(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पैज (संक्षिप्त रूपांतरीत कथा २)

    मूळ कथा – द बेट; लेखक – ॲन्टोन चेकॉव्ह (१८६०-१९०४) : हिंवाळ्यांतील एका मध्यरात्री रावसाहेब आपल्या अभ्यासिकेमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या घालत होते. राहून राहून त्यांना वाटत होते की पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी ती पैज लावायला नको होती. पण आता सुटका नव्हती. ती पंधरा वर्षांपूर्वीची संध्याकाळ व त्यावेळी घडलेल्या गोष्टी रावसाहेबांना अगदी स्पष्ट आठवत होत्या. त्यांनीच दिलेल्या पार्टीत कशावरून तरी चर्चेला विषय आला होता फांशी बरी की आजन्म कारावास बरा. बऱ्याच जणांचे मत होते फाशीची शिक्षा रद्द व्हावी व केवळ आमरण कारावासाची शिक्षाच ठेवावी.

      March 13, 2022


  • अजब न्याय नियतीचा – भाग २१

    आरूला, आता काय सरप्राईज बघायला मिळणार याची खूप उत्सुकता लागून राहिली होती. नीलनं आपल्याला या सगळ्या प्लॅनबद्दल आधी का नाही सांगितलं याचं तिला आश्चर्य वाटत होतं. नीलला राजूबद्दल काय माहिती असेल? त्यानं हे आपल्याला का नाही सांगितलं? डॉक्टरसाहेबांनी उपचाराचा भाग म्हणून राजूला इथं का आणायला सांगितलं असेल? असे अनेक प्रश्न आरूच्या मनात रुंजी घालत होते.

      October 6, 2019


  • आफ्रिकन जमातीचा म्होरक्या आणि खंडणी (संक्षिप्त रूपांतरीत कथा २५)

    मी, येश्या म्हणजे यशवंत आणि काश्या म्हणजे काशीनाथ, आम्ही तेव्हा गडहिंग्लजजवळ होतो आणि आम्हाला एखाद्या मुलाला पळवून खंडणी मागायची कल्पना सुचली.
    शहरांत लोकांना चीट फंडासारख्या स्कीममधे फसवणं हा आमचा धंदा.
    तो करायला थोडं भांडवल लागतं.
    काश्याकडे आणि माझ्याकडे मिळून जेमतेम दहा हजार रूपये होते.
    आम्हाला आणखी पंधरा-वीस हजार रूपयांची गरज होती.
    तेव्हा ही मूल पळवण्याची कल्पना सुचली.
    जवळच एक गांव होतं.
    बहुतेक शेतकरी. आपल्या कुटुंबावर, विशेषतः मुलांवर, खूप प्रेम करणारे.
    शहरापासून दूर असलेल्या गावचे मूल पळवणे सोपे.
    गाजावाजा कमी.
    ह्या आडगांवात कदाचित एखादा पोलिस पोंचला असता.
    तो सुध्दा चार दिवसांनी.
    आम्ही गांवातल्या सरपंचाच पोरगंच पळवायच ठरवलं.
    सरपंचाला गांवात मान होता.
    तो थोडीफार सावकारी पण करायचा.
    पोरगं ९-१० वर्षाच होतं.
    त्याचे केस कुरळे होते आणि रंगाने तो थोडा उजळ होता.
    त्या गोंडस पोरासाठी सरपंच पंचवीस हजार द्यायला एका पायावर तयार होणार ह्याची खात्री होती.
    गांवापासून दोन मैलांवर एक डोंगर होता.
    तिथे घनदाट झाडी होती.
    डोंगराच्या मागच्या उतारावर एक गुंफा होती.
    तिथे आम्ही आमचं सर्व सामान ठेवलं होतं.
    संध्याकाळी जवळच्याच गांवातून जीप भाड्याने घेऊन आम्ही सरपंचाच्या घरावरून फेरी मारली.
    सरपंचाच पोरगं दिसलं आम्हाला.
    समोरच्या भिंतीवरल्या मांजराला दगडं मारत होतं.
    काश्याने त्याला विचारलं, “ए पोरा, येतो काय फिरायला ? हे चाॅकलेट घे.”
    पोराने एक विटेचा तुकडा नेम धरून काश्याच्या डोळ्यावर मारला आणि तो म्हणाला, “आलो की पण फक्त चाॅकलेटवर भागणार नाही. पाचशे रूपये द्यायला लागतील.”
    असं म्हणत तो आमच्या जीपवर चढला.
    आम्ही त्याला दोघांच्या मधे जागा दिली.
    गावाच्या बाहेर येताच मी त्याचे तोंड दाबून धरले आणि दोघानी मिळून त्याला तोंड, हात पाय बांधून खाली आडवा टाकला.
    मुलाने चांगलाच प्रतिकार केला पण आम्हां दोघांपुढे त्याचं कांही चाललं नाही.
    आम्ही त्याला गुंफेत घेऊन आलो.
    मी गाडी खालीच ठेवली होती.
    काळोख झाल्यावर मी गाडी शेजारच्या गावात जाऊन परत दिली.
    येतांना गुंफेपर्यंत चालत आलो.
    पोराने बोचकारल्यामुळे अंगावर झालेल्या जखमांना काश्या हळद लावत होता.
    गुंफेच्या तोंडाजवळ खडकामागे विस्तव होता.
    मुलगा उकळणाऱ्या काॅफीकडे पहात होता.
    त्याने एक लाल कापडाची पट्टी कपाळाच्या वर गुंडाळली होती आणि बहिरी ससाण्याची पिसे त्यात खोवली होती.
    त्याच्या हातात छोटी काठी होती.
    मला पाहताच माझ्यावर काठी रोखत तो म्हणाला, “नागनाथ,तिथेच थांब, आफ्रिकन जमातीच्या म्होरक्याच्या छावणीत प्रवेश करायची तुझी हिंमत कशी झाली ?”
    काश्या आपली विजार वर करून पोटरीवर औषध लावत म्हणाला, “तो आता ठीक आहे.
    आम्ही एक नाटक करतोय.
    तो एका आफ्रिकन जमातीचा म्होरक्या आहे आणि मी त्याच्या टोळीने पकडलेला माणूस आहे.
    उद्या सकाळी मला शिक्षा म्हणून माझे मुंडन करून मग डोक्याची चामडी काढायचा हुकुम आहे म्होरक्याचा.
    येश्या, ह्या पोराची लाथ भारी लागते रे !”
    पोरगं तर एकदम खुशीत होतं.
    आयुष्यात प्रथमच मनासारखं करता येतयं असंच त्याला वाटत असावं.
    गुंफेमधे रहाण्यात त्याला मजा वाटत होती आणि तो स्वतः बंदी आहे, हे तो विसरलाच होता.
    त्याने मला नवेच नाव दिले, “नागनाथ”.
    माझे डोळे सापासारखे दिसतात म्हणाला.
    मला गुप्तहेर ठरवून म्होरक्याचे शिलेदार परत आले की उद्याच्या सूर्योदयाबरोबर मला खांबाला बांधून जाळून टाकण्याची शिक्षाही त्याने जाहिर केली.
    आम्ही संध्याकाळी जेवायला बसलो.
    पोरगं घाईघाईने सगळं तोंडात कोंबत होतं.
    काश्या आणि मी सावकाश खात होतो तोवर त्याने फन्ना पाडला.
    समोसा तोंडात कोंबून तो बडबडू लागला, “मला खूप मजा वाटतेय-मी कधी पूर्वी असा सहलीला गेलो नव्हतो-माझ्याकडे एक पाळलेलं रानमांजर होतं-गेल्या वाढदिवसाला मला नऊ वर्षे पूर्ण झाली-मला शाळेत जायचा खूप कंटाळा येतो-उंदरांनी मामाकडल्या कोंबडीची सोळा अंडी खाल्ली-अशा आफ्रिकन जमाती खरंच आहेत कां-मला आणखी थोडा रस्सा दे-ही झाडं हलून हलून वारा तयार करतात का-माझ्याकडे पूर्वी कुत्र्याची पांच पिल्लं होती-तुझं नाक वाकडं कां आहे-माझ्या बापाकडे खूप पैसा आहे-आकाशातले तारे गरम असतात कां-गेल्या आठवड्यात शेजारच्या शाळेतल्या बबड्याला दोनदां बुकललं-मला मुली आवडत नाहीत-मी दोरा बांधून बेडूक पकडतो-बैल हम्मा करतात कां-संत्री गोल कां असतात-ह्या गुंफेत झोपायला गाद्या आहेत कां-वर्गातल्या अशोकला सहा बोटं आहेत-किती वस्तू मिळून बारा होतात ?”
    एका दमात एवढं बडबडणाऱ्याच्या एवढ्याशा डोक्यात काय काय ठांसून भरलं होतं कुणास ठाऊक ?
    पण बापाकडे खूप पैसा आहे म्हणाला ते ऐकून बरं वाटलं
    थोड्या थोड्या वेळाने त्याला आठवण यायची की आपण टोळीचा म्होरक्या आहोत.
    मग तो आपली काठी बंदुकीसारखी धरून गुंफेच्या दारापर्यत गस्त घालत असे.
    मधेच त्याचे साथीदार आले कां ते पाहून येई.
    थोड्या थोड्या वेळाने तो लढाईत देतात तशी आरोळी मारायचा आणि काश्याला कांपरं भरायचं.
    सुरूवातीपासूनच त्याने पोराचा धसका घेतला होता.
    मी पोराला म्हणालो, “ओ म्होरके, तुम्हाला घरी जायचंय काय ?”
    पोरग म्हणालं, “छ्या ! कशाला घरी जायचं ? मला शाळेत जायला बिलकुल आवडत नाही. घरी कांही मजा नाही. मला असं बाहेरच आवडतं.ए नागनाथ, मला घरी परत नाय न्यायचं, हां ! सांगून ठेवतोय ! काय?”
    मी म्हणालो, “आताच नाही रे !
    थोडे दिवस इथे गुंफेतच राहू आपण.”
    पोरगं म्हणालं, “हां, हे ठीक आहे.”
    अकरा वाजता आम्ही चादरी गोधड्या घातल्या आणि पोराला दोघांच्यामधे झोपवलं.
    बाहेर पानांची थोडी सळसळ झाली की त्याच्या कल्पक मनाला वाटे की कोणी शत्रु आला किंवा जनावर आलं तो माझ्या आणि काशाच्या कानांत सांगे,
    “सावधान, बहुतेक बिबळ्या येतोय.”
    त्याने आम्हाला तीन तास असं जागं ठेवलं.
    शेवटी मला गुंगी येऊन अर्धवट झोप आली.
    त्यांत मी स्वप्न पाहिलं की जहाजावरच्या केसांच्या झिपऱ्या असलेल्या, एका भयानक दिसणाऱ्या चांच्याने मलाच पळवलंय आणि एका झाडाला बांधून ठेवलंय.
    पहाटे मला काश्याच्या भयंकर किंचाळ्यांनी जाग आली.
    ते ओरडणं पुरूषाचं वाटलं नाही तर बायका झुरळ पहातांच घाबरून जोराने भान सोडून किंचाळतात त्या प्रकारचं होतं.
    एक जाडा, सशक्त पुरूष गुंफेमध्ये पहाटेच असा किंचाळतांना ऐकणं दु:खद होतं.
    काय झालं हे पहायला मी उडी मारून उठलो.
    म्होरक्या काश्याच्या छातीवर बसला होता.
    एका हाताने त्याने काश्याचे केस धरले होते.
    त्याच्या दुसऱ्या हातात आम्ही पाव कापायला वापरतो ती सुरी होती आणि तो अगदी चिकाटीने आणि मेहनतीने काश्याचा चकोट करण्याचा व त्याची कातडी भादरण्याचा प्रयत्न करत होता.
    काश्याला दिलेली शिक्षा तो अंमलात आणत होता.
    मी पोराच्या हातातली सुरी काढून घेतली आणि त्याला परत झोपायला लावले पण तेव्हापासून काश्याची हिंम्मत तुटली.
    तो आपल्या जागेवर परत झोपला पण पोरगं जोपर्यंत आमच्याबरोबर होतं, तोपर्यंत त्याने कधीच डोळे बंद केले नाहीत.
    मी परत थोडी डुलकी काढली पण मला मध्येच आठवण झाली की सकाळ झाल्यावर खांबाला बांधून मला जाळण्याची शिक्षा म्होरक्याने सुनावली होती.
    मी घाबरलो नाही की अस्वस्थ झालो नाही पण उठलो आणि बाहेर येऊन एका मोठ्या खडकाला टेकून उभा राहिलो आणि विडी पिऊ लागलो.
    काश्याने मला विचारले, “येश्या, एवढ्या लवकर कसा उठलास ? घाबरलास ?”
    मी म्हणालो, “मी आणि घाबरलो. छे ! खांदा भरून आला म्हणून मला वाटले, जरा बाहेर आलो.”
    “खोटारडा आहेस !” काश्या म्हणाला, “तू घाबरला आहेस. तुला खांबाला बांधून जाळण्याची शिक्षा दिलीय ना त्याने.त्याच्या हातात काडेपेटी मिळाली तर तो शिक्षा अंमलातही आणेल.येश्या, हे भयानक आहे ना ! तुला वाटतं, अशा कार्ट्याला परत घरी नेण्यासाठी कोणी खंडणी देईल ?”
    मी म्हटलं, “नक्कीच! असा गुंड-पुंड मुलगाच आईबापांचा लाडका असतो.
    आता तुम्ही दोघे न्याहरीची तयारी करा.
    मी डोंगरमाथ्यावरून टेहळणी करून येतो.”
    मी त्या डोंगराच्या माथ्यावर गेलो आणि सभोवार पाहिले.
    मी त्या गांवाच्या दिशेने पाहिलं.
    मला वाटलं होतं की तिथले गांवकरी आतापर्यंत हातात विळे, लाठ्या, काठ्या घेऊन मूल पळवणाऱ्यांच्या शोधात बाहेर पडलेले दिसतील.
    पण गांव एकदम शांत होता.
    फक्त एका शेतात एकजण नांगरणी करत होता.
    कोणी नदी, नाले शोधत नव्हतं आणि कुणाचीही कसलीही धावपळ नव्हती.
    कुणी पालक बातमीची उत्सुकतेने वाट पहात बाहेर उभे असलेले दिसत नव्हते.
    मला त्या डोंगरावरून ते गाव अगदी नेहमीसारखेच शांत झोपलेले दिसत होते.
    मी विचार केला, “बहुतेक लांडग्यांनी शेळी पळवली, हे अजून ह्यांच्या लक्षातच आले नसावे. लांडग्यांचा विजय असो.”
    मग मी डोंगर उतरून न्याहरी करण्यासाठी खाली आलो.
    मी गुंफेत पोहोचलो तेव्हां काश्या भिंतीला पाठ लावून उभा होता आणि त्याला धांप लागली होती.
    पोरगं थोड्या अंतरावर हातात नारळाच्या अर्ध्या एवढा धोंडा घेऊन नेम धरून त्याला मारायची धमकी देत होतं.
    काश्या म्हणाला, “ह्याने माझ्या पाठीवर उकडलेला गरमगरम बटाटा ठेवला. मग पायांनी पाठीवरच चुरडला. मी रागाने त्याचे कान उपटले.”
    मी पोराच्या हातातून दगड काढून घेतला.
    पोरगं काश्याला म्हणालं, “मी तुला बघून घेईन. म्होरक्याला हात लावून आतापर्यंत कोणीही सुटलेला नाही, त्याला शिक्षा होतेच !”
    न्याहरी झाल्यावर पोरगं खिशांतला एक चामड्याचा तुकडा हातात घेऊन गुंफेबाहेर गेलं.
    “येश्या, ह्याचा आता काय बेत असावा. तो पळून जाईल काय ?”
    काश्याने उत्सुकतेने विचारले.
    “तशी शक्यता नाही. त्याला घराची बिलकूल ओढ दिसत नाही. आपल्याला खंडणी वसूल करण्यासाठी कांही तरी बेत ठरवला पाहिजे. गांवामधे फारशी गडबड दिसली नाही. कदाचित त्यांना हा पळवला गेलाय, हेच अजून लक्षांत आलं नसेल. तो शेजारच्या मावशीकडे वगैरे राहिला असेल, असा समज झाला असेल त्यांचा.
    आज नक्की त्यांच्या लक्षांत येईल. आपला पन्नास हजार रूपये मागणारा निरोप त्याच्या बापापर्यंत पोचवायला हवा.”
    तेवढ्यात आम्हाला लढाईच्या आरोळ्या ऐकू आल्या.
    राक्षसांबरोबर युध्द सुरू करण्याआधी वानरांनी मारल्या असतील तशा.
    म्होरक्याने खिशातून गोफण काढली होती आणि तो ती गरगर फिरवत होता, मी पटकन वांकून त्याचा मारा चुकवला आणि फट् असा आवाज झालेला ऐकला.
    त्याचबरोबर काश्याचा ‘आह्’ असा कळवळल्याचा आवाज आला.
    एक अंड्याएवढा दगड काश्याच्या कानशीलावर लागला आणि काश्या कळवळून ओंडक्यासारखा पडला तो नेमका बाजूला पाणी उकळत असलेल्या कथलाच्या टोपातच.
    मी त्याला ओढून बाहेर काढला आणि अर्धा तास त्याच्या डोक्यावर थंड पाणी ओतत बसलो.
    काश्या म्हणाला, “मला पुराणातली कुठली व्यक्ती आवडते माहीत आहे ?”
    मी म्हणालो, “काश्या, काळजी करू नकोस. तू ठीक होशील.”
    तो म्हणाला, “कंस आवडतो. गोकुळातली सगळी कार्टी मारायला पुतनेला पाठवणारा कंस. येश्या, तू मला एकट्याला सोडून नक्की जाणार नाहीस ना !”
    मी बाहेर गेलो आणि पोरग्याची बकोट धरून त्याचे डोळे बाहेर येईपर्यंत त्याला गरागरा फिरवला.
    मग त्याला म्हणालो, “जर माझं ऐकलं नाहीस तर तुला घरी परत सोडून येईन. सरळ वागणार की नाही बोल.”
    तो म्हणाला, “मी मजा करत होतो. मी काही काश्यामामाला मारणार नव्हतो. चुकून लागलं त्याला. पण त्याने मला कां मारलं ? आता नाही मी परत असं करणार. नागनाथ, तुम्ही मला परत घरी नाही पाठवलंत आणि मला ‘सरदार’खेळ खेळू दिलात तर मी सरळ वागेन.”
    “सरदार खेळ मला माहित नाही. तू काश्यामामाबरोबर ठरव काय खेळायचं तें. तो तुझा आजचा सवंगडी.
    आता आत ये आणि त्याला दगड मारल्याबद्दल त्याची माफी माग. ताबडतोब.”
    मी दोघांना एकत्र आणलं.
    काश्याला बाजूला घेऊन सांगितलं की दुसऱ्या जवळच्या गावात जाऊन पहातो की ह्या गांवची काही बातमी कळते कां ?
    शिवाय खंडणी मागणारं आणि ती कशी पोचवायची हे सांगणारं पत्रही पाठवायचय.
    काश्या म्हणाला, “येश्या, तुला ठाऊक आहे की मी वाऱ्यावादळात, पाऊसपाण्यात, चोरी करताना, जुगारात लबाडी करताना, गाडीवर दरोडा घालतांना, पोलिसांची धाड आली असतांना, सदैव तुझी साथ दिली आहे.
    कधीच कच खाल्ली नाही. पण हे दोन पायांच जिवंत अस्त्र मला नाही झेपत बाबा. तू मला सोडून जास्त वेळ बाहेर राहू नकोस !”
    “मी दुपारी परत येईन. तोपर्यंत ह्या मुलाची करमणूक कर. आपण आता सरपंचाला पाठवायचे पत्र लिहूया.”
    मी म्हणालो.
    मग कागद आणि पेन्सिल घेऊन दोघे बसलो आणि पत्र तयार केले.
    तोपर्यंत म्होरक्या अंगाला वाकळ लपेटून गुंफेच्या दारापर्यंत गस्त घालत होता.
    काश्याने अजीजीने मला सांगितलं की ह्या द्वाड पोरासाठी पंचवीस हजार खंडणी कोणी देणार नाही तर रक्कम कमी माग.
    तो म्हणाला, “मी आईबापांच्या मुलावरील प्रेमाची शंका घेत नाही पण आपण माणसांशी व्यवहार करतोय आणि कुणीही माणूस हे रानमांजर घेऊन जाण्यासाठी पंचवीस हजार खर्चायला तयार होईल असं वाटत नाही. तेव्हा वीस हजार खूप झाले. मला माझा वाटा कमी दे.”
    काश्याला बरं वाटावं म्हणून मी वीस हजार लिहिले.
    पत्र असं झालं होतं.
    “सरपंच,
    आम्ही तुमच्या मुलाला गांवापासून दूरवर एका ठिकाणी ठेवलंय.
    चलाख गुप्तहेराला पण तो सांपडणार नाही.
    फक्त पुढील अटींवर तो तुम्हाला परत मिळेल :
    आम्ही तुमच्याकडे वीस हजार रूपयांची खंडणी मागत आहोत. पैसे आज मध्यरात्री पुढे सांगितलेल्या ठिकाणी ठेवायचे.
    ह्या अटी जर मान्य असतील तर आज रात्री आठ वाजतां उत्तर पाठवा.
    घुबड पूल ओलांडल्यावर शेजारच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळच असणाऱ्या शेताच्या भिंतीशी तीन मोठे वृक्ष एकमेकांपासून तीनशे फूटावर आहेत.
    तिसऱ्या झाडाच्या समोर भिंतीच्या बुडाशी एक छोटी लांकडी पेटी असेल.
    तुमचा एक निरोप्या उत्तर त्यात ठेऊन लागलीच गांवी परतेल.
    तुम्ही जर आमचा विश्वासघात केलात किंवा आमची मागणी पूर्ण केली नाहीत तर तुमच्या मुलाचं तोंड तुम्हाला परत दिसणार नाही.
    ह्या अटी बदलणार नाहीत.
    जर आमची मागणी पुरी केलीत तर मुलाला तीन तासांत गावात परत सोडण्यात येईल.
    ह्या अटी जशाच्या तशा मान्य केल्या नाहीत तर पुन्हा ह्या बाबतीत पत्रव्यवहार केला जाणार नाही.
    दोन खतरनाक इसम.
    वर सरपंचाचा पत्ता लिहून मी ते पत्र खिशात ठेवलं.
    मी निघणार तोच ते पोरगं येऊन मला म्हणालं, “नागनाथ मामा, तुम्ही बाहेर जाल तेव्हा मला खेळायला परवानगी दिलीय ना !”
    मी म्हणालो, “हो खेळ ना !
    काश्या खेळेल तुझ्याबरोबर.
    कुठला खेळ म्हणाला होतास ?”
    “सरदार-सरदार खेळणार आहे.”
    “ठीक आहे. हा खेळ बहुदा त्रासदायक नसावा.”
    काश्या पोराकडे संशयाने पहात म्हणाला, “मला काय करावं लागेल ?”
    पोरगं म्हणालं, “मामा, तुला घोडा व्हायचंय. हात जमीनीवर ठेऊन गुडघे टेकवून चार पायावर उभं रहायचय.
    मी सरदार आहे. मला पुण्याला जायचय. घोड्याशिवाय कसा जाणार ?”
    मी काश्याला म्हणालो, “आपला बेत तडीस जाईतोवर त्याची मर्जी सांभाळ.”
    काश्याने हात जमिनीवर टेकून घोडा केला आणि माझ्याकडे पाहिले.
    सांपळ्यात पकडलेल्या सशाच्या डोळ्यातली भिती मला त्याच्या डोळ्यात दिसली.
    त्याने कातर आवाजात पोराला विचारले, “पुण्यापर्यंत अंतर किती आहे ?”
    सरदार झालेलं पोरगं म्हणालं, “१६० मैल आणि आपल्याला लौकर पोहोचायचंय तेव्हा तुला जोरांत पळावं लागेल.”
    पोरगं काश्याच्या पाठीवर चढलं आणि टाच मारावी तसे दोन्ही पाय काश्याच्या बरगड्यांत मारले.
    काश्या म्हणाला, “येश्या, कांही कर पण लवकर परत ये. आपण खंडणी पंधरा हजारच ठेवायला हवी होती. ए पोरा ! तंगड्या मारू नकोस. नाहीतर चांगला बडवून काढीन.”
    मी शेजारच्या गांवाच्या पोस्ट आॅफीसजवळ उभा राहिलो.
    बाजाराला आलेले लोक गप्पा मारत उभे होते.
    एक मिशीवाला म्हणाला, “शेजारच्या गांवच्या सरपंचाचा पोरगा गायब हाय म्हणं. हरवला कां पळीवला, कुणास ठाऊक ?”
    मला हीच माहिती हवी होती.
    मी थोडा तंबाखू विकत घेतला.
    उगीचच भाज्यांच्या किंमतीची चौकशी केली.
    हळूच पत्र पोस्टात टाकले आणि सटकलो.
    एका तासाने त्या गांवची पत्र न्यायला माणूस येईल, तो घेऊन जाईल पत्र.
    मी परत गुंफेत आलो तर दोघांचा पत्ता नव्हता.
    मी दोघांना सगळीकडे शोधले.
    शेवटी “काश्या”, “सरदार” अशा हांका मारायचा धोकाही पत्करला पण उत्तर आले नाही.
    मग मी तंबाखू मळत त्यांची वाट पहात बसलो.
    अर्ध्या तासाने झुडुपात मला सळसळ ऐकू आली.
    काश्या धडपडत बाहेर आला.
    त्याचा सारखा तोल जात होता.
    त्याच्यामागे हलक्या पावलांनी सरदार चेहऱ्यावर मिष्कील हंसू घेऊन उभा होता.
    काश्या थांबला.
    आपल्या कपाळावरचा घाम पुसत, काश्या मला उद्देशून बोलू लागला, “येश्या, तुला वाटेल की मी दलबदलू आहे पण माझा नाईलाज होता. मी एक सशक्त आणि स्वसंरक्षण कसं करावं ते जाणणारा माणूस आहे. एक वेळ अशी येते की सगळे मुखवटे गळून पडतात. पोराला मी त्याच्या घराकडे पाठवलं. पूर्वी हुतात्मे होऊन गेले. ज्यांनी भयंकर हाल सोसले पण ठाम राहिले. त्यांच्यापैकी कोणाच्याही वाट्याला असे राक्षसी हाल आले नसतील. मी आपल्या बेताशी आणि तुझ्याशी प्रामाणिक रहायचा प्रयत्न केला पण शेवटी सहन करण्याला सीमा असते.”
    मी विचारलं, “काय झालं, काश्या ?”
    “मी घोडा झालो, सरदार स्वार झाले आणि पुण्यापर्यंतचा १६० मैलांचा प्रवास केला असेल, एक इंच कमी नसेल.
    मग मला हरभरे म्हणून दगड चावायला दिले. मग दोन तास त्याच्याबरोबर रस्ता दोन्ही बाजूला कसा जातो, ह्याबद्दल हुज्जत घालावी लागली. रस्ता हिरवाच कां, निळा कां नाही, ह्याच्यावर वाद झाला ? माणूस किती सहन करणार ? शेवटी त्याची काॅलर पकडून डोंगरावरून खाली आणला. वाटेत माझ्या पायांवर त्याने लाथा मारून पाय काळे-निळे केले. दोनदा हाताला चावला. पण शेवटी तो घरी गेला. मी त्याला त्याच्या गावात जायचा रस्ता दाखवला आणि शेवटी एक लाथ मारून त्याचे दहा फूट चालणे कमी करून गावाकडे पाठवला. आपली खंडणी गेली. माफ कर पण नाहीतर काश्याला वेड्यांच्या इस्पितळात रहायला लागलं असतं.”
    हे सांगताना काश्या हाश हुश करत होता, धापा टाकत होता पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि शांती होती.
    मी काश्याला म्हटले, “काश्या, तुमच्या घराण्यात कोणी अचानक धक्का बसून गेलेला नाही ना !”
    काश्या म्हणाला, “नाही, माझा बाप मलेरियाने गेला.”
    मी म्हणालो, “मग ठीक आहे. मागे पहा.”
    काश्या मागे वळला आणि ते हंसत असलेलं पोरगं पाहून मटकन खालीच बसला.
    तासाभरानंतर मी काश्याला माझा बेत सांगितला.
    “आजच्या आज मध्यरात्रीपर्यंत आपण खंडणी घेऊन निघून जाऊ.”
    हा बेत ऐकून काश्याला थोडा धीर आला आणि तो पोराकडे बघून हंसला.
    जरा बरं वाटलं की तो पोराबरोबर जपानी युध्दाच्या खेळांत रशियन व्हायलाही तयार झाला.
    माझी खंडणी मिळवण्याची योजना धंदेवाईक मुले पळवणाऱ्यांपेक्षा चांगलीच होती.
    ज्या झाडासमोर त्यानी उत्तर पेटीत ठेवायचे होते, ते रस्त्यावरून सहज दिसणारे होते कारण आजूबाजूच्या शेतात सध्या काहीच नव्हतं.
    पोलिसांनी रस्त्यातुनच मला पाहिलं असतं.
    पण मी कांही कच्च्या गुरूचा चेला नव्हतो.
    मी कितीतरी आधीच जाऊन झाडाच्या गर्द फांद्यात लपून बसलो होतो आणि तिथेच थांबणार होतो.
    बरोबर वेळेवर गांवाकडून एक सायकल येतांना दिसली.
    तेरा चौदा वर्षांचा एक मुलगा सायकलला पेडल मारत आला.
    त्याने डबा शोधून काढला, खिशातली चिठ्ठी डब्यात ठेवली आणि परत पेडल मारत निघूनही गेला.
    मी तरीही एक तास थांबलो.
    माझी खात्री पटली की कांही दगा नाही.
    मी हळूच झाडावरून खाली उतरलो.
    चिठ्ठी घेतली आणि भिंतीला लगटून चालत सरळ जंगलाकडे पोहोचलो व गुंफेचा रस्ता पकडला.
    गुंफेत पोहोचल्यावर मी चिठ्ठी उघडली, कंदिलाजवळ आलो आणि काश्यालाही ऐकू येईल एवढ्या आवाजात वाचू लागलो.
    चिठ्ठी पेनने लिहिली होती आणि अक्षर गिचमीड होतं.
    दोन खतरनाक इसमांस,
    सभ्य गृहस्थांनो : माझ्या मुलाला माझ्या स्वाधीन परत करण्यासाठी खंडणी मागणारे. तुमचे पत्र आजच्या पोस्टाने मिळाले. मला वाटते तुमच्या मागण्या जरा जास्तच आहेत. मी तुम्हाला ह्या पत्राद्वारे सुधारीत प्रस्ताव देत आहे. मला विश्वास आहे की तुम्ही तो स्वीकाराल. तुम्ही बंटीला परत माझ्या ताब्यात द्या आणि मला फक्त पाच हजार रूपये द्या, म्हणजे मी त्याला तुमच्या हातून काढून घेईन. तुम्ही रात्री आलात तर बरं होईल कारण दिवसा आलात आणि बंटीला परत करतांना आमच्या शेजाऱ्यांनी तुम्हाला पाहिलं तर ते तुमचं काय करतील, त्याची जबाबदारी माझी नाही.
    तुमचा आदर करणारा,
    सरपंच.
    “ही शुध्द चांचेगिरी आहे, भामटेगिरी आहे. उध्दटपणा आहे. ह्यांना...”
    मी म्हणत होतो पण तेवढ्यात माझं लक्ष काश्याकडे गेलं.
    त्याच्या डोळ्यात अजीजी होती.
    एका सशक्त, निष्ठूर व्यक्तीच्या डोळ्यात असते अशी अजीजी.
    तो म्हणाला, “येश्या, पाच हजार म्हणजे कांही जास्ती नाहीत आणि आपल्याकडे आहेतही. आणखी एक रात्र इथे हे पोरगं राहिलं तर मला वेड्यांच्या इस्पितळात पोचवेल. हा सरपंच सद्गृहस्थ तर आहेच शिवाय उदारही असला पाहिजे नाहीतर एवढं व्रात्य कार्ट परत घ्यायला एवढीच खंडणी नसती मागितली. आपण संधी नको घालवायला !”
    मी म्हणालो, “काश्या, खरं सांगायचं तर आपण शेळी समजून आणलेल्या ह्या कारट्याने माझ्या मेंदूचा पण भुगा केलाय.आपण आजच त्याला त्याच्या घरी पोंचवू, पांच हजारांची खंडणी देऊ आणि ह्या राज्यातून बाहेरच जाऊ.”
    आम्ही पोराला रात्री त्याच्या घरी घेऊन गेलो.
    आम्ही त्याला सांगितलं की त्याच्या बापाने त्याच्यासाठी चांदीची मूठ असलेली तलवार आणलीय.
    तेव्हा तो जायला तयार झाला.
    जेव्हा आम्ही सरपंचाचा दरवाजा ठोठावला, तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते.
    आमच्या पूर्वीच्या बेताप्रमाणे मी ह्यावेळी झाडाखालच्या पेटीतून वीस हजार रूपये खंडणी घेणार होतो.
    प्रत्यक्षात काश्या पांच हजार रूपये खंडणी मोजून सरपंचाना देत होता.
    जेव्हा पोराच्या लक्षांत आलं की आम्ही त्याला घरी सोडून जाणार, तेव्हा तो किंचाळून, काश्याच्या पायाला घट्ट विळखा घालून जळूसारखा चिकटला.
    सरपंचानी प्लॅस्टर ओढून काढावं तसा त्याला हळूहळू खेंचून काढून आपल्या ताब्यांत घेतला.
    काश्याने सरपंचाना विचारलं, “तुम्ही त्याला असा किती वेळ धरून ठेवू शकाल ?”
    सरपंच म्हणाले, “आता मी पहिल्यासारखा बळकट राहिलो नाही तरी दहा मिनिटे धरून ठेवीन.”
    काश्या म्हणाला, “ठीक आहे. तेवढ्यात मी ह्या जिल्ह्याचीच नव्हे तर राज्याचीही हद्द ओलांडून कर्नाटकांत पोहोचेन.”
    काळोखी रात्र असूनही आणि जाडजूड काश्यापेक्षा जोरात पळणारा असूनही मी जेव्हा पळणाऱ्या काश्याला गांठला तेव्हा तो त्या गांवाच्या वेशीपासून चांगला दोन मैल दूरवर पोंहोचला होता.
    -- अरविंद खानोलकर.

      June 15, 2022


  • रेशीमगाठी – भाग ४

    पाच-दहा मिनिटांतच एक उंचीपुरी, गौरवर्णी, तरतरीत मुलगी आत आली. वेळेवर पोचतो की नाही यामुळे येणारा एक प्रकारचा अस्वस्थ भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला होता. ती घाईने क्लार्ककडे आली आणि तिने विचारलं, “का हो, कुणी केदार देशपांडे आले आहेत का?”

      March 10, 2022


  • वेळेनंतरची उपरती

    एक न्यायमूर्ती होते. अतिशय निःस्पृह व कर्तव्यकठोर म्हणून त्यांची ख्याती होती. खुनाचा आरोप सिद्ध झालेल्या प्रत्येक खुन्याला कोणीतीही दयामाया न दाखविता त्यांनी फाशीची शिक्षा ठोठावली होती. कोणताही खून खटला त्यांच्या न्यायालयात असला की, आरोपीला फाशी होणारच हे जवळजवळ निश्चित झालेले असायचे.

    आपल्या कर्तव्यकठोर स्वभावामुळे प्रसिद्ध असलेले न्यायमूर्ती घरातही तसेच वागायचे. त्यामुळे त्यांच्या मुलाला लहानपणापासून प्रेम मिळाले नाही. त्यामुळे तरुणपणी मुलगा वाईट संगतीने बिघडला. त्याच्याच हातून एकाचा खून झाला व तो खटला चालविण्यासाठी नेमका याच न्यायमूर्ती समोर आला.

    एरवी प्रत्येक खुन्याला फाशी देणारे हे न्यायमूर्ती समोर आपला मुलगा आरोपी असल्याचे पाहून कचरले. त्यांची कर्तव्यकठोरता कमी झाली. त्यांचे मुलाविषयीचे ' ममत्व' एकदम जागे झाले. त्यामुळे न्यायदान करताना ते आता बुद्धिवादाची भाषा बोलू लागले.

    सध्याच्या काळात फाशीची शिक्षा अमानुष आहे. एकाने दुसऱ्याचा जीव घेतला म्हणून त्याचा पुन्हा आपण जीव घ्यायचा का? अशी भाषा त्यांनी सुरू केली. मात्र मुलानेच त्यांना अडविले. तो म्हणाला, ''माझ्यावरील ममत्वामुळे तुम्ही आता हे बोलत आहात. मात्र खुनाचा गुन्हा मला मान्य आहे. त्यामुळे तुम्ही मला फाशी दिलीच तरच ती योग्य होईल व तुमच्याही न्यायदानास 'कलंक' लागणार नाही.

    मात्र न्यायमूर्तीना आपल्या मुलाकडून घडलेल्या अपकृत्यात आपणही थोडेफार वाटेकरी आहोत, असे वाटू लागले. त्यांना उपरती झाली, परंतु आता खूप उशीर झाला होता.

    आपल्या हातून या खटल्याचा योग्य निकाल लागणार नाही हे ओळखून त्यांनी हा खटला दुसऱ्या न्यायमूर्तीकडे चालवावा, अशी शिफारस केली व आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते न्यायालयातून बाहेर पडले.

      November 7, 2017


  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३१)

    मागील भागात मी साहित्यिक देवेंद्रजी वधवा यांचा उल्लेख केला आहेच. पुन्हा एकदा नगरला एका कार्यक्रमाला योग आला. पुण्यातील ज्येष्ठ कवयित्री ऍड. संध्याताई गोळे, काव्यशिल्प पुणेच्या अध्यक्षा कवयित्री ऋचा कर्वे, सुनेत्राताई गायकवाड, विद्याताई देव यांच्या पु.ल. एक साठवण या कार्यक्रमासाठी नगरला निमंत्रण आले होते. या सर्वच कवयीत्री माझ्या सुपरिचित होत्या.

      June 25, 2021


  • परिसस्पर्श… (मी आणि ती कथा)

    इतक्यात मला ती दिसली.. गावाकडे पहिली होतो.. आता ओळखू येत नव्हती.. कोणत्या साहेबाची , कृपा ‘ झाली कोण जाणे. मी तिच्या समोरच होतो… तिनेही रोखून बघीतले आणि मला ओळखले..

      July 5, 2021


  • हेमकुंड/ व्हॅली ऑफ फ्लॉवर्स – भाग – २

    नरसिंह मंदिरातील नरसिंहाच्या मूर्तीचा डावा हात कृश आहे व असे सांगतात की जेव्हा हा हात गळून पडेल तेव्हा नैसर्गिक उत्पात घडतील. नर-नारायण पर्वत एकमेकावर कोसळून पडतील व बद्रीविशालचे मंदिर कायमचे बंद होईल आणि मग 'भविष्यबद्री' बद्रीनाथ म्हणून पुजला जाईल. नरसिंह मंदिराजवळ दुर्गामंदिर आहे. या मंदिरात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कुशमांडा, स्कंदमाता, कल्याणी, काली, गौरी व सिद्धी अशा नऊ मूर्तीची नवदुर्गा म्हणून पूजा केली जाते. या मंदिरात वासुदेवाची भव्य देखणी मूर्ती आहे. तसेच या मंदिरात 'श्रीवासुदेव गिरिराज चक्रचुडामणी' असे एका सम्राटाचे नाव खोदलेले आहे. इ.स. ८२० च्या आसपास ही मंदिरे बांधली असावीत, असा एक अंदाज आहे. नंतर या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला असावा. नागरशैलीतील या मंदिरांच्या शिखरांचे संतुलन व आधार देण्याची पद्धत ही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण आहे.

    जोशीमठचे आणखी एक आकर्षण म्हणजे 'औली.' जोशीमठ ते औली या रस्त्याचे अंतर साधारण १६ कि.मी. आहे. पण आता जोशीमठ ते औली असा लोहरज्जुमार्ग तयार झाला आहे. साधारण साडेचार कि.मी. अंतराच्या या प्रवासात आपण जवळजवळ ३३०० फूट उंच जातो. औली हे 'बुग्याल' आहे. बुग्याल म्हणजे उंचीवरील सपाट प्रदेश. जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत हा सर्व भाग हिमाच्छादित असतो. त्यावेळी स्कीईंग हा साहसी खेळ या ठिकाणी शासनाच्या पर्यटन विभागातर्फे शिकवला जातो. मार्च-एप्रिलमध्ये बर्फ वितळू लागते व मखमली हिरवळीत हा सर्व भूभाग हरवून जातो तर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात असंख्य नाजूक, सुंदर गोजिरवाण्या, विविध आकाराच्या रंगांच्या फुलात हा भाग दडून जातो. हिमाच्छादित पर्वत रांगांचे तसेच हाथी, कॉमेट, द्रोणागिरी नंदादेवी इ. नामांकित पर्वतशिखरांचे इथून फार सुंदर दर्शन होते.

    जोशीमठला भारतीय सैन्यदलाची मोठी छावणी आहे.

    जोशीमठ ते बद्रीनाथ हा रस्ता अरुंद व अवघड आहे. त्यामुळे या मार्गावर एकतर्फी वाहतूक चालते. यालाच 'गेट सिस्टीम' असे म्हणतात. जोशीमठपासून २० कि.मी. अंतरावर 'गोविंदघाट' आहे. गोविंदघाटला आपला बस प्रवास संपतो व पदभ्रमंती सुरू होते. 'हेमकुंड' व 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स'ला जाण्यासाठी फक्त गोविंदघाटहून जाणारा हाच एकमेव मार्ग उपलब्ध आहे.

    'गोविंदघाट' (उंची १८२९ मीटर्स), गुरू गोविंदसिंगांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले स्थळ! या ठिकाणी अलकनंदा व लक्ष्मणगंगेचा संगम होतो. म्हणून याला ‘लक्ष्मणप्रयाग’ असे सुद्धा म्हणतात. इथे गुरुद्वार असून गुरुद्वारात राहण्याची व खाण्याची सोय होते. जादा सामान ठेवण्यासाठी क्लॉकरूमची सुविधा इथे उपलब्ध आहे. पुढील प्रवासासाठी हमाल, घोडे, दंडी (डोली) सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होतात. काही छोटेखानी विश्रामगृहे पण येथे उपलब्ध आहेत.

    अलकनंदेचा पूल ओलांडला की चढाचा रस्ता सुरू होतो. २-३ कि.मी. चा हा रस्ता चांगलाच दम काढतो. वाटेवर फारसे जंगल-झाडे पण नाहीत. साधारण ३ कि.मी. अंतरावर 'पुलना' ही वस्ती येते. (पुलना उंची १९२० मीटर्स) मग मात्र चढउताराचा, जंगलातून जाणारा रस्ता सुरू होतो. सोबत असते लक्ष्मणगंगेची! इथून निसर्गाची विविध रूपे खुलायला लागतात. पुढे साधारण ५ कि.मी. अंतरावर 'भ्युंदर' ही वस्ती येते. ही संपूर्ण घाटी 'भ्युंदरघाटी' म्हणून ओळखली जाते.

    'भ्युंदर' (उंची २२३९ मीटर्स) हे ४०-५० घरांचे गाव असून राजपूत व भोटिया जमातीचे लोक इथे राहतात. भ्युंदरहून 'काकभृशुंडी' या पर्वतशिखराचे रमणीय दर्शन होते. या पर्वत शृंखलेत भ्युंदरपासून साधारण २२ कि.मी. अंतरावर काकभृशुंडी नावाचे हिरवेगार पाणी असलेले एक सुंदर सरोवर आहे. हे सरोवर ५००० मीटर्स उंचीवर आहे. हाथी पर्वताशेजारी असलेल्या या सरोवराकडे विष्णुप्रयागहून सुद्धा जाता येते पण तुलनेने भ्युंदरकडून जाणारी वाट थोडी सोपी आहे. पण ही नेहमीची मळलेली वाट नाही. त्यामुळे या सरोवराकडे जाण्यासाठी अनुभवी मार्गदर्शक घेणे आवश्यक आहे. मार्गात जंगल, चढ-उतार, प्रवाह, ग्लेसिअर्स ओलांडावे लागतात. वाटेत कुठेही मनुष्यवस्ती नाही. त्यामुळे मुक्कामाचे सर्व साहित्य बरोबर ठेवावे लागते. वन्यप्राण्यांचे या भागात अस्तित्व आहे.

    या जलाशयाजवळील हत्तीपर्वतावर दोन प्रचंड मोठे पाषाणखंड आहेत. त्यापैकी एकाचा आकार कावळ्यासारखा तर दुसऱ्याचा गरुडासारखा. हा कावळा व गरूड यांच्यात विश्वामधील घडामोडी संबंधी संभाषण सुरू असते, अशी एक श्रद्धा आहे. या विषयी तुलसीदास रचित 'रामचरितमानस' या महाकाव्यात एक कथा सांगितली आहे -

    लोमेश ऋषींच्या आश्रमात एक शिष्य विद्याभ्यासासाठी रहात असतो. हा शिष्य अत्यंत अहंकारी असतो. त्यामुळे त्याला गुरूबद्दल आदरभाव कधीच दाखवता येत नाही. या अहंकारी स्वभावामुळे तो लोमेश ऋषींना अपमानित करत असे. लोमेश ऋषींनी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या स्वभावात बदल होत नव्हता. लोमेश ऋषी शिवभक्त होते.

    एके दिवशी या शिष्याची आपल्या गुरूप्रती वर्तणूक पाहून भगवान शिवशंकर क्रुद्ध झाले व त्यांनी 'तू नीच पशू कुळात एक हजार जन्म घेशील' असा शिष्याला शाप दिला. आता मात्र शिष्याचे डोळे उघडले. तो शंभू महादेवाची करूणा भाकू लागला. लोमेश ऋषींना जेव्हा हे कळले, तेव्हा त्यांनासुद्धा खूप वाईट वाटले. त्यांनी श्रीशंकराची प्रार्थना करून उ:शाप देण्याची विनंती केली. लोमेश ऋषींची प्रार्थना ऐकून श्रीशंकराला दया आली व त्यांनी सांगितले याला कोणताही जन्म मिळू दे पण प्रत्येक जन्मात त्याला प्रभू रामचंद्राचे स्मरण राहील. मी हा त्याला वर देत आहे. आता शिष्याला कावळ्याचा जन्म प्राप्त झाला. तो जंगलात निघून गेला. त्याचे जीवन दुःखीकष्टी झाले. जंगलातील मृत जनावरांचे मांस खाऊन आपल्या नशिबाला दोष देत तो दिवस कंठू लागला. असाच फिरत फिरत तो एके दिवशी अयोध्येला पोहोचला. श्रीशंकराने दिलेल्या वराचे त्याला स्मरण झाले. तो रामनाम घेऊ लागला. प्रभू रामचंद्राचे माहात्म्य व थोरवी त्याला जाणवू लागली.

    राम-रावण युद्धात मेघनादाने (रावणाचा पुत्र) नागास्त्राचा प्रयोग राम-लक्ष्मणावर केला. राम-लक्ष्मण नागपाशात बद्ध झाले. सर्वांनी आशा सोडली. नागपाशातून मुक्त होण्याचा मार्ग फक्त गरूड जाणत होता. महाबली हनुमानाने गरूडापाशी जाऊन राम-लक्ष्मणांना नागपाशातून मुक्त करण्याची प्रार्थना केली. हनुमंताच्या प्रार्थनेप्रमाणे गरूडाने राम-लक्ष्मणाला नागपाशातून मुक्त करून जीवदान दिले.

    परंतु गरूडाच्या मनात एक शंका राहिलीच. आपल्या पत्नीसाठी शोक करणारा, सामान्य माणसाप्रमाणे वागणारा हा राम नक्की कोण आहे? श्रीरामाचे श्रेष्ठत्व गरूडाला अज्ञात होते. शेवटी हा प्रश्न त्याने नारदमुनींना विचारला. तेव्हा त्यांनी गरूडाला सांगितले हा प्रश्न तू ब्रह्मदेवाला विचार. तेव्हा गरूड ब्रह्मलोकी गेला व त्याने आपली शंका ब्रह्मदेवाला विचारली. तेव्हा ब्रह्मदेवांनी गरूडाला सांगितले की, हा प्रश्न तू श्रीशंकराला विचार गरूड कैलास पर्वतावर पोहोचला. श्रीशंकरानी त्याचे स्वागत केले. गरूडाने श्रीशंकराला प्रश्न विचारला. स्मितहास्य करीत शंकरांनी गरूडाला सांगितले, हा प्रश्न तू काकभृशुंडीला विचार.

    गरूड अचंबित झाला. अखेर तो मानस सरोवराकाठी वास्तव्य करत असलेल्या कावळ्याचा जन्म घेतलेल्या शापभ्रष्ट शिष्यापाशी आला. या पक्षीराजाने काकभृशुंडीला आदराने वंदन केले व त्याला सांगितले, तू माझा गुरू आहेस व माझ्या शंकेचे तूच समाधान करू शकशील. तेव्हा काकभृशुंडीने मोठ्या आदराने रामाचे माहात्म्य गरूडाला सांगितले व सांगितले की प्रभू रामचंद्र हे कोणी सामान्य नाहीत तर जनकल्याणासाठी भगवान श्रीविष्णूंनी हा घेतलेला अवतार आहे. काकभृशुंडीने गरूडाला उपदेश केला, ज्ञान दिले.

    काकभृशुंडी गरूडाला सांगतात, 'हे गरूडा, अहंकारामुळेच माणसाला अनेक प्रकारची दु:खे व मनोरोग जडतात. जन्ममरणाचे मूळ कारणही अहंकारच आहे. भक्ताच्या मनातील अहंकार दूर करणे हे ईश्वर आपले कर्तव्य समजतो. भक्ताच्या मनातील अहंकार दूर करून तो भक्ताला दुःखमुक्त करतो हे भगवंताचे भक्तावरील प्रेमाचे प्रतीक आहे. अहंकाराचे शोकदायी गळू ईश्वर मातेच्या ममतेने कापून टाकतो.'

    या परिसरातील लोक काकभृशुंडी सरोवर हे एक पवित्र सरोवर मानतात. मकरसंक्रांत व नंदाष्टमीच्या दिवशी पुलना, भ्युंदर गावातील लोक वाजतगाजत या स्थानी येतात. काकभृशुंडी सरोवराची मनोभावे पूजा करतात. मात्र या दुर्गम स्थळी फारच थोडे लोक जातात.

    असे सांगतात की, कावळ्याला आपला मृत्यू समजतो. जेव्हा त्याला मृत्यू दिसू लागतो तेव्हा तो काकभृशुंडी घाटीत येतो व देहत्याग करतो. या भागात गेलेले लोक सरोवराच्या परिसरात कावळ्याची पिसे पाहिल्याचे सांगतात.

    या काकभृशुंडी सरोवरातून भ्युदरगंगा नदी उगम पावते व भ्युंदर गावाजवळ लक्ष्मणगंगेत स्वत:ला ती हरवून जाते.

    भ्युंदरहून परत २-३ कि.मी.चा चढउताराचा रस्ता व मग लक्ष्मणगंगेचा पूल ओलांडल्यावर शेवटचा ३ कि. मी. चा पूर्ण चढणीचा टप्पा! या शेवटच्या ३ कि.मी.मध्ये मात्र चांगलीच दमछाक होते व मग येते 'घांगरिया.'

    हा पूर्ण रस्ता गोविंदघाटपासून हेमकुंडपर्यंत चांगला बांधलेला आहे. जागोजागी राहण्याची व खाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. शीख यात्रेकरूंची सतत वर्दळ या रस्त्यावर सुरू असते. 'वाहे गुरू' व 'सत् श्री अकाल' असा घोष कानावर येत असतो. चाल व चढण सोडल्यास कोणताही धोका किंवा अडचणी या मार्गावर नाहीत.

    'घांघरिया' (उंची ३०४८ मीटर्स) उंच पर्वतशिखरांनी वेढलेले, देवदार वृक्षराजीत दडलेले, हिरवळीने मढलेले आणि नाजूक सुंदर फुलांनी सजलेले छोटेखानी गाव! इथे गुरूद्वार असून ते सर्वांसाठी मुक्त आहे. गुरूद्वारात निवास व भोजनाची पण व्यवस्था होते. शिवाय गावाला साजेशी छोटी लॉजेसपण येथे उपलब्ध आहेत. घांघरियापासून १ कि.मी. चालल्यावर लक्ष्मणगंगा ओलांडली की डावीकडचा रस्ता ४ कि.मी. अंतरावरील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' कडे तर उजवीकडचा रस्ता ६ कि.मी. अंतरावरील 'हेमकुंड' कडे घेऊन जातो. हेमकुंडच्या रस्त्याकडे नजर टाकली असता एक सुंदर प्रपात नजर खिळवून टाकतो.

    १९३१ साली फ्रँक स्मिथ हा ब्रिटिश गिर्यारोहक 'कामेट' हे शिखर सर करण्याच्या प्रयत्नात होता. परत येत असताना त्याचा रस्ता चुकला व एका फुलाने बहरलेल्या दरीत त्याचे आगमन झाले. या दरीचे व फुलांचे सौंदर्य पाहून स्मिथ थक्क झाला. त्या दरीचे त्याने 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' असे नामकरण केले. जुलै-ऑगस्ट महिन्यात ही दरी जंगली फुलांनी बहरून जाते. ७० वर्षांपूर्वी स्मिथने जवळजवळ २५०० प्रकारची फुले पाहिली होती. आज मात्र २५०-३०० प्रकारची फुले इथे पाहायला मिळतात. १९८२ साली ही दरी व आजूबाजूचा परिसर असे ८७.५ चौ.कि.मी. क्षेत्रफळ राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे. हेमकुंड हा या राष्ट्रीय उद्यानाचा एक उपविभाग आहे.

    हेमकुंडची चढण सुरू होते ती फुलांच्या सोबतीने! भूर्जपत्र, होडोडेंड्रॉन, चीड, पाईन वृक्षांच्या साथीने! जिरनियम, लिली, अस्टर्स व अनेक सुंदर नाजूक, रंगीबेरंगी फुलांनी सर्व परिसर नटलेला! कड्याकपारीत उमललेली नाजूक फुले माना हलवून आपले स्वागत करीत असतात. मंद निळ्या रंगाची प्रिमुला, लिंडोफोलिया, लाल चेरी, हिमालयन यलो पॉपी, गुलाबी गोल्डन लिली, जांभळी जिरेनियम, लाल-पांढरे जंगली गुलाब, जांभळ्या रंगाची आयरिस इ. अनेक प्रकारची असंख्य फुलेच फुले! या फुलांचे सौंदर्य थक्क करून टाकणारे आहे. 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' पेक्षा जास्त प्रकारची व सुंदर फुले मला हेमकुंडच्या

    वाटेवर पाहायला मिळाली. मध्येच पायात येणारे झरे तर कधी ग्लेसियर्स! या स्वप्नसृष्टीत चार-साडेचार कि.मी. ची वाट कधी संपते तेच समजत नाही आणि मग दर्शन झाले ते हिमालयातील दिव्य फुलांचे, ब्रह्मकमळाचे! हिरव्या पांढऱ्या रंगाचे मिश्रण असलेले क्रीम रंगाचे 'ब्रह्मकमळ!' त्याच्या पाकळ्या बटरपेपरसारख्या थोड्या पारदर्शी! मंद गोड सुगंध! याचा आकार डोळ्यासारखा असल्यामुळे या फुलांना नेत्रकमळ असेही म्हणतात. वनस्पतीशास्त्रात या फुलांना Saussurea Obvallata म्हणून ओळखले जाते. पुराणात या फुलांना 'दिव्यपुष्पे' म्हटले आहे. साधारण १३०००-१५००० फुटांवर ही फुले फुलतात. खरंच, ही फुले म्हणजे विधात्याची एक अद्वितीय निर्मिती आहे.

    थोडे पुढे गेल्यावर एक पायऱ्यांची वाट हेमकुंडला जाते. हा रस्ता जवळचा असला तरी उभ्या चढणीचा आहे. थंडीचा कडाका वाढू लागतो. मध्येच सर्व परिसर धुक्यात गुरफटून जातो. ढग अंगाला स्पर्श लागतात. बघता बघता दृश्य अदृश्य होते. वातावरणात गूढरम्य शांतता पसरलेली असते. मधूनच गुरूद्वारातील भजनाचे स्वर कानी येऊ लागतात. वातावरणात ते सुरेल स्वर पावित्र्य पसरवतात. सर्व वातावरण स्वप्नमय होत असते व त्यात आपण स्वत:ला हरवत असतो.

    १४,५०० फूट उंचीवरील हे छोटेसे सरोवर म्हणजे निसर्गाची एक अमोघ देणगी आहे. नाजूक फुलांनी वेढलेले, आकाशाची निळाई ल्यालेले हे सरोवर सूर्यप्रकाशाच्या किरणात चमकत असते. तर मध्येच कधीतरी धुक्याची दुलई अंगावर पांघरून घेते. पाण्यात छोटे छोटे हिमखंड तरंगत असतात, तर तळ्याकाठचे गुरुद्वार कमळासारखे शोभायमान दिसत असते. गुरूद्वाराच्या शेजारील लंगरमध्ये चहा, खीर, खिचडीचे वाटप मुक्तहस्ते व प्रेमाने सुरू असते. साधारण १/२ कि.मी. परीघ असलेल्या या सरोवराच्या दर्शनाने व तेथील वातावरणाने देहभान हरपते आणि मन एका वेगळ्याच विश्वात विहरू लागते.

    गुरुद्वाराच्या शेजारीच लक्ष्मणाचे छोटेसे मंदिर आहे. लक्ष्मणाची मंदिरे फारशी कुठे आढळत नाहीत. मला तर लक्ष्मणाची मंदिरे फक्त ऋषीकेशला व हेमकुंडला पाहायला मिळाली. हेमकुंडचे हे मंदिर पुरातन असून नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार थोर योगी सतपालजी महाराज यांनी केला आहे. मंदिराशेजारी एक धर्मशाळासुद्धा आहे. पण प्रचंड थंडी, निसर्गाच्या बेभरवशी रौद्र स्वरूपाची शक्यता, यामुळे पर्यटक सहसा हेमकुंडला रात्री मुक्काम करीत नाहीत.

    या सरोवराच्या परिसत ७ पर्वतशिखरे आहेत. प्राचीन काळात रक्तबीज नावाची दुष्ट शक्ती देवांना, ऋषींना छळू लागली. त्रस्त झालेले देवदेवता ब्रह्मदेवाला शरण गेले, तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना सामुंध ऋषींना शरण जाण्यास सांगितले, तेव्हा सामुंध ऋषी हिमालयात तपोसाधनेत मग्न होते. देवदेवता सामुंध ऋषींच्या दर्शनाला आले. देवदेवतांचे आगमन व त्यांची इच्छा ऋषींनी अंतर्ज्ञानाने जाणली. त्यांच्या शरीरातून एक दिव्य तेज प्रगट झाले व त्या तेजाने दुष्टदमनाचा नाश केला. पुढे या दिव्य तेजाचे सात ऋषींत रूपांतर झाले व हे सात ऋषी सात पर्वत शिखरावर तपोसाधना करू लागले. म्हणून या पर्वतशिखरांना सप्तशृंग व पर्वताला सामुंध पर्वत असेही म्हणतात. ही बर्फाच्छादित पर्वतशिखरे हेमकुंड सरोवराचे जलस्रोत आहेत. देवदेवतांचे या परिसरात कायम वास्तव्य आहे, अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. या परिसरातील दिव्यशक्तीचे वास्तव्य आद्य शंकराचार्य जाणून होते.

    हेमकुंडच्या परिसरात पिवळ्या चोचीचे व लालभडक पायाचे कावळे (अल्पाइन चफ) पाहायला मिळतात. साधारण १०,००० फूटांवर हे कावळे दिसतात. हिमवादळाची पूर्वचाहूल त्यांना लागते व ते आवाज करीत खालच्या भागात स्थलांतर करतात. त्यांच्या हालचालीने मेंढपाळांना हिमवादळाची पूर्वसूचना मिळते. सुवर्ण गरूडही या भागात घिरट्या घालताना दिसतो. अंगोरा जातीच्या मेंढ्यांचे कळप या परिसरात चरण्यासाठी भटकत असतात. हिमचित्ते, अस्वले, कस्तुरीमृगांचा पण या परिसरात वावर असतो. शॉर्ट टेल्ड होल हे छोटे उंदरासारखे दिसणारे प्राणी या परिसरात आढळतात. त्यांची जमिनीत खोल बिळे असतात. बिळात ते गवताचा साठा करून ठेवतात. फुले, फळे, किडे व गवत हे त्यांचे खाद्य! हिमवृष्टी सुरू झाली की ते स्थलांतर न करता बिळात आश्रय घेतात व मग ५-६ महिने ते बिळातच वास्तव्य करतात.

    हिमालयात अशी अनेक स्थळे आहेत, की ज्यांच्या दर्शनाने हृदय अपार शांतीने भरून जाते. शरीरात निसर्गातील ईश्वरी शक्ती प्रवाहित होते. ही ईश्वरी शक्ती विचारचक्रातील षड्रिपु पुसून टाकते व पुनीत झालेल्या मनाला निर्मळ आनंदाचा साक्षात्कार होतो, विचारांचा सुगंध मनात दरवळू लागतो व स्वर्गसुखाची अविस्मरणीय अनुभूती प्राप्त होते. हेमकुंड हे असेच स्थळ आहे.

    -प्रकाश लेले

      September 21, 2022


  • ब्रेन रॉट – ३ : लोच्या झाला रे

    पण बेसिन जवळच्या ज्येष्ठ नागरिक म्हणता येईल अशा माणसाकडे ते पहात होते . गेली सात ते आठ मिनिटे तो माणूस चेहरा धूत होता . नॅपकिन ने कोरडा करत होता . स्वतःभोवती सगळीकडे फिरून चेहरा निरखित होता . पुन्हा चेहरा धूत होता . पुन्हा कोरडा करत होता . पुन्हा… पुन्हा…

      December 31, 2025


  • बिनचेहऱ्याची माणसं

    कंडक्टर पाठीमागून एकेकाची तिकीटं काढत माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. टीव्हीचा बाॅक्स मी पायाशी ठेवला होता. मी त्याला नागठाणेचे तिकीट मागितले. त्याने सत्तर रुपये घेऊन तिकीट दिले व विचारले, ‘हा बाॅक्स कुणाचा आहे?’ मी, माझा आहे सांगितल्यावर त्याने त्याचे लगेजचे पस्तीस‌ रुपये मागितले.

      November 20, 2021