नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
१९५५/५६ सालची गोष्ट. उन्हाळ्याचे दिवस. . तो शेतीच्या कामासाठी मुंबईहून दिवड्यासाठी निघाला.. दिवडा…. साठगांवच्या पुढचं त्याचं गाव. साठगांवहून बसने चार तास लागत. सकाळची एस्टी न मिळाल्याने त्याला रात्र साठगावात काढणं भाग होतं. ते फार मोठं गाव नव्हतं. प्रथमच संध्याकाळच्या एसटीने तो उतरला होता . रात्रीचे दहा वाजत होते. आता हॉटेल मध्ये राहणं भाग होतं.
February 4, 2026
खूप सुंदर असतं घरात आज्जी असणं. घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं. तिच्या पदराआड दडलं की कसं सुरक्षित वाटतं. वेगळेच संस्कार होतात मनावर तिच्यासोबत असलं की. तुम्ही चुकलात तर प्रेमाने तुम्हाला ओरडेल, रोज संध्याकाळी देवासमोर बसून शुभंकरोती म्हणवून घेईल, मनाचे श्लोक पाठ करून घेईल, लाडू वळले की पहिला तुम्हाला देवासमोर ठेवायला लावेल आणि दुसरा तुमच्या हातात देइल, तुमचा हात हातात घेउन मंदिरात नेइल आणि तुम्ही परत निघताना निरोप घेत तुमचा गोड पापाही घेईल.
July 5, 2020
रानपाखरा, रोज सकाळीं येसी माझ्या घरा
गाणे गाउन मला उठविसी मित्र जिवाचा खरा.
शरीर निळसर, शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी
सतेज डोळे चमचम करती जणु रत्ने गोजिरी. ॥१॥
पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला,
अफाट आभाळातुन कैसे उडता येते तुला ?
रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर
तूही त्याच्या संगें येसी गात गात सुस्वर ।।२।।
वाट चालुनी संध्याकाळी रवि सोडी अंबरा
आणि तूहि मग पंख उभारुन जासी अपुल्या घरा
सूर्यासंगे जासी येसी सदाकदा का बरे?
शेजारी आहेत काय रे परस्परांची घरे? ।।३।।
देह एवढा, अपाय कोणी करील तुजला इथें
म्हणून का तुज रवीबरोबर माय तुझी धाडिते ?
सांगतोस का तिला कसा हा छानदार बंगला ?
होते का रे कधी आठवण माझी सखया तुला ? ।।४।।
तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी
नेशिल का मज तुझ्या बिऱ्हाडी बसवुनि पंखावरी ?
माय तुझी येईल, सूर्यही येइल भेटायला,
मजाच होइल सख्या पाखरा, नेह एकदा मला ।।५।।
June 20, 2026
सूर्याने आपली केशरी सोनेरी आभा वाळूवर पसरली आणि वाळूचा रंगच बदलून गेला. जिथवर नजर जाईल तिथवर सोनेरी रंगाची उधळण झाली. सोन्याचा व केशराचा सडा मऊ मुलायम वाळूवर पसरला. मावळतीच्या सूर्याचा गोळा जणू अथांग वाळूवर वास्तव्याला आल्यासारखा अप्रतिम दिसत होता. आम्ही ते दृश्य डोळे भरून पहात होत तोच पुन: एक ५-७ घरांची वस्ती लागली. प्रवास सुरू केला तेंव्हा सकाळच्या कोवळ्या ऊन्हात फिकट निळसर दिसणारे आकाश, दुपारच्या टळटळीत ऊन्हात चांदीसारखे चमकणारे आकाश, मधेच मावळतीच्या सूर्याने केलेले सोनसळी केशरी आकाश आणि आता आमची बस थांबली तेव्हा सूर्याचा गोळा क्षितिजाकडे झेपावत असताना इंद्रधनुष्यातले जवळपास सगळे आकर्षक रंग ल्यालेले आकाश...आकाशाचे एवढे विविध रंग इतके दिवस सिमेंटच्या जंगलात राहिल्याने कधी दिसलेच नव्हते. ते अगदी तृप्त मनाने न्याहाळत होतो. अद्याप सूर्य क्षितिजावर रेंगाळत होता. त्याच्या प्रकाशात सगळे अगदी स्वच्छ दिसत होते. रंगीबेरंगी छोट्या चौकोनी गोल तंबूंची वस्ती खूपच उठून दिसत होती. बस त्या वस्तीजवळ थांबली तेव्हा ५-६ गोरीपान गोबरी मुले रंगीबेरंगी पोशाखात व स्कार्फ व टोपीचे गोंडे उडवत वस्तीचे कुंपण ओलांडून बसपाशी आली. आम्ही खाली उतरताच त्या वस्तीचा म्होरक्या आमच्या स्वागताला पुढे आला.
म्होरक्याने आम्ही तिथे उतरताच आम्हाला मोठ्या तंबूपाशी नेले. त्याच्या मागे एक विस्तीर्ण तलाव होता. हाच तो प्रसिद्ध 'चिंघाई 'तलाव. चीनमधील हे सर्वात मोठे अंदाजे४३००चौ.कि.मी.व २१ते२५मी. खोल) तळे खाऱ्या पाण्याचे आहे. आकार इतका मोठा की, एका तीरावर उभे राहून दुसरा तीर दिसतच नव्हता. हा तलाव म्हणजे चिंघाई प्रॉव्हिन्सची हद्द सुरू झाल्याची खूणच. १००००' उंचीवरचा हा तलाव अतिशय थंडगार, स्वच्छ, काळसर पाण्याचा आहे. त्यात विविध प्रकारचे भरपूर मासे आहेत. पूर्वी १०० पेक्षा जास्त नद्या या तळ्याला पाणी पुरवत असत. पण वाळूचे थर या नद्यांमध्ये वाढल्याने त्यातील सुमारे २५ नद्याच शिल्लक राहिल्या आहेत. तळ्याचा आकार कायम कमी जास्त होत असतो. ते लहान व्हायला लागले की, अनेक छोटी छोटी तळी या तळ्याजवळ तयार होतात. २००४ मध्ये असेच एक छोटे तळे तयार झालेले आम्ही पाहिले. या तळ्याच्या पश्चिमेला एक बेट आहे, त्यावर एक महादेवाचे मंदिर आहे. Ma Ha De Va असे त्याचे तिबेटी बौद्ध लोकांमध्ये त्याचे अभिधान आहे. तिबेटी लोकांचे ते तीर्थस्थान असल्याने कोणीही या तळ्यातून बोटीने प्रवास करून देव दर्शनाला जात नाही. वर्षातून तीन महिने ते संपूर्णपणे आटते. तेव्हाच बौद्ध धर्मगुरू चालत जाऊन देवाचे दर्शन घेऊ शकतात. इतर वेळी नाही. चिनी वर्षगणनेप्रमाणे फक्त 'घोड्याच्या' वर्षात या तळ्याला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. घोड्यावरून १८ दिवसात किंवा पायी२३ दिवसात ही प्रदक्षिणा यात्रेकरू पूर्ण करतात. तिबेटमध्ये जी ४ तळी पवित्र मानली जातात त्यापैकी हे एक. मानसरोवराशेजारी कैलास पर्वत आहे. त्यामुळे या चार तळ्यात त्याचा मान पहिला. चिंघाई तळे कोणत्याही पर्वत पायथ्याशी नाही, तर वाळवंटात आहे. या तलावाच्या दुसऱ्या टोकास एक (चिंघाईपेक्षा) लहान तळे आहे. वाळवंटात असूनही त्याचे पाणी गोड आहे हे आश्चर्य. अर्थात खरे काय ते गाईडच जाणे, कारण ते पाणी न पचणारे आहे असे त्याने आधीच जाहीर केले होते. स्थलांतरीत पक्ष्यांच्या विश्रांतीसाठी ते अतिशय उत्तम आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या खूप जाती इथे पहायला मिळतात. तळ्याच्या काठी वाळूतून थोडे चालून तळ्याच्या पाण्यात पाय बुडवून आम्ही परत तंबूत आलो.
एव्हाना सूर्यदेव दिवसभराचा प्रवास संपवून थकून भागून विश्रांतीसाठी क्षितीजापलिकडे जायला निघाले. जाताजाता त्यांनी आपले केशरी, भरजरी पांघरूण तळ्यावर पसरून तळ्याच्या पाण्याचा रंग बदलण्याची किमया आम्हाला दाखवली. तळे अंधारात अदृश्य होऊ लागताच आम्ही तंबूत परतलो. आता आमच्या स्वागतासाठी तंबूत ५-६ पुरुष व काही स्त्रिया जमल्या होत्या. त्यातील पुरुषांनी नर्तकांचा चकाकता वेष परिधान केला होता. आरसे, टिकल्या लावलेले घेरदार अंगरखे, खाली चुणीदार पायजमे, कमरेवर बांधलेले रंगीबेरंगी रूमाल, डोक्यावर गोल टोप्या असा त्यांचा वेष आकर्षक होता. नर्तिका तर खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांनी डोक्यावर सोनेरी टिकल्या लावलेल्या जाळ्या बांधल्या होत्या. घट्ट दोन वेण्यांना रंगीबेरंगी गोंडे बांधले होते. बेताच्या उंचीच्या, रंगाने गोऱ्यापान, सुडौल बांधा, धरधरीत नाक (कदाचित मेकपची करामत असेल) असणाऱ्या, हातभर रंगीबेरंगी बांगड्या व पायात जाडजाड तोरड्या घालून छुमछुम करत त्या नर्तिका आम्ही बसलो होतो त्या तंबूत आल्या. तेवढ्यात तंबूचा मागचा पडदा अचानक जमिनीवर पडला व नाचाचीपोज घेऊन उभ्या नर्तिकांमागे आपोआप गडद निळ्या काळसर आकाशाचा पटल, त्यात चमकणाऱ्या चांदण्यांसह निर्माण झाला. आमची टेबले अर्धगोलाकारात मांडली होती. जेवणाची सुरुवात अर्थातच सूप-ब्रेडने झाली.
नंतर नेहेमीप्रमाणे २-३ कोर्स भाज्या व भाताच्या थाळ्या आल्या. इकडे जेवण सुरू होताच नर्तिकांनी आपली कला सादर करण्यास सुरुवात केली. तालात पदन्यास करत, एकापाठोपाठ गिरक्या घेत सगळ्याजणी व त्यांचे जोडीदार कधी गोलाकार करत, कधी एकामागोमाग जात तर कधी एकमेकांच्या मिठीत शिरत लीलया सगळीकडे भिरभिरत होते. साथ फक्त ढोलकी सारख्या दिसणाऱ्या वाद्याची व सनईसदृश सुरावटीची. नाचाच्या कोणत्याही खास शिक्षणा शिवाय त्यांनी जी 'नृत्यकला' सादर केली ती एकदमच लाजबाब! २ तास कसे संपले कळलेच नाही.
तेथून निघाल्यावर झिनिंगला पोहोचायला फार वेळ लागला नाही. आमचे हॉटेल मुख्य रस्त्यावर होते. त्यामुळे मुक्कामी पोहोचताच सगळे जण पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडले. चालणे फार झाले नसले तरी दिवसभराचा प्रवास अंगावर यायला लागला, तसे सारे परतले. सगळीकडे सामसूम झाली. आम्हीही गाढ झोपेत होतो. अचानक रात्री २-३ च्या सुमारास आमच्या खोलीची बेल वाजली. त्या अगोदर कुलुपात किल्ली फिरवण्याचा प्रयत्न झाल्याच्या चाहुलीने चाळवलेली झोप आता पूर्णपणे उघडली. पीपिंग होले मधून पहाण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो, पण अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये काहीच दिसेना. दार उघडावे का अशा संभ्रमात असतानाच बेल पुन: जोरजोरात वाजू लागली व दाराचे हँडल फिरवण्याचा आवाजही येऊ लागला. रिसेप्शनचा फोन उचलला जाईना. आता दारावर धक्के व बरळल्याचाही आवाज येऊ लागला. गाईड व सिक्युरिटीही झोपेत! त्यामुळे गप्प बसून बाहेरचा धिंगाणा थांबण्याची वाट पहाण्याची वाट पहाण्याखेरीज उपायच राहिला नाही. स्थानिक भाषा येत नाही, बाहेर किती जण आहेत याचा अंदाज नाही. त्यामुळे जीव मुठीत धरून बसण्याखेरीज इलाजच नव्हता. तास-दीड तासाने धिंगाणा हळूहळू कमी झाला. शेजारच्या खोल्यांपैकी कोणी बाहेर कसे आले नाही याचेही आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. सकाळी उलगडा झाला की हा प्रकार करणारा एक दारुडा पूर्वी त्या खोलीत रहात होता आणि अधून मधून तो या हॉटेल मधल्या त्याच्या पूर्वीच्या खोलीत शिरणे, प्रवेश न मिळाल्यास शिवीगाळ करणे, आरडाओरडा करणे, धिंगाणा घालणे वगैरे करतो. तिथल्या स्टाफला हे नवीन नसल्याने ते तिकडे दुर्लक्ष करतात! चीनच्या भूमीवर आलेल्या पहिल्याच सलामीने आम्हाला नवाच अनुभव मिळाला.
सकाळी आम्ही झिनिंगची सफर केली. चिनी औषधालय, त्याचा कारखाना इ. ठराविक ठिकाणांची पहाणी झाली. शहर जरा उंचावर असल्याने रस्ते खूपच चढ उताराचे आहेत. अगदी कोकणची आठवण करून देणारे. सभोवती गर्द झाडी. जेवणानंतर झिनिंगच्या स्थानिक 'तू' या आदिवासी जमातीच्या लोकांना भेट होती. गावातून निघून आमची बस गर्द झाडीत लपलेल्या वळणावळणांच्या व चढ उतारांच्या रस्त्याने जायला लागली. अतिशय सुंदर असा हा साधारण दीड तासाचा प्रवास करून आम्ही त्यांच्या वस्तीवर पोहोचलो. तेथे त्यांनी बनवलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी प्रत्येक झोपडीबाहेर हातगाड्यांवर दुकाने थाटली होती. उत्तम भरतकाम केलेले छोटेछोटे बटवे, स्कार्फ, उशांचे अभ्रे, हस्तकलेचे नमुने असणारे विविध प्रकारचे रुमाल, पिशव्या यांची विक्री या हातगाड्यांवर चालू होती. मध्यभागी चौक व बाजूने २-२ खोल्यांची घरे अशी ५-६ घरांचीच ती वस्ती. चौकात थोडासा उंचावर स्टेजसारखा चबुतरा आणि प्रत्येक घराच्या पडवीत प्रवाशांची बसण्याची सोय केली होती. आमची बस थांबताच २-३ पुरुष व २-३ स्त्रिया पुढे आल्या. हेच ते 'तू' जमातीचे लोक. आमच्या गळ्यात स्कार्फ घालून व अत्तरासारखा स्प्रे उडवून त्यांनी आमचे स्वागत केले व आत नेऊन पडवीत बसवले. सर्वजण स्थानापन्न झाल्यावर चायनीज टी व कुकीज देऊन आमचा पाहुणचार करून त्यांच्यातील मुखियाने कार्यक्रमाची सुरुवात करून दिली. चौकातील स्टेजवर पाहुण्यांच्या करमणुकीसाठी वेगवेगळे कार्यक्रम सुरू झाले. स्टेजच्या मधोमध खांब होता. त्याच्या वरच्या टोकाच्या गोल कड्यावर पक्क्या बसवलेल्या पण जमिनीपासून बऱ्याचवर तरंगतील अशा बांबूच्या काठ्या होत्या. या काठ्या व खांबही रंगीबेरंगी कागद, कापड यांनी सजवलेले होते. पडवीत, मोकळ्या जागेत, छपरांवर पताकांच्या माळा वाऱ्यावर डुलत होत्या. एका बाजूच्या खोलीत वादक बसले होते. आम्ही चायनीज चहा व उकडलेल्या शेंगांचा आस्वाद घेत असताना वाद्ये वाजू लागली व कार्यक्रमाला सुरुवात झाली. कमरेपर्यंत येणारी रंगीबेरंगी पोलकी, त्याखाली पायापर्यंत येणारे रंगीत घेरदार परकर, एक वेणी व तिला झुपकेदार गोंडा, डोईवर मोठ्या घेराची हॅट घातलेल्या काही मुली व रंगीत शर्ट-पायजमे घातलेली मुले हातात हात घालून पुढे आली, आम्हाला विश करून सर्कशीसारख्या कसरती करू लागली. मधल्या खांबाशी लागून असलेल्या कड्यांना लोंबकळून त्यांनी हवेत गोल फेर धरून कसरती सुरू केल्या. त्या पाहून अगदी थक्क व्हायला झाले. निवेदन चिनी भाषेतून होते, तरी देहबोली इतकी स्पष्ट व बोलकी होती, की भाषा समजत नसूनही सर्वकाही समजत होते. हा खेळ बराच वेळ चालला होता. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन त्यांचा महत्त्वाचा खेळ सुरू झाला.
यावेळी खेळ करणाऱ्यांनी आमच्या सहप्रवाशांपैकी मॅडेरिन भाषा येणाऱ्या एका चिनी माणसाची निवड केली. तोही खूप खूष झाला. त्याच्या बायकोने आपला कॅमेरा सरसावला. त्याला घेऊन ते आतल्या खोलीत गेले. थोडा वेळ गेला अन् अचानक आतल्या खोलीतून वाजंत्रीचा आवाज ऐकू येऊ लागला. आमचे लक्ष साहजिकच तिकडे गेले. वाजंत्रीवाले आपल्या वाद्यांसह दोन-दोनच्या ओळीत, तालात मागे पुढे पावले टाकत, मागे पुढे झुलत पुढे आले. त्यांच्या मागोमाग चमकदार रंगीबेरंगी कपडे व मुंडावळ्यांसारख्या माळा सोडलेली टोपी घातलेला, आमचा सहप्रवासी दोघांच्या हातात हात घालून नाचत नाचत आला. त्याच्या मागोमाग त्याचे (तात्पुरते) 'तू' आईवडील व भावंडे होती. त्यांचा एक फेरा पूर्ण झाल्यावर स्टेजवर अगोदरच दाखल झालेल्या 'तू' पुरोहितासमोर त्याला उभे केले. त्याच्या मागोमाग तशाच चमकत्या पोशाखात 'नवरी' ही आपल्या आईवडील व बहिणी-मैत्रिणींबरोबर नाचत येऊन पुरोहितासमोर उभी राहिली. पुरोहिताने त्यांच्या (मँडेरीन) भाषेत काहीतरी विचारले. दोघांनी माना डोलावल्या, दोघांच्या हातात रेशमी स्कार्फ व फुले दिली गेली. ते त्यांनी एकमेकांना द्यायचे होते. स्कार्फ घालताना वधूवरांना उचलणे, उंच करणे, दोघांची उंची सारखी होताच नवरीला खांद्यावर टाकून दुसऱ्याच माणसाने पळवणे, नवऱ्याने त्यांना गाठणे असे बरेच खेळ करून झाले. फुले देताना अचानकच नवरीऐवजी दुसरी जाडी म्हातारी बाई पुढे येणे, तिला नवरदेवाने फुले देणार नाही म्हणणे असे बरेच गमतीजमतीचे प्रकार चालू होते. सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली. शेवटी एकमेकांच्या गळ्यात स्कार्फ घालण्यात यश आल्यावर प्रीस्टने त्यांचे लग्न झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर चिनी पद्धतीनुसार एकमेकांच्या आईवडिलांना गुडघ्यावर बसून चहा देणे, त्यांनी वधुवरांना 'आंगपाओ'ची (चिनी) लालपाकिटे भेट देणे वगैरे 'विधी' पार पडले. दोघांनीही पुरोहिताशी हस्तांदोलन करून विवाह संपन्न केल्याबद्दल आभार मानले. सर्व समारंभ अत्यंत गंमतीत व हास्यविनोदात पार पडला. त्या सहप्रवाशाची सिंगापुरी धर्मपत्नीही उत्साहाने सगळे शूटिंग करत होती, फोटो काढत होती. लग्न समारंभ संपल्याची घोषणा झाली व नवरी आपल्या सख्यांबरोबर आतल्या खोलीत गेली. तिचा 'नवरा' (आमचा सहप्रवासी) ही कपडे बदलून आमच्यात येऊन बसला.
-- अनामिका बोरकर
December 7, 2022
ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते.
व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे.
ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात वावरतात. कुटूंब वत्सल असतात. जीवन व व्यवहार ह्या दोन प्रमुख मार्गावर अनेक पदे सांभाळलेली. प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, अशा अनेक क्षेत्राचे अद्यावत ज्ञान मिळालेली असतात. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा योग्य फायदा समाजाच्या विकासांत व्हावा वा त्यांच्याकडून करुन घ्यावा ही अपेक्षा.
ज्येष्ठाना अनेक सवलती शासनाकडून दिल्या गेल्या आहेत. आणि मिळतही आहेत.
एक गम्मत बघा. बस वा रेल्वेने प्रवास करा. इतरापेक्षा खर्च कमी.
यात्रीने भरलेल्या बस वा रेल्वेत अचानक शिरा. लोक तुमचा आदर करतात. लोक उठून आपली जागा तुमच्या साठी देऊ करतात. तुमचा चेहरा बघताच ती तुम्हाला मिळते. तो चेहरा असहाय्य वा मागणी करणारा नसतो. तर त्यावर किंचीत हस्याची छटा असते. एक आशिर्वाद देण्याची भावना असते. थोडेसे प्रेम व्यक्त होत असते. तुमच्या चेहऱ्यावर ज्येष्ठत्वाची झलक मात्र असते. ही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असल्याचा शिक्का त्या गर्दीत देखील तुमच्या विषयी आदर निर्माण करतो. शेजारचा विनम्र होऊन प्रेमाने हात धरीत आपले आसन मोकळे करीत तुम्हाला त्या जागेवर बसवितो. हां ! कदाचित् तुमची दुखणारी कंबर, मान, वा गुढगे, तुमचा वाकडा तिकडा करणारा शरिराचा आकार त्याच्या नजरेत आलाही असेल. पण ते कांहीही असो, तुम्हाला सन्मान पूर्वक न प्रयत्न करता, जागा मात्र निश्चीत मिळते.
आहो तुम्ही बँकेत जा. इतरापेक्षा तुम्हाला जास्त व्याजदर मिळतो. तेथे तर तुमच्याकडे न बघता, फक्त समोरचा कागद बघत, तुमच्या वयाची कदर केली जाते.
केवढे महत्व आहे तुमच्या ज्येष्ठत्वाचे.
अनेक उपाधी (Degrees) असतात. त्या प्रत्येकजण आपल्या जीवनांत मिळवतो. परंतु त्या सहज मिळत नसतात. त्यासाठी अभ्यास, परिश्रम, व मनाचा निश्चय लागतो. मग ते ज्ञान कोणत्याही मार्गाचे असो. B.A., B.SC., B.Ed . L.L.B., M.B.B.S. C.A., B.E., B.Tech. इत्यादी. त्याच प्रमाणे निरनीराळे व्यवसाय ( Jobs) वा नोकऱ्य़ा जसे शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, अकॉन्टटंट, इत्यादी ह्या सर्व त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांच्या उपाधी बनतात. त्यासाठी प्रत्येकाने त्या त्या प्रमाणात परिश्रम घेतलेले असतात. अभ्यास असतो, धडपड असते. कुणीतरी बाजारांत जाऊन त्या खरेदी केलेल्या नसतात. प्रत्येक उपाधी मागे दडलेली असते, त्याची त्या त्या प्रकारची तपश्चर्या आणि यश.
ज्येष्ठ नागरिक बनण्यासाठी मात्र विना श्रम, कांहीही कष्ट न घेता, कोणताही अभ्यास न करता, कोणत्याही परिक्षेला सामोरे न जाता मिळते ही उपाधी, ही डीग्री. आणि तीही अतिशय प्रतीष्ठेची.
कशासाठी ज्येष्ठाना श्रेष्ठ समजले जाते?
प्रत्येकाच्या पाठीवर एक गाठोडे असते. ते अनुभवाने भरलेले असते व भरत जाते. हे गाठोडे जमा केले असते, जीवन दावावर लाऊन. आयुष्य खर्च करुन. निसर्गाने दिलेली पुंजी गमाऊन. Every thing at the cost of life. हे अनुभव जमा केलेले असतात. ते सहज मिळालेले नाहीत.
इतर प्रांत बदलले जातात. C.A. व्हायचे होत, डॉक्टर झालो. प्राध्यापक व्हायचे होते, वकील झालो. फुट बॉल प्लेयर व्हायचे होते, नट झालो. इत्यादी. जसे श्रम, प्रयत्न, परिस्थीती येत गेली, व्यक्ती बदलत गेल्या.मार्ग व ध्येय बदलत गेले. त्यांच्या उपाध्या बदलत गेल्या.
ज्येष्ठत्व मात्र कोणत्याही मार्गाने गेलांत तरी शेवटी ते मिळत गेले. ते सर्वासाठी एकच असते. सर्व उपाध्या मानव निर्मीत असतात. परंतु ज्येष्ठत्व जे प्राप्त होते, ते नैसर्गिक चक्राला अनुसरुन. आणि म्हणुन त्याचे अनन्यसाधारण महत्व असते.
जीवन मृत्युचा सतत लपंडाव चालू असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षणा भोवती मृत्यु दबा धरुन बसलेला असतो. ह्याला काळ व वेळ यांचा खेळ म्हणतात. दोघे एकत्र येताच, मृत्यु जीवनावर झडप घालतो. ते जीवन त्वरीत नष्ट होते. ह्याचसाठी आम्ही जीवनाला अनिश्चीत समजतो. आम्ही केंव्हाही, कोणत्याही क्षणी मरणार ह्याचे आम्हास इतरांचे मृत्यु बघून ज्ञान होते. परंतु मृत्युची जाणीव कुणासही केंव्हाही येत नसते. हा निसर्गाचा आशिर्वाद असतो. निसर्ग तुम्हास सदैव जागृत राहण्याचा संदेश देत असतो. आम्ही आमच्या मनाच्या sub-conscious अर्थात जाणीवेच्या स्थरावर नेहमी सतर्क असतोच. ज्याचे ह्यांत थोडेशे दुर्लक्ष होते, मृत्यु त्यावर त्याच क्षणी घाला घालतो.
तुम्ही बघितले असेल. पक्षी- चिमणी वा कबुतर अंगणांत पडलेले दाणे, एकदम जाऊन टीपत नसतात. प्रथम ते सर्वत्र नजर टाकून मृत्यु कोठे लपलेला आहे कां? ह्याचा मागोवा घेतात. स्वसंरक्षणाची खात्री होताच ते दाणे टिपतात. प्रत्येक प्राण्याच्या जगण्याच्या हलचालीमधून त्याची सतर्कता सतत प्रतीत होत असते. हे त्याच्या सहज अंगवळणी पडलेले असते. एखादी चुक वा दुर्लक्ष त्याचे जीवन चक्र थांबऊ शकते.
माणसाचेही असेच दिसून येते. दैनदीन जीवनांत येत जाणाऱ्या असंख्य संकटा विषयी तो सतर्क असतो. ती संकटे नैसर्गिक असो वा मानव निर्मीत. जीवाचा बचाव करणे, निसर्गाने जे दिले ते योग्य तऱ्हेने सांभाळणे हे सर्वात त्याचे प्रथम कर्तव्य समजले जाते. आणि प्रत्येकजण स्वतःची त्याप्रमाणे काळजीही घेत असतो. क्षणा क्षणाला मृत्युशी त्याचा संघर्ष होत असतो.
इतका कठीण आयुष्याचा मार्ग तो चालत असतो. आणि एक एक पाऊल टाकीत जेंव्हा आयुष्याची सर्व साधारण मर्यादा जी निसर्गाने अंदाजे १०० वर्षे त्याच्या वाटेला दिलेली असतात, तो ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
अशा भयावह व क्षणा क्षणाला संकटग्रस्त वाटणाऱ्या जीवनाची ५० वर्षे तो जेव्हां पूर्ण करतो, त्याची अर्धी जीवनपाऊल वाट झालेली असते. जवळ जवळ निसर्ग अपेक्षीत कर्तव्ये संपत आलेली असतात. प्रौढत्वाचा टप्पा ओलांडून तो वृद्धत्वाकडे झुकू लागतो. त्याच्या ह्या धडाडीपूर्ण व यशस्वी टप्यालाच ज्येष्ठत्वाची संकलपणा मानलेली असते. त्याचा ज्येष्ठत्वाचा काळ आरंभ झालेला असतो.
जीवनाचे इतर मार्ग जसे Money, Muscle, Spirit, Career. Character, Recommendations, इत्यादी यश मिळविण्यास मदत करु शकतात. परंतु ज्येष्ठत्वाच्या मार्गाला पर्याय नाही. तो एकमेव व निश्चीत आहे.
जे खचकले ते गेले. जीवनाच्या चाकोरीतून हटले. जे टिकले, खंबीरपणे झगडत राहीले, ते जीवन मार्ग चालत राहीले. आज त्याना ज्येष्ठाची उपाधी मिळाली. अनुभव घ्यावा लागत नाही. तो मिळतो. निसर्ग तुमच्या ओंझळीत टाकतो. तुमच्या पाठीवरचे गाठोडे वाढत जाते. ते जेवढे मोठे, तेवढाच सन्मान मोठा.
१०० वर्षे जे पुर्ण करतात त्याना शतायुषी ही उपाधी सन्मानाने दिली जाते. ज्या ज्येष्ठानी ९० ते ९५ वा १०० ह्या वयाचा टप्पा गाठलेला आहे, काय वेगळ त्यानी केल ? ते जीवनाशी संघर्ष करीत राहीले. प्रत्येक क्षण मृत्युच्या भोवऱ्यांत गुंतलेला असतना, जीवन क्षणभंगुर असताना. ते जागृतपणे जगले. व यशस्वी झाले. मृत्यु केंव्हा व कसा घाला घालील अनिश्चीत असते. प्रत्येक क्षणाबरोबर, वातावरणाबरोबर, तुमचा सतत संघर्ष चालू असतो.
एक प्रकारचा लढा. जे जगले ते केवळ त्यांत यश मिळत गेले म्हणून. निसर्ग नेहमी जीवन मृत्युची दोन्हीही दारे उघडी करुन तुम्हास मार्ग दाखवित असतो. तुमची सतर्कता तुम्हाला जगवित असते. जीवन पुढे पुढे जाण्यात मदत करीत असतो. आपले ज्येष्ठत्व हे लढा करुनच आपण मिळविले आहे. म्हणूनच हा ज्येष्ठत्वाचा सन्मान.
येथे एक महत्वाची बाब सर्वांसमोर आणू इच्छीतो. जीवनाची वाटचाल जरी खडतर दिसत असली तरी मानवाने आपल्या बुद्धी व ज्ञान याच्या साहाय्याने तीलाच पूर्णपणे बदलून टाकलेले आहे. ते जीवन आता आनंद देणारे, हवे हवेसे वाटणारे, सुलभ, आशादायी, करमणूक प्रधान बनलेले आहे. तरी मृत्युच्या चकरा जीवनाभोवती चालूच असतात
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
December 26, 2016
गोष्ट अगदी खरीखुरी आहे. एका बाईला खूप प्रयत्नांनी बाळ होते. परंतु जन्मतःच त्याच्या हृदयामध्ये छिद्र असल्याचे डॉक्टरांना जाणवते. डॉक्टर त्या बाईला जेवढी मदत करता येईल तेवढी करतात. परंतु बाळाची तब्येत सुधारत नाही. डॉक्टर तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन जाण्याचा सल्ला देतात.
July 17, 2024
एका गाडी बनविणाऱ्या कंपनीच्या कारखान्यात एक प्रज्ञावान इंजिनिअर असतो. तो स्वतःच्या हिकमतीवर एक नवीन गाडी बनवितो. गाडी फार सुरेख झालेली असते. सगळे जण तिला पाहून मोहित होतात. इंजिनिअरही स्वतःच्या सृजनावर प्रसन्न होतो. आता टेस्ट ड्राईव्हसाठी गाडीला कारखान्याच्या बाहेर न्यायचे असते.
May 24, 2024
मी एकदम शॉकड्… जायचं हे माहित होतं. पण असं? नीलम पुढे म्हणाली, तुझा पासपोर्ट, व्हिसा, तिकीट आणि करंन्सी तुला अटेंडंट एअर पोर्ट वर रात्री 12 वाजता आणून देईल. तू आत्ता फोरेक्स् कार्ड घे झेराकडून आणि घरी जाऊन तयारी कर. तसही तुझा पासपोर्ट येई पर्यंत 7- 8 वाजतील.
February 3, 2022
एखादा चित्रपट पाहून मनावर इतक परिणाम होऊ शकतो? यावर माझा विश्वासच बसेना… त्यासाठी मी हा चित्रपट टाॅकीजमध्ये जाऊन एकदाचा पाहून घेतला.
August 31, 2021
नग’ म्हणजे ‘पोचलेला’ इसम किंवा ‘कॅरेक्टर’ किंवा ‘पात्र’ आणि कोकणची माणसं कितीही साधीभोळी असली आणि काळजात त्यांच्या भरली शहाळी वगैरे असली तरी एकेक जण म्हणजे ‘नग’ असतो.
December 25, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti