(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सीएन टॉवर ….. एक आधुनिक आश्चर्य !

    गगनभेदी इमारती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. गाईड त्यांचे महत्व विषद करीत होता. फर्स्ट कॅनेडियन प्लेस (1165 फूट), कॉमर्स कोर्ट वेस्ट (942 फूट), ट्रुंप इंटरनॅशनल हॉटेल अँड टॉवर (908 फूट), स्कोशिया प्लाझा (902 फूट), टीडी कॅनडा ट्रस्ट टॉवर (862 फूट), टोरेंटो डोमिनियन बॅंक टॉवर (732 फूट) अशा एका पेक्षा एक टोलेजंग व ऐतिहासिक इमारती प्रेक्षकांना आकर्षित करीत होत्या. पण मला ओढ लागली होती ती सीएन टॉवर पहाण्याची !

  • बायको माहेरी जाणे – एक दुःखद (सुखद) प्रसंग

    प्रत्येक विवाहित पुरुषाच्या आयुष्यात बायको माहेरी जाणे असे आनंदाचे प्रसंग येतात. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी असा प्रसंग आला आणि तिला एकट्यालाच माहेरी जाणे आवश्यक असेल तर तशी (खुश) खबर बायकोच तुमचा मूड बघून अतिशय लाडीकपणे सांगते. काही वेळेस तुम्हाला देखील सोबत येण्याचे आग्रही निमंत्रण असते. तुम्हाला ऑफिसच्या कामातून सुटी मिळणे अशक्य असेल तर सूट मिळू शकते.  पण अशा वेळेस तुमच्या कौशल्याचा कस लागू शकतो.

  • सहजीवन

    .. आजही टेरेसवर येणारी दोन कबुतरे माझ्या तळहातावरील तांदूळ निर्धास्तपणे खात असतात. पण आधी बोटांच्या पेरांवर चोच मारून धोका नसल्याची खात्री न चुकता करतात. सहनिवासात (Society) राहणार्‍यांशी सलोखा ठेवताना या पाहुण्यांचा सहवासही किती प्रेरणादायी असतो नाही का? सहजीवन म्हणजे आणखी काय असते?

  • हानाबी (जपान वारी)

    हानाबी म्हणजे आतिषबाजी (fireworks). फरक एवढाच की आपल्याकडे दिवाळी सारख्या फेस्टिवल साठी आतिषबाजी केली जाते इथे अतिषबाजीसाठी हा फेस्टिवल.फटाके हा शब्द अपुरा वाटावा अशी सुंदर सजावट. अतिशय विलोभनीय दिसणारी आणि आपल्या प्रकाशाने का होईना रात्रीचा अंध:कार नाहीसा होऊ दे अशी प्रार्थना करणारी अशी हानाबी!

  • प्रवासातील चित्तथरारक प्रसंग

    आजूबाजूचं सौंदर्य नजरेने टिपत असताना काही मिनिटातच एकदम आरडाओरडा ऐकायला आला. समोर बघितलं तर मी सोडून दिलेली ‘गोंदोलो बोट’ पाण्यात पूर्णपणे उलटली होती. सर्वजण गंटागळया खात होते. जीवाच्‍या आकांताने ओरडत होते.

  • नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग ४

    आतापर्यंत आपल्या देशात असल्यामुळे कोणीतरी ओळखीचा मिळेल, अशी एक शक्यता होती. मात्र जिथे कोणीच ओळखीचा भेटणार नाही, अशा संपूर्ण अज्ञात, अनोळखी प्रदेशात आम्ही निघालो होतो. कलकत्त्याहून बांगलादेशला न जाताच परत नागपूरला जाण्याची नामुष्की येते की काय? अशा परिस्थितीतून वैध परवाना मिळवून, अर्धी लढाई आपण जिंकल्याचा आनंद आणि अभिमान आम्हाला वाटत होता.

  • विज्या

    विजय बारा वर्षाचा होता . गावात याला सगळे विज्या म्हणूनच हाक मारायचे. समुद्राच्या काठावर वसलेले ते छोटेसे कोकणातले मच्छीमारांचे गाव. बहुतांशी कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारीवरच चालायचा. विज्याच्या वडिलांची पण एक होडी होती. गावातली चार पाच लोकं त्याच्या होडीवर कामाला होती. एकत्र कुटुंब असल्यामुळे विज्याच्या घरी माणसांचा राबता खूप होता. विज्याला दोन भावंड होती, नववीत असलेला एक मोठा भाऊ आणि त्याच्याहुन लहान असलेली एक बहीण. त्याच्या काकाला पण चार मुले होती त्यामुळे घरी सात जणांची ही टोळी खूप मस्ती करायची.

    मासेमारी करणाऱ्या गावातील होड्या संध्याकाळी समुद्रात जाऊन पहाटे पर्यंत परत यायच्या. आजकाल मोबाईल ची सोय झाल्यामुळे एक बरे झाले होते, माशाचा भाव किनाऱ्याला यायच्या आधीच व्यापारी ठरवून सकाळी टेम्पो हजर करायचे. उरली सुरली छोटी मासळीच कायती लोकल बाजारात जायची.

    विज्या हे सारे लहानपणापासून बघत आला होता. विज्याला अभ्यासात चांगली गती होती त्यामुळे घरातल्यांच्या अपेक्षा त्याच्याकडून फार होत्या. त्याने चांगले शिकून मुंबईला नोकरी करावी असेच सर्वांना वाटत होते. पण विज्याच्या मनात मात्र मासेमारी बद्दल भलतेच कुतूहल होते. कित्येकदा त्याने बाबा कडे रात्री होडीवर यायची इच्छा बोलून दाखवली होती पण त्याला सतत नकार मिळत होता.
    *********
    गणपती दोन दिवसांवर येऊन ठेपले होते. चतुर्थी चा सण म्हणजे कोकणातली दिवाळीच. घरातील प्रत्येकजण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत गुंतला होता. शाळांना पण सुट्ट्या पडलेल्या त्यामुळे बच्चे कंपनी पण घरीच होती. संध्याकाळी दिवेलागणीची वेळ झाली आणि घरच्यांच्या लक्षात आले विज्या कुठे दिसत नाहीएय. गावात शोधाशोध सुरू झाली. सुरुवातीला वाटले कुठल्या तरी मित्राच्या घरी असेल पण कुणाच्याच घरी नाही हे आढळल्यावर मात्र सगळ्यांचेच धाबे दणाणले. गावकऱ्यांनी गावातली सारी ठिकाणे पालथी घातली पण विज्याचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. त्याच्या आईने तर एव्हाना रडायला सुरुवात केली होती. आता पोलिसांना कळवावे असे सर्वांचे मत पडले. पण त्या अगोदर कुणीतरी त्याच्या वडिलांना होडीवर फोन केला. त्यांना घडल्या प्रकाराची कल्पना दिली. ते पण चिंतेत पडले. त्यांनी लगेच इतर खलाशांना परत किनाऱ्या च्या दिशेने होडी घेण्यास सांगितले. सारेच जण चिंतेत होते. होडीवरचे सारे जण विज्याच्या वडिलांची समजूत काढत होते. पण बापाचा जीव पार टांगणीला लागला होता.

    **********

    विज्या बसल्या जागी एकदम अवघडून गेला होता! होडीच्या सतत खालीवर होण्याने त्याच्या पोटात माळमळायला पण लागले होते. त्याच्या कानावर त्याच्या बाबाचे आणि इतर खलाशांचे बोलणे पडत होते. समुद्रात मासेमारीसाठी जायला मिळावे म्हणून तो कधीपासून हा प्लॅन बनवत होता. संध्याकाळी समुद्रात होडी लोटायच्या आधी सगळ्यांची नजर चुकवून तो बुडाशी लपून बसला होता. एवढा सगळा मोठा प्रकार होईल याचा त्याने विचारच नव्हता केला नव्हता. आता आपल्याला पडणाऱ्या माराच्या विचाराने तो जागच्या जागी थिजून गेला होता. लपण्याच्या जागेतून बाहेर येऊन वडिलांसमोर उभे राहण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती. त्याला आता खूप रडायला येत होते.

    होडी जेवढ्या वेगाने शक्य होईल तेवढ्या वेगाने किनाऱ्याकडे जात होती तेवढ्यात एक खलाशाला हुंदक्यांचे आवाज ऐकू आले. त्याने वाकून पाहिले असता थर थर कापत आणि हुंदके देऊन रडत असलेला विज्या नजरेस पडला!

    “अरे तू हय काय करतंस?” तो खलाशी जोरात ओरडला

    ते ऐकल्या बरोबर विज्याच्या रडण्याचा जोर अजून वाढला! आता काय प्रकार नक्की झालाय तो सगळ्यांच्या लक्षात आला. लपलेल्या जागेतून विज्या बाहेर यायला तयार नव्हता!

    “विज्या, भायर ये” त्याच्या बाबाने ओरडून सांगितले.

    “बाबा , मारू नको… मिया चुकलंय.. परत नाय करूंचय” विज्या रडत रडत बोलत होता.

    बाबाने मारणार नाही असे आश्वासन दिल्यावरच तो बाहेर आला. बाबाने सर्वात प्रथम घरी फोन लावून विज्या मिळाल्याची खबर दिली तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला!

  • मृत्युंजय

    मंत्रोच्चारयुक्त जप हा झाला आध्यात्मीक उपासनेचा एक भाग.मनुष्य जेव्हा रोग व्याधींनी त्रस्त होतो तेव्हा त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज भासते व तो दैवी शक्तीच्या उपासनेकडे वळतो.आपणास आरोग्य देतो “सुर्य “व मारक शक्ती ही त्याचाच पुत्र “यम “याकडे असते.त्या दोघांचा कर्ता शिव.म्हणुनच त्यांच्या कृपेच्या अपेक्षेत गायत्री व मृत्युंजय मत्रांचे अनन्य महत्व आहे.मृत्यु अटळ असला तरी त्याच्या अनुषंगाने अवती- भोवतीच्या स्नेहजनांना येणार्या भितीवजा वलया ला सुसह्य करता आले तरी तो जणु मृत्यूवर विजयच म्हणजे “मृत्यूंजय” ह्या कल्पनेवर आधारित प्रस्तुत लेखात विद्यमान परिस्थीतीचा आढावा घेत विविध दृष्टीकोनांना हाताळीत, मृत्युनंतर काय ह्या प्रश्नचिन्हाला अलगद स्पर्श केला आहे.

  • नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्याबरोबर `संवाद’ लाईव्ह

    नागपूरकडल्या परिसरातील एका सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या प्रेमानंद गज्वी यांना एकांकिका आणि नाट्यलेखनाने आकृष्ट केले. पुढे १९८०-१९८५च्या सुमारास ते मुंबईला आले आणि त्यांची प्रतिभा अधिकच पल्लवीत झाली. ‘देवनवरी'(१९८१), ‘तनमाजोरी'(१९८४), ‘वांझ माती'(१९८४), ‘जय जय रघुवीर समर्थ'(१९८८), गांधी-आंबेडकर(१९८८), ‘किरवंत'(१९९१), ‘पांढरा बुधवार'(१९९५) अशी एकाहून एक सरस नाटके त्यांनी लिहिली *आणि विद्यमान मराठी नाटककारांच्या मांदियाळीत त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले.

  • नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग ५

    आम्हाला मुजीबुर रहमान यांचे पहिले दर्शन झालं ते एका कुठल्यातरी कार्यक्रमात! ते व्यस्त होते. त्यावेळी त्यांच्या बाजूला कोणी जवळ जाऊ नये म्हणून बॉडीगार्ड होते. संबंधिताशी आम्ही बोललो. दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी भेटायला वेळ दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांच्या घरी ३२ धनमंडी या पत्त्यावर गेलो. तो दोन मजली बंगला होता. सकाळी त्यांच्यासोबत चहा घेतला. त्यांनी आमचं कौतुक केलं आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला. अतिशय प्रसन्न सहृदय आणि प्रेमळ व्यक्तिमत्व होतं. इतका साधा प्रेमळ माणूस अशा लढ्याचे नेतृत्व करू शकतो? यावर विश्वास बसत नव्हता. पण ते सत्य होतं.