(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वृक्षवल्ली

    निसर्गाशी माणसाचं नातं फार पुरातन काळापासून आहे. आपल्या बोलण्यातून कित्येक झाडं, झुडपं, रोपं, फळा-फुलांचे संदर्भ सहजपणे येत असतात.. त्यामुळेच संत तुकाराम महाराजांनी म्हटलेला अभंग माणसांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो.. वृक्षवल्ली आम्हा, फक्त सोयरीच नाही तर ती आमच्यात भिनलेली आहेत..

      July 28, 2021


  • निरागस लिली

    खरं पहाता, ती एक हिंदी सिने अभिनेत्री.. मात्र तरीदेखील तिच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटते.. कारण आपण तारुण्यात असताना, तिचा अभिनय आपल्याला मनापासून आवडलेला असतो.. तिची मनातील ‘मोहक’ छबी, ही कधीही पुसली जात नाही.

      September 22, 2021


  • प्रशंसेला दूरच ठेवा

    आपली प्रशंसा केलेली कोणाला आवडत नाही? उलट सर्वांनी सदासर्वकाळ आपली प्रशंसाच करावी असेच अनेकांना वाटत असते. परंतु अशा प्रशंसेमुळे गर्व निर्माण झाल्यास कधी कधी आपल्या कार्यात तो व्यत्यय आणू शकतो. म्हणून प्रशंसेला सहसा भुलून जाऊ नये. यासंदर्भात आचार्य विनोबा भावे यांचे एक उदाहरण खूपच बोलके आहे. महात्मा गांधी यांची विचारसरणी प्रमाण मानून आचार्य विनोबा भावे यांनी पवनारला आपला आश्रम सुरू केला. त्या वेळी तेथे जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज हे काही काळ शिकण्यासाठी म्हणून आले होते. एकदा विनोबाजी चरख्यावर सूत कातत बसले असता तेथे त्यांना कोणीतरी पोस्टाने आलेली काही पत्रे आणून दिली. त्यातील एक पत्र महात्मा गांधी यांचे होते. विनोबाजींनी ते पत्र वाचले व लगेच ते फाडून फेकून दिले. या वेळी कमलनयन बजाज तेथेच होते. त्यांना विनोबाजींच्या कृत्याचे आश्चर्य वाटले. विनोबाजींच्या माघारी त्यांनी त्या पत्राचे फाडलेले तुकडे गोळा केले व एकत्र करून वाचले. त्या पत्रात महात्माजींनी विनोबांना लिहिले होते, 'तुमच्याइतकी महान व्यक्ती अजून तरी माझ्या पाहण्यात नाही'. खरे तर महात्माजींचे हे प्रशंसापत्र विनोबाजींनी ज्याला त्याला दाखवायला पाहिजे होते. परंतु ते त्यांनी फाडून टाकले होते. म्हणून कमलनयन बजाज यांनी विनोबाजींना त्यासंबंधी विचारणा केली असता ते म्हणाले की, अशी पत्रे जपून ठेवणे हा मोह आहे. कारण त्यामुळे मला गर्व उत्पन्न होईल व गर्वाने फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. त्यामुळे ते पत्र जवळ बाळगणे म्हणजे माझे एका परीने नुकसानच होते. अर्थात, त्या महात्मा गांधीजींनी मजविषयीच्या ज्या प्रेमाने ते पत्र लिहिले होते तो प्रेमाचा भाग मी आधीच काढून घेतलेला आहे. बाकींचे नष्ट करण्यातच माझा फायदा होता व म्हणून ते पत्र मी फाडून टाकले. विनोबाजींचे हे तर्कशुद्ध विवेचन ऐकून कमलनयन बजाज यांचे अर्थातच समाधान झाले.

      February 9, 2017


  • ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र

    सकाळी सात च्या सुमारासच त्या परिसरात गेल्याने धुक्याची अंधुकशी चादर पसरली होती. मध्येच एखाद्या वाडीतील दोन चार घरातून बाहेर पडणारा धूर धुक्यात मिसळताना दिसत होता. अधून मधून येणाऱ्या पावसाच्या लहान लहान सरींनी पळसाच्या पानांवर पावसाचे टपोरे थेंब खाली पडायच्या अवस्थेत खोळंबल्यासारखे दिसत होते.

      July 30, 2021


  • गंगेच्या उगमापाशी- गोमुख -भाग १

    प्राचीनकाळी इक्ष्वाकु वंशातील महापराक्रमी, प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करणारा पुण्यशील चक्रवर्ती सगर राजा राज्य करत होता. या सगर राजाला साठ हजार पुत्र होते व ते सर्वजण आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी होते. एके दिवशी सगर राजाला अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झाली. त्याने ऋषीमुनींचा सल्ला घेतला. सर्वांनाच ही कल्पना आवडली. यज्ञाची सिद्धता झाली. अश्वमेध यज्ञाचा घोडा सिद्ध झाला.

      August 22, 2022


  • बालकुमार -कथा – मोन्या

    आपल्याला मित्र असणे कित्ती छान असते नाही का ? मित्राबरोबर खूप गप्पा मारता येतात,खेळता येते आणि खेळता खेळता भांडता सुद्धा येते, मित्रशिवाय आपल्याला करमत नसते हे तितकेच खरे.

      January 10, 2019


  • सुपारीचं खांड

    व्यसनांच्या यादीमध्ये वरती कितीही विविधता असली तरी सर्वांत खालचे पापभिरू व्यसन हे सुपारीचेच मानले जाते. हे नगण्य आहे, अशी समाजाची ठाम समजूत आहे.

      December 19, 2021


  • बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १४ – स्थितप्रज्ञ सावरकर

    सावरकर यांनी  लहानपणापासून सतीच वाण पत्करले होते. हजारोंच्या घरी पुढेमागे सोन्याचा धूर निघावा म्हणून आपली चूल बोळकी वयाच्या विसाव्या वर्षी फोडून टाकली होती.

      October 10, 2022


  • ओवणे, पटवणे, गाठवणे

    मंगळसूत्र मण्यांच्या आकारानुसार दोर वळली जायची. दोन पदरी साठी चार दोऱ्या व लांबी पण ठरलेली. पायाच्या पिढंरीवर पाणी लावून दोर वळली की मग चारपदरी दोर आणि ते सगळे एकत्रित करून दोन सोन्याचे मणी नंतर दोन सोन्याच्या वाट्या मध्ये एक मणी परत दोन वाट्या असे ओवून झाले की मग तीन पदर पायाच्या अंगठ्याला पीळ देऊन अडकवून एक पदरी दोऱ्या काळे मणी ओवून मग असे आळीपाळीने चार पदर ओवून झाले की देवा समोर पाट मांडून घरातील एखाद्या मोठय़ा सवाष्णी कडून त्या मंगळसूत्राला हळदीकुंकू लावून बांधून घेवून झाले की देवाच्या व त्या बाईच्या पाया पडायला लागायचे.

      July 15, 2022


  • शब्द, अक्षर, भाषा : कृपया ‘चारोळी’ म्हणूं नका

    चार ओळींच्या काव्याला ‘चारोळी’ म्हणून संबोधण्याची पद्धत गेली कांहीं वर्षें बळावली आहे. कुण्या कवीनें तें नांव चार ओळींच्या (विनोदी व हलक्याफुलक्या) कवितेला दिलें, व योगायोगानें तेंच नांव मराठीत रूढ झाले. चारोळी म्हणजे अर्थातच, ‘चार ओळी’ . तसेंच, चारोळी हा पदार्थ बदाम-पिस्ते-काजू यांच्यासारखा सुका मेवा. खाण्याच्या अनेक पदार्थांमध्ये चारोळी वापरतात. त्या संदर्भातील अर्थ , काव्याचें ‘चारोळी’ हें नामाभिधान करतांना , त्या कवीच्या होता की काय, नकळे.

      June 15, 2017