नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
जो पर्यंत माणसाला आरशात तो स्वत: दिसत नाही, तो पर्यंत तो स्वत:चं आणि इतरांचं आयुष्य बदलू शकत नाही..
June 23, 2018

न रडणारं, बुटांचा आवाज ऐकत स्तंभित झालेल, नुकतंच जन्मलेलं बालक इतकं बोलकं असू शकतं? कुणास ठाऊक, कॅमेऱ्याची करामतअसावी. टोपलीत ठेवून ते मूल अलगद छोट्या ओहोळात सोडलं जातं. वाहत वाहत पुढे पुढे जात राहतं. अजूबाजूचा प्रदेश बदलत जातो.
May 4, 2022
थोरामोठ्यांचे आदर्श तर आपल्यासमोर असतातच पण या चिमुकलीनेसुद्धा जाता जाता नकळतपणे नक्कीच एक आदर्श घालून दिला होता.(स्वानुभवावरून प्रेरित कथा)
November 2, 2022
थोर भारतीय संस्कृती’‘असें आपण सदासर्वदा म्हणत असतो, आपल्याला या संस्कृतीचा अभिमानही असतो. संस्कृतीतील चांगल्या गोष्टीबद्दल अभिमान असणें रास्त आहे ; पण संस्कृतीचें हेंही दुसरें, अयोग्य, हीन रूप आहे, आणि त्याला राजमान्यता होती , ‘शिष्टजनां’ची मान्यता होती, हेंही आपण विसरतां कामा नये.
March 9, 2019
पोपट नामक एका तरुणाचे लग्न झाले होते . (येथून पुढे याला पोपट्या म्हणायचे . लग्न झालेल्यांना फारशी किंमत द्यायची नसते . जेष्ठ नागरिक झाल्यावर पोपटराव वगैरे म्हणता येईल . तोवर पोपट्याच ! )साधारण चार सहा महिन्यांनी त्याचा ‘नव्या लग्नाचे ‘नऊ दिवस संपले . आणि त्याला आपल्या बायकोतले काही दोष जाणवू लागले .
July 14, 2018
जळतं आहे प्रजासत्ताक आणि मी जिवंत आहे त्या आगीच्या झळया खात
मेले आहेत माझे मित्र आणि माझं आयुष्य बनलंय एक आफत.
माझ्या मातेचा पदर भिजलाय रक्तानं आणि अश्रूंनी
माझी प्रियतमा आणि माझे लोक वाहून गेलेत, जळून गेलेत
मी कसा वेड्यासारखा म्हणतोय, अजूनही ते दिवस येतील
डोंगराला वेढणारा प्रकाश आगीचा नसेल, सूर्याचा असेल…
January 26, 2011
एक दिवस एक व्यक्ती स्वर-मंचच्या ऑफिसमध्ये आली. त्यांचे नाव संजय पवार. रूबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खर्जामधील लक्षात राहण्यासारखा आवाज. एका निराळ्या कामासाठी ते भेटायला आले होते. पण समोर हार्मोनियम पाहून त्यांनी चक्क गाणे ऐकवण्याची विनंती केली. हा माणूस गझलचा निस्सीम चाहता होता. त्यांचे काम काही झाले नाही. पण आमची मैत्री झाली. लवकरच त्यांनी 'प्रेशिया फार्मा' नावाची स्वतःची कंपनी काढली. या कंपनीसाठी लोणावळा येथे माझा गझलचा कार्यक्रम आयोजित केला. तेव्हापासून त्यांचा असा एकही समारंभ नाही की ज्यासाठी मी उपस्थित नाही. स्वर-मंचचाही असा एकही कार्यक्रम नाही ज्याला ते उपस्थित नाहीत. गाण्यामुळे असे अनेक चाहते आणि मित्र मला मिळाले.
माझ्या पुढील गझलच्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक सुरेश सरैय्या यांची उपस्थिती लाभली. काही कार्यक्रम महाराष्ट्राबाहेर केल्यानंतर आषाढी एकादशीनिमित्त 'विठ्ठल विठ्ठल' हा अभंगांचा कार्यक्रम अरविंद खेर यांच्या स्वबोध परिवारासाठी गडकरी रंगायतनमध्ये सादर केला. यावेळी 'हरिपाठ जसा समजला तसा' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. नंतर 'गाणी आवडणारी' हा मराठी व हिंदी लोकप्रिय गाण्यांचा कार्यक्रम आम्ही स्वर - मंचतर्फे केला.
याच वेळी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन माझ्या नकळत सुरू झाले होते. माझ्या नातलगांनी, मित्रमंडळींनी, पत्नी प्रियांका आणि मुलींनी माझ्या पन्नासाव्या वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम करायचे ठरवले होते माझे मित्र हेमंत रणदिवे यांनी माझा आवडता सेरेमोनियल हॉल बुक केला होता. कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था केली होती. आमच्या स्वर - मंच अॅकॅडमीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी गाण्याचा कार्यक्रम बसवला होता. मला याची कोणतीही कल्पना नव्हती. 'वाढदिवसाच्या दिवशी कुठेही कार्यक्रम घेऊ नका हं बाबा!' एवढेच शर्वरी आणि केतकी मला म्हणाल्या होत्या. माझी आईदेखील त्यांनाच सामील होती. १४ ऑक्टोबर २०१२ रोजी सकाळी देवदर्शनाला जाऊ या म्हणून मला या मंडळींनी सरळ हॉलवर नेले. तिथे माझी वादक कलाकार मंडळी आणि गाण्याच्या कार्यक्रमाची तयारी पाहून मी काय ते समजलो. हे एक मात्र छान केले. माझा पन्नासावा वाढदिवस गाण्याशिवाय कसा होणार? आणि माझ्या विद्यार्थ्यांनी खरोखरच अतिशय प्रेमाने गाण्याचा छोटा कार्यक्रम सादर केला. माझ्या दोन्ही मुली शर्वरी आणि केतकी या कार्यक्रमात गायल्या. गाण्यावरील प्रेमाचा प्रवाह पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला होता. मला तरी अजून काय हवे होते? मला पन्नास दिव्यांनी ओवाळण्यात आले. माझ्या सर्व नातेवाईकांनी आणि मित्रांनी अभिष्टचिंतन केले. गाण्यासाठी मला सांगण्यात आले. कोणतीही पूर्वतयारी न करता स्टेजवर होणारा हा माझा पहिलाच कार्यक्रम होता. तसेच कोणतीही मेहनत न घेता आयोजित होणाराही हा माझा पहिलाच कार्यक्रम होता. या सर्व जिवलगांनी एक अलोट समाधान मला दिले. छोट्या केतकीने 'हॅप्पी बर्थडे बाबा' असे स्वतः रंगवलेले ग्रिटींग कार्ड मला दिले. आत्तापर्यंत मला मिळालेली ही वाढदिवसाची सर्वात मोठी गिफ्ट होती.
-अनिरुद्ध जोशी
August 17, 2022
सर्वसाधारणपणे सिनेरसिकांना, या दोघींमध्ये सुश्मिता आवडते. कारण ती आपल्यातील वाटते. उलट ऐश्वर्या ही सुंदर असली तरी एखाद्या कचकडी बाहुलीसारखी वाटते. तिचं सौंदर्य हे संगमरवरी पुतळ्यासमान वाटतं.. सुश्मिता ही हाडामासाची रेखीव शिल्प वाटते.. शेवटी काय, दोघीही गोडच आहेत.. एक पुन्हा पुन्हा घ्यावी अशी खीर, तर दुसरी तब्येतीला जपून मागावी, अशी बासुंदी!!
July 8, 2022
परमेश्वरच्या मनात एका पासून अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली आणि सृष्टीच्या निर्मितीची सुरवात झाली. वैज्ञानिक भाषेत याला “बिग बैंग” असे म्हणतात. त्या क्षणापासून परमात्मा रचित प्रत्येक जीव “एका पासून अनेक होण्याची” इच्छा मनात धारण करून सृष्टी निर्मितीची परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहे. एक कोशकीय जीव स्वत:ला विभाजित करून एका पासून अनेक होते. परमेश्वराने स्त्री-पुरुष या रूपाने मानवजातीची निर्मिती केली आहे. अन्य जिवांप्रमाणे ‘एका पासून अनेक होण्याची’ परमेश्वरी इच्छा मानवा मधे ही आहे.
August 4, 2011
बाहेरचे दिवे किती लखलखत असले तरी समयीतील मंद. पवित्र ज्योत एक वेगळाच आनंद देते. नुसताच आनंद नाही तर एक फार मोठे सत्य सांगते. सगळीकडे अंधार झाला की माणसाच्या मनात देखिल नको ते विचार येतात. अधांराची भिती वाटते मन अस्वस्थ होते. आणि एक छोटीशी मिणमिणता दिवा लावला तरी धैर्य येते. आत्मविश्वास वाढतो.
December 27, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti