नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
उखाणा हो नुसते म्हटले तरी लाजायला. होते. हो ना. कुणी शोधले असेल हे. पण आज तागायत उखाणा घेणे आवश्यक आहे लग्न ठरले की घरातील व बाहेरील बायका मैत्रीणी उखाणे शिकवतात. आता हल्ली म्हणे उखाण्याचे पुस्तक मिळते. कोणता उखाणा कधी घ्यायचा हे असते त्यात. आणि यातून बरेच काही शिकायला मिळाले. इतिहास लिहिताना जसे अनेक साधने असतात त्यातून त्या काळाचा संदर्भ मिळतो. पण उखाण्यातून तर अनेक शाखांचे ज्ञान मिळते. नंतर काही काळानंतर पुरुष सुद्धा उखाणा घेऊ लागले. मला नक्की काय म्हणतात ते आठवत नाही पण साधारणपणे आर्या म्हणत असतील. एखाद्या बाईचा आवाज गाण्यासाठी योग्य असेल तर ती गोड आवाजात उखाणा घेत होती हे मी ऐकले आहे....
लग्नाच्यावेळी अनेक प्रसंगात घ्यायचे उखाणे. उदा. देवाच्या मंदिरात दरवळतो उदबत्तीचा वास... घालते जिलेबीचा घास. उदबत्तीचा गुण समजला. पूर्वी लहानपणी लग्न व्हायची म्हणून सगळे काही समजले पाहिजे...
महादेवाला बेल वाहते वाकून... मान राखून..
श्री कृष्णाला वाहते तुळशीचे पान...
मान राखून..
देव व त्यांच्या साठी कोणती फुले पाने वापरायला हवेत हे सांगण्याचा उद्देश होता..
उर्दू भाषेत दगडाला म्हणतात पथ्थर...
लावते अत्तर.
इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून..
यांची सून...
परकिय आक्रमणाचा परिणाम...
स्वराज्य माझ जन्म सिद्ध हक्क आहे असे म्हणतात लोकमान्य टिळक...
नावाने लावते कपाळावर कुंकू ठळक..
इंग्रजानी दिली शिक्षा. सावरकर गेले परदेशी.... च्या दिवशी.
स्वातंत्र्याचे पडसाद..
आई बाबा आहेत प्रेमळ सासूसासरे आहेत हौशी... च्या दिवशी.
नदिवरुन भरुन आणली कळशी.
... चे घर हीच माझी काशी.
मोठ्या माणसांचे स्वभाव व घराला दिलेले आदराचे स्थान..
साठ मिनिटांचा एक होतो तास
राव आहे माझे बी ए पास..
रुप नको पैसा नको पती असावा गुणी.
चे नाव घेते ही नंदिनी.
शिक्षणाचे नव वारे वाहू लागले.
भाजीत भाजी मेथीची...
माझ्या प्रितीची..
तुम्ही मला का आडवला..
माझ्या बायकोचे नाव आहे प्रमिला..
अशीही प्रथा होती...
ग्रामीण भागातील उखाणा दोन वाक्यात नाही तर दोन दोन पानं असतात. पण पाठांतर जबरदस्त. त्यात खोल्यांची नावे. भांडी. घरातील व्यकी आणि काय काय सगळेच विषय हाताळले जात... आता उखाणा वधू वर मनाने तयार करतात. वाहवा मिळवतात. पुढे चालून एकेरी नावाने हाक मारतात पण उखाणा म्हटलं की नक्कीच लाजतात. मी लहानपणी ऐकलेले उखाणे सांगितले आहेत. त्यामुळे यातून समाजाचा इतिहास समजला गेला.
--सौ कुमुद ढवळेकर
August 27, 2022
PhD. ही शैक्षणिक क्षेत्रातली सर्वोच्य पदवी. कोणत्यातरी विषयाचा अभ्यास, माहीती, संकलन करुन ते नाविन्य विद्यापिठापुढे सादर करुन मान्यता मिळवणे. व जगापुढे ठेवणे. कित्येक विषय नाविन्यपू्र्ण व चमत्कारी असतात. परंतु ज्ञानामध्ये हातभार लावणारे असतात. वैद्यकीय क्षेत्रातल्या तीन विद्यार्थ्यानी एक विषयाचा अभ्यास व Statistics गोळा केले होते. तो अहवाल वाचण्यांत आला.
December 31, 2017

कथेचा मथळा वाचून तुम्हांला नक्कीच माझा राग आला असेल. पण लक्षांत घ्या की मी ह्या गोष्टींमध्ये गोमुच्या बाबतींत घडलेल्या खऱ्या गोष्टींची नोंद करतोय. प्रकाश कलबाडकर हा पत्रकार म्हणून लिहितांना एखाद्या चार आण्याच्या बातमीला बारा आण्याचा मसाला लावतांना दिसेल. कधीतरी संपादकांना खूष ठेवण्यासाठी न घडलेली बातमीही देईल.
April 5, 2022
November 17, 2021
सकाळपासून तो मुख्य रस्त्याच्या कडेच्या भुसभुशीत जमिनीमध्ये खड्डे खणण्याच्या उद्योगाला लागला होता. कुदळ मारून मारून आता तो अगदी थकला होता. थोडा वेळ विश्रांतीसाठी म्हणून तो बाजूला बसला. तेव्हाच राज्याचे एक मंत्रीमहोदय तेथून जात होते.
December 25, 2023
सतत तेच ते विचार…आपण क्षणभंगुर असल्याचे…आता आहे…मग नाही…खरे तर हे सत्य आहे …त्रिकालाबाधित…
April 15, 2021

त्यादिवशी माझंही तसंच झालं. समोरचं एसटीचं धूड बघितल्यावर बावचळून मी बाईक साईडला घेतली . एसटीवाला निर्धास्तपणे गेला आणि मी साईडपट्ट्यांजवळ असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर कोसळलो . गाडी माझ्या अंगावर पडली होती आणि मला ती बाजूला करता येत नव्हती . पण माझ्या सुदैवाने , शेजारच्या झाडाजवळ जेवायला बसलेला एक तरुण धावत आला आणि त्यानं गाडी बाजूला केली. मला उठवलं आणि शेजारच्या त्या झाडाच्या सावलीत नेलं.
September 30, 2020

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची नोंद न घेणारं आपलं कमकुवत मन! पण प्रत्येक घटना आपल्या आयुष्यावर , कुटुंबावर पर्यायाने आपल्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करीत असते.
January 26, 2022
शहरीकरणानंतर घरातल्या दोघांनी काम करणं आवश्यक झालं, मग त्यातून शहरातल्या लहान जागेमुळे आजी आजोबा गावी आणि मुलं शहरात. कुटुंब लहान होत गेली, त्यातून मुलांवर संस्कार करणारी पिढीच नामशेष होऊ लागली. त्यामुळे मुलंही त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थ वेगळाच घेऊ लागली आणि नको त्या संगतीत रमू लागली तेव्हा कुठेतरी सहिष्णुतेचे गणित बिघडू लागलं आणि मग अरेरावी, मुर्दाडपणा, फक्त मी आणि मी ही भावना वाढू लागली.
August 19, 2023
शन्ना आणि वपु यांच्या कथांमधील दमदार बीजांना आमच्या चित्रसृष्टीने कधीच न्याय दिला नाही. शन्नांच्या प्रसन्न आणि ताज्या लेखणीने दिलेले दोन चित्रपट मला दिसले- ” आनंदाचं झाड आणि एक उनाड दिवस ! ” ( वपुंचा एकच – ” मुंबईचा जावई “)
January 6, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti