(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • निपटारा – भाग  5

    लेण्यांची उंची आणि खोलवर उतरणाऱ्या पायऱ्यांकडे आता कुठे मनोजसरांचे लक्ष गेले आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांची चलबिचल सुरू झाली, ते परतायची घाई करू लागले, म्हणाले, “अरे, तो भत्ता बित्ता राहू द्या आता, आपण आधी खाली उतरू. मग निपट निरंजनच्या मठात हवं तर खाऊ भत्ता, पण आता निघायचं. चला चला!’

  • एक समाधानी योनी

    रस्त्यावरील एका पुलावर बसलो होतो. एक मेंढ्या बकरय़ांचा कळप समोर चरत होता. तो कळप साधारण ३० ते ४० बकरय़ांचा असावा. एक मेंढपाळ त्याना मार्गदर्शन करीत होता. तो कांही वेळा झाडावर चढून बरीचशी पाने फान्ट्या तोडून त्या बकरय़ाना चरण्यासाठी टाकीत होता. बराच वेळपर्यंत ते दृष्य बघत मी आनंद घेत होतो. त्यांची पळापळ, बागडणे, खेळणे, एकमेकाना ढूसण्या देणे, सारे चालले होते. चरणे हा प्रमुख कार्यक्रम त्या पार पाडीत होत्या. कांही बकरय़ा आपल्या पिल्लाना चाटीत होत्या. प्रेम व्यक्त करीत होत्या. त्यातील तरुण बकरय़ा त्यांच्या पद्धतीने प्रेम व्यक्त करण्यांत व्यस्त दिसल्या. जीवन चक्रामधले जवळ जवळ सर्व उपक्रम त्या तन्मयतेने पूर्ण करीत असल्याचे जाणवले. त्याच बरोबर त्या मेंढपाळामुळे सर्वजण सुरक्षित असल्याची भावना देखील बाळगुन होते.

    भरपूर खा, प्या, बागडा, मजा करा, सुरक्षित रहा, हा संदेश त्या बाळगुन होत्या. आणि हे सत्य ह्या साठी की सर्वजण वर्तमान काळांत जगण्याचा आनंद घेत होत्या. भविष्याची त्याना समज नव्हती व क्षमतांदेखील नव्हती. त्या कारणाने गरज वाटत नव्हती. त्यांचे भविष्य निश्चीत व अटळ होते. जसे तुमचे आमचे असते. ते म्हणजे मृत्यु. मृत्यु अंतीम असतो हे जरी सत्य असले, तरी त्याना खाटीकखाना ( Slaughter House ) ह्या दरवाज्यातून जावे लागणार असते. हे मानव निर्मीत सामाजिक व व्यवहारीक आधारलेले सत्य बनलेले आहे. त्यामुळेच त्यांच्या मृत्युचे विविध प्रकार वा स्थळे नाहीत. मृत्युची एकच पद्धत. अपघाती आणि कांही क्षणांतच. एक घाव आणि दोन तुकडे.
    कोणता उद्देश असतो जीवन चक्राचा. काय योजना आहे त्या ईश्वराची वा निसर्गाची ? खरय़ा अर्थाने त्याची उकल आज पर्यंत निश्चीत व सर्वमान्य झालेली नाही. मानवाला बुद्धी, प्रगल्भता मिळालेली आहे. आपल्या विद्वतेच्या, ज्ञानाच्या, अनुभवाच्या शिखरावर जाऊन तो अनेक तर्क-वितर्क, प्रमेये, प्रस्थापीत करतो. तो श्रेष्ठत्व सिध्द करण्याच्या मागे लागला आहे. त्याचा संघर्ष, अविश्वास, आणि नैसर्गिक चक्रामधला विरोध हा शेवटी त्याचेच जीवन अशांत होण्यातच घडत आहे. खाण्याची चिंता, पिण्याची चिंता, विश्रांतीची चिंता, सुरक्षिततेची चिंता, थोडक्यांत म्हणजे जगण्याचीच चिंता त्याने निर्माण केलेल्या आहेत. निसर्गाला हवे असते ते एक जीवन चक्र. जन्म, वाढ, पुनर्निमिती आणि मृत्युच्या छायेत जीवनाला निरोप. पुन्हा चालत राहते ते तसेच जीवन चक्र.
    हे सारे करीत होत्या त्या बकरय़ा. शिवाय आपल्या जीवाचे बलीदान देऊन इतर जीवांचे पोषण करण्यांत सहभाग देत होत्या. मानवाने मात्र त्याच्या जीवनचक्रांत बाधा आणून निर्माण केलीत अनेक दुःखे आणि अशांतता. मृत्यु अटळ असला तरी त्याचे प्रकार अनिश्चीत केले. तो वेळ घेणारा झाला. वैचारीक भय निर्माण करणारा झाला. मृत्युची जाणीव तिवृतेने करणारा झाला.
    " बकरय़ानो – मेंढ्यानो निसर्गाच्या योनीतील समाधानी चक्रांत तुम्ही आहांत " म्हणत मी तेथून घरी आलो.-- डॉ. भगवान नागापूरकर
    9004079850
    bknagapurkar@gmail.com

  • सुमनसुगंध

    प्रसन्न मुद्रा, स्नेहाळ हास्य आणि मधासारखा गोड गळा लाभलेल्या सुमन कल्याणपूर यांचे नाव आजही संगीत क्षेत्रात अदबीने घेतले जाते. कोणत्याही वादात न पडणाऱ्या सुमनताई मितभाषी असून, त्यांचे जीवन साधे, सुंदर आहे.

  • बस्तर ( छत्तीसगड ) नक्षलवाद

    अबुजमाड भागात सरकारी यंत्रणाचे अस्तित्व नाहीच.कोणताही रस्ता वा पूल बांधल्यास ते सुरुंग लावून उडवले जातात.माओवादी आपल्या जनता सरकार मार्फत आदिवासी मुलांकरता शाळा चालवतात,तेथे शिक्षक नाहीत मुलांना जेमतेम अक्षर ओळख आणी माओ प्रेमाची गाणी शिकवली जातात.

  • बिछड़े सभी बारी बारी’

    फुलाबाईकडून पैसे न आल्याने त्यांनी आईला पैसे मागितले. आईने मला फुलाबाईच्या घरी वसूलीसाठी पाठवले. मी त्यांच्या घरी जाऊन एका स्टुलावर बसून रहात असे. असे बरेच दिवस केल्यानंतर ते पैसे एकदाचे मिळाले.

  • अनुभूती’ कुटुंब न्यायालयीन खटल्यांची

    पंधरा कथा असलेले आणि केवळ ८८ पानांचे हे पुस्तक, मराठी कायदेविषयक साहित्यातील एक अमूल्य ठेवा बनून राहिले आहे. लेखिका बागेश्री ताई , या कुटुंब न्यायालयाच्या निवृत् न्यायाधीश आहेत . तसेच  गेली चाळीस वर्षे मॅरेज  कौन्सिलिंग नंतर न्यायदान आणि त्यानंतर ज्येष्ठांचे कौन्सिलिंग करीत असताना त्यांना जे अनुभव आले ते केसेस  आणि कथांद्वारे त्यांनी लिहिले आहेत.

  • वाहतो ही ‘शब्दां’ची जुडी

    १९६४ रोजी ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाचा शुभारंभ झाला व आशाजींच्या ‘ताई’ने शेकडो प्रयोगांतून लाखों नाट्यरसिकांच्या मनात कायमचं ‘घर’ केले.

  • हरवलेला भक्त

    रेल्वे गर्दीने भरून गेली होती. टी. सी ला एक पाकीट सापडते. त्यात काहीच पुरावा नसल्याने काहीच अंदाज येईना शेवटी त्याने विचारले, ही पर्स कुणाची आहे ?,तेव्हा एक आजोबा येतात आणि म्हणतात माझी आहे. टी.सी म्हणतो,खात्री कशी पटणार ? आजोबा म्हणतात त्यात श्रीकृष्णाचा फोटो आहे . त्यावर टी सी म्हणतो असा फोटो कोणाकडेही पडेल.त्यात काय विशेष ? तुमचा फोटोही नाही त्यावर आजोबा शांतपणे उत्तर देतात ,मी शाळेत असताना ही पर्स मला वडिलांनी दिली होती .थोडे पैसे खाऊसाठी दिलेले असायचे.तेव्हा आई बाबांचा फोटो लावला होता जसा कॉलेज कुमार झालो तेव्हा माझा मला फोटो आवडायचा त्यांचा फोटो काढून मग माझा फोटो ठेवायला लागलो नंतर लग्न झाल माझी बायको सुंदर होती माझा फोटो काढून मग तिचा फोटो ठेवू लागलो ,काही वर्षांनी आम्हाला एक मुल झाले . आयुष्याचा नवीन पर्व सुरु झाल . मग त्याचा फोटो ठेवू लागलो .

    मात्र हे सगळ सांगताना आजोबांचे डोळे पाणावले गेले , ते बोलतच राहिले, म्हणले काही वर्षापूर्वी माझे आई बाबा गेले नंतर माझी पत्नीही साथ सोडून गेली ,ज्या मुलाला मी वाढवलं त्यानेही मला सोडलं तो आता त्याच्या आयुष्यात व्यस्त झाला , मला पाहायला त्याच्याकडे वेळ हि नाही . म्हणून आता माझ्या पर्स मध्ये मी श्रीकृष्णाचा फोटो लावलाय . मला कळून चुकलय की भगवान श्रीकृष्ण माझे शाश्वत साथी आहेत . माझी साथ कधीच सोडणार नाही, जर मला आधीच कळलं असत की जे प्रेम मी माझ्या कुटुंबावर केले तेच मी देवावर केले असते तर असे एकटे पडलो नसतो .

    टी. सी ने त्या आजोबांची व्यथा समजून घेतली आणि पर्स परत केली . तो टी सी पुढच्या स्टेशन ला उतरून एका पेपर विक्रेत्याकडे जाऊन विचारले "भगवान श्रीकृष्णाचा फोटो आहे का ? मला माझ्या पर्स मध्ये ठेवायचा आहे.........

    गोष्ट व्यावहारिक दृष्टीने touching असली तरी येत्या काळाची चुणुक दाखवणारी आहे. कुटूंब छोटी छोटी होत चालली आहेत, स्वयंकेंद्रित होत चालली आहेत. आपण स्वत: पुढच्या अशा परिस्थिती साठी तयार असले पाहिजे म्हणजे नैराश्य येणार नाही. ह्या सगळ्यावर उपाय म्हणजे 'योग' आणि 'ध्यान' यांची कास आपण धरली पाहिजे.

    जय श्रीकृष्णा !!

  • Quote – एक विचार….

    आयुष्य पण आता व्याकरणासारख झालं आहे...
    एवढे नियम पाळतोय...
    तेही विचारपूर्वक...
    आणि तरीही भीत भीत...
    नेमकं आपल आयुष्य...
    ह्रस्व कि दीर्घ...?

    -- तृप्ती प्रभाकर जवळबनकर

  • सावली प्रेमाची

    अॉफीसमधून घरी आल्यावर नेहमीप्रमाणे बॅग बायकोकडे दिली व फ्रेश व्हायला गेलो. पंधरा मिनिटांत फ्रेश होऊन किचनमधे आलो. तो पर्यंत अंजूचे पोहे तयार झाले होते. मी व अंजू पोहे खात होतो त्याचबरोबर तिची चहाची तयारी चालू होती. मी म्हणालो “अग पोहे तरी शांतपणे खा मग चहा कर.” नको, मला आता इतके वर्ष तुमच्या बरोबर राहून माहिती झालंय की पोहे संपले की शेवटच्या घासाबरोबर तुम्हाला चहा प्यायला आवडतो.