(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतीय संतांचे योगदान

    भारत भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते डॉक्टर स्नेहल तावरे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात संतांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे संतांचे योगदान आणि संत साहित्याची समीक्षा या डॉक्टर नीला पांढरे यांच्या लेखाने या पुस्तकाचा प्रारंभ होतो

      October 29, 2023


  • कृष्णाच्या बाळक्रांडा

    एकदा यशोदेने त्याला नीट न्हाऊ घातले, अंगात कपडे घालून ओव्या गात
    दह्यादुधाच्या गाड्याखाली त्याला पाळण्यात निजविले, आणि आपण कामाला
    गेली. इकडे कृष्ण जागा होऊन वर पाय करून नाचू लागला, आणि पायांनी
    सबंध गाडाचा गाडा उलथून पाडला!

      November 15, 2025


  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २५)

    साहित्यिक सहवासाचे जे जे प्रसंग आहेत ते सर्वच लिहायला हवेत असे मनापासून वाटते. पण खूप मर्यादा पडतात आणी जसे आठवते तसे लिहिलेही जाते. कधी कधी द्विरुक्तीही होत असते. पण अशा ओघवत्या लिखाणात ते लगेच टाळता येत नाही.

      June 18, 2021


  • लताचे पराभव !

    ७०हून अधिक वर्षे सुरांचे आभाळ समर्थपणे पेलणारी लता ! अनेक सहगायकांबरोबर ती गायली आहे. तिची उंची आता सर्वमान्य झालीय. संगीत क्षेत्राचे वादातीत नेतृत्व तिच्याकडे आहे. अशी गायिका पुन्हा होणे नाही. खुद्द भालजी पेंढारकरांनी तिचे वर्णन ” कृष्णाची हरवलेली बासरी ” असे केले आहे. आनंदघन या टोपणनावानें तिने काही चित्रपटांना दिलेलं संगीत अनुभूतीपलीकडचे आहे. तरीही मी वरील शीर्षक वापरतोय.

      February 7, 2022


  • चिमणचा दाणा

    एक दिवस एका चिमणीला शेतात एक मटारचा दाणा सापडला. तिने तो चोचीत उचलला आणि खूप आनंदीत झाली. आता याने नक्कीच पोट भरेल.

    मग तिने विचार केला की देवाने माझ्यावर इतकी कृपा केली आहे तेव्हा खाण्याच्या आधी देवाची पूजा करावी. ती आंघोळीसाठी पवित्र नदीकडे जाऊ लागली. पण प्रश्न होता की हा मटारचा दाणा कुठे लपवावा. जर जमिनीवर ठेवला तर मुंग्या खाऊन टाकतील. किंवा पक्षी उचलून घेऊन जाईल. तिने तो दाणा एका पुलावर ठेवला तेथे एक सुतार काम करीत होता. ती त्याला म्हणाली, “भाऊ, जरायाच्याकडे लक्ष्य ठेव.”

      October 22, 2025


  • वरची खोली (कथा)

    मी एका बांधकाम कंपनीच्या भल्यामोठ्या कार्यक्षेत्रात नोकरी करणारा एक सामान्य  इंजिनियर होतो , आमच्या कंपनीला या गावाच्या जवळून जाणाऱ्या महामार्गाचे काम मिळाले आणि , या कामाची बातमी स्टाफ मध्ये पसरली …मी पण  साहेबांच्या मागे लागून .नव्हे अगदी हट्ट करून  प्रोजेक्ट करणाऱ्या टीम मध्ये मी  माझा समावेश करून घेतला महिन्यापूर्वी या  साईटवर आलो.

      February 5, 2026


  • बलात्कार

    बलात्काराच्या बातम्या हल्ली कानी पडतात वारंवार ...

    पुरुषात आजही दडलाय लांडगा हे सिद्ध होतंय वारंवार ...

    पुरुषातील पुरुषत्वच घेतोय बळी राक्षसासारखा स्त्रीचा वारंवार ...

    पुरुष असल्याची लाजही वाटते वाचून बातम्या बलात्काराच्या वारंवार ...

    हातही शिवशिवतात घेण्यास घोट बलात्कारी पुरुषांच्या नरडीचा वारंवार ...

    स्त्रियांनीच का उभा चिरू नये अशा बलात्कारी पुरुषास असेही वाटते वारंवार ...

    स्त्री - पुरुष समानतेच्या काळातही स्त्रीच ठरतेय पुरुषाच्या वासनेचा बळी वारंवार ...

    स्त्रियांच्या शीलाच रक्षण करण्यानेच पुरुषातील पुरुषत्व सिद्ध होत हे कोण सांगणार या षंड पुरुषांना वारंवार ...

    -- निलेश बामणे

      April 21, 2013


  • अतर्क्य

    राधिकाला या नवीन जागेत येऊन आता तीन  महिने झाले होते. राधिकाचा नवरा राजीव बँकेत नोकरीला होता. बँकेचे कर्ज थकवणाऱ्या एका कर्जदाराचे हे घर बँकेने ताब्यात घेऊन लिलाव केला होता त्यातून ते राजीवला मिळाले होते. पनवेल शहरात अगदी मोक्याच्या जागी  ते दुमजली घर होते.

      June 12, 2020


  • गोवा

    गोव्याला आमच्या श्री. शांतादुर्गा देवीचं देऊळ आहे. श्री. शांतादुर्गादेवी ही आमची कुलदेवता. कोकणातल्या गावातला गणपती उत्सव साजरा करुन मुंबईला परतण्याआधी गोव्याला जाऊन देवीचं दर्शन घेणं हा रिवाज आम्ही अनेक वर्षे पाळतो आहोत. गंमत अशी की दरवर्षी आणखी एका कामानिमित्त गोव्याला जावंच लागतं. थोडक्यात गोव्याच्या दरवर्षी दोन फेर्‍या ठरलेल्या. एखाद्या वर्षी तीनवेळा सुद्धा जाणं होतं. फेरी कितवीही असो, गोव्याला जायचं म्हणजे अंगात उत्साह संचारतो. हिशेब केला तर आतापर्यंत गोव्याला पंचवीसएक फेर्‍या सहज झाल्या असतील. पण म्हणून गोव्याला जाण्याचा कंटाळा कधीच घडत नाही. गोवा साद घालतो आणि मी गोव्याला जातो. आतुरतेने, ओढीने. ही ओढ नेमकी गोव्याबाबत का भासते याचं उत्तर देणं कठीण आहे.

      July 24, 2010


  • चिमणा वासुदेव

    वासुदेव आला दारी, वासुदेव आला
    चिमणा वासुदेव आला ।।धृ ।।

    टोपीवर मोरपिसांना
    खोवोनि येथें आला,
    काही दान करा त्याला ।
    दारी वासुदेव आला. ।।१।।
    बांधुनिया घुंगुर पायी

    थय थय थय नाचत येई
    सुखवी गाऊनि तुम्हाला ।
    दारी वासुदेव आला ।।२।।

    “द्याल जरी पैसा एक,
    देव तुम्हां देईल लाख,
    माई धर्म करा याला' ।
    दारी वासुदेव आला ।।३॥)।

    “वडिलांच्या तुमच्या नावे
    पैशाचे दान करावे,

    माई, पुण्य मिळविण्याला ।
    दारी वासुदेव आला ।।४॥।

    नाचुनिया आता थकला
    द्या एकच पैसा त्याला
    खाऊ गोड घ्यावयाला ।
    वासुदेव दारी आला ।।५।।

      June 25, 2026