(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आलास..? ये, दार उघडंच आहे

    ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता आणि तिचा अनुवाद. अनुवादक माहित नाही...

    आ गए तुम?
    द्वार खुला है, अंदर आओ..!

    पर तनिक ठहरो..
    ड्योढी पर पड़े पायदान पर,
    अपना अहं झाड़ आना..!

    मधुमालती लिपटी है मुंडेर से,
    अपनी नाराज़गी वहीँ उड़ेल आना..!

    तुलसी के क्यारे में,
    मन की चटकन चढ़ा आना..!

    अपनी व्यस्ततायें, बाहर खूंटी पर ही टांग आना..!

    जूतों संग, हर नकारात्मकता उतार आना..!

    बाहर किलोलते बच्चों से,
    थोड़ी शरारत माँग लाना..!

    वो गुलाब के गमले में, मुस्कान लगी है..
    तोड़ कर पहन आना..!

    लाओ, अपनी उलझनें मुझे थमा दो..
    तुम्हारी थकान पर, मनुहारों का पँखा झुला दूँ..!

    देखो, शाम बिछाई है मैंने,
    सूरज क्षितिज पर बाँधा है,
    लाली छिड़की है नभ पर..!

    प्रेम और विश्वास की मद्धम आंच पर, चाय चढ़ाई है,
    घूँट घूँट पीना..!
    सुनो, इतना मुश्किल भी नहीं हैं जीना..!!

    ...महाश्वेता देवी.

    अनुवाद...

    आलास..?
    ये, दार उघडंच आहे ...आत ये
    पण क्षणभर थांब....

    दारातील पायपुसण्यावर
    अहंकार झटकून ये...

    भिंतीला बिलगून वर चढलेल्या
    मधुमालतीच्या वेलावर
    नाराजी सोडून ये...

    तुळशीपाशी मनाचे सारे ताप सोडून ये...
    बाहेरच्या खुंटीला सारे व्याप टांगून ये...

    पायातल्या चपलांबरोबर
    मनातली नकारात्मकताही काढून ठेव ..

    बाहेर खेळणाऱ्या मुलांकडून
    थोडा खेळकरपणा मागून आण..
    गुलाबाच्या कुंडीतलं थोडं हसू
    चेहेऱ्याला लावून आण...

    ये...
    तुझी सारी दुःखं, सारे प्रश्न
    माझ्यावर सोपव...
    तुझ्या दमल्या-भागल्या जीवाला
    प्रेमाच्या चार गोड शब्दांचे विंझणवारे घालते...

    ही बघ....
    तुझ्यासाठीच ही संध्याकाळ अंथरली आहे मी..
    सूर्य क्षितिजाला बांधलाय
    आणि
    आकाशी गुलालाची उधळण केलीयं...

    प्रेम आणि विश्वासाच्या मंदाग्नीवर
    चहा उकळत ठेवलाय...
    तो घोट घोट घे....

    ऐक ना ...
    इतकंही अवघड नाहीये रे जगणं ...

    --

      September 3, 2016


  • नागराणीचा मुकुट

    एक होता राजा. त्याला एकुलती एक मुलगीच होती. त्या मुलीला त्यानं खूप कोडकौतुक करून वाढविलं होतं. एकदा राजा राजकुमारीला बरोबर घेऊन फिरायला बाहेर पडला. फिरता फिरता एके ठिकाणी त्यांना लोकांची गर्दी जमलेली दिसली. राजा आणि राजकुमारी दोघेही त्या गर्दीत घुसले. बघतात तर एक गारुडीण नागाला खेळवीत होती. एकदा नागाची बांगडी करून ती हातात घाली, तर एकदा कंठीसारखी त्याच्या गळ्यात घाली

      October 5, 2025


  • गोमु वजन कमी करतो (गोमुच्या गोष्टी – भाग ८ )

    खरं तर ह्या वजनाच्या तिकीटावरील भविष्यावर विश्वास ठेवणं आणि मैना आणि कार्ड समोर घेऊन बसणाऱ्याने सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवणं सारखचं आहे. नेहमीच घडू शकणाऱ्या घटनांबद्दल अंदाजपंचे दोन वाक्य लिहायची की ते भविष्य खरं होण्याचे चान्सेस वाढतात.

      March 12, 2022


  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ११

    निशाने त्याच्या हाताला जोरात हिसडा दिला, “Please रोहन, तू माझ्या अंगाला हात लावू नकोस. आणि माझ्या मागेही येऊ नकोस.  मला तुझं काहीच ऐकायचे नाही. जाऊदे मला. Don’t touch me, Don’t touch me”

      April 15, 2020


  • कोणीतरी आयुष्यात डोकावते तेव्हा…

    आज शाळेचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. कारणसुद्धा तसेच आहे. शाळेसाठी तब्बल ८० लाख रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधांसह एक एकर क्षेत्रात शाळेची इमारत दिमाखात उभी आहे. आज शाळासुद्धा सर्वांसोबत त्या व्यक्तींची वाट बघत आहे जी व्यक्ती शाळेचे उद्घाटन करणार आहे.

      May 5, 2022


  • समथिंग डार्क इन ब्लॅक

    कधी कधी नात्यांमध्येही गम्मत असते. परंतु कळली तर ठीक नाही तर मात्र बोंब. बहुदा असेच होत असते. मला ती त्या दिवशी भेटली खरी पण अस्वस्थ होती. साहजिक आहे लग्नाचे वय झाले होते , निघूनच गेले होते करंट सतत करिअरच्या मागे लागल्यामुळे लग्नाचा विचार ती करूच शकत नव्हती.

      January 4, 2020


  • अपण्णक जातक

    वाराणशीचे राज्य. राजाचे नाव ब्रह्मदत्त. या राज्यातल्या एका व्यापाऱ्याच्या
    कुळात बोधिसत्त्वाचा जन्म झाला. बोधिसत्त्व मोठा झाला. देशोदेशी हिंडून
    व्यापार करू लागला.

      December 25, 2024


  • बस…

      November 3, 2014


  • दिवाळीची पोस्त

    पोस्टमनची आणि त्या मुलीची हळूहळू चांगली दोस्ती जमली. दिवाळी जवळ आली होती. पोस्टमनला काय द्यावे याचा विचार ती मुलगी करत होती. तिला एक युक्ती सुचली. पत्र घेण्यासाठी दार उघडल्यावर तिला रोज दिसायचे की पोस्टमनची पावले मातीत उमटली आहेत.

      July 12, 2024


  • युगांतर – भाग ३

    सुमंत जयंत परचुरे. 

    दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ताईने राहिलेल्या दुधाचा चहा करून घराची आवरा आवर आणि साफ सफाई करायला घेतली. डिसेंबर चा काळ असल्याने थंडी पडली होती. समुद्र जरी जवळ असला, उष्म वातावरण असले तरी थंडीत हवामान त्या उष्म्याला जुमानायचे नाही.

      October 24, 2021