नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सुखी माणसाचा सदरा मिळणे म्हणजे परीस मिळण्यासारखंच असतं..सुखी माणसाचा सदरा ही एक सुंदर कल्पना असल्याचे सर्वांनीच मान्य केले असले तरी त्या सदऱ्याचा शोध सुरूच असतो, निरंतर सुरुच राहाणार..
September 6, 2016
चित्रपटातील एखादे नायक – नायिका जेंव्हा आपल्याला आवडत असतात तेंव्हा त्यांच चालणं, बोलणं, ह्सणं, रडणं, नाचणं सारच आपल्याला आवडत असत. पण याचा अर्थ आपलं त्यांच्यावर प्रेम आहे असा होत नाही ना, सांगायच तात्पर्य इतकच आवड आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
December 19, 2013
नोव्हेंबर चे कालनिर्णय चे पान उलटले आणि चाहूल लागली ती माझा पन्नाशीचा उंबरठा ओलांडण्याची.
Age is जस्ट a number, all is in your mind..
असं अनेकदा ऐकलेलं असतं आणि ते खरं आहे.
तरीही मागे वळून पाहिलं की आपलाच प्रवास आपण कसा केला याचं चित्र समोर उभं राहतं.
अनेक आनंदाचे क्षण, यशाची शिखरे, संघर्ष आणि काय असतं प्रत्येकाच्या आयुष्यात? प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो इतकंच बाकी सुख दुःख असा ऊन पावसाचा खेळ काही जीवनभर सुटत नाही. आपण खेळत राहतो.. कधी जित कधी हार असणार.. असू देत...
पन्नाशी म्हणजे आयुष्यातली लख्ख दिसणारी दुपार.
अनेक अनुभवातून, कर्तृत्व सिद्ध करून आपण उभे असतो.
एव्हाना उन्हाचे चटके सोसण्याची सवय झालेली असते.
आपले कोण, परके कोण याची अनुभूती घेतलेली असते.
कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडे पाहुन जीवनातल्या संध्याकाळची जाणीव रोज होत असते.आपल्या सतत कार्यरत असलेल्या लोकांना थकलेलं पाहणं खुप वेदना देणारं असतं.
त्याचवेळी आपली मुलं यशस्वी होत असतात. त्याचं समाधान असतं.आता थोडी आपली सुखाची परिभाषा बदलललेली असते. दुसऱ्यांना आनंद देत आपण स्वतःचा आनंद शोधत असतो. व्यवहार दूर ठेवत आपण थोडे हळवे होत जातो.
आता कुणाशी बाजारात काही खरेदी करतांना पैसे कमी करा यासाठी भांडत नाही की कुणाला फार उपदेशाचे डोस ही देणं योग्य समजत नाही. जीवन हा ज्याचा त्याचा प्रवास.. तो प्रत्येकाचा वेगळा हे पटलेलं असतं.
येणाऱ्या संध्याकाळची तयारी दुपारीच केली की
संध्याकाळ रम्य होते.दिवे लख्ख स्वच्छ करायचे. त्यातली तेल, वात, आणि सोबत समाधानाचे अत्तर जागेवर आहे ना?सगळं ठीक आहे का हे बघून ठेवायची असते ती दुपारीच..
कधी सोनपावलानी कातर वेळ येईल तेंव्हा आपणच आपले आनंदाचे दिवे लावायचे असतात. आणि कृतज्ञतेच्या अत्तराने गंधित व्हायचे दिवस येणार असतात.
सोबत कुणी असेन. नसेन.. माहीत नसतं. आयुष्याची रेषा पुढे जात असतेच...
कारण प्रत्येकालाच मालकंस आळवायचा असतो पण भैरवीची चाहूल नकळतपणे मनात असतेच ना?
फार सेंटी बिंटी लिहिण्याचा माझा उद्देश मुळीच नाही. परवा डॉ. कडे गेलो म्हटलं बघा दिवाळीच्या गोडा धोडानी जरा दोन चार किलो वाढलंय (वजन ). बीपी गिपी, शुगर चेक करा. डॉक्टर निर्वीकार.
बसा. नाव, वजन नोंदी केल्या, वय म्हटलं 50,
काय? त्यांचा प्रश्न.
म्हणजे? जास्त वाटलं का?
No मला वाटले 40 असेन!
माझ्या अंगावर पुन्हा मूठभर मास चढलं.
सगळं नॉर्मल आहे. साखर 105 म्हणजे ओक्के.
पण वजन जरा कमी करा बरं.व्यायाम वाढवा.
नक्कीच! असं म्हणुन मी परतलो.असो...
जगण्याचं नवे भान पन्नाशी देते.
कुणी uncle, सर, काका, दादा काही म्हटलं तर छान स्माईल द्यायचं...
रफी लता यांच्या गाण्यासोबत अर्जितला पण ऐकायचं..
पुरणपोळी सोबत पिझ्झाचा बाईटपण घ्यायचा...
मंदिरात सोवळं आणि सिंगापूरात जीन्स वर मिरवायचं..
रोज नवीन काहीतरी वाचायचं.. जुन्या मित्रांना बोलायचं..
पैश्यापेक्षा आनंद कमवायचा..
असेल तो पैसा जरा जपून वापरायचा..
बाकी इन्शुरन्स बक्कळ काढुन ठेवायचा..
स्वतःला आणि जोडीदाराला नाही दुखवायचं..
पुन्हा तारुण्यात जायचं..
रोज मोगरा तिच्या केसात आणि
सुख आपल्या ओंजळीत साठवायचं..
दुखावलं असेन कुणी आपल्याला त्यांना मनापासून माफ करायचं..
काहीच मनात नाही ठेवायचं.
रोजच सकाळी मनाची पाटी स्वच्छ करायची..
नवे अनुभव त्यावर लिहायचे.. संध्याकाळी वाचायचे,
भरून आले डोळे तर थोडं मोकळं व्हायचं...
आपलं आनंदाचे झाड रोज नव्याने बहरत ठेवायचं..
आलेला क्षण देवाचा प्रसाद म्हणायचा आणि गोड मानायचा..
बघा आयुष्य तेजाळणार हे नक्कीच...
गद्धे पंचविशी,चाळीशी झाली आणि आता साठी बुद्धी नाठी होण्याअगोदर पन्नाशीत एवढं जमलं तरी पावलो बुवा!
म्हणजे जिंदगी लंबी नही उंची होनी चाहिये असं पटतं!
Lots of Love to All.....
ता. क. हे मी सर्व सवाई महोत्सव ऐकताना लिहतोय..
अभिजीत कोळपे
चिंचवड पुणे 33
फोन 7350005813
January 18, 2024
आपल्या सामर्थ्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देणारा, खूप जवळचा तरीही तटस्थ, कटू असलं तरी सत्य तेच सांगणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘तो’ किंवा ‘ती’ च्या पलीकडचं नातं असणारा…निर्मळ आरसा! असा किमान एक तरी आरसा प्रत्येकाला हवाच!!
November 25, 2021
मायावी बाजारांच्या भुलभूलय्यात अडकलेल्या सर्व सामान्य माणसाला-ग्राहक राजाला सावध करणारे, त्याच्या हक्कांची अधिकारांची जाणीव करून देणारे आणि या सर्व व्यवस्थेत तो केंद्रस्थानी आहे, हे भान सर्वांना आणणारे हे तळमळीचे लिखाण लिहिले आहे ग्राहक पंचायतीचे प्रसिद्ध कार्यकर्ते श्री सुरेश बहिराट यांनी. दै. लोकमत मध्ये विक्रमी 20 वर्ष लिहिलेल्या ग्राहक चेतना या सदरातील अत्यंत निवडक, महत्वाच्या सार्वकालिक मूल्य असलेल्या लेखांचा हा संग्रह सर्वांसाठीच संग्रहनीयआहे. पृ.200 किं.200 रू. पुस्तकाचे नाव – ग्राहक चेतना : लेखक – सुरेश बहिराट : पाने : २०० किंमत – २०० रुपये श्रीपाद कोठे नचिकेत प्रकाशन, 24-योगक्षेम लेआऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-440015
September 29, 2012
हौस करता करता माणूस सोनं चांदी कमावतो, पण त्यापायी त्याचा लोभ वाढत जातो, पण ज्यांच्या कडे रोजचं जगण्याला हातात काही नाही असे श्रीमंत मात्र या जगात तुच्छतेने बघितले जातात.
August 25, 2021
मी देखील ‘लोकमत’ पेपर सुरु केला. मात्र गेले वर्षभर, रोजचा पेपर उघडूनही पहाण्याचेही धैर्य मला होत नाहीये.
September 17, 2021
वसुधैव कुटुम्बकम????
February 20, 2011
ग्रेस यांच्या कवितावाचनाची एक CD मी काही वर्षांपूर्वी विकत आणली आणि हे व्यक्तिमत्व माझ्यावर प्रभाव टाकून गेले. सो कॉल्ड “दुर्बोधतेचा “शिक्का त्यांच्यावर मारून मराठीजन मोकळे झाले असले तरी ही व्यक्ती मराठी शब्दांना ज्या अलौकिक उंचीवर नेऊन ठेवते त्याचे विस्मयकारक अनुभव मी अनेकवेळा घेतले.
January 18, 2022
आजवर कित्ती तरी बाबतीत जपान देशाचं नाव ऐकलंच असेल. जसे औद्योगिक दृष्ट्या जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांपैकी एक असलेला, उगवत्या सूर्याचा देश. त्याबरोबरच जपानने आजवर भोगलेली भयानक संकटे, इथे होणारे भूकंप, त्सुनामी इथपर्यंत सर्वकाही आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेच. हे सारे घेऊन जगणारे हे जपानी आणि ह्या देशातील काही रंजक अनुभव, मी या जपान विषयीच्या लेखमालेतून लिहिण्याचा प्रयत्न करीन.
May 6, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti