नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
डॉ. अलका कुलकर्णी या मुंबईसारख्या शहरातून डॉक्टर झालेल्या आणि शहाद्यासारखे दूरचे गाव त्यांनी कार्यक्षेत्र म्हणून निवडले. या गोष्टीबरोबरच वैद्यकीय व्यवसाय करीत असतानाही त्या दमदार लेखन करतात, याचे कौतुक वाटते. `ओळख’ हा डॉ. अलका कुलकर्णी यांचा कथासंग्रह वाचला. त्यांचा काहीसा आगळावेगळा विषय अर्थवाही होऊन मनात खोलवर रुतू लागला. त्यातील बहुतेक सर्व कथा आधुनिक जगातल्या स्त्रियांच्या समस्येवर आधारित आहेत, तरीही काहीशा चाकोरीबाहेरच्या आहेत.
January 25, 2010

आम्ही कुठेही मोट्या हॉटेलमध्ये खाल्ले तरीपण चहा प्यायला टपरीवर जायचो. ठाण्याच्या गडकरीमध्ये चहा प्यायला जायचो परंतु एका चहासाठी ३० -३२ रुपये टू मच ..वाटत असे, म्हणून जवळच्या टपरीवर सात रुपये कटींग बेस्ट..
June 22, 2021
“मंगळ”यानाच्या प्रज्वलनाने,
“मंगळास” “मंगलमय” केले आहे,
“अमंगल” “मंगळाचे”,
चांगलेच “मंगळ” झाले आहे I
September 24, 2014

मी माझ्या मुद्रण / प्रकाशन व्यवसायात दरवर्षी सुमारे 5 दिवाळी अंक छापत असे. त्यातील ज्ञानदूत हा अंक मुंबईतून निघत असे. प्रसिद्ध नोगी कंपनी (माकडछाप काळी टूथ पावडर) यांच्या तर्फे मालक कै. प.सी.बोले व कै. तारा बोले हा दिवाळी अंक प्रकाशित करत असत. त्यांचे आणि माझे खुपच जवळचे संबंध होते. त्यांच्यामुळे मुंबईतही माझ्या खुप ओळखी झाल्या.
June 3, 2021

कंडक्टरने घंटा वाजवली आणि तेवढ्यात घंटेची दोरीच तुटली. “असंच आमचं आयुष्य आहे.” तो म्हणाला अन पुन्हा कसनुसा हसला.
January 26, 2022
इतरांप्रमाणे माझ्या मनात एक दिवस आत्महत्येचा विचार आला.आत्महत्येचा कोणता प्रकार निवडावा या विवंचनेत मी होतो.आत्महत्येची तीव्रता कमी होण्या अगोदर निर्णय होणे आवश्यक होते. नसता विचार बदलू शकतो.तीव्रता हेच यशाचे गमक आहे हा सुविचार देखील या निमित्ताने जन्माला आला.
January 1, 2024

लेफ्टनंट जनरल निंभोरकरांचे ते शब्द ,पाण्याच्या त्या एका थेंबाने ऐकले आणि तो एकदम उत्तेजित झाला ..थेंब रोमांचित झाला. थेंबाचा अणुरेणू प्रफुल्लित झाला. हे काहीतरी विलक्षण ऐकायला मिळालं होतं.
September 27, 2019
दुपारची वेळ, डोळ्याला डोळा नुकताच लागला होता. नको त्या वेळेस घणघण्याची फोन ची सवय. सवयीप्रमाणे तो घणघणलाच. कुस बदलून घेतला. ओळखीचा नंबर नव्हता. माझ्या सारख्या छोटया पडद्यावरच्या अभिनेत्याला सुद्धा असे unknown number घेणे आवडत नसते, ego issue म्हटले तरी चालेल. पण गेले कित्येक दिवस घरात बसून कंटाळलोच होतो. विचार केला, जरा वेळ चांगला जाईल आणि फोन घेतला.
"हॅलो, अजय कसा आहेस रे? " फोन उचलता क्षणीच समोरुन कोणा एका स्त्रिचा घणघणीत आवाज कानावर आदळला. क्षणभर चक्रावलो. अजय अशी एकेरी आवाजात हाक मारणाऱ्या दोनच स्त्रिचा माझ्या आयुष्यात उरल्या होत्या. एक ताई आणि दुसरी वहिनी. आता हि तिसरी कोण? मला प्रश्नच पडला. तरीही उत्तर तर द्यावे लागणार होतो, म्हणून बोललो,
“मी चांगला आहे. तुम्ही कोण बोलताय? "
“Oh, thank God. तू खूप आजारी असल्याचे मला कळाले होते पण फोन करु का नको अशा द्विधा मनस्थितीत होते. दवाखान्यातून घरी आलास ना? "
"हो, हो, घरी आहे आणि मजेत आहे. राग मानू नका पण मला कळेल कां आपण कोण बोलताय ते? "
"घर ते घर बघ अजय दवाखाना काय, कितीही सुखसोयींनी उपलब्ध असला तरी शेवटी तो दवाखानाच. आता चांगली विश्रांती घे. स्वतःची काळजी घे. डॉक्टरांचा सल्ला ऐक. सर्वात महत्वाचे म्हणजे ती दारु, त्या पाटर्या आता बंदच कर बाबा.'
ह्या तिच्या शेवटच्या वाक्याने तर मी बसल्या जागी उडालोच. अजून स्वत:ला सावरतोय नाही तो पर्यंत पुढचा प्रश्न,
“घरी सदा आहे नां? त्या स्वयंपाक वाल्या कला मावशी येतायत ना? तुझा ड्रायव्हर सुट्टीवर गला होता तो आला कां नाही? तसे काय म्हणा तुझ्या घरुन कोणी ना कोणी येत असतातच म्हणा तसा तू एकटा नसतोसच.
"अहो मी एकटा नसतो. तो issue नाहीच आहे. पण माझ्याबदल इतकी माहिती असणारी तू कोण बोलते आहेस हे मला समजेल कां? " नकळत मी एकेरीवर आलो.
“Sorry, really sorry. बोलण्याच्या नादात मी कोण हे सांगायचे. राहून गेले. तू ओळख पाहू, तुला काही आठवतंय कां? लहानपाणी तुला अज्या, टज्या म्हणून चिडवणारी, शेजारी राहणारी कोणी मुलगी? "
“Oh yes... yes... पुष्पा... शेंबडी अग तुला कोण विसरणार? माझी सगळी डिटेल माहिती आहे हं तुझ्याकडे."
"ओ, एकतर आता मी शेंबडी नाही. ऑफिसात मला पुष्पा मॅडम म्हणतात. मी. मीस पुष्पा पेठे. दुसरी गोष्ट मला हवी असलेली माहिती मी मिळवते आणि तुझी वहिनी माझी शाळेतील मैत्रीण आहे.
"Ok पुष्पा मॅडम. अजून तुम्ही पेठेच कां? कोणी मिळालेला दिसत नाही. आणि माझ्या माहितीमध्ये interest तुझा पाहून बरं वाटतय बघ.
"हं बोलू ह्यावर कधीतरी अजय, आत्ता साहेब केबिन मध्ये बोलवतायत. But you take care हं. दारु पिऊ नकोस..." इतके सगळे पटापट बोलून तिने फोन ठेऊन दिला. मी पण गालातल्या गालात हसलो आणि फोन ठेवून दिला.
मी आणि पुष्पा जवळ-जवळ बरोबरीचेच. माझ्यापेक्षा काही महिन्यांनी ती लहान असेल. शेजार-शेजार च्या घरांत आमच लहानपण गेलं. ते पेठे आम्ही साठे. बरीच वर्षे आम्ही शेजारी होतो. घर जरी शेजार-शेजारची होती, तरी एका घरांत पोळ्या झाल्या तर दुसऱ्या घरांत भाजी शिजत असे अशी आठवण आई आणि ताई सांगायच्या. त्या काळची माझी आठवण म्हणजे जुने लहानपणी फोटो.
सदा म्हणजे माझा caretaker. त्याला हांक मारली. कपाटातून जुना अगदी जर्जरीत झालेला आल्बम काढायला सांगितला. बाबांच्या इस्टेटीमधून मी हट्टाने उचलून आणलेली हि एकमेव वस्तू... जुने संग्रहित फोटो... सदाने त्यावरची धूळ कापडाने झटकली आणि माझ्या बाजूला आणून ठेवला. मी त्याची पान चाळायला सुरुवात केली. ते काळे पांढरे फोटो पाहून तर हसूच आलं. पहिलाच फोटो अस्मादिकांचा. फारच खूष झालो. तसा त्या फोटोत अवधा तीन चार वर्षांचा असेन. अबब... केवढे प्रचंड केस होते माझ्या डोक्यावर पाहतच राहिलो.
समोरच्या आरशात स्वत:ला निरखून पाहिलं... नकळत मी माझ्या केसविहीन गुळगुळीत डोक्यावरुन हात फिरविला... चपापलो... लगेचच स्वतःला सावरुन फोटोतल्या माझ्या भरपूर केस असलेल्या डोक्यावरुन हात फिरविला... त्या खुशीतच आनंद मानला व एकामागून एक पुढील फोटो पाहायला सुरुवात केली. एका फोटो मध्ये मी आणि पुष्पा आपआपल्या आईच्या कडेवर बसलेलो होतो. एका फोटोत तर ती आणि मी बाबांच्या स्कुटरवर पुढे उभे... अगदीच रडके, शेंबडे... बापरे... पुन्हा एकदा आरशात पाहिलं. हं, आजारी दिसत होतो हे खरे, पण रडका वगैरे नक्कीच दिसत नव्हतो. आम्ही दोघे जवळ-जवळ सहा सात वर्षाचे होई पर्यंत जमशेदपूरला एकमेकांचे शेजारी होतो. त्यानंतर तिच्या बाबांनी नोकरी बदलली आणि ते कुठेतरी दुर्ग भिर्लइ त्या भागात रहायला गेले. माझी पेठे कुटुंबीयांची आठवण इथपर्यंतच राहिली. आमच्या घरांत मात्र पेठे हा विषय सदैव असायचा.
पुढे दिवस गेले. वर्षे गेली. मी मोठा झालो. पुण्याला इंजिनियरींग कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये राहायला गेलो. पुष्पाला सुद्धा पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन मिळाली आणि ती कुठल्यातरी त्यांच्या नातेवाईंकासोबत रहात असते हे मला आईने सांगितले होते पण ते माझ्या डोक्यातून पूर्णपणे निघून गले होते. एके दिवशी अचानक ती माझ्या समोर येऊन उभी राहिली. तिनेच मला स्वतःची ओळख करुन दिली. तिच्या आईने तिला माझी सगळी माहिती दिली होती. त्यामुळे ती मला शोधत आली होती. त्या वेळेस आमचे थोडेसे संभाषण झाले होते. नंतर तिने तीन-चार वेळा मला भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळेस माझ्यासोबत सीमा असायची. हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने मला भेटणे टाळले.
परंतु माझ्या घरी मात्र सीमा आणि माझ्या मैत्रीची संपूर्ण माहिती पोहचलेली होती. सीमा, श्रीमंत घरची एकुलती एक अत्यंत मॉडर्न मुलगी आहे तिचे वडील पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. श्रीमंतीमुळे तिचे शौक ही श्रीमंती आहेत, तिची आई प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्या नाट्यकलाकार म्हणून खूप प्रसिद्ध होत्या. त्यांचा गूढ मृत्यु झाला होता वगैरे वगैरे अगदी अथ पासून इति पर्यंत संपूर्ण माहिती.
घरी कळाल्यानंतर, सीमाचे सतत माझ्या सोबत असणे आईबाबांना फारसे आवडले नव्हते. मी अतिशय हुशार मुलगा होतो. माझे अभ्यासातून लक्ष उडून जाईल ही त्यांची पहिली काळजी होती. दुसरे म्हणजे आमचे घर मध्यमवर्गीय आणि बाळबोध वळणाचे. संध्याकाळी देवाचा दिवा लावून उदबत्तीच्या मंद, पवित्र सुगंधामध्ये आणि दिव्याच्या वातीच्या शांत उजेडात देवासमोर बसून शुभंकरोती, परवच्या म्हणणारी आम्ही मंडळी. असल्या आमच्या घरांत संध्याकाळी परक्या मुलांसोबत, उग्र अत्तराच्या वासामध्ये, लाईटच्या मंद मादक उजेडात हार्ड ड्रिंक्स घेणारी सीमा हे तर न जुळणारे गणित होते. मला हे सगळे समजत होते. पण ऐन तारुण्यात घरातून मोकाट सुटलेला मी मुलगा होतो. बाहेरच्या रंगीबेरंगी जगाशी झालेली ताजी ताजी ओळख होती त्याची भुरळ पडली आणि ह्या आकर्षक "बॉबकट" असलेल्या, शर्ट पॅन्ट घालून मुलांच्या बरोबरीने उभी राहून गप्पा मारणाऱ्या, हलकंस हार्ड ड्रिंक घेणाऱ्या सीमाकडे आकर्षला गेलो. कॉलेजांत नाटकात आम्ही बरोबरीने अभिनय करत होतो. प्रॅक्टिस निमित्ताने दिवसातला बराच वेळ ओकामेकां सोबत असायचो. ती दिसायला सुंदर होती. तिचा अभिनय उत्कृष्ट होता. तिच्याकडे अनेक प्लस पॉईंट होते. माझा एकच प्लस पॉईंन्ट होता, मी हुशार होतो. अशा अनेक कारणांमुळे आमची घनिष्ट मैत्री जमली होती. पुढे त्या मैत्रीला 'प्रेमप्रकरण' अस गोंडस वळण मिळालं.
शिक्षण पूर्ण झाले. मला चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. एव्हाना आमचं प्रेमप्रकरण तिच्या वडिलांपर्यंत पोहचल होत. ते लवकर लग्न करा अशी घाई करु लागले. माझे आईबाबा ह्या लग्नाला "हो" म्हणणे शक्यच नव्हते. शेवटी आईबाबांच्या मनाविरूद्ध जाऊन, त्यांना काहिही न सांगता मी आणि सीमाने कोर्टात जाऊन विवाह केला. त्या संध्याकाळी तिच्या बाबांनी त्यांच्या क्लब मध्ये दणक्यात पार्टी दिली. भरपूर मंडळी आमंत्रित केलेली होती. फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणून निघाला होता. दारु आणि खाण्यापिण्याची रेलचेल होती. भरपूर रोषणाई असलेल्या हॉलच्या एका कोपऱ्यात वाद्यवृंद मंद मंद वाजत होता. आणि मी मी मात्र त्या माणसांच्या मेळाव्यात सीमा शेजारी उसने हसू तोंडावर आणून एकटाच उभा होतो. सभोवताली फिरणारी माझी नजर आई बाबा, ताई भाऊजी, दादा वहिनी आणि घरातील बच्चे कंपनीला शोधत फिरत होती. त्या क्षणी आपण चुकलो. अक्षम्य गुन्हा केला. ह्याची खोलवर जाणीव झाली. त्या रात्रीला दुसऱ्या दिवशीच्या सकाळची आतुरतेने वाट पहात होतो. सकाळी घरी जाण्याची तीव्र ईच्छा होत होती.....
पण कुठल्या तोंडाने जाणार होतो? माझी मलाच लाज वाटत होती. मला रहावले नाही. दादाला फोन केला आणि सगळे सांगितले. तो एकही शब्द बोलला नही. त्याने फोन ठेवून दिला. काही वेळ मी ही स्तब्ध उभा राहिला होतो.... पण पुढची वाटचाळ तर चालू ठेवायलाच पाहिजे होती.
सर्वसाधारण घरातला मी आणि श्रीमंत व अतिसुधारलेल्या घरातील सीमा अशा आमच्या जोडीच्या संसाराला सुरुवात झाली होती. नव्याचे नऊ दिवस तसे सुरुवातीचे काही महिने सगळे सुरळीत चालू होते. माझी नोकरी, तिचे शॉपींग, संध्याकाळी कुठल्यातरी हॉटेलात डिनर असे दिवस जात होते. हळूहळू ती कंटाळली. मला पण संध्याकाळी घरी आल्यावर घरचे जेवण मिळावे अशी ईच्छा होऊ लागली. ओक दिवशी तिने, आपली नाटकात काम करण्याची ईच्छा बोलून दाखविली नाटकात काम करणे ही तिची आवड होती ती ओका अभिनेत्रीची मुलगी होती. अभिनय हा तिच्या रक्तात होता. तिने स्वत:ला पुन्हा रंगमंचावर अजमायला सुरुवात केली. तिची ती आवड आणि उत्कृष्ट अभिनय पाहून तिच्या वडीलांनी नाटक कंपन्यांना फायनान्स करायला सुरुवात केली.
मग काय विचारता? पुढे येणाऱ्या प्रत्येक नविन नाटकात मूख्य भूमिका सीमाकडेच. बघता बघता वर्तमान पत्रातील जाहीरतींमध्ये, भिंतीवरील जाहीरीतीवर, विजेच्या खाबांवरच्या पोस्टरवर जिकडे-तिकडे फक्त सीमा-सीमा आणि सीमा. सुरुवातीला काही नाटकात मी तिच्याबरोबर तिच्यासोबत राहण्यासाठी कामे केली. पण मला ते फार काही आवडले नाही. तिची मात्र घोडदौड चालू होती. रंगमंचावरुन तिचे सिनेसृष्टितही पदार्पण झाले होते. त्यामुळे पाण्यासारखा पैसा वाहू लागला होता.
खरे तर माझीही नोकरी काही कमी नव्हती. लठ्ठ पगाराची नोकरी होती. पंरतू तिच्या दृष्टिने ती आता ठीक-ठीक राहिली होती. तिला माझ्या पगारातील पैशाची गरज राहिली नव्हती. दोन-तीन वर्षे तिने अभिनय करत संसार सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण वाढत्या प्रसिद्धिमध्ये पाण्यासारख्या वाहणाऱ्या पैशासोबत ती वाहत गेली. संसाराचा बांध कधीच तुटून गेला होता. तो तिच्या लक्षातही आला नव्हता बांधातून जोरात बाहणाऱ्या पाण्याला मी हतबलीत होऊन पहात होतो. तरीही मी सतत तिच्यासोबत रहाण्यासाठी नोकरी करताना रात्रीचे नाटकाचे प्रयोग स्विकारु लागलो. तसा मी कलाकार तर होतोच पण माझ्या रक्तात अभिनय नव्हता त्यामुळे ही कसरत एखाद वर्षभरच करण्यात मी यशस्वी झालो. माझ्या सारख्या मध्यमवर्गीयाला सीमा, तिची ती नाटक, तिचा तो मित्रवर्ग, रात्रीचे घराबाहेर राहणे, दारुच्या पाटर्या, सिगारेटच्या धूरांची वलय हे सर्व वातावरण झेपण्यापलिकडच होत. त्या वातावरणात मी दडपला गेलो. हळू हळू आमच्या मध्ये बऱ्यापैकी भांडण होऊ लागली. ह्या भांडणांना कंटाळून तिने स्वतःसाठी एक फ्लॅट विकत घेतला. रात्री उशीर झाला किंवा दोन पेग जास्त झाले की ती त्या flat मध्ये राहू लागली. आमचा संसार आणि मी दोनही तिच्या पाायतली बेडी झाली होती.
नेमके ह्याच काळात तिचे वडील गले तिच्यावर असलेले उरलेसुरले बंधन ही संपुष्टात आले होते तिच्या दु:खात सहभागी होण्यासाठी दारू आणि तिचा मित्रवर्ग भरपूर होता माझी गरज उरलीच नव्हती. तसाही म्हणा, मी नावापुरताच नवरा होतो.
अचानक, मी आयुष्यातल्या एका विचित्र वळणावर येऊन उभा राहिलो होतो. त्या वळणावरील काटेरी झुडपांचे काटे मला अतिशय वेदना देऊ लागले, डोक्यावरच रखरखणार उन मी सोसू शकत नव्हतो. दूरवर कुठेही आश्रयाला सुद्धा एखाद्या झाडाची सावलीही दृष्टिस पडत नव्हती. माझ्यासाठी हे सगळेच असह्य होत चालले होते. ओका विचित्र कोंडीत मी ओकटाच..... ओकटाच... सापडलो होते अशात दारुच व्यसन कस आणि कधी लागल ते मला कळालच नाही...
ओके दिवशी दारुच्या नशेत असतानाच, अर्धवट भरलेली काचेची दारूची बाटली माझ्या हातातून निसटली व जोरात जमिनीवर आदळली. तिच्या भयंकर कल्ल अशा आवाजाने घराच्या खिडक्यां खिळखिळ आवाज करत हादरल्या...... गुदमरून टाकणारा तो विचित्र वास माझ्या नाकात गेला. नकळत उलटीचा जोरदार हमका आला आणि भडाभडा ओकलो ....... मी घाबरलो...... त्या घाणीत पडून घाण आणी काचा शरीराला लागतील अशी भिती वाटली.... तोल सांभाळण्यासाठी भिंतीचा आधार घेतला....... भिंतीशिवाय आधार देणारे दूसरे कोणी घरात नव्हतेच..... मी आणि मी.... फक्त मी... मी ओकटाच... कसेतरी स्वतःचे शरीर बाजूला असलेल्या सोफ्यावर झोकून दिले आणि त्या घाणीतच झोपून गेलो.
दूसऱ्या दिवशी सकाळी बेलच्या कर्कश आवाजाने जागा झालो. समोरच्या घडयाळात आठ वाजलेले दिसले. नजर खाली जमिनीवर पडली. माझी मलाच लाज वाटली. लाजेने खाली बघतच मी दार उघडले. राजू सकाळच झाडू पोचा आणि इ. काम करायला आला होता. आश्चर्यचकीत होऊन क्षणभर त्याने माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्याला डोळा देण्याची माझे धाडस नव्हते. त्याने मुकाटयाने घाण साफ करायला सुरुवात केली. मी शांतपाणे सोफ्यात बसून पहात होतो. तो काचा गोळा करत होता. त्या काचांच्या आवाजात मला माझ्या आईच्या हळू हळू रडण्याच्या आवाजाचा भास झाला. माझी ही अवस्था पाहून ती दुसरे काय करेल? रडेलच नां? मला वाटल ती मला बोलावती आहे. त्या क्षणी तिच्याजवळ जाऊन तिच्या मांडीत डोक ठेवून धाय मोकलून रडावे असे वाटू लागले... पण... पण मी कसा जाणार होतो?
मी तर तिचा बाबांचा कोणाचाच विचार न करता, त्यांना काहीही न सांगता घर सोडून आला होतो. बराच वेळ विचार केला. ताडकन उठलो आणि बाथरुम मध्ये गेलो अंगाचा घाणेरडा वास गरम गरम पाण्याने स्वच्छ धुवून टाकला. बाथरुमच्या बाहेर आलो. राजू माझी वाट पहात बाथरुमच्या बाहेर उभाच होता. म्हणाला, "दादा मी दिवाळीसाठी घरी जातोय. आठवडाभर येणार नाही. घरी आईबाबा आणि बहिण, भाऊ सगळे आहेत. दिवाळीनंतर येईन." असे सांगून माझ्या उत्तराची वाट ही न पहाता तो निघून गेला. मी स्वतःशीच हसलो. घरी जाण्यासाठी सुट्टी घेताना माझ्या उत्तराची अपेक्षाही न करता निघून जाणाऱ्या राजूच्या वागण्याने माझ्या मध्ये नाविन उर्जा संचारली. ऑफीसात पोहचलो, सुट्टीचा अर्ज केला आणि थेट निघून कोल्हापूरला जाणारी बस गाठली. मी इंजिनियर झालो त्याच वर्षी बाबा रीटायर्ड झाले होते आणि आमच्या जून्या घरी कोल्हापूरला येउन स्थायिक झाले होते. दादा त्या पूर्वीच कोल्हापूरात पोहचला होता तो कॉलेजात प्रोफेसर होता आणि वहीनी शाळेत प्रिन्सीपॉल होती. ताईच सासर- तिथूनच जवळ ८० कि.मी. वर होत ती तीकडेच रहात असते. खरे तर मी पण शिक्षण पूर्ण करुन कोल्हापूरात रहाव अशी बाबांची ईच्छा होती. पाण माझ्या नशिबाने मला पुण्यात आणून सोडलं होत.
बस कोल्हापूरात पोहचली तेव्हा संध्याकाळ होऊ लागली होती. तिनिसांजेला वहिनी तुळशीजवळ दिवा लावत होती आणि माझी रिक्षा दारात जाऊन थांबली. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.
तिने दादाला हांक मारली. क्षणभर मी घाबरलो. मला घरात घेतील की नाही अशी भिती मनाला स्पर्शन गेली. वहिनीचा आवाज ऐकून सगळेजण घराबाहरे आले. मला पाहून त्यांच्या आनंदाला पार राहिला नव्हता. आई पुढे आली तशी मी तिला जवळ घेतली आणि तिच्या आनंदाश्रुत न्हाऊन निघालो. सगळ्यांच्या पाया पडत सगळ्यांसोबत घरात गेलो. आईला तर काय करु काय नको असे झाले होते.
"एकटाच आलास कां रे? सीमा नाही आली कां? " आईने विचारले.
मी उत्तर देणे टाळले. माझे वागणे बाबांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी विषाय बदलला. रात्री सगळ्यांच्या सोबत मांडी घालून बसून जेवलो. वरण-भातावर यथेच्छ ताव मारला. थोडयाफार गप्पा झाल्या आणि सगळे झोपायला गेले. मी पुण्यात येऊन निशाचर झालो होतो. मला झोप येत नव्हती. शेवटी बाहेर अंगणांत जावून बसलो. जवळ-जवळ चार-पांच वर्षानंतर असा ओकटाच, हातात दारुचा ग्लास घेतल्याशिवाय निरभ्र आकाशाखाली, मोकळी हवा अंगावर घेत निवांत बसलो होतो. वाऱ्याची प्रत्येक झुळूक आयुष्यात केलेल्या ओक -अंक चुकीची आठवण ताजी करुन जात होती. आपल्याच विचारात मग्न मी शांत होतो. तितक्यात पाठीवर बाबांचा हाथ पडला. उठून उभा राहिलो, नकळत बाबांना घट्ट मिठी मारुन ओक्याबोक्शी रडत राहिले. बाबा मात्र शांत होते. मी शांत झाल्यावर बाबा म्हणाले, "अजय स्वतःला ओकटा कधी समजू नकोस. ह्या घराची दार तुझ्यासांठी सदैव उघडी आहेत. तुझी आई नेहमीच तुम्हा दोघांची वाट बघत असते. मला कळतय, “हे घर, सीमासाठी खूप लहान आहे ती आली तर आनंदच आहे, पण निदान तू तरी ये जा.
"हो बाबा, हो बाबा म्हणत मी पुन्हा बाबांच्या खांद्यावर डोके ठेवून माझे डोळे पुसले बाबांच्या त्या बोलण्याने खूप धीर आला होता. ह्या नंतर मात्र मी वारंवार घरी जा- ये करु लागलो. दारुला हातात धरली नाही. दारु सोडताना त्रास होत होता पण बहुतेक सुट्टया कोल्हापूरात घरीच असायचो. त्यामुळे ती सवय सुटली होती.
एव्हाना मी, आणि सीमा दोन दिशेला दोघे निघून गेलो होतो. तिने अभिनयामध्ये खूप यश मिळविलेल होत. ती खूपच प्रसिद्ध झाली होती. माझ्या आयुष्याला हरवलेला जुना रस्ता पुन्हा गवसला होता. बरेच वेळा मी कोल्हापुरातच असायचो. आईबाबा किंवा घरचे कोणीच मला माझ्या आयुष्यासंबधी एकही प्रश्न विचारत नव्हते. त्यामुळे मी नव्याने जीवन जगू लागलो होतो. केव्हातरी सीमासोबतचे नात तोडून टाकण्याची तीव्र ईच्छा होत असे. पण संस्कारी घरातून मोठा झालेल्या. मला "घटस्फोट" हा शब्द तितकासा पटत नव्हता.
शिवाय इतक्या वर्षांमध्ये मी माझ्या आणि ती तिच्या life style मध्ये adjust झालेलेच होतो. कागदोपत्री असलेले नात रोजच्या जीवनात कुठेही अडचण होत नव्हते. त्यामुळे "घटस्फोट" हा शब्द मी डोक्यातून काढून टाकलेला होता. झाला इतका नशिबाच खेळ स्विकारून मी पुढे चालण्यास सुरुवात केली होती.
दोन वर्षे सगळे सुरळीत चालले होते. पुणे-नोकरी - कोल्हापूर असे चक्र व्यवस्थित set झाले. अक दिवशी आई आजारी पडली. तिचा ताप जाईचना. हळूहळू ती अशक्त होऊ लागली. ताई, वहिनी तिला डॉ. कडे घेऊन जात होत्या. डॉ. नी पुढची तपास चक्र पूर्ण केली आणि आईला कॅन्सर झाल्याचे निदान केले. त्या रात्री आम्ही सगळेच खूप अस्वस्थ झालो होतो. नशिबाने नविन डाव समोर मांडला होता. फक्त ह्या वेळेस मी ओकटा नव्हतो इतकेच. बाबा तर रिटायर्ड झालेले होते. दादा घर चालवत होता त्याला ओकट्याला इतका मोठा खर्च झेपाणारा नव्हता. माझी परिस्थिती चांगली होती. न बोलता आईच्या ह्या वाईट मुलाने तो खर्च उचलला. तसे पाहिले तर आईच्या दुखण्यात आम्ही प्रत्येकानेच आपली जवाबदारी समजून काम वाटून घेतल्यासारखी काम करायला सुरुवात केली होती. मी आठवडाभर पुण्यात असायचो शुक्रवारी रात्री मात्र आईजवळ. सोमवारी सकाळी परत पुणे हा माझा उपक्रम झाला होता. ते तीन दिवस मात्र मी दादाला पूर्ण सुट्टी देत होतो. मला आठवतयं त्या प्रमाणे मी कोल्हापूरला असताना अकदा पेठे काका आणि काकू आईजवळ दोन दिवस येऊन राहिले होते. त्यावेळेस ह्या पुष्पाचा ओझरता विषय निघाला होता.
दुखण्यामध्ये आईला सीमाला भेटण्याची खूप ईच्छा होती. केवळ आणि केवळ आईसाठी मी सीमाला तसा फोन केला आणि “अकदा तरी ये" अशी कळवळीची विनंती केली. "प्रयत्न करते वेळ मिळाला की येते.” असे छानसे उत्तर तिने दिले परंतू तिला काही वेळ मिळाला नाही. काही महिन्यानंतर आई हे जग सोडून गेली. आमच्या त्या दिवसात तरी निव्वळ माणुसकी म्हणून तरी तिने भेटायला याव अशी माझी अपेक्षा होती परंतू तसे काही घडल नाही. एव्हाना ती प्रसिद्ध सिने अभिनेत्री झाली होती. काही ठिकाणी राजकारणात ही तिच्या नावांचा उल्लेख होऊ लागला होता. अफाट पैसा तिने कमावला होता. त्या पैशामुळे मित्रावळ ही तिच्याजवळ खूप जमा झालेली होती. ती खूप पिऊ लागल्याचेही ऐकीवात आले होते. ह्या सगळ्यातून तिला वेळ मिळणार नाही हे मला माहित असूनही तिच्याकडून काही अपेक्षा करणे ही माझी चूकच होती.
आई पाठोपाठ सहा महिन्यात बाबा पण अचानकच गेले... आणि ये रे माझ्या मागल्या... तसा मी पुन्हा ओकटा झालो. आयुष्याने पुन्हा कलाटणी घेतली. अकटेपणा मी सहन करु शकलो नाही. व्यसन खूप वाईट असत हे माहिती असूनही मी पुन्हा व्यसनी झालो. संध्याकाळी कामावरुन आलो की नित्यनियमाने दोन पेग घेऊ लागलो. दादाने घरी बोलावले तरी कोल्हापूरला जाणे टाळू लागलो. रोज सकाळी उठलो की ठरवायचो आज नाही ध्यायची, पण नाही... स्वत:ला थांबवू शकत नव्हतो...
ओका रात्री असाच थोडासा नशेत असताना सीमाच्या सेक्रेटरीचा फोन आला, "सर सीमा मॅडमने गळफास लावून आत्महत्या केली आहे." क्षणार्धात सगळी नशा उतरली माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. अत्यंत अस्वस्थ झालो. तसा तिचा आणि माझा कित्येक वर्षात तोंडदेखला देखील संबंध राहिलेला नव्हता. द्विधा मनस्थितीत हॉलच्या सोफ्यात येवून बसलो होतो काय करावे? तिच्या घरी जाऊ की नको? शेवटी विचार केला की मी घटस्फोट तर घेतलेला नाही. कागदोपत्री तर मी तिचा नवरा होतो. न रहावून तिच्या घरी पोहचलो, भरपूर गर्दीमध्ये दूरवर मी एकटाच उभा होतो. स भरपूर महत्वाकांक्षी आणि जिद्दी स्वभावाची सीमा आत्महत्या करते हे माझ मन मानायला तयार नव्हत. कोणाला विचारावे ह्या विचाराने पुढे सरकलो तोच खिशातला फोन वाजला. दादा बोलू लागला, "अजय तिथे अजिबात जाऊ नकोस. ह्या प्रकरणापासून दूर रहा. कुठल्याही भानगडीत अडकू नकोस.
"हो दादा नक्की मी दूर राहीन. पण मी already तिच्या इथे पोहचलो आहे आणि गर्दीत दूरवर उभा आहे.” इतके म्हणून मी फोन ठेवून दिला आणि कोणाला तरी विचारुया हा मनातला विचार दूरवर फेकून दिला.
माझ्या पाठीला पाठ लावून तिची काही मित्रावळ उभी होती. त्यातल्या काहींना मी ओळखत होतो सुदैवाने त्यांनी मला ओळखले नव्हते. ते आपआपसात बोलत होते त्यावरुन सीमाची कोणा ओका रईस राजकरण्यासोबत गेली काही वर्षापासून मैत्री होती. त्याने तिला राजकारणात सन्मानीय स्थान मिळवून देण्याची लालूच दाखविली होती. तिच्यासोबत प्रेमाचे नाटक ही चालू ठेवून तिचा पैसा लुटुन घेतला होता आणि तिचे शरीर ओरबडून घेतले होते. ती कंगाल झाली होती. विद्रूप झाली होती. हे जसे तिच्या लक्षात आले तसे तिने त्याच्याकडे तिचे पैसे परत मागायला सुरुवात केली होती. आत्महत्येच्या आधल्या रात्री "तिचे आणि त्या" माणसाचे खूप मोठे भांडण झाले होते म्हणे. तो माणूस पहाटेसच तिच्या घरुन गेला होता असेही लोक म्हणत होती आणि दूपारी ही अशी पंख्याला लटकलेली मिळाली होती. त्यामूळे तिची आत्महत्या ही संशयास्पदच होती. मुख्य म्हणजे त्या रईस राजकारणी माणसाच्या नावाचा उल्लेख मात्र कोणी करायला धजत नव्हते. हा सगळा प्रकार ऐकून आणि पाहून जिवाला अतीव वेदना होत होत्या. परमेश्वराने तिला सगळे भरपूर दिले होते. पैसा रुप कला कुटूंब, कसलीही उणीव त्याने ठेवली नव्हती परंतू अतिमहत्वाकांक्षी सीमाने स्वतःच्या हाताने स्वत: सगळे घालवले होते. इतकेच नाहीतर भरपूर मित्रांचा आणि नातेवाईकांना गोतावळा असलेल्या सीमाला अग्नि देण्यासाठीही कोणी पुढे येईना. तिला बेवारशी म्हणून कुठलातरी तिथला कर्मचारी अग्नि देईल हे माझ्याकडून पहावले गले नाही. शेवटी मी पुढे गेलो. फक्त एका कागदोपत्री नवऱ्याचे नाते असलेल्या मी, केवळ माणुसकीच्या नात्याने माझ्या बेईमान पत्नीचा अंतिमविधी उरकून घरी परतलो होतो.
घरी पोहचलो तर ताई आणी भाऊजी घरी पोहचलेल होते. काही वेळानंतर दादा आणि वहीनीही येऊन घडकले. माझी अवस्था पाहून दोन दिवस माझ्यासोबत राहून ताई, भाऊजी आणि वहिनी घरी परतले. घरी मुल ओकटीच होती. दादा मात्र आठवडाभर माझ्या सोबत राहिला व पुन्हा मला घरी घेवून गेला. मी दोन महिन्याची “Sick leave" घेतली होती. घरी दादा - वहिनीनी मला ओकटयाला अजिबात सोडले नाही. मला आईबाबांची उणीव अजिबात भासून दिली नव्हती मी पुढे आणखीन दोन महिने सुट्टी वाढवली आणि जवळ जवळ चार महिने त्यांच्याजवळ राहिलो होतो.
ह्या काळात पुन्हा ओकदा स्वतःला दारूमधून सोडवून घेतले. कारण दारूच्या आहारी गेलेल्या सीमाची झालेली दयनीय परिस्थितीचे उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होते. दारू सोडली खरी, पण तो पर्यंत दारूने माझे करायचे ते नुकसान करुन ठेवले होते. माझी लिव्हर काहीशा प्रमाणात दुर्बळ झाली. पथ्यपाणी सांभाळणे गरजेचे झाले होते. काही महिन्यातच नोकरी सोडून दिली. रंगभूमीवरील काही कलाकारांसोबत मैत्री होती. विरंगुळा म्हणून त्यांच्या ओळखीने दूरदर्शनच्या मालिकांमध्ये छोटया-मोठया भूमिका स्विकारायला सुरुवात केली. माझे पथ्यपाणी सांभाळण्यासाठी दादा-वहिनी ताई आळीपाळीने माझ्याजवळ येवून राहू लागले. सदा तर असायचाच. स्वयंपाकवाल्या मावशींना वहिनीने सगळे शिकवून ठेवले होते. मी स्वत:ला खूप सावरले होते. दिवसातून २-३ तास शूटिंग करुन घरी येत होतो. थोडासा विरंगुळा ही होत असे. नशिबाने पुन्हा नवीन वळण घेतले. माझ्या भूमिका रसिकांना आवडत गेल्या आणि लवकरच माझी अभिनेता म्हणून नविन ओळख जगासमोर आली. कामाचा व्याप वाढू लागला पथ्यपाण्याकडे थोडे दूर्लक्ष होऊ लागले. अशक्त होऊ लागलो. आणि अलिकडेच नेमकी काविळ झाली. तब्येत खूपच खालावली होती दारू पिणे पूर्णपणे सोडून दिले होते. तरीही लोक मला बहुतेक दारुडाच समजत असावेत म्हणूनच त्या शेंबडया पुष्पाने, “दारु पिऊ नकोस" असा जोरात दम भरला असावा. पुष्पाच्या बोलण्याचा विचार करत होतो.
बाजूच्या भिंतीवर असलेल्या आई-बाबांच्या फोटोकडे पाहून गालातल्या गालात हसलो. आईची खूप आठवण आली. सीमासोबत मी लग्न करु नये असे तिने मला सोंगण्याचा खूप प्रयत्न केला होता. "अजय ती मोठया घरातली मुलगी आहे. तिच्यापासून थोडा दूरच रहा. तिला आपल घर, कदाचित उद्या, तु सुद्धा तिच्यापेक्षा लहान, गरीब वाटू लागशील. ह्या वयात चारचौघात व्यसन करणाऱ्या मुली संसार करु शकत नाहीत. त्यांच्याबरोबर आयुष्य निघत नाही. आपल्या सारख्या परिस्थितीमध्ये, संस्कारात वाढलेल्या तुला आवडणाऱ्या कुठल्याही मुलीसोबत तू लग्न कर. मी आणि बाबा तुझ्यामध्ये अजिबात येणार नाही. पण हा नाकापेक्षा मोठा मोती आपल्या नाकाला घेऊन गळून पडेल रे." ती कळवळीने सांगायची पण नाही. मी नाही औकले. हसण्यावरी नेले आणि स्वतःच्या आयुष्याच हसू करून घेतले, धुळधाण करुन घेतली आणि ज्या वयात पत्नी-मुलांसोबत असणे गरजेचे असते त्या वयात ओकटा पडलो आहे. त्याची खोलवर जाणीव झाली. नकळत डोळे भरुन आले.
दावारची बेल वाजली. दूधवाल्याची वेळ होती. सदाने दार उघडले. “दादा दूधवाला नाही आला, ताई आणि भाऊजी आले आहेत." ऐकून मी खूष झालो. आज तरी ओकटा राहणारी नाही ह्याचा आनंद झाला. पाठोपाठ दादा-वहिनी मूले सगळीजण आली माझ्या आनंदाला पार नव्हता राहिला. त्यांच्या पाठोपाठ पुष्पा ..... हातात ओक छोटीशी बॅग घेऊन.... तिच्या बॅगेचा पट्टा तिच्या चपलेत अडकला. ती अडखळली. वहिनीने तिला हात देऊन घरात आणले.... मी पहातच राहिलो. दादाने हसून मान हलविली.... पुष्पा केवढी वेगळी दिसायला लागली होती क्षणभर नकळत माझी नजर तिच्यावर स्थिरावली.
“अजय, ही पुष्पा आता शेंबडी नाही राहिली हं." ताई म्हणाली.
"खरच ग बाई केवढी बदलली आहे. म्हणूनच पहातोय."
'आता पहातच रहा हं भाऊजी" असे म्हणून वहिनी हसली. मी दादाकडे पाहू लागलो. पुष्पा मात्र लाजली..... आणखीत एक..... नविन वळण.
-सौ. वैजयंती गुप्ते
गांधीनगर - गुजरात
February 24, 2023

“आपण बसा ना ! माझी मावशी थोड्याच वेळात खाली येईल.
आपलं नांव नानासाहेब नाफडे म्हणालात ना !”
मावशींची पंधरा वर्षांची नटखट भाची बंगल्यात नुकताच प्रवेश केलेल्या पाहुण्यांना म्हणाली.
ती पुढे म्हणाली, “तोपर्यंत मी आहे ना तुमच्याशी बोलायला. चालेल ना !”
थोड्याच वेळांत तिची मावशी खाली येणार आहे हे लक्षात घेऊन पण ह्या क्षणी त्या भाचीला खूष करता येईल असे काय बोलावे, याचा विचार नाना नाफडे करत होते.
त्यांच्या मनांत एक दुसराही विचार येत होता.
ते इथे खास विश्रांतीसाठी आले होते.
अशा अपरिचित लोकांना भेटून विश्रांतीने बरे होण्याचा उद्देश साध्य होईल कां ?
अशी शंका त्यांच्या मनांत डोकावत होती.
मुंबईत अनेक डाॅक्टर्स आपल्या रूग्णांना तेव्हां बरं होण्यासाठी विश्रांती घ्यायला सांगत.
ते म्हणत, “तुमच्या नर्व्हजवर खूप ताण आहे.
तो फक्त शांत जागी विश्रांती घेऊनच कमी होईल.”
ही पध्दत त्यांनी अर्थातच ब्रिटीशांकडून उचलली होती.
विश्रांती घ्यायला खंडाळा, लोणावळा, पांचगणी, महाबळेश्वर ह्यांतलं एखादं ठिकाणही सुचवीत.
नानासाहेब नाफडे इथे यायला निघाले, तेव्हां त्यांची थोरली बहिण त्यांना म्हणाली, “मला माहित आहे की पांचगणीसारख्या ठिकाणी तुला स्वतःला स्वतःशीच बोलायची वेळ येईल कारण तिथे दुसरा कोणी भेटणंही कठीण आहे आणि एकटेपणामुळे तुझ्या मनावर आणखीच ताण येईल.
मी तुला तिथे रहाणाऱ्या कांही ओळखीच्या व्यक्तींना पत्रे लिहून देते.
माझ्या आठवणींप्रमाणे ज्या व्यक्तींचा अनुभव मला चांगला आला अशाच व्यक्तींना पत्रे लिहिन मी.”
नाना नाफडे मनांत विचार करत होते की ज्या श्रीमती वसुंधरा पंडित यांच्या नावे बहिणीने पत्र दिले होते, त्यांच कुटुंब व विशेषत: स्वतः श्रीमती वसुंधरा पंडित चांगल्या लोकांत मोडत होत्या की विरूध्द बाजूच्या होत्या
तेवढ्यात बराच वेळ आपण कांहीच बोललो नाही, हे शिष्टाचाराला धरून नाही असे वाटून वसुंधराबाईंच्या भाचीने विचारले, “तुम्ही इथल्या बऱ्याच रहिवाशांना ओळखत असाल ना !”
नाना नाफडे म्हणाले, “तसं मी स्वतः नाही ओळखत कुणाला पण माझ्या बहिणीने कांही लोकांना उद्देशून पत्रे लिहून दिलीत.
हळू हळू होईल ओळख.”
हे बोलतांना त्यांना मनांत थोडा विषाद वाटत होता आणि बहिणीकडून ही पत्रे घेतली त्याचा पश्चात्तापही.
ती नटखट तरूणी म्हणाली, “म्हणजे तुम्हाला माझ्या मावशीबद्दल कांहीही ठाऊक नसणार तर !”
“मला फक्त तिचे नांव आणि पत्ता माहित आहे.” पाहुण्यांनी कबुल केले.
नाना नाफडे विचार करत होते ह्या श्रीमती पंडित सधवा होत्या की विधवा ?
दिवाणखान्याच्या रचनेवरून तो एखाद्या पुरूषाच्या आवडीप्रमाणे सजवलेला होता.
“मावशीच्या आयुष्यांतली भयानक शोकांतिका बरोबर तीन वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला तिच्या आयुष्यात घडली.
बहुदा तुमची बहिण इथे येऊन गेली त्यानंतर लगेचच.” ती मुलगी म्हणाली.
“त्यांची शोकांतिका ?” नाना नाफडेंनी विचारलं.
ह्या शांत सुंदर गांवात शोकांतिका घडणं त्यांना स्वाभाविक वाटलं नाही.
“तुम्ही बसला आहात त्याच्या बरोबर समोर एक मोठी फ्रेंच विंडो दिसत्येय.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या अशा हवेत आम्ही ती खिडकी पूर्ण उघडून कां ठेवली असेल ?”
एका मोठ्या खिडकीकडे बोट दाखवत ती भाची म्हणाली.
प्रवेशद्वार त्यांच्या उजव्या हाताला होतं आणि ती प्रचंड खिडकी समोरच होती.
तिची खालची बाजू जमिनीपासून दीड फूटांवरच होती आणि समोर नीट गवत कापून केलेले छोटे अंगण (Lawn) दिसत होते.
“ह्या ऋतुमधे ह्या गांवी सध्या हवा थोडी विचित्र आहे पण त्या खिडकीचा आणि त्या शोकांतिकेचा कांही संबंध आहे ?” नानासाहेबांनी तिला विचारले.
ती तरूणी म्हणाली, “तीन वर्षांपूर्वी ह्या खिडकीतून मावशीचे यजमान आणि तिचे दोन धाकटे भाऊ हातात बंदुका घेऊन नेहमीप्रमाणे शिकारीसाठी बाहेर पडले.
ते कधीच परत आले नाहीत.
त्यांना आवडणाऱ्या पक्षांच्या शिकारीसाठी योग्य जागेच्या दिशेने जात असतांना ते अचानक दलदलीत रुतले.
थोड्याच अवधीत ते तिघेही दलदलीत आंत नाहीसे झाले.
त्या वर्षी अवकाळी पाऊस जास्त झाल्यामुळे अशी दलदल बऱ्याच ठिकाणी झाली होती.
त्यामुळे एऱ्हवी सुरक्षित वाटणाऱ्या जागा अचानक दगा देत होत्या.
त्यांचे देहही सांपडले नाहीत.
ही त्यांतली भयानक गोष्ट होती.”
हे सांगताना एऱ्हवी धिटाईने बोलणाऱ्या त्या तरूणीचा आवाज हळवा आणि कातर झाला होता.
ती पुढे सांगू लागली, “माझ्या बिचाऱ्या मावशीला अजूनही वाटतं की ते तिघे कधी तरी परत येतील व त्यांच्याचबरोबर गेलेल्या स्पॅनिएल जातीच्या कुत्र्यासह नेहमीच्या संवयीप्रमाणे त्या समोरच्या खिडकीतून आत येतील.
म्हणून खिडकी अगदी काळोख होईपर्यंत उघडी ठेवलेली असते.
बिचारी माझी मावशी पुन्हा पुन्हा ते कसे बाहेर गेले, तिच्या यजमानांनी कसा पांढरा रेनकोट खांद्यावर घेतला होता, तिचा धाकटा भाऊ राजन कसे “अंधार कां पसरला चहूंकडे” हे गाणे म्हणवून तिला चिडवत होता.
मावशीला ते गाणं आवडत नसे, ते तिला उदास करत असे.
तुम्हांला माझ्या मनातलं सांगू ? अशा शांत संध्याकाळी माझ्या मनांत भयानक विचार येतो की ते सगळे खरंच तर त्या खिडकींतून आंत येणार नाहीत ना !” बोलतांना तिच्या अंगावर शहारे आले असावेत आणि ती थांबली.
जेव्हां श्रीमती वसुंधरा पंडित बाहेर यायला उशीर लागल्याबद्दल पाहुण्यांची क्षमायाचना करत बाहेर दिवाणखान्यात आल्या, तेव्हा नाना नाफडेंना हायसं वाटलं.
त्या म्हणाल्या, “मला वाटते आमच्या सुनिताने तुमची चांगली करमणूक केली असेल ना !”
नाना नाफडे म्हणाले, “तिचं बोलणं खूपच मन वेधून घेणारं होतं.”
श्रीमती पंडितनी चटकन त्यांना विचारलं, “आणि हो, ही समोरची मोठी खिडकी उघडी आहे त्याचा तुम्हाला कांही त्रास वाटत नाही ना !
माझे यजमान आणि भाऊ शिकार आटोपून परतले की नेहमी तिथूनच प्रवेश करतात.
आज ते दलदलीतील पक्षी मारण्यासाठी गेलेत.
येतील तेव्हा त्यांचे बूट वगैरे इतके खराब असतील की माझी कार्पेट खराब करून टाकतील.
तुम्ही सर्व पुरूष ह्या बाबतीत सारखेच ! होय की नाही ? “
श्रीमती पंडित उत्साहाने बडबडत होत्या.
शिकारीविषयी, मारायला पक्षी कमी झाल्याबद्दल, सध्याच्या हंगामात बदके मिळण्याबद्दल, इ. वर अधिकारवाणीने कांही सांगत होत्या.
नाना नाफडेंना मात्र ते सर्व भयानक वाटत होतं.
ते अधूनमधून तिची गाडी दुसऱ्या एखाद्या विषयाकडे वळवायचा प्रयत्न करत होते पण त्यांत फारसं यश येत नव्हतं.
त्यांना दिसत होतं की तिला त्याच विषयावर बोलायचं होतं आणि तिची नजर बरेचदा समोरच्या खिडकीतून दूरवर पहायचा प्रयत्न करत होती.
नाना नाफडेनी भेटीसाठी आजचाच, तिच्या शोकांतिकेला तीन वर्ष पूर्ण करणारा, दिवस निवडावा, हे त्यांना त्यांच दुर्दैव वाटत होतं.
ते म्हणाले, “दोन तीन डॉक्टरांनी मला पूर्ण विश्रांती घ्यायला आणि मेंदूवर कोणताही ताण येणार नाही याची काळजी घ्यायला सांगितले आहे.
तसेच जास्त थकवा येईल असे शारिरीक कामही टाळायला सांगितले आहे.”
अनेक लोकांचा जसा समज आहे तसं त्यांनाही मनातून वाटत होतं की ऐकणाऱ्यांना दुसऱ्या व्यक्तीचे आजार व त्यावरील औषध ह्याबद्दलच्या गोष्टी ऐकायला क्वचितच उत्सुक असतात.
तरीही ते पुढे म्हणाले, “परंतु खाण्याचं पथ्य मी काय पाळावं, ह्या बाबतीत मात्र डॉक्टरांच एकमत नाही.”
ऐनवेळेस येऊ घातलेली जांभई दाबून श्रीमती पंडित अचानक उत्साहाने बोलू लागल्या.
मात्र ते बोलणं नाना नाफडेंच्या आजाराबद्दल नव्हतं.
त्या म्हणाल्या, “ते पहा, ते आले एकदाचे.
बरोबर चहाच्या वेळी आले आणि चिखल अगदी त्यांच्या डोळ्यांपर्यंत लागलेला दिसतोय.”
नाना नाफडेंच अंग भितीने किंचित थरथरू लागलं आणि ते भाचीकडे वळले व नजरेतून तिला सहानुभूती दर्शवू लागले.
ती मुलगी खिडकींतून बाहेर पहात होती आणि तिच्या नजरेत आश्चर्ययुक्त भीती दाटून आली होती.
एकाएकी धक्का बसल्याप्रमाणे नाना नाफडे खुर्चीत बसूनच गर्रकन खिडकीकडे वळले व बाहेर त्याच दिशेला पाहू लागले.
संध्याकाळनंतरचा काळोख दाट होत होता आणि तीन व्यक्ती त्या पटांगणातून खिडकीकडे येत होत्या.
तिघांच्याही खांद्याला बंदुका अडकवलेल्या होत्या आणि एकाच्या खांद्यावर पांढरा रेनकोट होता.
एक थकलेला स्पॅनिएल कुत्रा त्यांच्याबरोबरच चालत येत होता.
आवाज न करता तिघेही घराच्या जवळ आले आणि मग त्यांतला एक तरूण गाण्याची ओळ गाऊ लागला, “अंधार कां पसरला चहूंकडे“.
नाना नाफडेंनी आपली काढून ठेवलेली टोपी पटकन घातली, बाजूलाच ठेवलेली हातातली कांठी उचलून घेतली आणि मग अशा वेगाने पळत ते मुख्य रस्त्यावर आले की त्यांना दिवाणखान्याचं प्रवेशद्वार, बंगल्याकडे येणारा रस्ता आणि बंगल्याचे फाटक नुसते नजरेखालून गेल्यासारखे भासले.
तिथूनच जाणाऱ्या सायकलस्वाराने ब्रेक दाबल्यामुळे होऊ घातलेला अपघात टाळला.
“आलो बरं कां बाईसाहेब.” खिडकींतून आत येत पांढरा कोट खांद्यावर घेतलेला गृहस्थ पंडित बाईंना म्हणाला.
“वाटेत मधेमधे चिखल होता पण बहुतेक वाट सुकी होती.
काय ग ! आम्ही आत येतांना दिवाणखान्यांतून पळून जाणारी व्यक्ती कोण होती ?”
“एक अगदी वेगळा आणि विचित्रच इसम होता, नाना नाफडे नांवाचा.”
बाईसाहेबांनी खुलासा केला. “तो फक्त त्याच्या आजाराबद्दल बोलत होता आणि निरोपाचा एक शब्द किंवा अचानक जावं लागतंय म्हणून माफी वगैरे कांही न मागताच तो तुम्ही येताच पळाला.
कुणाला वाटेल की त्याला इथे भुत दिसले.”
भाची शांतपणे म्हणाली, “मला वाटते की ह्या स्पॅनिएल कुत्र्यामुळे ते पळाले.
ते मला म्हणाले होते की त्यांना कुत्र्यांची खूप भीती वाटते.
एकदा नदीकिनारी एक गावठी कुत्र्यांची झुंडच त्यांच्या मागे लागली होती.
शेवटी त्यांना जवळच्या ख्रिश्चन स्मशानांत खणलेल्या एका खड्ड्याचा आश्रय रात्रीसाठी घ्यावा लागला होता आणि ते सर्व गांवठी कुत्रे वरून भुंकत होते.
अशा प्रसंगामुळे एखाद्याच्या मनांत कुत्र्यांबद्दल कायम भीती बसली तर त्यांत काय नवल ?”
सुनिताने कांही सत्त्य बोलण्याचं व्रत घेतलं नव्हत; ऐन वेळी रोमांचक कथा रचणं आणि त्या खऱ्या वाटतील अशा पध्दतीने सांगण, ही त्या मुलीची खासियत होती.
शिकारीहून परतणा-या पंडित बाईंचे यजमान आणि भाऊ ह्यांना ते भूतच समजले व “य: पलायते, स जीवते”, हे धोरण अवलंबून ते तिथून धांवण्याचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडत जे पळाले, ते आपल्या पाचगणीतल्या तात्पुरत्या मुक्कामावर म्हणजेच एका चांगल्या लॉजवर आले.
अशोक लॉज कांही फार मोठा नव्हता.
एका बंगल्याचे चार भाग करून चारजणांना देत असत.
ॲाफीस आऊटहाऊसमधे होतं.
नाना नाफडेंनी त्यांतले चांगले दोन भाग स्वत:ला आरामांत रहाता यावं म्हणून घेतले होते.
त्यांनी त्या जागेचं चांगलं महिनाभराच भाडं आगाऊ भरलं होतं.
ते अशोक लॉजपर्यंत जरा वेग कमी करून पण धांवतच आले.
कधी एकदा लॉजवर पोहोचतोय असं त्यांना झालं होतं.
तरीही जेव्हा ते लॉजवर पोहोचले तेव्हा ते सरळ आपल्या खोलीत गेले नाहीत.
ते ॲाफीसमधे गेले.
ॲाफीसमधे तेव्हा मॅनेजर नव्हता.
तो जेवायला घरी गेला होता.
तिथे शिरपा बसलेला होता.
शिरपा लॉजमधे केअरटेकर ते हमाल अशी अनेक प्रकारची कामे करत असे.
नाना नाफडे ॲाफिसमधल्या सोफ्यावर धपापत्या उरानिशी बसले.
शिरपाने विचारलं, “सायेब, काय वाघ वगैरे मागे लागला काय? कधीमंदी गावात येतो एखादा वाघ.”
नाना नाफडे म्हणाले, “नाही रे बाबा, वाघ नाही. वाघाला काय मी घाबरतो काय?” लॉजवर पोचल्यावर नानांना तरतरी येऊ लागली होती.
“मंग काय झालं म्हणायचं?” शिरप्याने प्रश्न केला.
नाना म्हणाले, “भूत दिसलं बाबा भूत. माझ्या ह्या डोळ्यांनी पाहिलं मी.”
भूत म्हणजे शिरपाचा खूपच आवडता विषय.
साहेबांसाठी बियरचा ग्लास भरत तो म्हणाला, “भूत दिसलं! आसलं, आसलं! हिथ लई भूताटकीचे वाडे आहेत. ते त्या पारशाचं दिसलं की काय?”
बियरचे घुटके घेत नाना नाफडे म्हणाले, “नाही, अरे अख्खी भुतावळ दिसली मी कसा सुटलो तिथून, माझं मलाच माहित?”
शिरप्याच कुतुहल वाढलं, “आख्खी भुतावळ, म्हणजे किती?”
नाना म्हणाले, “पांच दिसली, पाच!”
शिरप्याने आश्चर्य व्यक्त करत म्हटलं, “अगागागा! पावनं सुटलात तुम्ही.”
नाना म्हणाले, “सुटलो म्हणजे काय! अरे पहिल्या दोन भुतांशी तर मी त्यांना जिवंत माणसं समजून त्यांच्याशी मस्त गप्पा मारल्या. ती दोन भुतेच सारखी मला आणखी तीन भुतं येणार आहेत, असं सांगत होती. थोड्या वेळाने ती तीन भुत खरंच आली.” नाना नाफडेंनी बियरचा ग्लास रिकामा करून खाली ठेवला.
शिरपा म्हणाला, “सायेब, तुम्ही त्यांचे पाय बघून ओळखलं कां?”
नाना नाफडे मान हलवत म्हणाले, “हो रे शिरपा! ती भुत खिडकीतून आत आली खिडकी वर त्यांनी एकेक पाय ठेवला तर तीनही पाय उलटे. मग मी त्या पहिल्या भुतांकडे पाहिलं तर त्यांचे पण पाय उलटे.”
ती तीन भुतं आत यायच्या आधीच मी तिथून पळालो. ती तीन भुतं अशी काळोखात अचानक दिसायला लागली. ती तीनही भयानक होती. अंगाला चिखल आणि राख फांसली होती त्यांनी. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या पण वेगळ्याच होत्या.”
ती मुलगी काही तरी खाणाखुणा करत होती. बहुदा मला कसं खायचं ते सांगत होती.”
शिरपाने विचारलं, “हा कोणाचा बंगला म्हणायचा?”
नाना नाफडे तोंड वांकड करत म्हणाले, “मी ‘लॉंग शॅडो’ हे बंगल्याचं विचित्र नाव ऐकूनच जायला नको होतं तिथे. तो माळाच्या टोकाला आहे तो! आता पंडितांना शोधत मी तिथे गेलो होतो.”
शिरपा म्हणाला, “सायेब, कुठले पंडित! अहो, इथे गो-या सायबांची भूतं खूप!”
शिरपा हाताची बोटं मोजत म्हणाला, “हा आठवा बंगला भूतांचा!”
नाना म्हणाले. “आठवा! मी चाललो बाबा मुंबईला! उद्या सकाळीच.”
शिरपा म्हणाला, “अहो, तुम्ही महिन्याचं भाडं भरलंय!”
नाना नाफडे म्हणाले, “माझी विश्रांती झाली आणि आजच्या धांवण्याने नर्व्हज पण ठीक झाल्या असाव्यात. आता बास्स!”
नाना नाफडे ठरवल्याप्रमाणे दुस-या दिवशी सकाळी मुंबईला निघून गेले. संध्याकाळपर्यंत शिरपाने कमीत कमी पंधरा-सोळा बंगल्यांच्या केअरटेकर्सना आणि तेवढ्याच प्रवाशांना लोंग शेडोतल्या भूतांच्या विविध कहाण्या ऐकवल्या.
त्या पसरत गेल्या.
पंडितांच्या कानावर नाही आल्या पण सर्वत्र झाल्या.
सहा महिन्यांनी पंडित कुटुंब पुण्याला रहायला गेले.
आणखी सहा महिन्यांनी पंडितांनी पांचगणीचा तो बंगला विकायचा ठरवले.
पुण्याचा एक दलाल त्यांच्या घरी आला होता. त्याने पांचगणीतल्या मित्राशी संपर्क साधला होता.
तो दलाल आला तेव्हां भाची सुनिता तिथेच होती.
तो पंडितांना म्हणाला, “साहेब, तुमचा बंगला विकला जाणं कठीण आहे.”
पंडित आश्चर्याने म्हणाले, “कां? इतका सुंदर बंगला!”
सुनिता म्हणाली, “हो, तिथे किती छान छान कल्पना सुचतात.”
तो दलाल तिच्याकडे, विशेषत: तिच्या पायांकडे पहात चांचरत म्हणाला, “माफ करा, पंडितसाहेब पण तो बंगला पांचगणीत भुताचा बंगला म्हणून ओळखला जाऊ लागलाय. बंगल्याच्या दिवाणखान्याच्या खोलीतल्या बंद खिडकींतून आंत बाहेर करणारं, एका पंधरा-सोळा वर्षांच्या
गो-या मुलीचे भूत पाहिल्याचे अनेकजण शपथेवर सांगताहेत."
सुनिताचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता.
-- अरविंद खानोलकर.
मूळ कथा - द ओपन विंडो.
मूळ लेखक - साकी (एच. एच. मन्रो १८७०-१९१६)
August 3, 2022
१९६४ च्या “शगुन ” मधील खय्याम ने संगीतबद्ध केलेलं हे गीत त्याच्या पत्नीने (जगजीत कौर ने) गायलेलं ! गीतकार- हिंदीतला आजवरचा ऑल टाइम ग्रेट – साहीर ! (त्याच्या नंतर गुलज़ार , मग जावेद , मग निदा फाजलीं – ही माझी यादी )
May 9, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti