नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
काळाला तीन भागांत विभागले जाते. भविष्य, भूत आणि वर्तमान काळ. भविष्य काळ अर्थात येणारा भावी काळ आणि भूत काळ गेलेला अर्थात मागचा काळ. दोन्ही काळाच्या मध्यभागी येणाऱ्या व जाणाऱ्या सिमा रेषेवर ज्याचे अस्तित्व मानले गेले तो वर्तमानकाळ. त्यामुळे वर्तमानकाळाचे मोजमाप किती वेळेचा तो काळ ह्याचे परीमाण ठरवीणेकेवळ शक्य नाही. येणारा काळ जो ज्या क्षणाला जातो तेव्हांच भविष्यकाळाचा भूत काळ बनतो. आणि तो परिवर्तनाचा क्षण कदाचित् त्याला वर्तमान काळ नांव देता येईल. परंतु खऱ्या अर्थाने त्याचे अस्तित्व नसल्यासारखेच असेल मानवाने वर्ष महीने दिवस तास मिनीटे सेकंद आणि सेकंदाचा हजारावा भाग मॅक्रो सेकंद हा यांत्रीक साधनानी केला आहे. परंतु मानवाच्या बुद्धी अनुभवाने त्या Micro Second चा केंव्हाच अनुभव घेणे शक्य नाही. ते शरीराच्या कोणत्याच हलचालीमध्ये मोजता येणार नाही. म्हणूनच वर्तमान काळ मोजणयाच्या क्षमतेत येत नाही. काळ आला नी गेला. त्या दोन क्रियाच्या मधली कालपनीक दुभंगमारी रेषा काठ वा कुंपण म्हणा हवे तर. उपनिषदामध्ये तर वर्तमान काळाचे अस्तित्व पण दाखविले नाही. इतका तो क्षणीक वा नामधारक झालेला आहे. तरीही अध्यात्मीक क्षेत्रात मानवी जीवनात संसारात वर्तमान काळाला अत्यंत महत्व दिले गेले आहे. प्राप्त झालेले आहे.
सर्व श्रेष्ठ काळ म्हणजे वर्तमान काळाला समजले गेले आहे. दोन अ-सत्या मधले एक सत्य समजले गेले आहे. ईश्वरी अनुभवाची प्रचीती, मनाच्या शांततेचा सर्वोतम क्षण, आनंद उपभोगण्याचा खरा काळ, म्हणजे केवळ वर्तमान काळच असेल. भविष्य काळ सदा अनिश्चीततेच्या लाटेवर आरुढ झालेला असतो. त्याच्या कोणत्याच क्षणाच्या सत्यतेची कल्पना करता येत नाही. एक सत्य म्हणून निश्चीत म्हणून कुणालाही समजणे शक्य नाही. तर्कज्ञानाला मर्यादा असतात.जरी ते ईश्वरी वा नैसर्गिक चक्रामधले असले तरी मानवासाठी काल्पनीक अनिश्चीत म्हणूनच अ-सत्य असा तो काळ असतो.
भूत काळ तर तुमच्यापासून दुर गेलेला असतो. पून्हा कधीही न येणारा न मिळणारा. तो फक्त फोटो अल्बमप्रमाणे आठवणीच्या कप्यात कोरला जाऊन तुमच्या जीवनातील प्रसंगाची चाळवा चाळव करण्याच्या फक्त कामाचा ठरतो. निश्चीत परंतु गेलेला काळ. म्हणून तुमच्यासाठी शेवटी एक अ-सत्य म्हणूनच समजला जातो. अनुभवाच्या फक्त मर्यादा असतात. कारण येणारा प्रत्येक क्षण अर्थात भविष्य काळ सतत नाविण्याचे प्रयोग करीतच येत असतो. त्यामुळे गेलेला क्षण वा भूतकाळ वर्तमान काळाच्या सत्यतेला साथ देण्यास सक्षम रहात नाही. म्हणूनच तो एक असत्य विचारांत जातो. हाती फक्त राहतो तो वर्तमान काळ. एक सत्य, चैतन्यमय, चंचल Ever moving period. भविष्य काळ त्याला स्पर्श करताच त्याचे रुपांतर भूतकाळांत होऊन जाते.
बुद्धीचा जीवंतपणा म्हणजे विचारांच्या लाटा सतत निर्माण करणे. विचार उत्पन्न होणे व त्याचा लय होणे. भविष्य काळाच्या चक्रात उत्पन्न होणारे विचार एका मागोमाग एक उत्पन्न होतात. ते वर्तमान काळाच्या सिमेवर आदळत भूतकाळाच्या दालनात निघून जातात. शरीर मनाला वासना-इच्छा शक्तीचे वरदान असते. ती नैसर्गिक क्रिया शक्तीचा एक भाग असते. शरीर मनाला सतत चैतन्यमय उर्जा शक्तीमध्ये गुंतवून ठेवण्याचे काम ह्या वासना शक्तीमुळे होत राहते.
वासना लाटाप्रमाणे उत्पन्न होत असतात. त्यातून निर्माण केला जातो उद्देश वा हेतू ( Object ). हा उद्देश शरीर मनाच्या हलचाली निर्माण करतो. भविष्यातले विचार व भूत काळांत आठवणीच्या दालनात गेलेले विचार, विचार म्हणून कदाचित मार्गदर्शक होऊ शकतील. परंतु 'क्षणाचा' 'वेळेचा ' विचार करताना वर्तमान काळावरची तुमची पकड सत्याचे दर्शन घडवणारी ठरते.
सतत उत्पन्न होणाऱ्या विचारांना थोपून धरण्याचा प्रयत्न करणे व उत्पन्न झालेले विचार त्वरीत बाजूस सारणे ह्या दोन प्रक्रिया आहेत. तुमच्या मनाच्या चंचल स्वभावाने ह्या दोन्हीही क्रिया सतत होत राहतात. त्या क्रियांच्या होण्यामध्ये बाधा निर्माण करणे म्हणजेच मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करणे. विचार रहीत वातावरणाची निर्मीती करणे. Objectless Thought चे वातावरण निर्माण करणे. वर्तमान काळाचे खऱ्या अर्थाने अस्तित्व जाणणे ह्यालाच म्हणतात. शरीरासाठी मनासाठी तुम्ही एका बाजूने भविष्याला जणू थांबवित असता व भूतकाळाला दुर सारुन ( काल्पनीक ) फक्त वर्तमान काळांत असतात. आणि हाच सत्याचा काळ असेल. ह्यालाच अनंत Infinite म्हणता येईल. यांत्रीक पद्धतीने ह्याचे मोजमाप करतां येणार नाही. परंतु आत्म्याच्या स्थरावरचा हा अनंत काळाचा क्षण असेल. ह्या ठिकाणी मिळणाऱ्या आनंदाला सिमा नसेल. Ecstasy of Joy हे सर्व फक्त ध्यान प्रक्रियेमध्ये Meditation मध्येच शक्य आहे. योग धारणा, प्राणायाम, अन्तःकरणातील मनाचा संकल्प जर मजबूत असेल, प्रयत्न तळमळीचे असतील तरच तुम्हाला वर्तमान काळामध्ये जगण्याचा खऱ्या अर्थाने अनुभव मिळू शकतो.
वर्तमान काळात विचार उत्पन्न होऊ शकत नाही. कारण भविष्यातील विचार झेपाऊन लगेच भूत काळांत जातो. त्यामुळे विचार रहीत काळ अर्थात शांतता ( Silence ) हाच वर्तमान काळाचा प्राण बनतो. ह्याच शांततेमध्ये ईश्वरी शक्तीचे आधीष्ठान वास करीत असते. ध्यान धारणेच्या सुरवातीला तुमची केलेली ईश्वरासाठीची प्रार्थना व संकल्प हा ध्यानावस्तेधील शांतता सफल करण्याचा प्रयत्न करते. शब्दाच्या ताकतीने जे साध्य होत नाही ते अव्यक्त स्थितीमुळे अर्थात शांततेच्या काळांत पूर्ण होऊ शकते. सतत वर्तमान काळांत जगा म्हणतात ते ह्याचसाठी. Experience the present by Objectless Silence.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
December 7, 2014
लेखक एम.टी.एन.एल. मध्ये अधिकारी होते. त्यांना हिमालयात पायी फिरण्याचा छंद होता. पायी जात असताना निसर्गाचं रम्य दर्शन, बर्फाच्छादित शिखरं, वन्य प्राणी, विविध रंगाची फुलं, वनौषधीची झाडं यांचा त्यांना परिचय झाला. गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक स्थळांना भेट देताना त्याचे पुराणातील संदर्भ त्यांनी दिले आहेत. निसर्गाचं विराट रुप त्यांना सतत आकषिर्त करीत होतं तर जिम कार्बेटचं जंगल जीवन त्यांना शीळ घालीत होतं. वन्यप्राण्यांच्या विशेषत: वाघाच्या शिकारीवर निर्बंध घालणार्या जिम कार्बेटला ते सलाम करतात. त्या सर्व ठिकाणांची पुराणाचा आधार घेऊन केलेली वर्णनं मनाला मोहवून टाकतात.
हिमशिखरांच्या सहवासात
लेखक : प्रकाश लेले
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १८०/- रुपये
पाने : १५०
हिमालयाच्या निसर्गाला पावित्र्याची, अध्यात्माची, संस्कृतीची जोड आहे. हिमालयातील स्थाने, मंदिरे, पर्वत शिखरे, सरोवरे, प्रपात, नद्या बघताना मन मंत्रमुग्ध होते. हिमालयाचा निसर्ग अनुभवावयाचा असेल तर अनवट वाटेवरुन पदभ्रमंती सारखा दुसरा पर्याय नाही. या पुस्तकातील सर्व स्थाने उत्तराखंडातील आहेत. या सर्व हिमशिखरांचे आभार कसे मानायचे हेच कळत नाही. त्या हिमशिखरांनी माझ्यावर केलेल्या प्रमाचा, आपुलकीचा वर्षाव आहे. सर्वांना माझे एकच सांगणे आहे, वर्षातील काही दिवस तरी तुम्ही अशा सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात घालवा.
-- प्रकाश लेले
October 18, 2016
अक्कमा चेरीयन ह्यांनी राज्य कांग्रेसवर लागलेले सगळे प्रतिबंध रद्द करण्यासाठी थंपनूर ते कोडीयार महाला पर्यंत एका विशाल मोर्च्यांचे नेतृत्व केले ज्यात सगळ्यांनी खादी टोपी घातली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यानी पोलिसांना मोरच्यावर गोळीबार करायला सांगितला, त्यावेळी अक्कमा चेरीयन ह्यांनी गर्जून सांगितले, ‘मी ह्या मोर्च्याची नेता आहे, गोळ्या झाडायच्याच असतील तर माझ्यापासून सुरवात करा.’ अक्कमा चे हे रूप पाहून पोलिसांनी आपले आदेश मागे घेतले. गांधींपर्यत त्रावणकोर ची वार्ता पोचली, त्यांनी अक्कमा चेरीयन ह्यांना ‘त्रावणकोर ची झाशी ची राणी’ अशी उपाधी दिली. १९३९ साली त्यांनी निषिद्ध आदेशांचे उल्लंघन केले अश्या आरोपाखाली ब्रिटिशांनी त्यांना कैद केले.
August 13, 2022
एक कोल्हा होता. त्याला सगळेच मूर्ख कोल्हा म्हणून ओळखायचे. आपल्या या ओळखीने कोल्हा खूप दुःखी असायचा. तो विचार करू लागला, आपला मूर्खपणाचा शिक्का पुसून हुशार, बुद्धिमान कोल्हा ही प्रतिमा सगळ्यांसमोर येण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. लोकांनाच मूर्ख बनवून आपल्याला राजाप्रमाणे सन्मान मिळवायला हवा.
October 22, 2025
पेशानं डॉक्टर असूनही सरळ साधे जीवन जगणारा आणि गोर-गरीबांविषयी, समाज रचनेंत तळाशी असलेल्या बहुजनांविषयी आंतरिक तळमळ असणार्या व्यक्ती आजकालच्या व्यवहारी जमान्यांत विरळच ! समाजाची बांधिलकी, समाजाचे रक्षण अशा बोजड शब्दांचा जरासाही आधार न घेतां जनसामान्यांची निरागस सेवा करणारा आणि त्यांच्या भल्यासाठी - हातचे न राखता - सतत झिजणारा “साधा माणूस” !! दीनांचा कैवारी - दीनबंधू दिनकर !!!
डॉ. दिनकर लक्ष्मण बडकस मुळचे नागपुरचे. काका प्रथितयश न्यायाधीश. नावाजलेले न्यायमूर्ती बडकस महाराष्ट्र शासनाचा “बडकस आयोग” त्यानींच साकारला. असे जरी असले तरी दिनकरांच्या घरची स्थिती विपरीत. पितृछत्र लहानपणीच विरले. पाच मुलांचा सांभाळ त्यांच्या मातेकडून धड होण्याजोगी परिस्थिती नव्हती. अंगावरची सदरा-चडडी आणि पाठीवर दुसरी जोडी, दुसर्या दिवसासाठी! अशा अवस्तथेत, नशीब आजमावण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईत जसे परप्रांतीय येतात तशी. योगायोगाने त्यांचे एक नातेवाईक डॉ. बांडखे हे मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत होते. त्या तत्वशील माणसांन या ------------ दिनूला नगरपालिकेच्या दवाखान्यांत कंपाऊंडरच्या जागेवर ठेऊन घेतले.
हाती आलेल्या संधीचं सोनं करण्याची किमया दिनूच्या अंगी होती. कुणाशीही जमवुन घेण, जमेल त्याला तशी मदत करण्याचा त्यांचा मनमिळाऊ स्वभाव तसेंच अविरत अथक कष्ट उपसण्याची तयारी या अंगभूत गुणांमुळे हा हा म्हणता मोठा लोकसंग्रह केला - अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत. गंमत अशी की लग्नासाठी त्यांना मुलगी देण्यास त्यांच्या व्यवसायामुळे कधी कधी अडचणी आल्या पण ------- जोशी सरांची सुकन्या सुशिला त्यांच्या मागे सुशील म्हणून छायेप्रमाणे उभी राहिली आणि ती “छाया” आजपर्यंत त्यांच्यामागे खंबीरपणे उभी ठाकली आहे. तोच त्यांचा मानसिक आधार.
पंधरा वर्षांच्या सेवेनंतर R.M.P CERTIFICATE / DEGREE मिळवली. नगर पालिकेच्या सेवेंत राहुन १९६२ पासून स्वतंत्र व्यवसायास सुरुवात केली. व्यवसाय क्षेत्र होते : कापुरबावडी-बाळकुम. दिनकर दिवसभर महानगरपालिकेच्या कर्मचार्यांची /वरिष्ठांची मनापासून सेवा करी. संध्याकाळी घाटकोपर ते बाळकुम तिथं ७ ते ११ पर्यंत ग्रामस्थांची सेवा. सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ लोटला, पण सेवेत कधी खंड पडला नाही. निवृत्ती नंतरही वयाच्या अमृतमयी वर्षापर्यंत उत्साह दुथडी भरुन वाहत होता.
कुणाकडे पैसे कधी मागितले नाहीत, असलेत तर द्या नाहीतर नंतर बघू ! या त्यांच्या उदार स्वभावांन त्यांनी बाळकुम-कापुबावडी आपलेसे केले. रात्री-अपरात्री स्वत: जाऊन जातीनं विचारपूस करावी. औषध आणि धीर द्यावा. प्रसंगी स्वत:कडे असलेली औषधे द्यावीत, कसलीही अपेक्षा न ठेवता. कुठलीही बांधिलकी नसतांना बहुजन समाज मनाला प्रेमाच्या धाग्यानं बांधून ठेवण्याची किमया एकटा दिनूच करु जाणे. निरागस सेवा म्हणतात ती हीच! मानवतेची पूजा बांधणार्यांचीच ही किमया !! पेशंट हाच परमेश्वर!!!
अज्ञा फिकिरी वृत्तीवर सारेचजण डॉ. दिनकरांवर फिदा. जयांच्याकडे पैसे नव्हते, त्या घरांतून डॉक्टरांच्या घरी पापड, कुरडया, शेवया, गहू, तांदूळ, आणि नाही नाही ते पदार्थ शेतमाल येऊन पडत असे, दिनुच्या ते गांवी हे नसे ! बाळकुम-कापुरबावडी मधल्या कोणत्याही छोट्या वा मोठ्या व्यक्तीच्या घरी समारंभास दिनू दादांना हमखास आमंत्रण, अन् ते ही अगदी हळदीपासून !! चिकन बनवणे हा त्यांचा छंद केंटुकी चिकन इतकेच सरस पण झणझणीत. ते बनवून इतरांना आग्रहाने खाऊ घालताना दिनू दादा जास्त प्रसन्न दिसतात. कापुरबावडीच्या अमिनाबाईचे पुसपुशीत चिकन महिन्यांतून ती ते चार वेळा त्यांच्या घरी असायचे.
गोतावळा, गणगोत विस्तारलेले त्यामुळे वरचेवर लग्न-मुंजी आधि समारंभ होत असत. दिनकर दादांची हजेरी अनिवार्य, नव्हे पाहिजेच ! पाहिजेच ! पण दादा येतीलच याची खात्री नसे. पेशंटचे बोलावणे त्यांना लग्नकार्यापेक्षा जास्त मोलाचे होते. दादा मनानं हळवे लोकसेवा हीच त्यांना समारंभाचा आनंद देऊन जाई. आपले मात्र तसे नसते, म्हणूनच सर्वार्थानं ते आमचे “दादा” आहेत!
नाशहिकची एक आठवण : लग्नकार्यात मग्न असतांना त्यांना कुणाचातरी निरोप मिळाला. कुणीतरी नात्यांतलं आजारी आहे, हे त्यांना कळले मात्र त्यांनी न जेवतां कार्य सोडून मुंबईस प्रयाण केले. असे प्रसंग, या सेवाभावी माणसाच्या आयुष्यांत वरचेवर येत असत. ते खर्या अर्थानं “अर्थपूर्ण” जीवन जगत होते, जगत आहेत. कुणीतरी आप्त स्वकीय, परिचित आजारी म्हटला की, दादा सर्व प्रथम तेथे हजर! पैशाची, मानधनाची, मानाची अपेक्षा मुळीच नाही. निखळ साधेपणा, हीच साधना नि ईश्वर सेवा !!
अतीव साधेपणानं आणि आपुलकीच्या वागण्यानं दादांनी प्रत्येक शाखेतले उत्तमोत्तम डॉक्टर्स स्ने-- जोडून ठेवले. डॉ. मुळेकर, डॉ. व्हि.बी. आठवले, डॉ. व्यास, डॉ. वर्तक आणि अनेकानेक, यादी खूप मोठी. ही सारी त्यांच्या घरची माणसं. मला एक प्रसंग आठवतो. एकदा ते स्वत: आजारी होते. घाटकोपरच्या हिंदुमहासभा रुग्णालयात त्यांना ठेवले होते. त्यांना भेटण्यासाठी मी सप्तनिक गेलो. दादा त्यांच्या बेडवर नव्हते. इकडे तिकडे चौकशी केली. दादा वेगळ्या वार्डात. दादा दुसर्या एका पेशंटला तपासतांना आढळले! जरा बरे वाटल्यावर इतरांच्या प्रकृतीची चौकशी. असे व्यक्तिमत्व विरळच. धन्य ते दिनकर .
स्वत:च्या मधुमेहाला सुमारे पन्नास वर्षे ते सांभाळून आहेत, सवत:ची प्रकृती सांभाळून, इतरांना हळूवारपणे सक्रीय आधार देणारा, प्रसंगी स्वत:च्या प्रकृतीची तमा न बाळगणारा दानशूर कर्ण दिनकरा सारखा विराळाच! नुकतीच वयाची अठ्ठ्यातरी ओलांडली. स्वत:पेक्षा इतरेजनांची काळजी वाहणार्या या दिनू दादांची दैदिप्यमान कारकीर्द शतायुषी व्हावी हीच या क्षणी गुरुमाऊली चरनी विनम्र विनवणी, हीच एक प्रार्थना !!
०७-१०-२००९
मुलुंड (पूर्व)
शब्दांकन : सुरेश नाईक, मुंबई ४०००८१
February 25, 2015
ना गपूरचे सुप्रसिद्ध गायक श्री. शरद मुठे माझ्या वडिलांचे मित्र होते. शरद मुठे हे उत्तम कवीदेखील होते आणि लहान मुलांची अनेक गाणी त्यांनी लिहिली होती. लहान मुलांची गाणी असलेले त्यांचे 'फुगेवाला' हे पुस्तक आणि इतर पुस्तकेही प्रसिद्ध झालेली होती. मुठेकाकांना लहान मुलांचे शिबिर घेऊन ठाण्यात गाणी शिकविण्याची इच्छा होती. डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक चिटणीस हे माझ्या वडिलांचे एक जवळचे मित्र. त्यांनी पुढाकार घेतला आणि मे महिन्याच्या सुट्टीत शाळेतच हे शिबिर आयोजित केले. या शिबिराच्या उद्घाटन समारंभासाठी मुठेकाकांनी एक अभिनव कल्पना मांडली. ते म्हणाले,
“या लहानग्यांच्या शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणेही छोटी मुलेच असतील." झाले! या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली गेली. या समारंभाचे अध्यक्ष होते अनिरुद्ध जोशी (वय वर्षे सात) आणि प्रमुख पाहुण्या होत्या मुग्धा चिटणीस (वय वर्षे पाच). मुग्धाने पुढे जाऊन कथाकथनकार आणि चित्रपट अभिनेत्री म्हणून खूप नाव मिळविले. बालगीते ही संख्येने फार कमी असतात. त्यामुळे नेहमी अनेक मुले तीच तीच गाणी म्हणताना आपण ऐकतो. मुठेकाकांनी या शिबिरात आम्हाला अनेक नवीन बालगीते शिकवली. ती लोकांसमोर सादर कशी करायची हे देखील शिकवले. अशा किती घटनांमधून आपण कसे घडत जातो, हे त्यावेळी आपल्याला कळत नाही, पण पुढील आयुष्यात त्याचा अगणित फायदा आपल्याला मिळत असतो. या शिबिरात साथीसाठी वाद्ये नव्हती. मुठेकाका एक लाकडी स्टूल समोर घेऊन ताल धरीत असत आणि आम्ही गात असू. कोणत्याही वाद्याच्या साथीशिवाय उत्तम गाणे सादर करता येऊ शकते, हे मुठेकाकांनी आम्हा लहान मुलांच्या मनावर कोरून टाकले. त्यामुळे पुढे कार्यक्रम सादर करताना असे अनेकदा घडते, की हवे असलेले वादक उपलब्ध नसतात. कधी कधी अनेक वाद्ये साथीला घेणे शक्य होत नाही आणि मग गायकावरील दडपण वाढते. मी मात्र अशा प्रसंगी कधीच डगमगत नाही. याचे सारे श्रेय मी मुठेकाकांच्या शिबिराला देतो.
- अनिरुद्ध जोशी
June 24, 2022
हौस करता करता माणूस सोनं चांदी कमावतो, पण त्यापायी त्याचा लोभ वाढत जातो, पण ज्यांच्या कडे रोजचं जगण्याला हातात काही नाही असे श्रीमंत मात्र या जगात तुच्छतेने बघितले जातात.
August 25, 2021
सुमित्रा भावे गेल्या, किशोर नांदलस्कर. अशी चित्रपट क्षेत्रातील एकेक जण ‘एक्झिट’ घेऊ लागल्यावर, काळजात धस्स होऊ लागलं. आज ना उद्या हा कोरोना जाईलही, मात्र जाताना अजून किती जणांना घेऊन जाणार आहे? हे त्याचा तोच जाणे.
June 17, 2021
बालेवाडीच्या क्रीडा संकुलाबाहेर जत्रेचं स्वरूप आलं होतं. संकुलाच्या प्रमुख प्रवेशद्वारापुढे भली मोठी कमान उभारलेली होती त्यावर लक्ष घेणारा लांबलचक कापडी फलक लटकवलेला होता, “अखिल भारतीय राज्यातंर्गत मैदानी स्पर्धा २०१९.”
May 15, 2022
“साहेब ते कोहिनूर वेगळे आणि हे शिक्षण कोहिनूर वेगळे. या वर्षापासून सरकारने शिक्षण क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या शिक्षकास हा सन्मान देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अण्णागुरुजी यांची निवड झाली आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात काही मूलभूत प्रयोग केले आहेत. त्यामुळे त्यांना हा सन्मान मिळत आहे.’
March 30, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti