नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक विचार आला की हा किडा दाराजवळ पडलेला आहे, लोकांची जा ये चालू आहे. दुर्दैवाने कुणाच्यातरी पायंदळी तो चिरडला जाईल. मी त्याला एका काडीवर उचलून बागेतल्या एका छोट्या झाडावर नेऊन ठेवले. मानसिक समाधान वाटले, की आपण त्याला त्यावेळी तरी मृत्यूपासून दूर नेले. पण केवळ कांही क्षणच गेले असतील, एक पक्षी तेथे झेपावून आला व त्याने त्या किड्याला अलगद उचलून नेले. एका जीवाचा अंत होताना दिसला. माझे मन खंतावले. माझा तर्काधीष्टीत हिशोब चूक वा बरोबर? समाधान हे देखील एक मानसिक शास्त्र असते. निर्माण झालेली परिस्थिती माणूस बदलू शकत नाही. परंतु त्याला वेगळा मार्ग देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या विचारांचे जे स्तर असतील त्याप्रमाणे तो योजना आखण्याचा विचार करतो. निसर्गाला मात्र तसेच अभिप्रेत असेल असे नाही. निसर्ग आपली चाल त्याच्याच पद्धतीने चालू ठेवतो. येथेच वैचरिक विविधता निर्माण होते. काळाच्या हाती एक दंडक (काठी) असतो असे म्हणतात . ज्याच्या एका टोकावर स्थळ व दुसऱ्या टोकावर वेळ ही कोरलेली असते. जेंव्हा एक टोक स्थळ निर्देश करते, त्याच वेळी दुसरे टोक वेळेची चाहूल टिपते. जीवनाच्या अंतिम मार्गावर स्थळ आणि वेळ यांची विधात्याने नोंद केलेली असते. म्हणूनच ते प्रत्येकाला अनिश्चित घटना परंतु निश्चत सत्याकडे नेते. काळाचा दंडक स्थळ व वेळ ह्याची जेथे गांठ पडेल तेथेच आघात करतो.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 5, 2020
रेणुका आर्ट खुले ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या साहित्य संमेलनात माझा सहभाग लक्षनिय होता पण दुसर्या साहित्य संमेलनात मनात असतानाही सहभागी होणे मला शक्य झाले नव्हते. पण तेंव्हाच तिसर्या साहित्य संमेलनात आपला सहभाग असायलाच हवा असं मी मनाशी पक्क ठरवलं होत. त्यामुळे या तिसर्या ई-साहित्य संमेलनातील काही उपक्रमात मी सहभागी झालो. खरं म्ह्णजे माझी व्यक्तीशः सर्वच उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा होती पण नाही शक्य झाले.
ई-साहित्य संमेलन ऑनलाईन सारख्या संमेलनांची मराठी साहित्याची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आवश्यकता आहे. हे संमेलन आयोजित करणे हे खरं म्ह्णजे खूपच धाडसाच काम आहे ते धाडस आसावरीजी आणि आयोजक आनंदाने करतात म्ह्णून त्यांचे आभारच मानायला हवे. या ई-साहित्य संमेलन ऑनलाईनच्या माध्यमातून मराठी साहित्याची चळवळ वाढावी म्हणून मोलाचा हातभार लागत आहे. या ई-साहित्य संमेलन ऑनलाईन उपक्रमामुळे मला व्यक्तीशः माझा साहित्यिक दर्जा ठरविण्यासाठी मदतच होते कारण आपल्या साहित्यावरील नामवंत लेखक कवींनी केलेली समिक्षा आपल्याला वाचायला मिळते त्यसोबत आपल्या साहित्यातील त्रूटी ही आपल्या लक्षात येण्यास मदत होते.
प्रत्यक्ष कोणत्याही साहित्य संमेलनाला उपस्थित राहणे मला कधीच शक्य झाले नाही पण या साहित्य संमेलनामुळे अप्रत्यक्ष का होईना तीन साहित्य संमेलनाला माझी हजेरी लागली. बर्याचदा कवी आणि लेखकांना तेच ते प्रकाराचे साहित्य लिहून बर्याचदा कंटाळा आलेला असतो या साहित्य संमेलनामुळे नवीन काही तरी लिहण्यास साहित्यिकांना प्रेरणा मिळते निदान तसा प्रयत्न तरी करण्याची इच्छा निर्माण होते.
खरं म्ह्णजे ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे हे व्यासपीठ नवोदित साहित्यिकांसाठी फारच महत्वाचे व्यासपीठ ठरायला हवे होते पण दुदैवाने ते तसे ठरताना दिसत नाही कारण या ई-साहित्य संमेलन ऑनलाईन मध्ये सहभागी झालेले सारेच लेखक कवी बर्यापैकी नावाजलेलेच आहेत. या अशा साहित्य संमेलनातून नवोदितांचा सहभाग अपेक्षित असतो तो दिसला नाही याचा अर्थ या साहित्य संमेलनाची प्रसिद्धी कमी पडली असं म्ह्णता येईल पण त्यासाठी आयोजक नाहीत तर तांत्रिक आणि आर्थिक अडचणी जबाबदार आहेत हे लक्षात घ्यायलाच हवे. आयोजकांनी हे ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे आयोजन करून एक प्रकारे साहित्य सेवाच केलेली आहे. त्यामुळे सहभागी साहित्यिकांनी त्यांचे आभार मानायलाच हवेत पण यापुढेही हा उपक्रम सुरू राहावा म्ह्णून ज्याला जी मदत करणे शक्य आहे त्याने ती करायलाच हवी.
या संमेलनात फक्त आपला सहभाग नोंदवला म्ह्णजे आपली जबाबदारी संपत नाही तर ती उलट वाढते कारण मराठी साहित्यासाठी काही तरी करण्यासाठी आपण तेंव्हा एक पाऊल पुढे टाकलेले असते. आजच्या आघाडीच्या लेखकांना ही संगणकाचा वापर तितकासा सफाईदापणे करता येत नाही त्यामुळे ही बरेच साहित्यिक या उपक्रमात सहभागी होण्याचे ठाळत असावेत तर मला व्यक्तीशः असं वाटत की त्यांच साहित्य इतर कोणाच्याही मदतीने या ई-साहित्य संमेलन ऑनलाईनच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहविणे शक्य असायला हवं होतं.
या उपक्रमात साहभागी होणार्यांची संख्या वाढायला हवी होती खास करून वाचकांची पण ते होताना दिसत नाही. वाचकांपर्यत पोहचण्यासाठी या माध्यमातून एक स्वतंत्र संकेतस्थळ तयार केल्यास बर्याच गोष्टी सोप्प्या होतील. ते शक्य होईल तेंव्हा होईल पण तोपर्यत हा ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे चा उपक्रम सुरू राहायलाच हवा...
-- निलेश बामणे
February 25, 2016
सावरकर विज्ञाननिष्ठेचे कट्टर पुरस्कर्ते होते. कोणतीही गोष्ट विद्यानाच्या कसोटीवर पारखल्याशिवाय ती आचरणात आणायची नाही ही त्यांचे सांगणे होते. राष्ट्राची प्रगती व्हावी व ती विज्ञाननिष्ठेनेच होईल अशी त्यांची धारणा होती.
October 8, 2022
दोन पूर्णतया भिन्न वस्तुंमधे सम्बन्ध अर्थात समानता दाखविणारी कविता म्हणजे ‘सम्बन्ध’
September 21, 2010
आजही लहानपणचा तो किस्सा आठवला की मलं खूप खुप हसू येतं.ते झाड,ते सणाचे वातावरण,त्या परंपरांना मी खुप मिस करतो. त्या सगळ्या गमती जमती आता इतिहास झाल्यातं असं वाटाया लागतं..आताशा गावंही बदललीतं,हिरवाई कमी होऊन तिथबी सिमेंटचे जंगलं वाढलीतं.काळासंगटच परंपराबी बदलल्यातं…आठवणी मात्र तशाच आहेत….!!!
February 3, 2026
मतकरींची एकटाकी लेखणी अधिक प्रभावी , चित्रदर्शी वाटली. माध्यमांतरात अशा तुलना अपरिहार्य , पण चित्रपट कादंबरीच्या आसपास पोहोचू शकला नाही. सगळं इंटेन्स नाट्य डायल्युट झालं आणि त्यामुळे निराशा झाली. चित्रपट ही सामूहिक घटना असली तरी मतकरींच्या एका लेखणीपुढे प्रभाव निर्माण करण्यात समूह पराभूत झाला.
January 9, 2021
गोडांब्या कडे बघूनच कोणालाही डेरेदार वृक्ष प्रत्यक्षात कसे असतात हे लगेच लक्षात येईल. भरगच्च पानांनी नेहमी बहरलेल्या गोडांब्याच्या खाली मे महिन्याच्या गर्मीत सुद्धा थंडगार वाटते. त्याच्या शितल छायेत एकदा बसल्यावर पुन्हा संध्याकाळ होईपर्यंत उठायची इच्छाच होत नाही.
August 1, 2021
शेक्सपिअर म्हणतो, ‘नावात काय आहे?’ तर नावातच खूप काही आहे.. कसं? ते बघाच. जगातील कोणत्याही देशांपेक्षा, आडनावांची विविधता फक्त भारतातच आहे.. त्यातूनही महाराष्ट्रात तर, या बाबतीत आडनावांनी कहरच केलेला आहे.
June 25, 2022
जेव्हा मी माझ्या पहिल्या जहाजावर ज्युनिअर इंजिनिअर म्हणून जॉईन झालो तेव्हा तिथल्या इंजिन कंट्रोल रूम मध्ये असलेला स्वीचबोर्ड पहिल्यांदा बघितल्याक्षणी शॉक्ड झालो, मनात आले, आयला हे कुठं येऊन फसलो आपण.
November 8, 2021

अंधार दाटून आला होता, आणि रवींद्र त्या अंधारात चालत जात होता. आजूबाजूला किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र रातकिड्यांचा आवाज कानात घुमत होता तर पायाखालची माती काटे, गवत, लहान खडे यांनी चालायला अडथळा आणत होती. पण रवींद्रचे लक्ष पुढे काळोखात जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या व्यक्तीवर खिळले होते आणि पुसट दिसत असणाऱ्या त्या व्यक्तीच्या मागे तो भान हरपल्या सारखं चालत जात होता. ना त्याच्या हातात टॉर्च किंवा काही दिवा नव्हता, ना त्या पुढे चालत असलेल्या व्यक्तीच्या हातात काही होते, केवळ चंद्राच्या प्रकाशात दिसेल एवढ्याच प्रकाशात ती व्यक्ती चालत होती पण, पायाखालची वाट, ती जागा, त्या व्यक्तीला अगदी तोंडपाठ असल्यासारखी वाटत होती. उलट रवींद्रचे लक्ष त्याच व्यक्ती कडे असल्याने तोच मधे मधे अडखळत होता, त्या व्यक्तीच्या हातात काहीसं असल्यासारखं त्याला दिसलं होत.
October 26, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti