एक होती कळी

एक होती कळी. सुंदर, टपोरी. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर पडल्या की, लोक म्हणायचे काय सुरेख आहे ही कळी ! तो तो कळी भाव खायची. आपल्या सौंदर्यावर भारी भरायची. मस्का मारायची. शेजारच्या कळ्या तिच्याशी बोलायच्या, हसायच्या. पण कळी काही कुणाशी बोलायची नाही की, हसायची नाही की, खेळायची नाही.



एक होती कळी. सुंदर, टपोरी. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर पडल्या की, लोक म्हणायचे काय सुरेख आहे ही कळी ! तो तो कळी भाव खायची. आपल्या सौंदर्यावर भारी भरायची. मस्का मारायची. शेजारच्या कळ्या तिच्याशी बोलायच्या, हसायच्या. पण कळी काही कुणाशी बोलायची नाही की, हसायची नाही की, खेळायची नाही. आपल्या सौंदर्याचा तिला इतका गर्व की ती सगळ्यांना तुच्छ लेखायची. आपल्याच तोऱ्यात मग्न होती.

एके दिवशी वारा कळीला म्हणाला, “ए सुंदर कलिके, चल माझ्याबरोबर फिरायला. मी तुला हसवेल, डोलवेल. तुला साता समुद्राकडच्या सुंदर सुंदर गोष्टी सांगेन. खेळतेस माझ्याबरोबर? ” कलिका म्हणाली, “तुझ्याबरोबर खेळायला मी मुळीच येणार नाही. अन् तुझ्याशी दोस्ती तर मुळीच करणार नाही. उनाडासारखा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे गर-गर करीत राहतो. तुला घर ना दार! मी नाही येत तुझ्याबरोबर!” वारा हसला. तिच्याकडे न बघताच निघून गेला.

मग आला दवबिंदू. म्हणतो कसा, “कलिके कलिके खेळतेस माझ्याबरोबर? आपण खूप गप्पा मारू. मी तुला आभाळातल्या सुंदर सुंदर गोष्टी सांगेन. येतेस?” कलिका म्हणते, “नाही रे बाबा. अरे, तुझे आयुष्य तरी किती? झाडांच्या पानांवर टिकून आहेस तोवर चमचम करशील मग खाली पडलास तर क्षणात तुझे आयुष्य संपेल. क्षणभर असे तुझे आयुष्य ! मी कशी येऊ तुझ्याबरोबर?” नाराज होऊन दवबिंदू निघून जातो.

मग येतो सूर्याचा पहिला किरण. कालिकेला हलकेच जागे करत म्हणतो, “ए सुंदर कलिके, एकटीच आहेस. मी येऊ तुझ्याशी खेळायला? आपण खूप खेळू, गप्पा मारू आणि… आणि मी तुला चंद्राच्या तारकांच्या सुंदर सुंदर गोष्टी सांगतो. येतेस?” कलिका जरा घुश्यात म्हणाली, “मुळीच नाही. तू जवळ येत जाशील तस तसा मला ताप लागेल. मी नाही येत तुझ्यासोबत.” सूर्यकिरण निघून जातो. कलिका परत एकटीच उरते.

इकडे सगळ्या कलिका वाऱ्याच्या झुळकेशी खेळतात, दवबिंदूशी छान छान गोष्टी करतात आणि सूर्याच्या स्पर्शाने मोहरून उठतात. अन् सगळ्याच कलिकांचे सुंदर फुलात रूपांतर होते. सुंदर, रंगीबेरंगी फुले पाहून वारा त्यांच्याशी दंगामस्ती करू लागतो. विविध रंगांची फुलपाखरं त्यांच्याशी खेळायला, गुजगोष्टी करायला येऊ लागतात. मधमाशा त्यांच्यातील मकरंद वेचू लागतात. फुललेल्या आनंदी फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळतो. सुगंधामुळे लोक तिकडेच आकर्षित होत होते. लोक म्हणत, काय छान फुलं फुलली आहेत.

मात्र सुंदर कळी फुललीच नाही. वारा तिच्याकडे जाईना, दवबिंदू तिच्याकडे बघेना ! सूर्यकिरणांनी तिच्याकडे पाठ फिरविली. जवळच असलेल्या कळ्या-फुलांनी तिच्याशी बोलणे टाकले होते. कळीला आपली चूक लक्षात आली. तिने वाऱ्याला बोलावले, “ये ना, माझ्याशी खेळायला. मला तू सातासमुद्रापलीकडच्या गोष्टी सांगणार होतास ना?” सुंदर कलिकेचे कोमेजलेले तोंड पाहून वाऱ्याला तिची दया आली तो तिच्याशी खेळू लागला. सातासमुद्रापलीकडच्या गोष्टी सांगू लागला. वाऱ्याच्या सहवासाने कलिका सुखावली.

दवबिंदूला ती म्हणाली, “ये, ना माझ्याशी खेळायला.” दवबिंदूलाही तिची कीव आली. तो कोणतेही आढेवेढे न घेता कलिकेशी खेळायला गेला. ती दवबिदूंच्या स्नेहाने ओलीचिंब झाली.

तिने सूर्यकिरणांना विनंती केली, “ये, मला फुलव.” सूर्यकिरणांनी तिला जवळ घेतले. आसमंतातल्या साऱ्या नवलाईच्या गोष्टी सांगितल्या. कलिका खुदकन हसली.

सकाळी एक सुंदर फूल फुललेले लोकांनी पाहिले आणि जाणारे-येणारे म्हणत होते, “काय सुंदर फूल आहे.” कलिका सुखावली. सगळ्यांशीच हसून खेळून बोलू लागली.

एक पुजारी आला. त्याने ते सुंदर फूल पाहिले आणि देवावर चढविले. कलिका धन्य झाली..

अशीच धन्यता तुम्हाला मिळो !
(सुनंदा पाटील : तापीकाठच्या लोककथा)

‘आपण पाय ठेवल्याबरोबर ते तुटले, तर आपली फजिती नाही का होणार?’ टो-पेट-नागेन म्हणाली.

‘काही असले तरी प्रयत्न करू या.’ दुसरी उत्तरली.

अशा प्रकारे प्रथम टो-केन वर गेली आणि त्यानंतर तिच्या बहिणीने तोच कित्ता गिरवला. आश्चर्याची बाब म्हणजे कोळ्याचे जाळे तुटले नाही. त्या दोघीही अधिक अधिक वर गेल्या. त्यांनी खूप अंतर कापल्यानंतर त्यांच्या एकाएकी लक्षात आले की, त्या रा- फोहची बनवलेली छोटी छानशी करंडी खाली विसरल्या आहेत. म्हणून टो-केनने तिच्या छोट्या बहिणीला ती आणण्यासाठी खाली धाडले.

तथापी ती घरी पोहचल्याबरोबर तिच्या आईने तिला ताबडतोब पकडले. आईने वा-मीरो ला टो-पेट नागेनवर लक्ष ठेवण्यास सांगितले आणि स्वतः टो-केनला शोधण्यासाठी गेली. तिला जमिनीपासून काहीच अंतरावर कोळ्याच्या जाळ्यावर असलेली टो-केन सापडली. ती आपली बहिण टो-पेट नागेनची वाट बघत होती आणि त्यासाठी काही अंतर खाली आली होती. आईने तिला ताबडतोब खाली येण्यास सांगितले. परंतु तिने नकार दिला. त्यानंतर तिने टो-केनचा पाय पकडला आणि खाली ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने कोळ्याचे जाळे घट्ट पकडले आणि लाथ मारुन आईच्या पकडीपासून स्वतःला मोकळे केले. या क्रियेमध्ये तिच्या एका पायाचा लवचिकपणा हरवला. असे होऊनही ती चढून वर गेली आणि शेवटी चंद्राच्या पृष्ठभागापर्यंत पोचली. आपल्या निष्ठुर आईच्या पंज्यामधून आपण मोकळे झालो याने ती भयंकर खुष झाली. चंद्राच्या पृष्ठभागावर तिने अंग टाकले आणि ती झोपली. तिने जवळच्या पेटीचा उशी म्हणून वापर केला.

निकोबारचे रहिवासी अजूनही मानतात की चंद्रावरचे पट्टे म्हणजे तिथे शांतपणे पहुडलेल्या टो- केनची सावलीमय आकृती होय. पौर्णिमेच्या दिवशी कुणीही हे पाहू शकतो.

Author