मदत घेऊन त्यातलं घड्याळ चालवलं होत, तिकडे इलेक्ट्रिक सप्लायची कंपनसंख्या [electric supply frequency] खूपच स्थिर असल्यामुळे हे शक्य झालं होते.

  • डुकरू

    अजून उजाडलं ही नव्हतं.
    इतक्यात डुकरुची हुसहूस सुरू झाली.
    इकडे तोंड खुपस, तिकडचा वास घे.
    इकडे लाथा मार, तिकडे लोळण घे.

    डुकरुच्या ह्या हुसहुशीमुळे त्याची बाकीची भावंडं पण चाळवली.
    डुकरीण आई रागावली. “फर्रऽऽफूऽऽक” करत आईने डुकरूला हाक मारली.
    आईचा आवाज ऐकताच, मान खाली घालून डुकरू जोरात धावतच आला.
    आईने पटकन त्याला कुशीत घेतलं.
    पण डुकरुने आईला अशी काही ढुशी मारली की...
    आई आणि डुकरुने चिखलात एक लोळण फुगडी घातली.

    डुकरुला प्रेमाने फटका मारत आई म्हणाली,“काय रे हे? पडले ना मी!”
    कान उडवत डुकरू चिरचीरत म्हणाला,“आई माझं कालपासून पोट दुखतंय.”
    आई म्हणाली,“काल चांगली ताजी-ताजी घाण न खाता, तू गेलास उकीरड्यावर. तिकडे शिळं अन्न खाल्लं असशील.ते तुला बाधलं असेल.
    डुकऱ्या पुकऱ्या, मी तुला हज्जारदा सांगितलंय, माणसांकडून एक शिकावं, “ताजं-ताजं खावं, शिळं-शिळं फेकावं.'कळलं.”
    डुकरू कळवळत म्हणाला, “अग आयेऽऽ, खाऊ खाऊन नव्हे, तर मार खाऊन माझं पोट दुखतंय! काल मी समोरच्या घरात गेलो होतो.तर त्या माणसाने मलाच काठी मारली ग आई.”
    डुकरुच्या पोटावर सावकाश नाक घासत आई म्हणाली,“ह्या शिकल्या-सवरलेल्या माणसांना लहान-मोठं काही कळतंच नाही.
    'छोट्या बाळांना काठी मारू नये'हे पण आम्ही डुकरांनी शिकवायचं की काय ह्या भल्या माणसांना?”
    डुकरुची भावंडं म्हणाली,“आई-आई त्या माणसाची मुलं, आपल्या उकीरड्यावर आली ना की आम्ही त्यांना चिखलात पाडणार. त्यांना धपाधप लाथा मारणार!”
    डुकरीण आई चिडून म्हणाली,“नाही!नाही!! आपण नाही माणसां सारखं वागायचं. आपण डुक्कर आहोत! डुक्कर!! आपण लहान मुलांना कधीच मारत नाही.कुणालाही लाथा मारत नाही.कुणालही त्रास देत नाही!!
    आपण कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही! ”

    डुकरुचा लहान भाऊ शेपटी उडवत म्हणाला,“म्हणजे आपण डुकरं त्या दुष्ट माणसांपेक्षा चांगले आहोत ना? आपण..... आपण सगळ्यांचे मित्र आहोत ना!”
    आई लहानू डुकरुला कुरवाळत म्हणाली,“हो रे माझ्या डुकऱ्या!
    अरे माणसं फक्त घरात राहतात. आपण अख्ख्या गावात राहतो.
    माणसं फक्त त्यांचच घर स्वच्छं ठेवतात. आपण तर अख्खा गाव स्वच्छं करतो.
    माणसांना खाण्यापिण्याच्या हज्जार खोड्या असतात.हे हवं तर ते नको,हे खा आणि ते फेक! घराचे नुसते उकिरडे करून टाकतात.
    आपल्याला कुठल्याच खोड्या नाहीत बघ! आपण मिळेल ते आनंदाने गोड मानून खातो. आपण गावभर फिरतो,उकीरडे फुंकतो.मजेत राहतो.”
    'हां,म्हणूनच,'चवीने खाणार तो डुक्कर होणार!' असं आपल्यात म्हणतात ते काही उगीच नाही!” असं डुकरुच्या भावाने म्हणताच आई खूश झाली!
    आईने त्याला प्रेमाने पोटाशी घेतलं आणि मायेने त्याचा कान चाटला.

    इतक्यात...
    डुकरुचे बाबा तोंडात कुठलसं गवत घेऊन तुडू-तुडू आले.
    आईने फुस्स फूस करून त्याचा वास घेतला.मग ते चावून-चावून डुकरुला भरवलं.
    तोंड वेडंवाकडं करत,ते गवत खाण्याचा डुकरू प्रयत्न करु लागला.
    कसबसं तो ते गीळू लागला.पण त्याला ते काही गिळता येईना.

    आईचं लक्ष नाहीसं पाहून डुकरु तोंडातला तो गवताचा चोथा थुकणारच होता.
    पण
    समोरच शेपटी हलवत बाबा उभे होते!
    डोळे बारीक करुन ते त्याच्याकडेच पाहात होते.मग.....
    डुकरुने भावाच्या पाठीवर हात ठेवून मान उंच करत,तो गवताचा चोथा कसाबसा गिळला.

    थोड्याच वेळात, डुकरुचं पोट दुखणं थोडं कमी झालं. त्याला बरं वाटलं.
    जवळच्याच मऊ मऊ बरबरीत,गार गार गुळगुळीत चिखलात डुकरू आडवा झाला.
    त्याने हात पाय ताणून आळस दिला.
    मस्त मजेत शेपटी तुड-तुड उडवत,शांत पडून राहिला.

    इतक्यात त्याच्या बाजूला 'धप्प' असा आवाज झाला!
    त्याने दचकून पाहिलं.
    त्या समोरच्या माणसाच्या मुलाचा चेंडू डुकरूच्या बाजूलाच पडला होता.
    तो मुलगा अंगणात उभा राहून डुकरूकडे प्रेमाने पाहात होता.
    डुकरुने चेंडूला एकच जोरदार फटका मारला.
    चेंडू ऊंऽऽऽऽऽऽच उडाला,आणि................
    मुलाच्या अंगणातच जाऊन पडला.

    मुलाने आनंदाने टाळ्या वाजवल्या! हात हलवून मित्राला शाबासकी दिली!
    त्याने आपल्या मित्राकडे पुन्हा चेंडू टाकला.....

    डुकरू आणि तो मुलगा आता रोजच हा खेळ खेळू लागले.

    ते एकमेकांचे 'खेळ मित्र' झाले!!

    - राजीव तांबे.

  • सावंत ‘विकी’

    विकीमध्ये गेलं की, दोन पाठमोरे काॅम्प्युटर ऑपरेटर एकामागे एक बसलेले दिसतात. त्यातील पहिल्याकडे मी पेनड्राईव देतो. तो ‘स्माईल’ देऊन माझी फाईल ओपन करतो. डिझाईन मधील मजकूर वाचतो. कुठे शुद्धलेखन चुकलं असेल तर नजरेस आणून देतो. प्रिंट सोडतो. आत जाऊन प्रिंट आणून देतो. वेळ असेल तर त्याच्या कलेक्शनमधील, काही फोटो पेनड्राईव्हमध्ये लोड करुन देतो. हे सर्व आपुलकीने करणाऱ्या माझ्या मित्राचं नाव आहे. सावंत ‘विकी’!

  • सोल्यूशन डॉट कॉम (कथा)

    मुंबईच्या दौऱ्यात एक दिवस रिकामा होता. खूप दिवस झालेत, दिवस काय वर्षं झालीत विठूला भेटलो नव्हतो. ठरवलं, जमलं तर भेटायचं. खूप ऐकलं होतं त्याच्या गरुड भरारीबद्दल. त्यामुळे खूप बोलायचं होतं. बरंच काही जाणून घ्यायचं होतं.