(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अलविदा

    हे सगळे लिहावे की नाही, तुझ्यापर्यंत माझ्या भावना पोचवाव्यात की नाही, यावर खुप विचार केला. मी अनेकदा लिहिलं. फाडून फेकून दिलं. पुन्हा लिहिलं.माझं मलाच ठरविता येते नव्हतं, तुला हे सगळं सांगावं की नाही.पण मग मी निश्चय केला.माझा मलाच धीर दिला ठरवलं एकदाचं, आतलं सगळं ओकून टाकायचं. आतली मळमळ काढून टाकायची.तरच मन स्थिरावेल. डोकं शांत होईल. ह्या तणावातून मुक्ती मिळेल. तसं हे सगळं स्पष्ट सांगणं सोपं नाहीय. एका मुलीसाठी, तेही चौदा वर्षाच्या कळीसाठी, तुम्हा सर्वांच्या। तुलनेत काहीच अनुभव नसलेल्या लेकीसाठी तर खरंच सोपं नाहीय.

      January 28, 2022


  • जीना यहाँ, मरना यहाँ !

    राज कपूर साठी रचलेल्या या गीतपंक्ती दोनदा खऱ्या ठरल्या – १९८७ साली त्याच्या मृत्यूच्यावेळी आणि आता २०१९ मध्ये त्याने निर्मिलेली हिंदी चित्रसंस्कृतीची वास्तू ” आर के स्टुडीओ “अस्तंगत होत असताना ! हे गीतकाराचे द्रष्टेपण म्हणायचे कां ? येणाऱ्या काळाची चाहूल इतकी आधी लागू शकते कां ? कदाचित हे चिरंतन सत्य काहींना आधीच कळत असावे.

      May 22, 2022


  • पिठापूर – कुरवपूर यात्रा – प्रस्तावना

    काही लोकांना ते ज्ञात असते. काहींना त्याची अनुभूती येते तर काहींना तो निव्वळ योगायोग वाटतो. मी ही अशीच योगायोग आणि अनुभूतीच्या उंबरठ्यावर अडकले आहे. नुकताच पीठापुर आणि कुरवपूर यात्रेचा योग गुरुकृपेने जुळून आला. त्या दरम्यान असे सुंदर अनुभव आले, जे सामान्य माणसाच्या विज्ञान निष्ठ बुद्धीला ही कोड्यात टाकणारे होते.

      April 13, 2022


  • श्री क्षेत्र कनकेश्वर देवस्थान अलिबाग

    पावसाळ्यात पहिल्या श्रावणी सोमवारी हजारो अलिबागकरांची पावले कनकेश्वरच्या प्राचीन शिवमंदिराकडे आपसूकच खेचली जातात. निसर्गाच्या कुशीत आणि उंच डोंगरावर असलेल्या या देवस्थानाकडे जण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक चोंढी कार्लेखिंड मार्गावरील मापगांव हुन मुख्य पायवाट तर अलिबाग रेवस रोडवरील झिराड गावातून जाणारी पायवाट.

      November 1, 2021


  • गोरी गोरीपान, फुलासारखी छान

    गोरी गोरीपान, फुलासारखी छान
    दादा, मला एक वहिनी आण । धृ. ।।

    गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी
    अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
    चांदण्याच्या पदराला बिजलीचा बाण ! ।॥१॥।

    वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
    चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
    हरणांची गाडी तुडवी गुलाबाचें रान ! ।।1२॥।

    वहिनीशी गटद्टि होता तुला दोन थापा
    तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
    बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान ! ।।1३।।

      June 13, 2026


  • नवे क्षितीज… नव्हे आव्हान

    २००६ हे वर्ष माझ्यासाठी नवीन आव्हाने घेऊन आले. डॉ. बेडेकर विद्या मंदिर ही माझी शाळा, तर बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स हे माझे बारावीपर्यंतचे कॉलेज! ही शाळा आणि कॉलेज ‘विद्या प्रसारक मंडळ' या शैक्षणिक संस्थेतर्फे चालवण्यात येते. या व्यतिरिक्त कॉमर्स आणि आर्टस् कॉलेज, पॉलिटेक्निक, लॉ कॉलेज, इंग्रजी माध्यमाची शाळा तसेच मॅनेजमेंट कॉलेज असे या संस्थेचे खूपच मोठे कार्यक्षेत्र आहे. डॉ. विजय बेडेकर हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. विद्या प्रसारक मंडळाच्या सभेमध्ये डॉक्टरांनी मॅनेजमेंट कमिटीचा सदस्य (संचालक) म्हणून माझे नाव सुचवले. सभेत ते मान्यही झाले आणि मी या संस्थेच्या मॅनेजमेंट कमिटीचा सदस्य (संचालक) झालो. डॉक्टरांनी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. मी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. माझ्यासाठी हा भावनिक क्षण होता. ज्या शाळेत आणि कॉलेजात मी शिकलो त्याच शाळेच्या आणि कॉलेजच्या मॅनेजमेंट कमिटीचा आता मी सभासद होतो, माझ्या शाळेशी आणि कॉलेजशी मी पुन्हा एकदा जोडला गेलो. असे काही घडले की मी स्तंभित होतो आणि विचार करायला लागतो की आयुष्याची ही निराळी, काहीशी अनपेक्षित वळणे काही आपण नियोजित केलेली नसतात. मग या घटना घडतात कशा? या सर्वांचे नियोजन नक्कीच कोणीतरी वेगळी शक्ती करत असते. आपण त्याला देव म्हणतो, आपला योग आहे असे म्हणतो, नशीब म्हणतो, काहीही म्हणतो. पण त्याचे उगमस्थान अजूनही अज्ञातच आहे. घटना चांगली घडली तर आपण आनंदित होतो. वाईट घडली तर आपण दुःखी होतो. पण हेसुद्धा फार काळ टिकत नाही. कारण आयुष्य काही काळाने वेगळे वळण घेते आणि आधीचे आपण हळूहळू विसरत जातो.

    मुंबई महानगरपालिकेच्या संगीत स्पर्धेचे मी परीक्षण केले. माझ्याबरोबर संगीतकार अच्युत ठाकूर आणि प्राची देवस्थळी होत्या. हिंडाल्को स्टाफ फेडरेशनसाठी सिल्व्हासा येथे गझलचा कार्यक्रम केला. मराठी सुगम संगीताचे विविध प्रकार दाखवणारा 'मराठी सुगम संगीत एक सुरेल लेणे' हा नवीन कार्यक्रम मी तयार केला. 'संस्कार भारती' या संस्थेने गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम आयोजित केला. समीरा गुजर आणि श्रीराम केळकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. नंतर इंडस्ट्रियल इंजिनीयरिंगच्या ऑल इंडिया कॉन्फरन्समध्ये हॉटेल फरियाज, लोणावळा येथे गझल नाईट सादर केली. कोमल करंदीकर आणि दर्शना घळसासी या माझ्या विद्यार्थिनी या कार्यक्रमात गायल्या. लायन्स क्लबच्या सुगम संगीत स्पर्धेचा परीक्षक म्हणून मी अहमदनगरला गेलो. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण माझे संगीतकार प्रभाकर पंडित यांच्या हस्ते झाले. पंडित सर आता पुण्याला राहायला गेल्यामुळे नेहमी त्यांची भेट घडत नसे. "अरे, तुला भेटण्यासाठी मुद्दाम पुण्याहून या कार्यक्रमासाठी आलो.” पंडित सर म्हणाले. ते माझ्याच हॉटेलात उतरल्यामुळे आमच्या भरपूर गप्पा झाल्या. त्यांनी सुगम संगीतावर एक पुस्तक लिहिले होते. त्याची प्रत सही करून मला देतांना ते म्हणाले, "या पुस्तकात तुझा उल्लेख केलाय. तुझ्याबद्दल लिहिले आहे. ते वाच आणि पुस्तक कसे वाटले याचा अभिप्राय द्यायला पुण्याला घरी ये." "नक्की येतो." मी म्हणालो. पण तो योग येणार नव्हता. पंडित सरांशी माझी ही अखेरचीच भेट ठरली. काही दिवसांनीच हा प्रेमळ संगीतकार रसिकांसाठी त्याच्या सर्व रचना मागे ठेऊन निघून गेला. माझ्या पहिल्या कार्यक्रमाचे, पहिल्या कॅसेटचे, पहिल्या रेकॉर्डिंगचे ते संगीतकार होते. ५००व्या कार्यक्रमालाही त्यांची उपस्थिती होती. मात्र या पुढील कार्यक्रमांसाठी माझ्याबरोबर त्यांची गाणी असणार होती.

    -अनिरुद्ध जोशी

      August 5, 2022


  • वर्‍हाडातली गाणी – ४

    नंदा भावजया दोघी जणी

    दोघी जणी

    घरात नाही तिसर कोणी

    तिसर कोणी

    शिक्यातल लोणी खाल्ल कोणी

    तेच खाल्लं वहिनीनी वहिनीनी

    आता माझे दादा येतील गं येतील गं

    दादाच्या मांडी वर बसील गं बसील गं

    दादाची बायको चोट्टी चोट्टी

    असू दे माझी चोट्टी चोट्टी

    घे काठी लगाव काठी

    घरा घराची लक्ष्मी मोठी

      November 6, 2016


  • आशिकी’

    काही माणसं ‘हृदयात’ घर करतात तर काही ‘मनात’ घर करतात… गणेशने मात्र त्याची गाणी ऐकणारांच्या ‘कानात घर’ केलंय.

      January 11, 2022


  • मुख्याध्यापकांचे पत्र

    सिंगापूरमधल्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील मुलांच्या पालकांना वार्षिक परीक्षेपूर्वी एक पत्र पाठविले. हे पत्र भारतातल्या सर्व पालकांना उद्देशून आहे असे वाटते. पत्राचा मसुदा थोडक्यात असा होता.

    प्रिय पालकांनो,
    तुमच्या मुलांच्या वार्षिक परीक्षा लवकरच सुरु होणार आहेत. तुम्ही सगळे आपापल्या पाल्यांनी उत्कृष्ट मार्क मिळवावेत या विवंचनेत असणार. परंतु मनात ही इच्छा बाळगताना एक गोष्ट विसरु नका.

    या मुलांमध्येच एक कलाकार आहे ज्याला गणित हा विषय फारसा रुचत नाही.

    त्यांच्यातच एक उद्योजक आहे ज्याला इतिहासाशी किंवा इंग्लिश साहित्याशी काही देणेघेणे नाही.

    एक संगीतकारही त्यांच्यातच आहे ज्याचे केमिस्ट्रीशी जुळत नाही.

    एक खेळाडू आहे ज्याला शारीरिक तंदुरुस्तीपुढे दुसरे काही सुचत नाही. त्याला निश्चितच फिजिक्सपेक्षा सुदृढ शरीरयष्टी जास्त महत्वाची वाटते.

    या उपरही तुमच्या मुलाला उत्कृष्ट मार्क मिळाले आणि वरची ग्रेड मिळाली तर ते कौतुकास्पद असेल. परंतु त्यांना तसे तुमच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही तर.....

    कृपा करा आणि त्यांचा आत्मविश्वास डळमळू देऊ नका. त्यांना सांगा, ठीक आहे, परीक्षेखेरीज इतरही बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आयुष्यात असतात.

    तुम्ही हे सांगून बघा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, ही मुले जग जिंकून दाखवतील.

    एका परीक्षेत मनासारखे यश मिळाले नाही अथवा कमी मार्क मिळाले म्हणून त्यांची स्वप्ने आणि त्यांची कौशल्ये त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका.

    हो, अजून एक लक्षात ठेवा. डॉक्टर्स आणि इंजिनिअर्सच फक्त या जगातले आनंदी प्राणी आहेत असे समजू नका.

    मनापासून शुभेच्छांसहित,
    मुख्याध्यापक.

    आपल्याकडेही सतत परीक्षांचा मौसम चालू असतो. कदाचित या पत्राने आपल्याही पालकांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रत्येक मुलगा अथवा मुलगी विशेष (युनिक) आहेत. त्यांचे ते विशेष असणे जपा.

    -- नीला सत्यनारायण

    अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

      July 29, 2024


  • महाराष्ट्र देशातील किल्ले

    आजपर्यंत ज्या ज्या लेखकांनी मराठी भाषेत गड किल्ल्यांच्या माहितीवरील ग्रंथ प्रकाशित केले आहेत त्यामध्ये चिं. ग. गोगटे यांचे नांव सर्वप्रथम येते. त्यामुळे चिंतामण गंगाधर गोगटे यांना आद्य दुर्ग अभ्यासकच म्हणले पाहीजे. इ.स. १८९६ पर्यंत महाराष्ट्रातील किल्ल्यांविषयीच्या माहितीचे कोणतेही मराठी भाषेतील पुस्तक लिहिले गेले नव्हते. गोगटे यांच्या ग्रंथाचा काळ हा इतिहासाचार्य राजवाडे यांचे ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीचा होता.

      May 14, 2019