नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

दुसऱ्या दिवशी सकाळी, चहा नाष्टा झाल्यावर सगळ्यांनी गढीवर जायचे ठरले. वाटेत मॅनेजर केळकर आणि गढीतील विहीर बुजवायचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्यासोबत गढीवर येणार होता. ठरल्याप्रमाणे वाड्यावरून निघताना दीने केळकरांना फोन करून मंदिराच्या पायथ्याशी थांबण्यास सांगितले. थोड्याच वेळात ते पायथ्याशी पोहोचले. केळकर दुसरी गाडी घेवून आले होतेच. मग सगळेजण बरोबर गढीच्या दिशेने निघाले. आरूला आणि नीलला कधी एकदा गढीपाशी जातो असे झाले होते. थोड्याच वेळात ते सगळे गढीच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचले. लांबून पाहून गढी किती मोठ्ठी असेल याचा काहीच अंदाज आला नव्हता. पण मुख्य दार आणि बाजूची तटबंदी पाहिल्यावर गढीची भव्यता नजरेत मावत नव्हती. भिंतीच्या टोकाला दोन्ही बाजूला मोट्ठे भक्कम ३५ ते ४० फूट उंचीचे बुरूज होते. गढीची दर्शनी भिंत आणि बुरूज यांचे २० फुटा पर्यंतचे बांधकाम दगडी होते आणि त्यावर उरलेले बांधकाम विटातील केलेले दिसत होते. गढीच्या तटबंदीवर आणि बुरुजावरील सज्जात बंदुकी ठेवायला केलेल्या जंग्या दिसत होत्या. काही ठिकाणी कोनाडे दिसत होते. तटबंदीच्या कपारींमधून लहान मोठी झुडुपे डोकावत होती.
September 28, 2019
सर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते.
लहान मुलगी कुमारिका विवाहित स्त्री माता, ह्या सर्व भूमिका, तिने जगाच्या व्यासपिठावर केलेल्या असतात. तिने जीवनाचा संसारिक अनुभव अनेक प्रसंगातून घेतलेला असतो. आजपर्यंत ती जीवनाची गाठोडी, केवळ जमा करण्यातच व्यस्त होती. आज्ञा ऐकणे पाळणे, वा करणे, ह्याच कार्यचक्रात ती गुंतलेली होती. आता ती परिपक्व भूमिकेत आलेली आहे. येथे जे जे आजपर्यंत जमा केलेले होते ते सारे वाटीत जाणे आता तिचे काम झाले आहे. निसर्ग चक्रानुसार घटनाची सतत पुनुरावृती होत असते. तशाच गोष्टी थोड्याश्या फरकाने होत असतात. ज्या इतरांना सर्वस्वी नवीन व वेगळ्या वाटणाऱ्या असतात, त्याचा आंतरिक गुंता आजीच्या अनुभव चौकटी मधलाच असतो. त्यामुळे त्याचा धागा तिच्या लक्षात येत असतो. अनुभवाच्या मार्ग दर्शनाचे पैलू येथेच मदत करतात.
आज मला माझ्या बालपणीची आठवण झाली. मी त्यावेळी दहा वर्षाचा असेन. मला शिकवण्यासाठी एक शिक्षक ( त्यांना आम्ही गुरुजी म्हणत असू ) घरी येत होते. चांगले शिक्षक परंतु अतिशय शिस्तप्रिय व कडक अश्या स्वभावाचे होते. त्याकाळी मुलांना त्यांच्या चुकाबद्दल बेशिस्तपनाबद्दल सतत मार बसे. रागावले जायचे. कोणतीही गोष्ट मुलांना समजावून सांगणे, त्यांच्या भावना जाणणे, ह्याबाबतीत पालकांना, शिक्षकांना, आणि कोणत्याही वडील व्यक्तींना मुळीच आस्था नव्हती. हा केवळ वेळ व्याया घालविण्याचा मार्ग आहे ही त्यांची धारणा असे. ” छडी लागे छम छम, विद्या एयी घम घम.” ह्या पुर्वकालीन तत्वज्ञानात त्यांचा विश्वास होता. त्याच प्रसंगी योग्य वेळी योग्य शिक्षा ही धाक व शिस्त निर्माण करते ही त्यांची अनुभव संपन्न समजूत होते. ( आता काळ पूर्ण बदलला, शिक्षक बदलये, आणि विद्यार्थीही.).
माझे शिक्षक अर्थात पूर्वकालीन होते. रोज रात्री सात वाजता ते एकतास शिकवीत असे. त्या वेळचे पाठ शिकवीत व गृहपाठ देत असे. बालवय व विद्यार्थी म्हणून अनेक चुका करीतच शिक्षणाचा मार्ग चालला होता. मात्र चुकले की ” गाढवा, मूर्ख ” असल्या शिव्या ते देत व अधून मधून पाठीत धपाटा ही लागावीत. मी निराश होत होतो. केव्ह्ना केव्ह्ना रडू येत होते. परंतु ” रडतोस काय असा ?” म्हणून त्यावरचा शांत करण्याचा उपाय म्हणून आणखी एखदा धपाटा पाठीत बसत असे. शिकणे तसे सारे दिव्यच होते. त्या वेळेला कळवळंल्याच्या आजही आठवणी येतात व हसू येते.
माझी वेगळी खोली होती. खाली सतरंगी अंथरून आम्ही बसत असू. एक दिवस अचानक माझी आजी तेथे आली. तिच्याजवळ कापूस होता. ती वाती व फुलवाती करीत तेथेच बसली. नेहमीच्या सवयी प्रमाणे, माझे चुकतच “ गाढवा ही बेरीज अशी होती का?” म्हणत गुरुजींनी माझा कान पिळला व मला धपाटा लगावला. मी कळवळंलो. मला रडू आले. आजी जवळ होती. तिला वयाचा एक अलिखित अधिकार मिळालेला होता. ती उसळून गुरुजीना म्हणाली “ अहो एवढे काय मारता त्या लहान मुलाला. चुकला असेल तर समजावून सांगा.” गुरुजी एकदम सटपटले. त्यांनी उत्तर दिले नाही. मात्र त्यानंतर त्यांच्या वागण्यातला झालेला बदल जाणवला. आता आजीच्या केवळ तेथे अस्तित्वामुळे वातावरण बदलल्याचे माझ्या लक्षात येऊ लागले. शिक्षेऐवजी प्रेमळ शब्दात समजावणे हे होऊ लागले. दुसऱ्या दिवसा पासून सतरंजी टाकून ठेवणे, वह्या पुस्तक पेन्सिल घेणे, ह्याच बरोबर ताटात कापूस, वाटीत थोडीशी रांगोळी आणि खिडकीजवळ आजीसाठी पाट ठेवणे हे आठवणीने केले जायचे. कदाचित त्यासाठीच व अशाच प्रसंगांना आई बाबा पासून वेगळ्याच संरक्षणाची भिंत बनणारी आजी मला खूप आवडायची.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 9, 2019
आता जमाना बदलला आहे. पिठाच्या गिरण्यांची संख्या कमी झाली आहे. तयार आट्याची दहा किलोची आकर्षक ब्रॅण्डेड पॅकेट्स मिळतात. उच्च मध्यम वर्गीयांकडे पोर्टेबल आटा चक्की असते. ते घरच्याघरी गहू, ज्वारी दळू शकतात.
November 27, 2021
कोण आहे रे तिकडे,महाराजांनी आवाज दिला.सेवक दौडतच आला. महाराज आज्ञा असावी. अरे, प्रधानांना ताबडतोब इकडे उचलून आण. महाराज गरजले. उचलून ? मी नाही समजलो महाराज, सेवक भीत भीत म्हणाला. गधड्या मला म्हणायचं होतं ताबडतोब त्यांना बोलावून आण. जसे असतील तसे.
टॉवेलात असतील तरी चालतील कां तुम्हांस..
August 18, 2019
” एक दूजें के लिये ” ने १९८१ साली धुमाकूळ घातला होता. चित्रपटाच्या प्रत्येक आघाडीवर ( अभिनय, गीत, संगीत, पार्श्वगायन, गोव्याची नयनरम्य पार्श्वभूमी ) हा चित्रपट देखणेबल होता. “बॉबी” नंतर ची ही तुफान गाजलेली प्रेमकथा (शेवट सुखांत नसला तरीही). कमल आणि रती ही नवोदित फ्रेश जोडी देणारा हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी मन तृप्त होत नाही.
May 3, 2021
तुमचे नाम संकीर्तन ।
हेचि माझे संध्या-स्नान ।।
तुमच्या पायाचे वंदन ।
हेचि माझे अनुष्ठान ।।
तुमच्या पायाचा साक्षेप ।
हा चि माझा काळ क्षेम ।।
तुमच्या प्रेमे आली निद्रा ।
हीच माझी ध्यान-मुद्रा ।।
एका जनार्दनी सार ।
ब्रह्म रुप हा संसार ।।
June 11, 2026
मायावी बाजारांच्या भुलभूलय्यात अडकलेल्या सर्व सामान्य माणसाला-ग्राहक राजाला सावध करणारे, त्याच्या हक्कांची अधिकारांची जाणीव करून देणारे आणि या सर्व व्यवस्थेत तो केंद्रस्थानी आहे, हे भान सर्वांना आणणारे हे तळमळीचे लिखाण लिहिले आहे ग्राहक पंचायतीचे प्रसिद्ध कार्यकर्ते श्री सुरेश बहिराट यांनी. दै. लोकमत मध्ये विक्रमी 20 वर्ष लिहिलेल्या ग्राहक चेतना या सदरातील अत्यंत निवडक, महत्वाच्या सार्वकालिक मूल्य असलेल्या लेखांचा हा संग्रह सर्वांसाठीच संग्रहनीयआहे. पृ.200 किं.200 रू. पुस्तकाचे नाव – ग्राहक चेतना : लेखक – सुरेश बहिराट : पाने : २०० किंमत – २०० रुपये श्रीपाद कोठे नचिकेत प्रकाशन, 24-योगक्षेम लेआऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-440015
September 29, 2012
मला किती कळतं, मला किती माहिती याचा गवगवा करणारा आजकाल समाजाला प्रबोधन करू पहातो, तो खरंच त्या केपेबल आहे का? याची खात्री आपण कधीच करत नाही.
September 2, 2021
“वहिनी चहा टाका दोन कप ” अशी हाक मारणारा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसुन माझा बालमित्र गजा. आम्ही दोघेही बालपणापासुन एकत्रच वाढलो. शिक्षण , लग्न आणि नंतर मुलेही साधारणतः एकाच वेळी. तो एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणुन नोकरीला लागला , आणि मी बैंकेत. प्रोफेसर असल्यामुळे बराचसा वेळ तो रिकामाच असतो.
आणि या रिकाम्या वेळात काहीतरी खुळ डोक्यात घेउन बसतो. बर, स्वतःपुरते ठिक आहे , पण इतरांच्या डोक्यातही हे खुळ भरणे ही त्याची आवडती गोष्ट आहे ,आणि आमचे घर हे त्याच्यासाठी ” सॉफ्ट टारगेट ” आहे. आता हा नुसता चहा पिउन जाणार की काहीतरी नवीन खुळ काढणार या विचारात असतानाच गजा म्हणाला ” वहिनी , लिटिल चैम्प्स या वेळेला चार वर्षांखालील मुलांसाठी आहे . पिंटु आणि सोनुला ( सोनु म्हणजे गजाचे अपत्य . वय वर्षे तीन ) आपण पाठवु या का ? “ही मात्र याची नेहेमीची सवय आहे. मी याचे नवनवीन प्रस्ताव नेहेमीच धुडकावुन लावतो , हे याला पक्के ठावुक आहे. त्यामुळे कुठल्याही नवीन प्रस्तावाविषयी हा मला डावलुन थेट हायकमांडकडे परमिशन मागतो. आणि एकदा हायकमांडच्या मनात आल्यावर बाकी कुणाच्या म्हणण्याला तितकासा अर्थ नसतो, हेही त्याला पक्के ठावुक आहे. ”अरे पण हे काय वय आहे डान्स करायचे ? इनमिन अडिचतीन वर्षांची पोर आपली .” माझा विरोधाचा थोडाफार प्रयत्न .”अरे कुठल्या जगात वावरतोस तु आजकाल ? आजच्या जगात मुले चालायला लागली की डान्समधील लिटिल चॅम्प्स बनतात , आणि बोलायला लागली की गाण्यामधील लिटिल चॅम्प्स , विनोद कळायचे वय व्हायच्या आत लिटिल विनोदवीर बनतात . आपला काळ गेला आता. आपली मुले या स्पर्धेत राहिली नाहीत तर कधी या रेसमधुन बाहेर फेकली जातील कळणारपण नाही
“गजा मार्केटिंगच्या क्षेत्रात असता तर खुप पुढे गेला असता . कुठलीही गोष्ट समोरच्याला पटेल अशी सांगण्यात त्याचा हातखंडा आहे. “
आणि तुपण लहानपणी स्टेजवर डान्स नाही का करायचास ? तुझे गुण पिंटुत उतरणारच की ! “ इति गजा .आता ही गोष्ट थोडीफार खरी आहे. लहानपणी मी शाळेत दोनवेळेस गॅदरिंगमधे डान्स केलेला आहे. इयत्ता दुसरीत असताना ‘ नाच रे मोरा आंब्याच्या वनात ‘ वर आमच्या मॅडमनी डान्स बसवला होता . माझ्या डान्सची त्यावेळेला सर्वांनी खुप तारीफ केली होती . त्याचे फोटोही अजुन माझ्याकडे आहेत. ( समोरुन चौथ्या ओळीतील डावीकडुन तिसरा मुलगा म्हणजे मीच ) . त्यानंतर सातवीत असताना ‘ जिसकी बीबी काली उसका भी बडा नाम है ‘ मधे मी ‘ काली बीबी ‘ बनलो होतो . ( माझे काही दुष्ट मित्र माझ्या रंगामुळे मला हा चान्स मिळाला असे चिडवायचे . पण आमच्या मॅडमनी संपुर्ण वर्गासमोर माझ्या नृत्यकौशल्याची तारीफ करुन सर्वांची तोंडे बंद केली होती .) दुर्देवाने त्याचे फोटो मात्र माझ्याकडे नाहीत . पण या एवढ्याशा भांडवलावर पिंटुने डायरेक्ट लिटिल चॅम्प्स मधे जावे याच्याशी मी काही सहमत नव्हतो . पण आजकाल संपुर्ण देशावरच ‘ आले हायकमांडच्या मना तेथे कोणाचे चालेना ‘ अशी परिस्थिती असताना आमचे घर तरी त्याला अपवाद कसे असणार ? मी मुकाट्याने परिस्थितीला शरण जाण्याचे ठरवले .एकदा स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवल्यानंतर आम्ही पुढील तयारीला लागलो. चौकशीअंती असे समजले की , ऑडीशन एक महिन्यानी आहे. त्यासाठी एका गाण्यावर डान्स बसवावा लागणार आहे , आणि तो करुन दाखवावा लागणार आहे. त्यात निवड झाली तर पुढील फेरीसाठी मुंबईला जावे लागेल .आता हा डान्स बसवण्यासाठी एका ट्रेनरला गाठावे लागणार आहे. आम्ही ही चौकशी करीत असताना पिंटु आणि सोनुला याचे काहीच सोयरसुतक नव्हते . फक्त शेजारी पाजारी मंडळी “आता पिंटु कुठे जाणार ? “ असे विचारायची आणि पिंटु बोबड्या स्वरात त्याला ” लिटिल चॅम मधे ” असे ऊत्तर द्यायचा .डान्स बसवण्यासाठी सुजी डान्स ऍकेडमी ही अत्यं
चांगली आहे असे समजले. या सुजीचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत उत्तम असुन गेल्या लिटील चॅम्पमधे दहा मुले इथुनच सिलेक्ट झाली होती. ही सुजी बर्याच हिरोहिरोइनना पण प्रशिक्षण द्यायची . मोठमोठ्या लोकांच्या लग्नात मेंदीच्या वेळी डान्स बसवायला ती लाखो रुपये घ्यायची , पण लिटिल चॅम्प्स साठी तिने स्पेशल डिस्काउंट रेट म्हणजे फक्त दहा हजार रुपये पर सॉंग लावला होता . ही समाजसेवा ती फक्त लहान मुलांना स्टेज मिळवुन देण्यासाठी करीत होती. मात्र एकंदर ही लिटिल चॅम्पची वारी माझ्या खिशाला भलतीच भारी पडणार होती.दुसर्या दिवशी सकाळी मी , माझी पत्नी , गजा , गजाची पत्नी , चि. पिंटु आणि चिं. सोनु ही वरात सुजी डान्स एकेडमीला पोहोचली. एक भला मोठा वेटींग हॉल , खाली गुबगुबीत गालिचा , बसायला उंची फर्निचर , संपुर्णपणे एसी हॉल , पलिकडे काचेच्या रुममधे बरीचशी मंडळी डान्स शिकत असलेली . स्टेजवर जिन्सपॅंट आणि टी शर्टमधे डान्स करणारा पंचविशीचा तरुण आणि दोन तरुणी . एकंदर वातावरण बरेच प्रसन्न वाटले . ” या दोन मुलींपैकी ओरिजिनल सुजी कोणती ? ” असे विचारताच “ सुजी हा मुलगा आहे “ असे ऊत्तर मिळाले . हे लोक मुलींसारखी नावे ठेवुन लोकांना कन्फ्युज का करतात हेच कळत नाही. ते जाउ द्या , अर्ध्या तासानंतर सुजीची अपॉइंटमेंट मिळाली . “ सो यु वॉना सेंड युअर चाइल्ड टु चॅम्पस? ” सुजी ”
हो , म्हणजे त्याला डान्सची खुप आवड आहे . टिव्हीवर गाणे चालु झाले की तो नाचायला लागतो. ” मी ” बट ओन्ली लायकींग डझन्ट मेक सेन्स . इट रिक्वायर्स पॅशन , एटिट्युड , स्ट्रेंग्थ , एफर्टस ” यातल्या एकेका शब्दावर डान्स करताना पाय आपटतात त्याप्रमाणे जोर देत सुजी म्हणाला .” हो , पिंटुकडे यातील सर्व काही आहे . ” इति सौ. ” आणि माझ्याकडे दहा हजार रुपये सुध्दा “. इति मी ” ओके . डिपॉजिट मनी इन कॅश . पण मी एकाच गाण्यावर डान्स बसवणार . शिवाय एकच अंतरा.
नेक्स्ट राउंडमधे गेला तर फिफ्टीन थाउजंड लागतील . वुइ विल सी दॅट लेटर .” “ओके “. माझे ऊत्तर .पुढचा एक महिना आमच्या घरात जे काय घडले त्याला माझ्यासाठी ‘ नरकवास ‘ असे नाव देता येइल. दररोज सकाळ संध्याकाळ पिंटुला क्लासला घेउन जाणे , सुजीकडुन एकेका ओळीवर स्टेप्स समजावुन घेणे , घरी आल्यावर सतत ‘ आजा पिया तोहे प्यार दुं ‘ हे गाणे पिंटुला लावुन देणे , हे चालु झाले . पुर्वी टिव्हीवर गाणे चालु झाले की हातपाय हलवणारा पिंटु नेमके हे गाणे चालु झाले की ढप्प बसायचा . जबरदस्तीने त्याचे हातपाय सुजीने सांगितल्याप्रमाणे हलवले तर रडायचा. एक स्टेप सांगितली तर नेमकी दुसरी करायचा . या सर्व प्रकाराला कंटाळुन मी कधीमधे पेपर वाचायला बसलो की सौं चे ” सर्व गोष्टीची गरज फक्त मला आहे , तुम्ही पसरा. ” नामक दुसरे गाणे चालु व्हायचे. त्यापेक्षा ‘ आजा पिया ‘ बरे म्हणत मी पिंटुचे हातपाय हलवुन घ्यायचो. तोपण कधी बरोबर हलवायचा कधी चुकीचे. तो चुकला की पुन्हा सौचे " सर्व गोष्टीची गरज फक्त मला आहे " चालु. घरातला टिव्ही बंद झाला , बाहेर फिरायला जाणे बंद झाले , पिक्चर बंद झाला , एवढेच नाही तर जेवण्याखाण्याचेपण हाल चालु झाले . सकाळचा चहा दोनदाचा एकदावर आला. जेवणाच्या ताटातले पदार्थ अचानक कमी झाले . कधीकधी नुसत्या भातावर तर कधी कधी परदेशातल्यासारखे नुसत्या ब्रेडवर भागवण्याची वेळ येउन ठेपली . दुपारच्या नाष्टयातील इडली , दोसा , समोसा या सर्व पदार्थांची गच्छंती झाली. त्यात रविवारचा नॉनवेजचा बेत पण बंद पडला. दिवसभर सकाळपासुन संध्याकाळपर्यंत नुसते आजापिया ऐकुन कान किट्ट होउन गेले. थोडक्यात माझे सुखी जीवन अचानक दुःखी होउन गेले. या सर्व प्रकारात गजा अत्यंत हुशार निघाला. सुजीचे दहा हजार रुपये ऐकताक्षणीच त्याने तेथुन काढता पाय घेतला. लिटील चॅम्प्स हे मॅच फिक्सींग सारखे फिक्स असते, असे त्याने आपल्या
बायकोच्या डोक्यात भरवले आणि सोनुचे नाव मागे घेतले. नवर्याचे ऐकणार्या बायकासुध्दा नेमक्या दुसर््यांच्याच कशा ? हीपण एक अनसॉल्व्ड मिस्ट्री आहे.औडीशनच्या दिवशी सकाळी सात वाजताच एकनाथ रंगमंदिरात पोहोचलो. आमच्याआधी शेकडो मंडळी रांगा लावुन उभी होती. एकंदरीत आजकाल कलेला शिक्षणापेक्षा चांगले दिवस आलेले आहेत हे पटले. सर्व आईवडीलांना मुलांपेक्षा जास्त टेन्शन आलेले दिसले. मुले आपली छान खेळत होती. आतमधे एक डान्समास्टर मुलांची औडीशन घेत होते. पालकांना मात्र मधे प्रवेश नव्हता ही चांगली गोष्ट होती अन्यथा काही उत्साही पालकांनी पाल्याऐवजी स्वतःच डान्स करुन दाखवला असता. दुपारी साधारणतः एक वाजता पिंटुचा नंबर आला .मास्टर्सपुढे डान्स करुन पाच मिनीटातच तो बाहेर आला , आणि आम्हाला हायसे वाटले. मात्र त्याने डान्स कसा केला हे कळायला मार्ग नव्हता, संध्याकाळी फक्त निवडलेल्या मुलांची यादी लागणार होती. संध्याकाळी यादीत पिंटुचे नाव नसलेले बघुन आमच्या प्रतिक्रिया अशा होत्या ,सौ - ( रडत ) सर्व मेहनत पाण्यात गेली.मी - ( चेहेरा दुःखी ठेवुन ) वर दहा हजार रुपयेपण . ( मनात - सुटलो. पुढच्या राउंडमधे गेला असता तर आणखी तुरुंगवास भोगावा लागला असता. )
-- निखिल नारायण मुदगलकर
March 18, 2010
“आई आता बास झालं हं तुमचं, चांगुलपणा शोधणं! प्रत्येक गोष्टीत चांगुलपणा पाहावा, चांगुलपणा शोधावा हे ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो. आयुष्यभर चांगुलपणा शोधून तुम्हाला मिळालं काय, ते तरी कळू दे.” वृंदा चिडून चिडून बोलत होती आणि तितक्याच थंडगारपणाने त्यांनी उत्तर दिलं, “तुझ्यासारखी सून मिळाली.”
March 14, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti