(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अपूर्वाईचा पूर्वरंग – 1 (माझी लंडनवारी – 4)

    फायनली, मुकुंदला ही अच्छा करून माझी एक बॅग आणि खांद्यावर एक सॅक घेऊन मी प्लेन मध्ये पाय ठेवला.  आयुष्यात पहिल्यांदा विमानात शिरत होते!! ज्या क्षणाची उत्सुकतेने वाट बघत होते, तो आता आला.

      January 2, 2022


  • सायसाखर

    – एसटी थांबली . मी उतरलो . घरी निघालो . रात्र झाली होती . घाटी चढताना मी सहज घराकडे नजर टाकली . आई बॅटरी घेऊन पायरीवर बसली होती . सायसाखरेची वाटी माझी वाट बघत होती …

      November 1, 2021


  • निळू फुले

    एकदा मी आणि माझी आई लिफ्टमध्ये असताना खांगटे काका आणि निळू फुले लिफ्ट मध्ये आले. आधी आमच्या भेटी झालेल्या होत्या. मी आईला म्हणालो आई हे निळू फुले…डायरेक्ट आई लिफ्टच्या बाहेर जायला निघाली. मग आम्ही तिला अडवले. इतका निळूभाऊंचा ‘ दरारा ‘ होता पडद्यावर .

      August 15, 2021


  • गझलचा आस्‍वाद कसा घ्यावा

    गझल हे काव्‍य खरे, पण ते गेय काव्‍य आहे. त्‍यामुळे, रसिकांनी गझल-गान ऐकावे, गझल स्‍वतः गावी किंवा गुणगुणावी, आणि वाचून रसास्‍वाद घेतांना सुद्धा ‘ध्‍वन्‍य’ पद्धतीने वाचावी, म्‍हणजे गझलचा आनंद द्विगुणित होईल.

      January 19, 2018


  • ती आठवण, ते सूर आणि मी

    क्षणा पुरता घडणाऱ्या गोष्टी आपण सहजतेने विसरून जातो. पण पंचवीस – सव्वीस वर्षानंतर तीच घटना आपल्या समोर येते व आयुष्याला एक नव वळण देते. निराश मनात आशेचा संचार करते. असाच एक अनुभव.

      May 22, 2011


  • दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल

    ऑक्टोबर २००७ मध्ये माझी एक मोठी इच्छा अचानक पूर्ण झाली. निर्मात्या मेधा मेहेंदळे यांच्या तन्वी प्रॉडक्शनच्या 'डॉटर' या हिंदी चित्रपटासाठी मी एक गाणे रेकॉर्ड केले. संगीतकार सलील अमृते होते. माझी पत्रकार विद्यार्थिनी तृप्ती दोंदेच्या मार्फत प्रेरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण कुलकर्णी मला भेटले. लोकसत्ता आणि दिशा डायरेक्टरसाठी कार्तिकी एकादशीनिमित्त 'मुखी नाम हाती टाळ' हा अभंगाचा कार्यक्रम ते करणार होते. पण एका कलाकाराने आयत्या वेळी माघार घेतली आणि ते अडचणीत आले होते. कार्यक्रम अवघा चार दिवसावर आला होता. झी सारेगमपचा महागायक अभिजीत कोसंबीही या कार्यक्रमात गाणार होता. “काहीही करा. पण आमच्या कार्यक्रमात गाण्याची आणि संगीत संयोजनाची जबाबदारी घ्या.” किरण कुलकर्णी म्हणाले.

    “अहो, असे काहीच मनात आणू नका. या कारणामुळेच मलाही इतक्या मोठ्या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळते आहे याचा मला आनंदच आहे." मी म्हणालो.

    माझ्यासाठी तर येणारा प्रत्येक कार्यक्रम महत्त्वाचा होता. माझ्या वादक कलाकारांबरोबर रिहल्सल्स झाल्या. अभिजीत कोसंबी आणि प्रसन्नजीत कोसंबीही यात भाग घेण्यासाठी अगोदरच ठाण्याला आले. लोकसत्ता या कार्यक्रमाचे प्रायोजक असल्याने कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. २१ नोव्हेंबर २००७ रोजी प्रेक्षकांच्या भरघोस उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. अभिजीत कोसंबी आणि अनिरुद्ध जोशी या कार्यक्रमाचे प्रमुख गायक होते. अभिजीतच्या गाण्याइतकाच त्याचा मोकळा स्वभाव मला आवडला. या कार्यक्रमामुळेच किरण कुलकर्णी हा नवीन मित्र मला मिळाला. यानंतर डिसेंबरमध्ये संगीतकार शंकर-जयकिशन यांच्या रचनांचा एक दीर्घ कार्यक्रम इंद्रधनूसाठी केला. आयोजक संजय जोशी यांच्या 'संत संग देई सदा' ह्या अभंगांच्या कार्यक्रमाचे प्रयोग आम्ही मांडगाव, वसई आणि अंधेरी येथे केले. यानंतर २५ डिसेंबर रोजी एक कार्यक्रम लातूर येथे केला. एकूण २००७ हे वर्ष बऱ्याच धामधूमीत गेले. माझा ७५० वा जाहीर कार्यक्रम. इंग्लंडचा दौरा. एका हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन आणि इतर अनेक कार्यक्रम यामुळे या वर्षीची डायरी अत्यंत व्यस्त होती. यात एक फार महत्त्वाची गोष्ट घडली होती. मी आता ८००व्या कार्यक्रमापर्यंत पोहोचलो होतो.

    -अनिरुद्ध जोशी

      August 9, 2022


  • छोटीसी बात……. उपदेश सिंचन

    “ताठ बस. पोक काढू नकोस. बसल्यावर पाठीचा मणका ताठ हवा.”“अरे असा काय चालतोस पोक्या सारखा? जरा छाती पुढे काढून चाल.”“साधं जेवता येत नाही तुला. चार नव्हे पाच बोटांनी घास घे.”“पुस्तकाला पाय लागला तर नमस्कार करावा,इतकी पण तुला अक्कल नाही?” वरील वाक्ये कुणी कुणास म्हंटली असतील?

      June 7, 2010


  • काय भरोनी ठेविले (सुमंत उवाच – ४०)

    सुमंत जयंत परचुरे. 

    जे दिसत नाही, जाणवत नाही, दाखवता येत नाही त्या मनाला सावरणे, आवर घालणे, भक्कम बनवणे किती कठीण आहे.

      October 1, 2021


  • आठवण संत कान्होपात्रा नाटकाची

    आज आषाढी एकादशी! त्यानिमित्ताने मागील काही जुन्या नाटकांचा अभ्यास करते वेळेस अचानक समोर 'संगीत संत कान्होपात्रा' नामक नाटक उभं ठाकलं. जास्तीचा अभ्यास करताना हे नाटक केवढं जुनं आहे हे लक्षात आलं.

    १९३१ च्या काळात हे नाटक रंगभूमीवर आलं असं वाचनातून निदर्शनास आलं. १९ नोव्हेंबर १९३१ रोजी या नाटकाचा प्रथम प्रयोग झाला. या नाटकाला संगीत मा. कृष्णराव व विनायकबुवा पटवर्धन यांचं लाभलं.

    नाटकात संत कान्होपात्रा यांच्या जीवनावर आधारित घडलेल्या काही ठळक प्रसंगांना नाट्य लेखक ना. वि. कुलकर्णी यांनी अधोरेखित केलं आहे.

    असं म्हणतात की संत कान्होपात्रा या मंगळवेढ्याच्या श्यामा नामक गणिकेची मुलगी पण पूर्वकर्मानुसार व संचित पूर्वपुण्यानुसार लहानपणापासूनच भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या. त्यांची भक्ती इतकी थोर होती की प्रत्यक्षात परब्रम्ह विठू माऊलीला त्यांची तळमळ पहावली नाही आणि खरोखरच त्याने त्यांचा अंत न पहाता त्यांना हृदयात स्थान दिलं.

    सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या संत कान्होपात्रा यांचे वास्तव्य पंढरपूर जवळ असलेल्या मंगळवेढ्यात होते. त्या अत्यंत रूपवान होत्या आणि म्हणूनच कर्नाटकातील बेदर बादशहाने त्यांना पळवून आणण्यासाठी त्याच्या सेवकाला धाडलं. कान्होपात्रा नेमाप्रमाणे एका विठ्ठल मंदिरात वीणा आणि चिपळ्या घेऊन भक्तीत तल्लीन झालेल्या असताना तो सेवक त्या घरी जाण्यासाठी बाहेर पडतील त्यावेळेस त्यांना पळवता येईल या दृष्टीने बाहेर उभा राहतो. बराच काळ बाहेर तात्कळल्यानंतर तो आत प्रवेश करतो आणि कान्होपात्रा यांच्या ध्यानात ती गोष्ट येते आणि त्या गर्भगृहात जाऊन पांडुरंगाच्या चरणांना घट्ट मिठी मारून त्याच्यापासून बचाव करण्याची भाक भाकू लागतात आणि इथेच त्या प्राण सोडतात.

    संत कान्होपात्रा नाटकातील गाणी:

    १)अगा वैकुंठीच्या राया

    २)अवघाचि संसार सुखाचा

    ३)अशी नटे ही चारुता

    ४)जोहार मायबाप जोहार

    ५)दीन पतित अन्यायी

    ६)देवा धरिले चरण

    ७)धाव घाली विठू आता

    ८)नुरले मानस उदास

    ९)पति तो का नावडे

    १०)पतित तू पावना

    ११)शर लागला तुझा गे

    यातील 'अगा वैकुंठीच्या राया' या अभंगात त्यांची आर्तता अधिक दिसून येते. वैकुंठीच्या राया तुझ्या चरणाशी मला अखंड थारा दे, सखया विठ्ठला मला या भवनदीतून पार कर, नारायणा मला भक्तीचं दान देऊन माझ्या नरदेहाला गती दे, वासुदेवाच्या नंदना, रखुमाई वल्लभा आता तू मलाही पदरात घे साधारणतः असा भाव संत कान्होपात्रा यांचा त्यावेळी असावा असं मला वाटतं.

    याच अभंगाची व्हिडीओ लिंक खाली देत आहे.

    (किर्ती शिलेदारांच्या आवाजात)

    https://www.youtube.com/watch?v=7qtZbvCNDxc

    (पं. राम मराठे यांच्या स्वरात)

    https://www.youtube.com/watch?v=azhXqtzIrFw

    -- आदित्य दि. संभूस.

    (अभिनेता, दिग्दर्शक, लेखक)

    व्हिडीओ सौजन्य: मुकुंद मराठे व दीप्ती भोगले यांचे यूट्यूब चॅनेल.

    २०/०७/२०२१.

      July 20, 2021


  • फुला-फळांची शाळा…

    फळाफुलांनी बहरलेल्या या शाळेचा संस्थापनदिनही एप्रिल फुल होता. तिथेही फूल आलच! सहज एकदा चौकशी केली तर कळलं बागायत जमिनीवर शाळा उभारल्याचं हे फळ होत.

      September 29, 2019