मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
एक होता राजा. त्याला एकुलती एक मुलगीच होती. त्या मुलीला त्यानं खूप कोडकौतुक करून वाढविलं होतं. एकदा राजा राजकुमारीला बरोबर घेऊन फिरायला बाहेर पडला. फिरता फिरता एके ठिकाणी त्यांना लोकांची गर्दी जमलेली दिसली. राजा आणि राजकुमारी दोघेही त्या गर्दीत घुसले. बघतात तर एक गारुडीण नागाला खेळवीत होती. एकदा नागाची बांगडी करून ती हातात घाली, तर एकदा कंठीसारखी त्याच्या गळ्यात घाली
October 5, 2025
एकदा यशोदेने त्याला नीट न्हाऊ घातले, अंगात कपडे घालून ओव्या गात
दह्यादुधाच्या गाड्याखाली त्याला पाळण्यात निजविले, आणि आपण कामाला
गेली. इकडे कृष्ण जागा होऊन वर पाय करून नाचू लागला, आणि पायांनी
सबंध गाडाचा गाडा उलथून पाडला!
November 15, 2025
रावणाने कपटाने सीतेला पळवून नेल्यानंतर रामाला फार दु:ख झाले. त्याने सगळीकडे सीतेचा शोध सुरू केला. परंतु सीतेचा शोध लागेना. शोध करीत करीत राम-लक्ष्मण किश्किंधा नगरीपर्यंत येऊन पोहोचले. तेथे ‘वाली’ या नावाचा वानर राज्य करीत होता.
December 25, 2024
खूप खूप वर्षे झाली. एका रानात एक हत्ती रहात होता. त्याचा एक मित्र होता. तो होता ससा. एके दिवशी हत्ती सशाला म्हणाला,‘आपण एक जमिनीचा तुकडा विकत घेऊया आणि त्या जमिनीत आपण एक सुंदर बाग तयार करुया.’
October 22, 2025
सूर्य आणि चंद्र दोघे सख्खे भाऊ. सूर्य मोठा तर चंद्र धाकटा होता. त्यांच्या घरची परिस्थिती कमालीची खालावलेली. घरी त्यांची आई आणि हे दोघे असे तिघेच जण होते. आई काबाडकष्ट करून दोघांना भरवत होती. पण तिच्या मिळकतीत एकवेळचे पोटभर जेवणही मिळत नव्हते.
November 15, 2025
(जपानची पुराणकथा)
फार फार वर्षांपूर्वी आकाशाच्याही वर तोका आमाहारा येथे विश्व निर्मात्याचे
घर होते. त्याकाळी ‘अमेनो मिनाकानुसि’ नावाच्या देवाचा सर्वत्र संचार होता.
‘अमेनो मिनाकानुसि’ या देवाने अनेक देव-देवता निर्माण केल्या.
November 25, 2025
पांडवांचा बारा वर्षांचा वनवास संपला. त्यानंतर एक वर्षभर त्यांना विराटाच्या मत्स्य देशात अज्ञातवासात राहून काढावे लागले. हाही खडतर काळ संपला व त्यांनी विराटाच्या नगरीस रामराम ठोकला.
November 25, 2025
कोणे एके काळी निकोबारमध्ये एकाकी जागी असलेल्या घरात एक विधवा स्त्री चार मुलींसह राहत होती. त्या चौघींमध्ये तीन मुली मोठ्या वय झालेल्या तर शेवटची मुलगी छोटी होती. त्या छोटीचे नाव होते टो-मी-रॉक (म्हणजे सौंदर्य ) तर इतर मुलींची नांवे अशी होती. टो-केन (मेहनती), टो-पेट-नागेन (स्वतःपूरते पाहणारी) आणि वा-मी-रो (गोष्ट सांगणारी)
November 15, 2025
राजाच्या मंत्र्याचा मुलगा अजय पण मूर्त्या बनवित असे पण तो काही उत्कृष्ट मूर्तिकार नव्हता. परंतु त्याची इच्छा हीच असे की कसेही करून प्रथम पारितोषिक पटकावे. मंत्री पण चतुर होता. तो काही तरी युक्ती करून मुलाला कसे बक्षीस मिळेल याचा तो विचार करू लागला.
ठरलेल्या दिवशी सर्व मूर्तिकार मूर्त्या घेऊन आले. रामकिरण नावाच्या मूर्तिकारने राजाची अतिशय सुंदर मूर्ती तयार केली होती. ती पहाताच मंत्री समजून गेला की नक्कीच या मूर्तीला प्रथम पारितोषिक मिळेल. त्याने रामकिरणला एकीकडे नेऊन सांगितले, खरंच, तू सुंदर मूर्ती बनविली आहेस.
October 5, 2025
कोणे एके काळी पृथ्वीवर डोंगरांच्या घळ्यांमध्ये तारा राजाचे राज्य होते. सर्व बाजूंनी उंचच उंच डोंगर आणि चहुबाजूंनी पसरलेलं घनदाट जंगल यामुळे इथे अंधाराचेच राज्य असायचे. राजाने आपल्या प्रजेला किमान गरजेपुरता का होईना प्रकाश देण्यासाठी म्हणून खास योजना आखली होती.
November 15, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti