(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • खासे सामोसे

    पाऊस पडून गेल्यावर काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा हमखास होतेच. अलीकडे कोणत्याही राजस्थानी स्वीट मार्टमध्ये गरमागरम सामोसे विक्रीला ठेवलेले असतातच. ज्याला ‘छोटीशी भूक’ आहे, तो सामोसा खायला, नक्कीच प्राधान्य देतो. दुकानदार तो गरम सामोसा पेपरप्लेटमध्ये घेऊन अंगठ्याने दाबून तो फोडतो, त्यात साॅस, ग्रीन चटणी घालून वरती बारीक शेव भुरभुरतो व सोबत एक तळलेली मिरची देतो.

      July 15, 2021


  • ओवणे, पटवणे, गाठवणे

    मंगळसूत्र मण्यांच्या आकारानुसार दोर वळली जायची. दोन पदरी साठी चार दोऱ्या व लांबी पण ठरलेली. पायाच्या पिढंरीवर पाणी लावून दोर वळली की मग चारपदरी दोर आणि ते सगळे एकत्रित करून दोन सोन्याचे मणी नंतर दोन सोन्याच्या वाट्या मध्ये एक मणी परत दोन वाट्या असे ओवून झाले की मग तीन पदर पायाच्या अंगठ्याला पीळ देऊन अडकवून एक पदरी दोऱ्या काळे मणी ओवून मग असे आळीपाळीने चार पदर ओवून झाले की देवा समोर पाट मांडून घरातील एखाद्या मोठय़ा सवाष्णी कडून त्या मंगळसूत्राला हळदीकुंकू लावून बांधून घेवून झाले की देवाच्या व त्या बाईच्या पाया पडायला लागायचे.

      July 15, 2022


  • द्रौपदी आणि आर्किमिडीज (कथा)

    गी द मोपासॉ च्या A SALE या कथेवर आधारित.

      June 6, 2022


  • एक परीस स्पर्श ( भाग – ४९)

    त्याने स्वतःपेक्षा अधिक प्रेम कधीच कोणावर केले नाही अगदी अनामिकावरही नाही… त्याने तिच्या आयुष्यातही कधी ढवळाढवळ केली नाही. तिलाही त्याच्या आयुष्यात कधी ढवळाढवळ करून दिली नाही. यापूर्वी त्याचे जिच्या जिच्यावर प्रेम होते तिच्या आयुष्यातही त्याने कधी  ढवळाढवळ केलेली नव्हती. त्याच्या मनात त्याच्याबद्दल यकिंचितही तिरस्कार नव्हता कारण त्याने तेच केले होते जे त्याला हवे होते.

      August 27, 2022


  • पद्य आणि मृत्युविचार : भाग-७-अ /११

    हिंदुस्तानी ख़याल-गायकीचा संदर्भ देत एका हिंदी बंदिशीचे शब्द पाहूं या. शास्त्रीय संगीतात जरी काव्याला सुरांपेक्षा दुय्यम स्थान असलें तरी, त्यात बंदिशीतील शब्दांचा आधार घेतला जातो. म्हणून हें एक उदाहरण. ही बंदिश पंडित रातंजनकर यांनी रचलेली आहे

      August 4, 2017


  • ठाणे ते कल्याण

    तो तरूण त्याच्याच तंद्रीत होता, कल्याण आलंय आता ऊठुन उतरायला पाहिजे याचे त्याला भानच नसल्यासारखा तो बसून होता. त्याच्या खांद्यावर थाप मारून मित्रा कल्याण आलेय उतरायचे नाही का असं बोलावंसं वाटलं. त्याच्या दिशेन पुढे जाणार इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली.

      December 31, 2021


  • कचकड्यांचे मोती

    सन्मान सांगावा जगाला, अपमान सांगावा मनाला, असं काहीसं सांगितलं जातं. त्यामुळंच कदाचित माणसं आपली झालेली फसगत सांगायला फारशी राजी होत नसावीत. मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यानंतर किती गार वाटलं, याच्याच कथा अधिक. तर आज मी सांगणार आहे, ती घटना आहे माझ्या फसगतीची. अंध विश्वासाची आणि यशाकडे जाण्यासाठी शॉर्ट कट निवडण्याची.
    तो काळ होता 1998 चा. माझा व्यवसाय अत्यंत अडचणीत आलेला होता. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. सार्वत्रिक मंदीचे चटके जाणवत होते. मी प्रिंन्टिंग, डिझायनिंग अशा व्यवसायात होतो. पुण्यातल्या शनिवार पेठेत एक मोक्याच्या जागेवर कार्यालय होतं. एके दिवशी एक गृहस्थ आले. काही तरी शोधत होते. त्यांच्या हातात एक फोटो होता. अक्कलकोट स्वामींचं महिला वेशातलं ते चित्र मी अनेक वेळा पाहिलं होतं. ते छायाचित्र त्यांनी मला दाखवलं. म्हणाले, ``असं चित्र मला हवं आहे. तुम्हाला माहीत असेल, तर पहा किंवा मला त्याच्या काही कलर प्रिन्ट्स काढून द्या.'' मंदीच्या काळात ग्राहक आलं होतं. त्यांना बसा म्हटलं. त्या छायाचित्राचं स्कॅनिंग करून फोटो लॅबमध्ये तुम्हाला चांगल्या प्रती स्वस्तात मिळतील, असं त्यांना सांगितलं. फोटोचं स्कॅनिंग केलं. त्याचे वीस रुपये त्यांनी लगेच काढून दिले. हे काम सुरू असताना गप्पा आल्याच. फोटो प्रती कशासाठी हव्या आहेत, असं विचारल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्राचा एक अनुभव सांगितला. अत्यंत अडचणीत आलेल्या त्या मित्राला कोणीतरी ही प्रतिमा दिली आणि त्याचे सारे प्रश्न सुटले, असं त्याचं सार होतं. जाताना त्यांना मी म्हटलं, ``तुमच्या फोटोकॉपीज आल्या की मला एक द्या. त्याचे हवे तर पैसे देईन मी.'' माझ्या या विधानावर तो थांबला. माझ्याकडे न्याहाळून पाहिलं, म्हणाला, ``साहेब, का थट्टा करता माझी. तुमच्यावर तर साक्षात लक्ष्मी प्रसन्न आहे. तुम्हाला आणखी काय हवंय?'' मी फारशा तपशिलात गेलो नाही; पण सध्या अडचणीत आहे, असं सूचित केलं. आता हे गृहस्थ पुन्हा बसले होते. म्हणाले, ``मी आज तुम्हाला एक कोटी रुपयाचं कर्ज द्यायला तयार आहे. कारण, तेवढी तुमची क्षमता आहे हे मी पाहातोय. माझा माझ्यावरच विश्वास बसेनासा झाला. हे कसं शक्य आहे?'' सारं शक्य आहे महाराजा, असं म्हणून तो सांगू लागला, ``मी भारतात असतो. काही वेळा आप्रिकेमध्ये. माझी बहीण तिकडेच आहे. तिच्या पैशाची गुंतवणूक मी करतो. आज मी तुमच्या व्यवसायात एक कोटीची गुंतवणूक करतोय, असं समजा. संकटात असलेल्या माणसाला मदतीचा हात हवा असतो इथं तर तो माझं सारं संकटच घ्यायला तयार होता. माझ्या आशा दुणावल्या होत्या. तो माणूस माझ्यासाठी देवमाणूसच बनलेला होता. यानंतर अर्धा पाऊणतास आम्ही गप्पा मारीत होतो. त्याला निरोप देताना दुसऱया दिवशी माझ्या घरी येण्याचं निमंत्रण द्यायला- मी विसरलो नाही. त्यानंही मोठ्या आनंदानं माझ्या निमंत्रणाचा स्वीकार केला. ती संध्याकाळ माझ्यासाठी स्वप्नवत होती. रात्र तर थेट स्वप्नांचीच होती. दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजताच ते माझ्या घरी आले. आम्ही दोघांनी त्यांचं स्वागत केलं. येताना त्यांनी एक मखमलीची डबी आणलेली होती. खास मला देण्यासाठी. ते म्हणाले, ``या डबीत खास आप्रिकन मोती आहेत. ते तुमच्या देवघरात ठेवा. मी संध्याकाळीच गुजरातला जात आहे. आठवड्याने येईन तेव्हा आपण एक कोटीचा व्यवहार करू. त्यासाठी आवश्यक तर तुमच्या वकिलांशी बोलून करार तयार करून ठेवा. मला माझ्या पैशाची काळजी नाही. कारण, अशा अनेक कोटींचा व्यवहार तुम्ही करताय, हे आताच मी पाहात आहे. पण एक करा- ही डबी आठ दिवसांनी माझ्या समक्ष उघडा. तिची साग्रसंगीत पूजा करू आपण त्या वेळी.'' माझा त्यालाही आक्षेप असण्याचं कारण नव्हतं. आमची न्याहरी झाली आणि ते जायला निघाले. थोडं थांबत ते म्हणाले, ``मी जी डबी दिली तुम्हाला ती फुकट देता येत नाही आणि त्या मोत्याची किंमतही करता येत नाही. असं करा, एका पाकिटात एक रुपया, दहा रुपये, शंभर रुपये तुम्हाला वाटेल तेवढी रक्कम ठेवा. पाकीट बंद करा अन् मला द्या. मी ते पाकीट तसंच बहिणीकडे पाठवून देईन.'' मी ठीक म्हणालो. आत गेलो. बायकोला सांगितलं. ती म्हणाली, ``अकरा रुपये ठीक आहेत. अजून कशाचा कशाला संबंध नाही अन् आज आपली क्षमताही कुठे आहे?'' मी म्हटले, ``असे कसे? अमूल्य गोष्टीची किंमत दहा रुपये? नाही. असं कर, एक हजार एक रुपया पाकिटात घाल अन् दे.'' तिची तयारी नव्हती; पण आम्ही दोघांनी आतल्या खोलीत अधिक काळ रेंगाळणं शंका निर्माण करणारं होतं. ती ठीक म्हणाली. एक हजार एक रुपयांचं पाकीट आदरपूर्वक त्या गृहस्थाच्या हातावर ठेवलं. त्याला नमस्कार केला आणि निरोप दिला. आज या घटनेला सात वर्षे झालीत. त्यानं दिलेल्या फोनवर कोणी भेटले नाही. तो गृहस्थ मला स्वामीमहाराजांचं छायाचित्र द्यायला आला नाही की कोणताही व्यवहार करायलाही फिरकला नाही. ज्या वेळी कर्जफेडीसाठी मी माझं राहतं घर विकलं तेव्हा सामानात ती डबी सापडली. ती उघडली. त्यात कचकड्यांचे तीन मोती होते. तापमानाच्या परिणामानं मोत्यांवरचं कवच निघालेलं होतं. विश्वास, श्रद्धा या बाबी तुमचं आत्मिक बळ वाढवायला ठीक आहेत; पण केवळ त्यावर संकटाचा सामना करता येत नाही. कारण, संकटाचा सामना करायला श्रद्धेबरोबरच प्रयत्नही लागतात, हे त्या हजारएक रुपयांनी मला शिकविलं होतं.

    -- किशोर कुलकर्णी

      March 23, 2006


  • गुगल आजी

    गुगल आजी

    व्यास क्रिएशन्स 
    व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी - महिला विशेषांकातून साभार

    आमच्या घराशेजारी देशमुख आडनावाचे नवीनच कुटुंब राहायला आले. देशमुख पती-पत्नी, त्यांचा सातवीत शिकणारा मुलगा आर्यन आणि आर्यनची आजी… राधाआजी.

    घरात इनमीन चारच माणसं. आर्यनच्या आजीने घरात लागणारे किराणा सामान इथे जवळ कुठे मिळते याची आमच्याकडे चौकशी करताच आईने त्यांना आमचा दूधवाला, पेपरवाला, किराणावाला, इस्त्रीवाला, केबलवाला यांचे संपर्क नंबर आणि पत्ते दिले. त्यामुळे त्यांचं काम खूपच सोपं झालं. त्यांना ह्या गोष्टींसाठी विनाकारण धावाधाव करावी लागली नाही. पोळ्या लाटण्याच्या कामासाठी आजी जेव्हा बाई शोधत होत्या तेव्हासुद्धा आईनेच आमच्याकडच्या घरकाम करणाऱ्या रखमाबाईंना त्यांच्याकडे काम करण्यासाठी राजी केले. आईमुळे रखमाबाई आढेवेढे न घेता लगेच त्या घरी कामासाठी तयार झाल्या. आजीला किती हायसं वाटले. सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्यासारख्या झाल्या. आईला तर त्या कितीतरी वेळ धन्यवाद देत होत्या. आर्यनच्या नवीन शाळेच्या प्रवेशासाठीसुद्धा बाबांनीच मदत केली. बाळूच्याच शाळेत प्रवेश मिळवून दिला.

      July 3, 2025


  • कुटुंब संस्था आणि स्त्रीचे स्थान

    कुटुंब आणि आजची स्त्री या विषयावर लेख लिहिताना प्रथम एक गोष्ट मला आवर्जून नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत, एवढ्या त्या एकरूप झालेल्या आहे. कुटुंबाची व्याख्या एकवेळ पुरुषाशिवाय पुरी करता येईलही, परंतु स्त्रीशिवाय ती पूर्णच होऊ शकत नाही.

      August 5, 2023


  • मरीआईची कहाणी (स्वच्छता संदेश देणारी गोष्ट )

    एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता. राजा मोठा पुण्याचा, मोठा भाग्याचा. त्याचे राज्य म्हणजे सुखाचे. त्रास नाही, चिंता नाही, रोग नाही, राई नाही. सारे लोक सुखी होते. पण होता होता काय झाले, एकदा आषाढचा महिना आला. झिम झिम पाऊस पडू लागला. शेते हिरवीगार दिसू लागली. गाई गुरांना चारा झाला. दूध दुभत्याची चंगळ झाली. शेतातली कामे संपली. मुली माहेरी आल्या.

      August 29, 2024