(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्वप्नपूर्तीच्या दिशेने

    १३ डिसेंबर २०१५ रोजी नगर विकास मंचच्या ‘जल्लोश’ या मोठ्या इव्हेंटचे दीपप्रज्वलन माझ्या हस्ते करण्यात आले. या समारंभात आमदार संजय केळकर यांनी माझ्या एक हजाराव्या कार्यक्रमाची तारीखच जाहीर केली. मला ‘ठाणे नगर रत्न’ पुरस्कार जाहीर करून सुभाष काळे यांनी या वर्षाची उत्साही सुरुवात केली होती.

      August 22, 2022


  • शिकार

    चिणक्या,गोल्या,रवी आन चेंड्या लहानपणापसुनच जिगरी दोस्तं व्हते.एकाच वयाचे अन एकाच शाळतं शिकल्यान तेह्यचा दोस्ताना आंजुकच घट्ट झाला व्हता.ते चौघबी लयच ईपितर व्हते.काम धंदा त काय करायचे नाही पण घरच्यायच्या जिवावरं मस्तपैकी जगुन दिसभर गावात काड्या करत हूंदडायचे.नको तिथं नाक खुपसण्याच्या तेह्यच्या सलयीधं सगळं गाव परेशान व्हतं.एकदिवस आसचं चौघं दोस्त पारावर बसले व्हते.लय दिवसाचं तेह्यच्या जिवनात एंजायमेंटच नवती.गावातबी तेह्यच्या कुरापती चालयण गेलत्या.चौघंबी शांत बसले व्हते.तेव्हड्यात गोल्या मनला,“व्हयं रं चंड्या आपण लय दिसाचं मटनबी खाल्ल नाही आन नरडंबी वल्ल केलं नाही.तव्हा मी काय मंतो आज सुकीरवार हे तं आपण पार्टी करायची का...?”

    पार्टीच नाव ऐकताच रवी,चंड्या आन चिणक्याच्या तोंडालं पाणी सुटलं.तेह्यलंबी आसच कायतरी करावं आसं वाटत व्हतं.
    “हो पण पार्टी कुठं आण कशी करायची?” रवी मनला.
    तसं चंड्या मनला,“आपण रवीच्या खारीत पार्टी करू की.कालच आंधाचा शिरप्या मनत व्हता की त्यानं त्यानं आत्ताच भट्टी लावलीय आन पाच सहा बिसलेर्‍या भरून पह्यल्या धारचा मालं तयार हाये मनुन...”

    तसं गोल्या मनला ते व्हयील पण बकर्‍याचं कायं.खाटकाच्या दुकानाऊन मटन आणल्यापक्शा आपण एखांद लहानस बकरच आणु.पोकभर खायालंबी व्हयील आन सस्तबी पडल.उरलेल्या पैशात नरडबी वल्ल व्हयील.काय मंता.?”
    तसं रवी मनाला मह्याकडं बकर हाये पण लयच मोठं आन जरगट हे.त्यापक्षा आपल्या चिणकु दाजीचं बकर लहान हे.आपण तेच आणायच का?”

    रविचंबोलनं ऐकताच चिनक्या उसळुन मनला ,“मह्याघरी बकरं हाये खरं पण मथारीचा लय जीव हे त्याच्यावरं.ईकायच नाही मंते.”
    चिणक्याच बोलन मंधातच ताडत चंड्या मनला ,“मथारीलं काय ईचारायच.घरचा कारभारी तं तु हे नं.आसं बायायच्या सल्ल्यानं कारभार करतु व्हयं रं”

    चेंड्याच बोलन ऐकुन चिणक्याचा पुरशी आहंकार जागी झाला.त्यानं बकर द्यायचं कबुल केलं.मंग ततीन हजार रूपयात बकर्‍याचा सौदा करून टाकला.चंड्यानं शिरप्या आंधाकुण मव्हाची दारू आणायच कबुल केलतं.तं रविन आन गोल्यानं भांडेकुंडे आन मसाला आणायच कबुल केलं.चिणक्यानं मोठेपणाचा आव आनत बकर्‍याचा सौदा तं केलता पण त्यालं आत्ता मथारीलं कसं पटवावं समजयनं गेलतं.
    आत्ता चिनक्या,,चंड्या आन रविलं संध्याकाळच्या पार्टीचा वेध लागला व्हता. चिनक्यानं दोस्तायसंग कालच बकर्‍याचा सौदा केलता.चिणक्याच्या मथारीजवळ एक लहान बोकड्या व्हता.चिणक्यानं मायच्या मांघार्‍याच दोस्तायसंगं बोकड्याचा सौदा केलता.तीन हजार रूपयात सौदा पक्का झालता. त्यात त्याचा साडेसातशे रुपये वाटा काटुन त्यानं बाविसशे पन्नास रूपये भेटणार व्हते. मंग काय सगळे दोस्तं संद्याकाळच्या पार्टीसाठी उतावळे झालते.ठरल्याप्रमाणं संध्याकाळचं माल मसाला घेऊन सगळेजणं खारीत जमले व्हते.तेह्यनं मव्हाच्या पह्यल्या धारच्या दोन चार बिसलेल्या भरून आणल्या व्हत्या.चिणक्याच्या मथारीलं बोकड्या ईकायचा नवता.तं चिनक्या त्या बोकड्यालं ईकायच्या मांघ लागला व्हता.

    संध्याकाळ झाली.सगळ्या दोस्तांनी बिसलेरीच्या बाटल्या रिकाम्या केल्या.थोड्याच वेळात मव्हाच्या पह्यल्या धारच्या मालानं अंमल दाखवायल सुरवात केलती.मंग काय चिनकु आन दोस्तायचा मेंदू गरगरू लागला.ते हूडदंग करू लागले.पार्टी चांगलीच रंगात आलती.आता पोटात भकभक आग लागली व्हती.मंग गोल्यानं चिणक्यालं मनलं कि,“ चला चिणकु दाजी टाका मटन शिजवायलं.” हे ऐकुण चिणक्याचातं चेहरा ढवळा शिपतच पडला.काय बोलावं त्यालं कायबी कळेनं गत्यालं चुप पाहुन रवी अन चंड्या चिणक्यावर आंजुकच चिडायलं लागले.चिणक्यानं आंधीच पैसे घेतल्यानं ते कानकोंडा झालता.तसं पाह्यलं तं चिणक्यानं पहाटचं मथारीलं पटवण्यासाठी खडा टाकुन पाह्यला व्हता पण मथारीनं बकरं ईकायलं साफ नकार देलता.आन वरून,“मुडद्या सगळं घर गिळलं अन आत्ता तुलं मव्ह बकर डोळ्यातं सलायलय व्हयं.चाल निंघ ईथुन आत्ता मनला तं मनला पुन्हा मनला तं मुडदाच शेकते तुव्हा.” चिणक्यानं कचरत कचरत गोल्या,रवी अन चंड्यालं घरी पाहाटं घडलेलं रामायण सांगतलं.हे ऐकुण तिघबी चवताळुन चिणक्याच्या आंगावर धाऊन गेले.गोल्यानं तं चिणक्यालं दम देऊन सांगल की,“आत्ता तं तुलं तेच बकर आणावं लागलं नायतं डबल पैसे वापस देवावं लागतील.”संगच्या दोस्तायचे तेवर पाहुन चिणक्या वरमला.त्यानं तिघायलबी शांत बसायलं सांगत एक प्लॅन समजाऊन सांगतला.चिणक्याचा प्लॅन ऐकुन बाकी तिघंबी तयार झाले.तेह्यणं उरलेली एक बाटली संपवली आन चिणक्याच्या मथारीचं बकरं चोरायच्या मोहीमेवर निंघाले.ठरलेल्या प्लॅन परमानं चिणक्या आन रवीनं आंगावर घोंगड्या पांघरून घेतल्या आन चिणक्याच्या घराकडं निंघाले.तं गोल्या अन चंड्या गावातल्या डिपुकडं फ्युज काढायलं निंघाले.घराजवळ पव्हचलकी तिनदा बॅटरीची टिकमिक करून ईशारा देयाचं तेह्यच्यात ठरलं व्हतं.ईकड चिणक्या आन रवी चिणक्याच्या घराच्या जवळ जवळ जात व्हते.चिणक्याच्या घरी एक काळं कुत्र व्हतं.चिणक्याची मथारी त्यालं बकर्‍यासंगच आंगणात बांधायची.त्या कुत्र्यालं घराच्या परसात आजब हालचाली जाणवु लागल्या.कायतरी ईपरीत घडायलय या भनकनं ते कुत्र केकाटु लागलं.कान टवकारू टवकारू मोठमोठ्याण भुकु लगलं.कुत्र्याचं केकाटन ऐकुन चिणक्याची माय अन बायको सावध व्हवुन घरातुन आवाज देवू लागल्या.तेवढ्यात रविनं डिपुच्या दिशेनं तिनदा बॅटरीची टिकमीक केली.तसं मागावरच आसलेल्या गोल्या आन चंड्यानं ताबडतोब लाईट बंद केली.लाईट गेल्या गेल्या चिनक्यानं पळतच जात गपकन खुट्याची शिकार सोडुन शिकारीच्या अंगावर घोंगडी टाकली आन शिकार घेऊन रानाच्या दिशेनं पळाले.चिणक्यालं त्याचे धरून शिकारीचे तीन हजार भेटले होते.तेह्यनं शिकारीचे खांडं खांडं केले.मालमसाला लावुन मस्त रस्सा भाजी बनवली.सगळ्या शिवारात भाजीचा गंध दरवळु लागला.मंग काय सगळ्या दोस्तायनं मिळुन रातभर मस्त पार्टी करत एन्जॉय केलं.पहाट पहाट चिनक्या घरी आला.रातची धुंदी आंजुकबी त्याच्या चेहर्‍यावर दिसत व्हती.रातचं चिनक्यानं माय आन बायकोलं काहिच सांगलं नवतं मनुन मंग ते दबकतच घरी येवु लागला.ते घरी आल्या आल्या त्याची बायको आन माय त्याच्या नावानं बोंबलू लागल्या.मायन मोठ मोठे डोळे टवकारत चिणक्याकडं पाह्यलं.तसा चिनक्या टरकलाच.चिणक्याची माय चिनक्यालं मनली,“मेल्या,मुडद्या,तुव्हा खानाखरोबा व्हवो,कुठं उलथला व्हता रातभर.आन व्हय रं रातच्याला घोंगडी घालून चोरासारखा काहून आलता आणि रातपसून आपलं कुत्र दिसयनं तू कशाला ते कुत्र घेऊन गेलता.व्हय रं मुडद्या.” जसयं चिनक्यानं मथारीचे शब्द ऐकले तसा त्यो हैरान झाला.त्यानं हैराणीनचं बकर्‍याच्या खुट्याकडं पाह्यलं तं ते बकरं चिणक्याकडं पाहुन बेऽऽअं..ऽऽ आसं वरडु लागलं.चिणक्यालं ते पाहुन कसकान्नुच झालं.त्याच्या मनात मळकी भरली.तो तसाच पळत पळत मोरीजवळ गेला आन भडाभडा वकाया लागला.त्याल व्हयालेल्या वकार्‍या पाहुन त्याच्या मायलं आन बायकोलं काहीच समजयनं गेलत.त्या बिचार्‍या घायबरून गेल्या.

    चिनक्याच्या मायनं शेजारच्या पिंट्यालं बलवुन चिणक्याचे दोस्त रवी,गोल्या आन चंड्यालं बलवलं.ते तिघबी तिथं आले तं तेह्यलं चिणक्या पोट खड्डोस्तोर वकायलेला दिसला.काय झालं तेह्यलं कळयनं गेलं.तेव्हड्यात तेह्यनं चिणक्याच्या खुट्यावरच्या बोकड्याचा“बेऽऽ....अंऽऽ“ आसा आवाज ऐकला. आवाज ऐकताच तेह्यच्या डोस्क्यात तडखन उजेडच पडला.राती तेह्यनं बोकड्याच्या जागी कुत्र्यालं नेलं व्हतं.आन बकर मनुन कुत्र्यालच खाल्ल व्हतं.दारूच्या नशेत तेह्यलं काहीच कळालं नाही.ते पिऊन टुंग व्हते.आत्ता त्या तिघायलबी मळमळुन आलं,आन तेबी भडं भडं वकु लागले.काय व्हयालं कोणालचं काय कळणं झालतं.मंग थोड्यायेळानं सगळा खुलासा झाल्यावर चिणक्याच्या मायलं अन बायकोलं रडावं का हासावं काहीच कळयन झालतं.

    सांगोवांगी ही खबर सगळ्या गावात पसरली.आत्ता सगळं गांव चिणक्या आन दोस्तायची पार्टी यावरं हासू लागलं.चिणक्या आन त्याच्या दोस्तायलं घराबाहीर निंघनं बी मुस्कील झालतं.घराबाहीर पडलं की जे ते ईचारायचं ,“काय मंग कशी झाली पार्टी”.तसं चिणक्या आन त्याच्या दोस्तायलं कसकान्नु व्हयाचं.पडलेल्या चेहर्‍यानं ते आपले मुकाट्यानं निंघुन जायाचे.

    ©गोडाती बबनराव काळे,हाताळा,हिंगोली.
    9405807079

      January 23, 2024


  • भक्तीरसाने ओथंबलेली नवी गाणी (विनोदी लेख)

    भक्तीरसाने ओथंबलेल्या या गाण्यांच्या भक्तीमय वातावरणात गणोशोत्सव साजरा करुन आपली महान संस्कृती जपण्यासाठी गणपती व इतर सणांच्या काळात विविध चित्रपटांची गाणी वाजवली जातात… त्याचा अनेकांना त्रास होतो….! खरं तर या गाण्यांचा भाव न समजल्यामुळे असा त्रास होतो… ही गाणी समजावी व आपला त्रास कमी व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न….

      August 16, 2019


  • दिघेचं ‘दिवास्वप्न’

    किशोर साव हा आमचा खूप जुना दोस्त. त्याच्या ‘दी गेम’ या पहिल्या नाटकापासून आमची मैत्री. काही वर्षांपूर्वी त्याचा ‘ब्लफमास्टर’ नावाचा धम्माल मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्याशी दिघेची भेट घालून द्यायची असं ठरविले.

      January 12, 2022


  • रुखरुख

    आज एक आठवडा झाला. त्या लहान मुलाला मी रस्त्यावर नकळत शोधण्याचा प्रयत्न करते आहे. पण तो कुठेही नजरेस पडत नाही आहे. कुठे असेल तो?
    मागच्याच मंगळवारी सकाळी दूध घेऊन येताना तो गाडीच्या समोर धावत धावत आडवा गेला होता.

      November 27, 2025


  • श्रद्धांजली…. महाराजांना !!

    आज ३ एप्रिल ! हृदयाच्या एका कप्प्यात कायम विराजमान असणार्‍या आमच्या महाराजांची आज पुण्यतिथी ! (म्हणजे महाराजांच्या पुतळ्याला हार घालून , पेपरमध्ये आपला फोटो छापून आणण्याचे राजकारण्यांची पुण्य पदरात पाडून घेण्याची तिथी !)

    ३३७ वर्षे झाली या दु:खद घटनेला , पण का कुणास ठाऊक मन एकदम ३३७ वर्षांनी मागे जातं आणि कुठल्याश्या अनामिक भावनिक सेतूनं ते आसन्नमरण अवस्थेतल्या त्या श्रीमंत योगीश्वराच्या मनाशी एकरूप होऊन सांगू लागतं.

      April 3, 2017


  • ठाणे नगररत्न पुरस्काराने सुखावले

    २०१५ हे वर्ष मला बरेच काही द्यायचे असे ठरवून उजाडले. 'ठाणे नगर विकास मंच' ही संस्था दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पाच मान्यवरांना 'ठाणे नगररत्न' पुरस्काराने सन्मानित करते. ठाणे शहराचे माजी उपमहापौर आणि ठाणे नगर विकास मंचचे अध्यक्ष माननीय श्री. सुभाष काळे यांनी फोन करून त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले.

    “अनिरुद्धजी, कलाक्षेत्रातील या वर्षीच्या ठाणे नगररत्न पुरस्कारासाठी आमच्या कमिटीने तुमचे नाव निश्चित केले आहे. गडकरी रंगायतनमध्ये एका मोठ्या समारंभात हे पुरस्कार दिले जातात. तेव्हा आपण या समारंभात हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहाल याचे संमतीपत्र सही करून द्या. सुभाषजी म्हणाले. मी त्यांच्याकडे पहातच राहिलो. “संमतीपत्र सही करून देता ना?" सुभाषजींच्या या प्रश्नाने मी भानावर आलो. आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मला दिल्ली आणि मुंबईत मिळाले होते. माझ्या ठाणे शहरात मिळणारा हा मोठा पुरस्कार होता.

    “माझ्या ठाणेकर रसिकांसमोर आपण मला पुरस्कार देणार आहात. आपले आभार कसे मानू? यासाठी कोणत्याही पत्रावर सही करून देण्याची माझी तयारी आहे." मी आनंदाने म्हणालो. "पण माझे खरे काम तर पुढेच आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी तुमचा गाण्याचा कार्यक्रम करावा आणि त्यात तुम्हाला पुरस्कार द्यावा अशी माझी इच्छा आहे." सुभाषजी म्हणाले. हा माणूस एका मागोमाग एक सुखद धक्के देत होता. तेही अगदी शांतपणे.

    “तुम्ही खरे बोलत आहात की माझी गंमत करता आहात?" मी विचारले. “अहो गंमत कशी करेल? खरंच विचारतो आहे." ते शांतपणे म्हणाले.

    “सुभाषजी, मला एक हजार जाहीर कार्यक्रम पूर्ण करायचे आहेत. ९८० पर्यंत मी पोहोचलो आहे. पुरस्काराइतकाच मला पुढील प्रत्येक कार्यक्रम महत्त्वाचा आहे." मी उत्तरलो.

    “तर मग या तुमच्या वाटचालीतील पुढचा कार्यक्रम ठाणे नगर विकास मंचसाठी असेल. लवकरच वर्तमानपत्रात या पुरस्कारांची घोषणा होईल.' सुभाषजी म्हणाले. एका दिवसात या माणसाने मला बरेच काही दिले होते. कार्यक्रमांसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच एक 'ट्रिगर' दिला होता. उत्साह वाढवला होता आणि पुरस्कार देऊन माझा आत्मविश्वास उंचावला होता. या काळात मला त्याची अत्यंत गरज होती. कधी कधी कलाकार एकदम हळवा होऊन जातो. कलाक्षेत्रात वाटचाल करताना एकदम त्याची शक्ती संपून जाते. या वेळी 'तू पुढे चल. आमचा तुला पाठिंबा आहे. आम्ही तुझ्या कलेवर मनापासून प्रेम करतो.' अशा शब्दांची त्याला फार आवश्यकता असते. माझे काहीचे असेच झाले होते. या वेळी सुभाष काळे आणि ठाणे नगर विकास मंचने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीच विसरू शकणार नाही.

    लवकरच हे पुरस्कार वर्तमानपत्रात जाहीर झाले. मग काय, माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. २२ फेब्रुवारी २०१५ रोजी 'ठाणे नगररत्न पुरस्कार वितरण सोहळा' गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आला. डॉ. मुरलीधर गोडे, डॉ. मंजूषा गोखले. श्रीधर नेवाळकर आणि नीता देवळालकर हे इतर क्षेत्रातील पुरस्काराचे मानकरी होते. 'फर्माईश' या माझ्या हिंदी - मराठी गीत - गझलच्या कार्यक्रमाने पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली. नंतर माझ्या गाण्याच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी छोटी फिल्म दाखवण्यात आली. याचे संकलन नरेन्द्र बेडेकर यांनी केले होते. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांना या समारंभासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते कलाक्षेत्रासाठीचा २०१५ सालचा 'ठाणे नगररत्न पुरस्कार' मला देण्यात आला. त्यांच्यासारख्या महान गायकाच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्याचे महत्त्व माझ्यासाठी अनेक पटींनी वाढले. यानंतर अजित कडकडे यांनी गाणे सादर केलेच, पण एक छोटे भाषण देखील केले. 'अनिरुद्ध, आता तू गाण्याचे विविध प्रकार उत्तम तऱ्हेने गाऊ शकतोस. तेव्हा एका गायन प्रकारात अडकून न राहता विविध स्टाईलची गाणी गा.' असा संदेश त्यांनी दिला. माझी गाण्याची कारकीर्द त्यांनी जवळून पाहिली होती. त्यांचा तो अधिकार होता. या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठाणेकर रसिकांनी माझे कौतुक केले.

    -अनिरुद्ध जोशी

      August 20, 2022


  • एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – क

    ज्‍या इंग्रजीच्‍या आक्रमणाची आपल्‍याला एवढी धास्‍ती वाटते, तिचंच उदाहरण पाहूं. इंग्रजीनं अनेक शब्‍द इतर भाषांमधून मुक्‍तपणे घेतले आहेत आणि त्‍यामुळे इंग्रजी भाषेची प्रगतीच झालेली आहे

      March 12, 2019


  • कोरडाच राहिलो सदा

      

      May 28, 2013


  • बाॅबी ५० वर्षांची झाली

    परवाच्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर २०२३ ला – ” बाॅबी ” – ५० वर्षांची झाली…कोण ही बाॅबी ? – असा प्रश्न आज नवीन पिढीला पडू शकतो कारण आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात लव्ह वगैरे सगळं एक व्यवहाराचा भाग असल्यासारखं वाटू लागले आहे पण आज जे साठीत आहेत त्यांना निश्चितच असला प्रश्न पडणार नाही कारण बरीच वर्षे बाॅबीने भुरळ घातली होती…
    बाॅबी हा सिनेमा….

      October 21, 2023