नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
भारतात सर्कस सुरु झाली १८८२ साली. विष्णुपंत छत्रे यांनी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय सर्कसचा पहिला शो केला. त्यानंतर महाराष्ट्राबरोबरच केरळ व बंगाल मधील काही मंडळींनी सर्कसला नावारूपाला आणले.
July 2, 2021
१६ ऑक्टोबर १९०३ रोजी अरबी समुद्राच्या साक्षीने पहिले हॉटेल ताज मुंबापुरीत उभे राहिले. काही ब्रॅण्ड स्वप्न असतात. केवळ ब्रॅण्डकर्त्यांचं नाही तर वापरकर्त्यांचंही. अमुक ब्रॅण्ड एकदा तरी वापरता यावा यासाठी काही जण प्रयत्नशील असतात; पण ब्रॅण्डनेम इतकं मोठं, की त्यातले केवळ मोजकेच यशस्वी होतात. भारतीय हॉटेल समूहातील असा स्वप्नवत ब्रॅण्ड म्हणजे ताज. जे कामानिमित्त वा स्वखर्चाने इथे वारंवार, क्वचित किंवा अगदी एकदा जातात त्या सर्वासकट जे कधीच इथे जाऊ शकलेले नाहीत त्या सर्वानाच या ताजचं आकर्षण आहे.
टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेटजी टाटा यांनी इंडियन हॉटेल कंपनीची (आयएचसीएल) स्थापना १८९९ मध्ये केली. त्यादरम्यान भारतात पाश्चिमात्य धर्तीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा त्यांचा मानस होता. यामागे अनेक दंतकथा सांगितल्या जातात. त्यातील एक अशी की, मुंबईत त्या वेळी अनेक अशी हॉटेल्स होती जी फक्त युरोपीयन मंडळींसाठी मर्यादित असत. त्यापैकी एक असलेल्या वॅटसन हॉटेलमध्ये जमशेटजींना भारतीय असल्याने वंशभेदाचा अनुभव आला. त्यामुळे स्वदेशी पंचतारांकित हॉटेलची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणायचं ठरवलं. काहींच्या म्हणण्यानुसार टाटांच्या काही मित्रमंडळींनी मुंबईतील तत्कालीन हॉटेलविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी ताजच्या उभारणीचा निश्चय केला. या कहाण्यांपेक्षा लोवाट फ्रेझर या टाटा समूहाशी जवळचे संबंध असणाऱ्या जमशेटजीच्या मित्राचं कथन अधिक पटतं. त्यांच्या मते ही संकल्पना जमशेटजींच्या मनात अनेक वर्ष घोळत होती. त्यावर त्यांनी अभ्यासही केला होता. मालकी हक्क वा उत्पन्नाच्या साधनापेक्षा पर्यटनदृष्टय़ा लोकांनी भारत पाहायला यावं, मुंबईच्या सौंदर्यात भर घालेल अशी आलिशान वास्तू निर्माण व्हावी, हा उद्देश जमशेटजींच्या मनात होता. १६ ऑक्टोबर १९०३ रोजी अरबी समुद्राच्या साक्षीने पहिले हॉटेल ताज मुंबापुरीत उभे राहिले. स्वत: जमशेटजींनी लंडन, पॅरिस, बर्लिन, डुसेलडॉर्फ इथून सामान, फर्निचर, अंतर्गत सजावटीच्या कलात्मक वस्तू आणवल्या. हॉटेल ताज मुंबापुरीचा सरताज ठरलं. तेव्हापासून ताज हॉटेलची साखळी भारतभर पसरत गेली.
भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय बीच रिसॉर्ट गोवा फोर्ट अग्वादा इथं सुरू केलं, ते १९७४ मध्ये ताज हॉटेल समूहानेच. हिप्पी पर्यटकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्याचे परदेशी पर्यटकांसाठी आदर्श ठिकाण असे रूपांतर होण्यात या हॉटेल समूहाचा वाटा मोठा आहे. त्यानंतर याच समूहाने अनेक राजवाडे हॉटेलमध्ये रूपांतरित केले. उदयपूर लेक पॅलेस त्यातील पहिला राजवाडा ठरला. भारतीय संस्कृतीला आंतरराष्ट्रीय मान्यतांचा पंचतारांकित साज चढवत ताज हॉटेल समूहाने एकेक शिखर सर केलं.
भारतीय राष्ट्रीय उद्यानातील ताज सफारी असो, ताज विवांता, ताज एक्झॉटिका या साऱ्या हॉटेल्सनी देशीपरदेशी मंडळींना पंचतारांकित अनुभव देण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. आज या समूहाच्या हॉटेल्सनी शंभरी गाठली आहे. त्यातील ८४ हॉटेल्स भारतभरात सेवा देतात, तर अमेरिका, लंडन, दक्षिण आफ्रिका, मालदीव, नेपाळ अशा विविध १६ देशांत ताज हॉटेलने आपला झेंडा रोवला आहे. २०१० मध्ये ताज हॉटेल कर्मचारी संख्या १३,००० इतकी होती.
२००८ च्या अतिरेकी हल्ल्याने मुंबईसोबत सारं जग हादरलं; पण हॉटेल ताजवरील हल्ला काळजावर ओरखडा उमटवणारा होता. अतिरेक्यांनी या वास्तूची निवडच भारतीयांच्या गौरवावर घाला घालण्यासाठी केली होती. २०१० मध्ये या हल्ल्याच्या खुणा तशाच जपत पूर्वीच्या तोऱ्याने ताज पुन्हा उभे राहिले तेव्हा प्रत्येक मुंबईकर, प्रत्येक भारतीय भरून पावला. या ब्रॅण्डची गंमत हीच की, त्याचा अनुभव घेणारे फार कमी; पण अनुभव न घेताही या ब्रॅण्डकडे आशेने, कुतूहलाने, अभिमानाने, मीसुद्धा एकदा इथे पोहोचेन या निश्चयाने पाहणारे जास्त. भारतीयांसाठी हा हॉटेल ब्रॅण्ड सोनेरी दुनियेसारखा आहे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
October 16, 2021
पाडोवा हॉटेलमाधुन चेकौट करुन आम्ही सर्वांनी जन गण मन चे समूहगान केल आणि तिथून 300 कीमीवरच्या पीसा शहराकडे निघालो. इटलीतील पीसाच्या झुकता मनो-याच्या आसपास अजूनही दोन ऐतिहासिक वास्तू आहेत; एक, बाप्टेस्ट्री जी इटलीतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बाप्टेस्ट्री आहे आणि जीची घुमटासह उंची झुकता मनो-याहूनही थोडी जास्तच आहे आणि दुसर, पीसा कॅथेड्रल. या दोहोंच्या बरोबरच झुकता मनोरा असूनही पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे तो झुकता मनोराच!
October 22, 2019
भास्कर कुलकर्णी यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या दिडशेहून अधिक रोजनिशी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्व विषयांवर सविस्तर लिहिलेले आहे. ते असामान्य व्यक्तिमत्त्वाचे चित्रकार व संवेदनशील लेखक होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी दरभंग्यात त्यांचे मंदिर उभारले.. आणि एका कलासक्त जीवनाची, आख्यायिका होऊन राहिली…
June 8, 2022
राज तरंगिनी हा विश्व प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे काश्मीर प्रान्ताचा संस्कृतात लिहिलेला पद्यबद्ध इतिहास. त्याचा कर्ता आहे कल्हण .
राजतरंगिणी म्हणजे राजांची नदी, प्रवाह किंवा परंपरा–असे यथार्थ नाव कल्हणाने आपल्या या राज वंशाच्या इतिहास स्वरूप ग्रंथाला दिले आहे.
June 11, 2026
मे महिन्यात घराचे बांधकाम सुरु झाले होते तशातच डिसेंबर महिन्यात आम्हाला दुसरे बाळ होणार आहे समजल्यावर आनंद झाला. किमया ताईने ह्यावेळी आपण कोणतीही रिस्क न घेता प्लॅन्ड सीझर करू त्यासाठी तिने तिच्या हॉस्पिटलला येणाऱ्या डॉ. रेखा थोटे यांच्याकडे कन्सल्ट करायला सांगितले, त्यांनी पण मागील डिलिव्हरीचे सगळे रिपोर्ट आणि हिस्टरी पाहिली आणि सीझरच करायचा निर्णय घेतला.
July 24, 2021
जून २०१८ मध्ये आम्ही जर्मनीत डुईसबर्ग इथे राहावयास गेलो होतो. भारतात परतण्यापूर्वी चार-पाच दिवस आधी मुलगा व सुनेने हा अनोखा आणि नयनरम्य प्राणिसंग्रहालय बघून घ्या असा आग्रह धरला. म्हणून आम्ही घरून नाश्ता करून व थोडा खाऊ- पाणी बरोबर घेऊन २७ जून २०१८ रोजी सकाळी दहाच्या सुमारास प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी निघालो. त्यांच्या घरापासून केवळ ३ बस स्टॉप इतके अंतर. प्राणिसंग्रहालय बघून आल्यावर वाटले एवढे जवळ जाऊन आपण प्राणी संग्रहालय बघितल नसत तर मनात कायमची रुखरुख राहिली असती !

प्रत्यक्ष जाऊन आल्यावर आम्ही आनंदाने फुलून गेलो. फक्त लहान मुलांसाठी ते प्राणिसंग्रहालय नव्हते तर सर्वांसाठी एक मनोरंजन पार्क होते. इथले ‘चायनीज गार्डन’ तर नितांत सौंदर्याने बहरलेले आहे, नटलेले आहे. चिनी राजाच्या दरबारातील वाद्य वादनाचा कार्यक्रम चालू असल्याचे सुंदर तैलचित्र आहे. त्याच्या दारात उभे राहून मी माझा फोटो काढून घेतला.
प्राणी संग्रहालय, 'रुहार' वरील मलहेमच्या सीमेवर डुईसबुर्ग मधील शहरी 'जंगलाच्या' उत्तरेकडील भागात वसलेले आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे ‘फेडरल हायवे’ जवळ असल्यामुळे थोडं अंतर चालल्यावर, छ्योट्या रस्त्यावरून, आत गेल्यानंतर, गेटच्या आत, एवढ मोठ प्राणी संग्रहालय असेल याची सुतराम सुद्धा कल्पना करता येत नाही.
प्राणी संग्रहालयाच्या मुख्य प्रवेशदारावर, संग्रहालयातील प्राणिमात्रांच्या वर्गीकरणाचे, त्यांची माहिती देणारे दिशा दर्शविणारे फलक आहेत. आत प्रवेश केल्यानंतर अतिशय सुंदर आणि सोप्या तऱ्हेने केलेले मार्गदर्शन अतिशय परिणामकारक आहे. त्यातील काही फलकांची झलक या लेखाच्या सुरवातीलाच दर्शविली आहे.
१२ मे १९३४ रोजी स्थापन झालेले हे ‘डुईसबर्ग प्राणी संग्रहालय’ जर्मनी मधील सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयापैकी एक आहे. हे ‘डोल्फिनेरिअम ‘ (DOLPHINERIUM), साठी तसेच, १९९४ पासून ‘कोआलास’ प्राण्याचे प्रजनन केंद्र म्हणून प्रसिद्धीस पावले आहे. ‘कोआलास’ मूळ ऑस्ट्रेलियामधील अस्वलासारखा दिसणारा छोटा ‘शाकाहारी- मांसाहारी’ प्राणी आहे.
खऱ्या अर्थी , १९३६ मध्ये, प्रथम हत्ती व लहान, लहान प्राण्यांच्या संवर्धनापासून या प्राणिसंग्रहालयाचा विस्तार होत गेला. १५.५ हेक्टर क्षेत्रफळावर २८० पेक्षा जास्त प्रजाती येथे असून ५००० पेक्षा अधिक प्राण्यांचे संवर्धन केले जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी काही काळ प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात आले होते . २००४ साली प्राणिसंग्रहालयाला ७० वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने 'पूर्ती' समारंभ साजरा झाला आणि ७० वर्षांचा इतिहास प्रदर्शनाद्वारे मांडण्यात आला होता. १२ मे २०२१ मध्ये त्याची तब्बल ८७ वर्षे पूर्ण झाली. आता तर जगभरातून दर वर्षी दहा लाख लोक प्राणिसंग्रहालयiला भेट देतात. प्राण्यांचा तसेच डॉल्फिन ‘शो’चा आनंद लुटतात.
या प्राणिसंग्रहालयात डॉल्फिन, कोआलास, तसेच कोडियाक अस्वले, मोठी मांजरे, जिराफ, हत्ती, झेब्रा, ऱ्हिनोस, उंट, जग्वार, चिंपांझी, उरांगगोटांन, गोरिला, निरनिराळ्या देशांतील हत्ती, वाघ, सिंह आहेत. त्याच प्रमाणे सांबर, मोर, पोर्कीपून (साळींदर), लाल गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो, ऱ्हिनोज , कांगारू, हरिणे हिप्पोपोटॅमस, मोठ्या प्रमाणात आढळणारी कासवे, असे असंख्य प्रकारचे प्राणी, पक्षी आणि जलचर प्राणी, लक्ष वेधून घेतात, मन मोहून टाकत, आपले वय विसरायला लावतात. लहान मुलांप्रमाणेच आपण शीळ घालतो, टाळ्या वाजवित आनंद व्यक्त करतो. सहजपणे आपले हात, क्षण टिपण्यासाठी कॅमेराकडे वळतात.
संपूर्ण युरोप मधील प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि निरीक्षकांना येथे खास सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्यांच्यासाठी हे प्राणी संग्रहालय तर एक पर्वणीच आहे.
एवढा मोठा परिसर असून सुद्धा इतक्या प्राणी- पक्षी याना दिला जाणारा उत्तम आहार, परिसराचे सभोवतालचे वातावरण, नियोजित, हेतुपुरस्सर निर्माण केले गेलेले उपयुक्त तापमान, प्राण्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी वैद्यकीय तपासणी सेवा, प्राण्यांना वावरण्यासाठी पुरेशी जागा आणि त्यांच्यात, 'भीती-मुक्त' मानसिकता निर्माण करण्यासाठी केलेला सततचा पाठपुरावा, अशा अनेक विधायक गोष्टी केल्या जातात. त्याच बरोबर पर्यटकांसाठी उभारलेले 'रिफ्रेशमेंट स्टँड्स', वनस्पतीने नटलेल्या बागा, खेळती हवा, स्वच्छता आणि शिस्त यांचा उत्तम संगम झालेला आढळतो. 'रिओ- निग्रो' ट्रॉपिकल Aquarium, टॉरटोईज एनक्लोजर, वगैरे विभाग आहेत.
डॉल्फिनेरियम
इव्हो, पेपिना, डेल्फी, डेझी, डार्ट, डेबी, डोबी अशा नावांचे डॉल्फिन या प्राणिसंग्रहालयात आहेत. सुमारे तीन दशलक्ष लिटर समुद्री पाण्यात पाणी असलेल्या तलावात डुंबत आणि विहार करतात. हे रासायनिक दृष्ट्या स्वच्छ केले जात नाही कारण क्लोरीन हे धोकादायक ठरू शकते. परंतु विशेष उपकरणांसह, पाण्यातून वेगाने हवा खेळवून ते स्वच्छ केले जाते. हे जर्मनीतील सर्वात मोठे डॉल्फिनेरियम. डॉल्फिनचे दररोज तीन 'शो' - म्हणजे खेळ होतात. आम्ही जेव्हा हा शो पाहिला तेव्हा जवळजवळ बाराशे ते पंधराशे, विशेषतः मुलं आणि त्यांचे पालक होते प्राथमिक शाळेच्या अनेक सहली आल्या होत्या. डॉल्फिन जेव्हा पाण्यातून सरकन बाहेर येऊन उंचच उंच उडी मारून, परत पाण्यात सूर मारतात तेंव्हा काठावर बरेच पाणी उडते. त्या पाण्याच्या फवाऱ्यात भिजायला मुलांना खूपच आवडते. ती सर्व मुलं मोठमोठ्याने गलका करत, किंचाळत, नाचतात तेंव्हा, ते बघून, ज्येष्ठ नागरिकांच्या मनातही उत्साह संचारतो आणि मजा येते. त्यांच्या लहानपणीच्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर येतात.
डॉल्फिन कुठून अकस्मात पणे वर उसळी मारून येणार याची कल्पना नसते. कधी जवळ, तर कधी दूर, कधी दोन तर कधी तीन- चार, कधी पाच- सहा डॉल्फिन असे नाचत नाचत, डोळ्यांचे पारणे फेडत एका-पाठोपाठ एक असे क्षणात उंच उडी घेत, नाचत नाचत परत पाण्यात सूर मारतात, तेव्हा त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचं कौतुक करावेसे वाटते. त्यांची पाण्यातील सांघिक कवायत, आकाशातल्या विमानांच्या सांघिक कवायतींची आठवण करुन देतात. प्राण्यांकडून इतक उत्कृष्ट काम करुन घेणे किती जिकिरीचे आहे, हे खरोखरच जाणवते.
-- वासंती गोखले
July 17, 2021
पहाटं पहाटं कावळे मास्तर नि शेरगाव गाठलं. झावळातच गडी ग्रामपंचायती समोर हजर. गाडी उभी केली.उपरण्याने आळपलेले थोबाडं मोकळ केल. इकडं तिकडं पाहिलं .कुणाचाच पत्ता नव्हता. कुणाचा म्हंजी पथकातलं एक ही मेंबर अजून टपकालं नव्हता. सीयोची आडर असल्यामुळे येतेल सारी. पण कोणं टॅन्शाॅन घेत एवढं ? ग्रामपंचायतीचा चपराशी सुदाक आला नव्हता अजून…
आता काय करावं म्हणून मास्तरं नी तंबाखूची पुडी काढली .चुन्याची डब्बी काढली. केला घाणा मळायला सुरू…
आता हे बसले तंबाखू मळीत पण पंचायत बायांची झाली. बायाच्या हागणदारीच रस्ताचं ग्रमपंचायती म्होरून जातो.तिथंचं हे मास्तरं उभं टाकलं.बरं लयं उशीर झाला की मग पंचाईतच व्हती बायांची. झावळात उरकून यावं लागतं.नाहीतर सकाळ सकाळ झॅक होऊन बरीचं गडी ग्रमपंचायती म्होरं थांबत्यात. खंडाची खंडाच असतो.उग उग चकाटया पिटीत बसलेला. तसल्या ख॓डयातून जमतं असतं व्हयं कुठं बायाला पोरीला टरमेल घेऊन जायला ? पाच सहा महिने झालं असलं. काळयाची सून अशीचं परसाकडं चालली व्हती.ते पवाराचं येडकोंढूळ माग माग गेलं. हासलं. पवारचं घर तसलं डेंजर..
दहा बारा जणांनी मरणाचं चेचलं.केसी भानगडी झाल्यात.बसलेतं खेटं देत कोर्टात…बाया तरी काय करत्याल ?
April 14, 2017
पुनर्जन्मावर आधारित असलेले ‘नीलकमल’ व ‘मेहबूबा’ हे चित्रपट गुलशन नंदा यांच्या सर्वोत्तम लेखनाचे मानदंड आहेत. राजकुमार व मीना कुमारी यांचा ‘काजल’ हा भावना प्रधान चित्रपट सत्तरच्या दशकातील माईलस्टोन मानला जातो. १९७१ साली गुलशन नंदा यांची ‘झील के उसपार’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने त्यांच्या आजपर्यंतच्या लोकप्रियतेचे रेकाॅर्ड तोडले.. तिच्या तब्बल पाच लाख प्रतींचा ‘न भूतो, न भविष्यती’ असा खप झाला!
February 22, 2022
प्रेमाच्या दिनी
गुलाब भेट दिली.
प्रेमाची ‘राजधानी’
हृदयी धडधडली.??????
February 18, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti