नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
….मी पुढील संभाषण ऐकण्याच टाळल कारण बाईंच हिंदी ऐकुन “मै खुद बहुत बावचळ गया था.”
September 14, 2019
जीवनाचे एक महान सत्य असते. जे भगवत् गीतेमध्ये देखील सांगितलेले आहे.
जे होत आहे ते चांगल्या साठीच. जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच.
जीवनातील प्रत्येक घटनेमध्ये कोणत्या ना कोणत्या रीतीने तुम्हास फायदा होतो. पण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या होणाऱ्या फायद्याबाबत नेहमी विचार करु नका.
आपण सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ आहात. ६०-७० वा अधिक वर्षे आपण जीवनाची खर्च केलीत. जर मागे वळून बघितल, तर तुम्हास दिसून येईल की तुम्ही लहान असताना ज्या जीवनाच्या मार्गाचा विचार केलांत, घटना कश्या व्हाव्यांत ही स्वप्ने रंगविलीत, तसे मुळीच झालेले नाही. सर्वच मार्ग एकदम भिन्न होत गेले. घटनाही वेगळ्या होत गेल्या. तरी देखील प्रत्येकजण म्हणेल
"भले कष्टमय जीवन का असेना, पण मी चांगल जगलो. मला माझ्या क्षमते नुसार, योग्यतेनुसार मिळत गेले."
निसर्ग हा शेवटच्या अंकात तुम्हाला समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.
"जे होत आहे ते चांगल्या साठीच. जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच."
हे जर जीवनाचे तत्वज्ञान असेल, तर ते तुमच्या अन्तरमनातून मान्य करीत जा. तशी स्वभावाची ठेवण निर्माण करा. अशा माणसाला सुख वा दुःख दोन्हीही सहज पचवण्याची शक्ती मिळत असते. मानसिक तणाव येथे कमी जाणवतो.
केवळ वर्तमानकाळातच जगा
भूतकाळातील चुकांबाबत पश्चाताप करु नका. भविष्याची चिंता करु नका. वर्तमान फक्त सफल करण्याकरीता संपूर्ण लक्ष केंद्रित करा. आजचा दिवस आपल्या हातात आहे. आज आपण रचनात्मक कार्य कराल तर कालच्या चुका सुधारतील आणि भविष्यांत निश्चितच फायदा होईल.
जीवन हे चक्रमय असते. काल्पनिक शक्तीनुसार तीन काळांत त्याचे विभाजन केले गेले. गेलेला तो भूतकाळ, येणारा तो भविष्यकाळ, आणि चालू सद्यःस्थितीतला तो वर्तमानकाळ. जरी हे तीन काळ वाटत असले तरी खऱ्या अर्थाने, फक्त दोन काळाचेच अस्तित्व माणसासाठी असते. भविष्य काळ येतो, वर्तमान काळाच्या सीमारेषेवरून छलांग मारीत भूतकाळांत अदृष्य होतो. भले काल्पनिक असो, वा असत्य असो, जगायचं असतं आम्हाला ते फक्त वर्तमान काळांत. तणावरहीत जगायचं असेल तर केवळ वर्तमान- काळाचा सहारा घेऊनच जगावं लागेल.भूतकाळातील अनुभव, कर्तृत्व यांची आठवण येणे चांगले, परंतु ते वर्तमान काळाचा आधार होऊ शकत नाही. भूतकाळातील गणितांची सांगड वर्तमानकाळाशी घालू नका. भविष्यकाळ तर अनिश्चित असल्यामुळे कल्पनेच्या झेपांना जागृत राहून आकार देत चला. फक्त वर्तमान काळांत जगण्याची संवय अंगीं ठेवा.
मानवी १०० वर्षाच्या मर्यादेत, तूम्ही सतत फक्त १० वर्षे जगण्याची वृत्ती मनाशी बाळगा. भूतकाळातली ५ वर्षे ही अनुभव व मार्गदर्शनासाठी आणि भविष्य काळातली फक्त ५ वर्षे जीवनाच्या योजने प्रित्यर्थ. पंचवार्षिक योजने प्रमाणे. ही योजना व्यवहारीक जीवनाची सांगड घालेल. वैचारीक झेप आणि कल्पना विलास यांना पायबंध घालेल. अशी आखणी तणावशीथिलता जीवनांत आणेल.
६ क्रमशः पुढे चालू
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 21, 2017
पत्रकारिता, साहित्य, शिक्षण, नाटक, सिनेमा, टी.व्ही मालिका, ग्रंथालये आणि राजकारण या क्षेत्रांवर लिहिणारे हे लेखक. लेखिका, आपल्याला विषयाचा अभ्यास करणारे आणि दिर्घकाळ अनुभव असलेले आहेत. या लेखमालिकेतील विषयांची ओळख करुन घेऊया….
December 24, 2021
विदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.
May 12, 2017
अजित हा एकदम हुशार मुलगा ! एकपाठी असला तरी फक्त घोकमपट्टी न करणारा ! सतत नवे प्रश्न विचारून शिक्षकांना सतावणारा.शाळेच्या वेळेत अभ्यासपूर्ण करून इतर वेळात वर्तमानपत्रे, मिळतील ती पुस्तके वाचणारा. रोज न चुकता प्रादेशिक व राष्ट्रीय बातम्या रेडिओवर ऐकणारा.कसलीही सभा असली तरी तिथे जाऊन वक्त्यांची व्याख्यानं ऐकणारा.
February 4, 2026
अनघा दिवाळी 2021 मध्ये आर. के. सावे यांची प्रकाशित झालेली दिर्घ कथा.
December 22, 2021

जगाच्या पाठीवर मंचकरावांसाठी सर्वात कठीण काम म्हणजे ‘विचार करणे ‘ हेच होते , आणि वारंवार ते त्यांना करावे लागत असे . आत्ता हि ते आपल्या झुपकेदार मिशीचे डावे टोक चिमटीत धरून विचारमग्न झाले होते . चिंतेचे कारण होते कि ‘ भीमा काकीस अर्जेंट कसे बोलावून घावे ?’ असे काय कारण होते कि भीमा काकीस पाचारण करण्याची वेळ अली होती ?
May 1, 2018
माणूस हा नेहमी सुखाच्या शोधात असतो. जरा कुठं मनासारखं घडलं नाही तर त्याची चिडचिड होते. माझंही तसंच झालं होतं. तसा मी सुखवस्तू होतो, मात्र ताणतणावाने मानसिक तोल ढळला की, मला सगळं काही सोडून हिमालयात निघून जावं, असं वाटत असे. तशी नुकतीच माझी चाळीशी उलटली होती. बायको, मुलं, फ्लॅट, नोकरी, गाडी अशा मध्यमवर्गीयाला जीवनावश्यक असलेल्या सर्व गोष्टी माझ्याकडे होत्या. फक्त मन सैरभैर झालेलं होतं…
May 29, 2021
विजय हातातील पेपर सोफ्यावर टाकत उठला आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला त्याने हळूच दरवाजा उघडला तर दरवाजात एक सुंदर स्त्री उभी होती…
December 14, 2022
आज आपण अशा एका व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देणार आहोत की ज्यांनी मुंबईच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक गोष्टींच्या पायाभरणीत सिंहाचा वाटा उचलला आहे. अशी ही महान व्यक्ती म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे, म्हणजेच नाना शंकर शेठ. आधुनिक मुंबईचे शिल्पकार. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून अगदी मृत्यूपर्यंत म्हणजे ६५ व्या वर्षापर्यंत मुंबईच्या जडणघडणीत त्यांनी केलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. या महिना अखेरीस , म्हणजे, 31 जुलै 2021 ला त्यांचा 156 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमिताने हा त्यांच्या योगदानाचा उहापोह !
July 30, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti