(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक परीस स्पर्श – भाग १

    आपल्या या कथेतील नायक विजय ! तो ही त्या परिसासारखाच आहे. त्याच्याही वाट्याला आले आहे परिसाचे जगणे ! कसे ? ते या कथेतून आपल्याला हळू हळू उलगडत जाईलच…तसं पाहिलं तर परीस हा एक दिसायला सामान्य दगडच असतो असं म्हणतात. तसाच आपला नायकही दिसायला एक सामान्य नव्हे अतिसामान्य माणूसच आहे…

      January 18, 2022


  • खादाड संगीतप्रेमींसाठी

    माझ्यासारख्या खादाड संगीतप्रेमींसाठी अज्ञाताकडून दिवाळी भेट…..मला आणि अज्ञाताला उचक्या लागणारच आहेत…पण तुम्ही खाद्यपंगतीचा आकंठ आस्वाद घ्यावा…

      October 29, 2019


  • एकांकिंका : मला काय त्याचे? (भाग ३)

    रामाने सीतेला सोडलं, रामाने सीतेला सोडलं हा एकच मंत्र आम्ही जपत आहोत. रामाने सीतेचा स्वीकार केला तर त्या युगातल्या लोकांना त्रास झाला आणि रामाने सीतेचा त्याग केला तर ह्या युगातल्या लोकांना त्रास होतोय. अरे मग रामाने करायचं काय? सीतेचा त्याग केल्यानंतर श्रीरामांनी परस्त्री सहवास धरला नाही. उलट रघूकुळातल्या पुरुषांच्या मनात सुद्धा परस्त्री येणार नाही असा आदर्श प्रभूरामचंद्रांनी घालून दिलाय, ह्याकडे कोण पाहत नाही. आणि न्यायाची भाषा न्यायाच्या दलालांनी करु नये.

      August 8, 2013


  • फोनाप्पा

    आपल्या दैवताशी इतका वेळ अनपेक्षित संभाषण. आप्पांना हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. या सुखद धक्क्यामुळे आप्पा एकदम निःशब्द झाले होते. तरीही धीर करून म्हणाले “मै क्या बोलू समझ मे नही आ रहा. मै आपको हमारे आंजर्ले गाव मे आनेका निमंत्रण देता हू. यहां का निसर्ग और समुद्र आपको जरूर अच्छा लगेगा.

      April 8, 2023


  • दिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी

    चित्रपटसृष्टीतील ज्या कलाकारांनी काळाची पावले ओळखली व त्या बरोबर स्वत:ला जुळवून घेतले ते चित्रपटसृष्टीत कायम स्थिरावू शकले. अरूणा ईराणीने हे ओळखले. त्या स्वत:च्या वयोमानानुसार भूमिका स्विकारत गेल्या. १९९२ मध्ये प्रदर्शीत झालेल्या “बेटा” मधील त्यांची सावत्र आई अप्रतिमच….सुरूवातीला गडद काळी असणारी ही व्यक्तीरेखा हळूहळू बदलत जाते आणि शेवटी मातृत्वाच्या झऱ्यात अकंठ न्हाऊन निघते. या भूमिकेसाठी त्यानां फिल्मफेअरचे उत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार मिळाला.

      August 23, 2019


  • कट प्रॅक्टिस

    रात्री दीड वाजता मोबाईलची रिंग वाजायला लागल्यावर डॉक्टर फोन करणाऱ्याला बडबडत उठला. कोणाला पोटदुखी झाली यावेळी असा विचार करत मोबाईलवर दिसणारा अननोन नंबर चा कॉल रिसिव्ह केला.

      October 25, 2021


  • “एकत्र कुटुंबाची गोष्ट”

    मुलांची वाढत्या वयातील जडणघडण व त्यांच्यावर होणारे सकारात्मक संस्कार हे एकत्र कुटुंबाच्या घरात होताना दिसतात. लहानग्या सदस्यांच्या शंकांचे निराकारण एकत्र कुटुंबातील जेष्ठ सदस्याकडून होते, आता मात्र, विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात असल्याने मुलांना आपल्या भावनांचा निचरा होण्यास अडचण निर्माण होते तसेच त्यास वेळ लागतो किंवा बंधने येतात असे वाटते.

      October 24, 2013


  • वर्तुळ एक मुक्त चिंतन

    हिंसा परमो धर्म: नावाची, डोळ्यात अंजन घालणारी एक सुंदर कथा मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिली आहे. एका प्रसंगी नीचवृत्ती मौलवीच्या तावडीतून एका हिंदू युवतीला साधाभोळा जामीद वाचवतो व घरी सुखरुप पोहचवतो. या उपकाराची परतफेड कशी करु असे तिचा पती विचारतो. त्यावर जामीद म्हणतो, ” संकटात सापडलेल्या कुणाचीही मदत कर. तीच माझी परतफेड असेल.” या कथेतून माझ्या विचारचक्रास गती मिळाली.

      March 15, 2025


  • युगांतर – भाग ४

    सुमंत जयंत परचुरे. 

    रवीने हातातला कप बाजूला ठेवला, “ताई काय बोलत्येस तू? कसला आजार? काय सांगत्येस तू हे”, रवीने ताईच्या खांद्यांना हाताने गदगदा हलवून विचारले, त्याच्या चेहऱ्यावर अशक्य गूढ भाव निर्माण झाले होते पण ताईने आपलं तोंड घट्ट मिटून घेतलं होतं, नकारार्थी मान हलवून ती सांगायचं टाळायचा प्रयत्न करत होती. “प्लिज ताई बोल ना ग, काय झालं होतं तुला? अण्णा मुंबईला काम आहे सांगून गेले होते ते आठवतंय मला चांगलंच, भयानक पाऊस होता तेव्हा, अगदी श्रावणातील ऐन दिवस, इथल्या पुजाऱ्याने भैरोबाच्या आवरातल्या महादेवाच्या मंदिरात असणे गरजेचेच होते, पण पण…. अण्णांनी अचानक एका संध्याकाळी आईला सांगितलं रात्री मुंबई ला जात असल्याचं.

      October 25, 2021


  • विश्वासातील शंका

    विश्वासातील शंका एक लहानशी घटना परंतु अध्यात्म जगांत एक महान तत्वज्ञान सांगून जाते. श्री कृष्ण एकदा जेवण्यासाठी बसले होते. रुख्मिनी त्याना जेवन वाढीत होती. अचानक श्रीकृष्ण उठले व लगबगीने जावू लागले. ते घराच्या दारापर्यंत गेले. ते क्षणभर तेथेच थांबले. थोडावेळ थांबून परत आले. पुन्हा जेवण्याच्या पाटावर बसले. रुख्मिनीला हे सारे अघटीत वाटले. तीच्या लक्षांत श्रीकृष्णाच्या ह्या हालचालीचा अर्थ कळला नाही. तीने तसे विचारले.

      February 27, 2012