(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • p-1076-kelyacha-shahi-halwa

    पिवळ्या रंगाचे पदार्थ

    पिवळा रंग हा अतिशय उत्साहवर्धक, आशावादी आणि मेंदूला सतत खाद्य पुरवणारा. म्हणूनच प्रत्येक वस्तुतज्ज्ञाच्या, इंटिरिअर डिझायनरच्या ऑफिसमध्ये या रंगाचा समावेश असतोच असतो. हा रंग फक्त कल्पनांचे इमले बांधत नाही तर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून त्या कल्पना सत्यात उतरवायला मदत करतो.

      March 22, 2017


  • साळीच्या लाह्यांचा पौष्टिक चिवडा

    साहित्य :- साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या व मक्याच्या लाह्या पॉपकॉर्न प्रत्येकी एक वाटी, चुरमुरे दोन वाट्या, भाजलेले शेंगदाणे पाव वाटी, डाळे पाव वाटी, मिरच्यांचे तुकडे (किंवा लाल मिरची पावडर), मीठ व पिठीसाखर चवीनुसार, कढीलिंब, ३-४ चमचे तेल.

    कृती:- ३-४ चमचे तेल फोडणी करा. त्यात मिरच्यांचे तुकडे व कढीलिंब तळून घ्या व दाणे परतून घ्या. नंतर डाळे टाकून गॅस बंद करा. नंतर सर्व प्रकारच्या लाह्या, चुरमुरे व चवीनुसार मीठ-पिठीसाखर घालून चांगलं मिसळून घ्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      April 17, 2017


  • p-1032-daal-kadhi

    चविष्ट डाळ आणि कढी

    उडीद डाळ चाळून धुऊन घ्या. पातेल्यात उडद व पाणी टाकून शिजवायला गॅसवर ठेवा. आले-हिरवी मिरची व टॉमेटो बारीक चिरून टाका. मीठ टाकून पातेले झाका. गॅस मोठा ठेवा व पाणी उडीद शिजेल एवढेच टाका. उडीद शिजल्यावर गॅस बंद करा.

      March 13, 2017


  • माझी अधिकमासी पाककृती खास जावयासाठी -पनीर वेज बिन्दापुरी

    आपल्या इथे अधिक मासात जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. गेल्या रविवारी लेक-जावयाला जेवायला बोलविले होते. शनिवारी रात्री सौ.ने अनरसे केले होते. (किमान ३३ अनरसे तरी जावयाला द्यायचे असतात, ते ही एका तांब्याच्या किंवा पितळेच्या डब्यात). साहजिक आहे चिवडा ही केला होता. रविवारी सकाळी सौ.ने सहज म्हंटले, मी केलेल्या पाककृती तुम्ही आपल्या नावाने खपवितात. आज लेक- जावई येणार आहे. त्या साठी तुम्हीच डिश बनवा. मी ही म्हणालो त्यात काय आहे, मला ही चांगले पदार्थ बनविता येतात, तू बघच. त्यावर सौ. म्हणाली साधी- सौपी पनीरची भाजी करा. काल संध्याकाळीच बाजारातून अर्धा किलो विकत घेतले आहे. टमाटर, कांदे आणि शिमला मिर्च ही आहे. तेवढ्यात लेकीचा फोन आला. बहुतेक तिच्या आईने तिला आज बाबा रेसिपी बनविणार आहे याची कल्पना दिली असेल. ती म्हणाली, बाबा नेहमी सारखी पंजाबी स्टाईल पनीरची भाजी बनवू नका, काही तरी वेगळ बनवा. विचार करू लागलो आणि एक नवीन कल्पना सुचली. पनीर, टमाटर, कांदे आणि शिमला मिरची (ढोबळी मिरची) वापरून भाजी करायचे ठरविले.

      July 21, 2015


  • p-1567-dodka

    आजचा विषय दोडका

    कीस बाई कीस, दोडका कीस..
    दोडक्याची फोड लागते गोड..
    आणिक तोड बाई आणिक तोड......

    हे गाणे म्हणत आपण शाळेत एक खेळ खेळत असु. या गाण्यात म्हणल्याप्रमाणे दोडका कधी 'गोड' लागला नाही.
    दोडका, शिराळे, कोशातकी या विविध नावांनी ओळखला जातो. ही भाजी अनेकांना आवडत नाही म्हणूनच याला दोडका हे नाव पडलं असावं. पचायला अतिशय हलकी असलेली ही भाजी पथ्याची समजली जाते, कारण त्यात फॅट खूपच कमी असते आणि कॅलरीज जवळजवळ नसतातच. दोडका ही भाजी हिरवी गार असून त्यावर रेषा असतात. हिची साल जाड असून आतील गर हा पांढऱ्या रंगाचा असतो. तसंच त्यात बिया असतात. भाजीची निवडताना तिचा हिरवा रंग आणि न वाकणारा निवडावा. तसंच त्यावर कोणत्याही प्रकारचे डाग नसावेत. पूर्णत: गडद असावा. ही भाजी प्रामुख्याने आंध्र प्रदेशात लोकप्रिय असली तरी महाराष्ट्रातही ती भाजीच्या स्वरूपात खाल्ली जाते. यात ‘क’ जीवनसत्त्व, झिंक, लोह, मॅग्नेशिअम आणि मॅगनीज असल्याने हिच्यात भरपूर गुणधर्म आहेत. फार पूर्वी पासून रानावनात वेलीवर मिळणाऱ्या दोडक्यांचा आयुर्वेदात मोठा वापर, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. या दोडक्यांची चव कडू असते. बियांचा औषधी उपयोग आहे. दमा, खोकला, कप, अम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी या विकारात या बियांचे चूर्ण किंवा काढा उपयुक्त आहे. त्यामुळे प्रथम उलटी होते किंवा नंतर जुलाबाद्वारे कफ बाहेर पडतो.

    दोडक्याची सालं म्हणजे शिरा फेकू नयेत. कोवळ्या असतील तर बारीक चिरून, शिजवून भाजी करावी किंवा परतून चटणी करावी. नाहीतर एका दोडक्याची सालं आणि एक टोमॅटो उकडून मिक्सरमधून काढून गाळावं आणि त्याचं सार किंवा सूप करावं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    काही पदार्थ दोडक्याचे
    भरला दोडका
    साहित्य :- पाव किलो कोवळे दोडके, पाव वाटी दाण्याचे कूट, दोन-तीन चमचे भाजलेल्या तिळाची पूड, वाटीभर बारीक चिरलेला टोमॅटो, चवीप्रमाणे गूळ, मीठ, चमचाभर कांदा-लसूण मसाला, दोन चमचे गोडा मसाला, दोन चमचे धने-जिरे पूड, तेल चार चमचे, ओले खोबरे अर्धी वाटी, कोथिंबीर.
    कृती :- दोडक्या च्या शिरा काढून दीड ते दोन इंचाचे तुकडे करावेत व भरल्या वांग्याप्रमाणे चिरा द्याव्यात. टोमॅटो व मसाले, तिळाचे व दाण्याचे कूट, धने-जिरे पूड, मीठ, चिरलेला गूळ, थोडे ओले खोबरे, कोथिंबीर एकत्र करावे. त्यात दोन चमचे तेल घालून कालवावे. हा मसाला दोडक्याेत भरावा. कढईत तेल मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी.
    भरलेले दोडके व उरलेला मसाला घालून हलवावे. रसाच्या आवश्य कतेप्रमाणे पाणी घालून मंद गॅसवर झाकण ठेवून भाजी शिजवावी. खोबरे-कोथिंबिरीने सजवावी.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    दोडक्याची चटणी
    साहित्य:- १ मध्यम आकाराचा दोडका, १-२ लसुण पाकळ्या, १-२ टेबल्स्पून खिसलेले कोरडे खोबरे मुठभर शेंगदाणे, ३-४ हिरव्या मिरच्या, १ कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, एक चमचा तेल.
    कॄती - दोडका स्वच्छ धुवून १/२ सेंटीमीटर जाडीच्या चकत्या करुन घ्याव्यात. शेंगदाणे आणि खोबरे वेगवेगळे कोरडे भाजुन घ्यावेत. कढईत तेल तापवून त्यात मिरच्या आणि लसुण घालावा. किंचीत परतून त्यावर दोडक्याच्या फोडी घालाव्यात. नीट खरपूस भाजुन घ्यावे. दोडक्याच्या फोडी थोड्या गुलबट दिसु लागतील. त्यात खोबरे, दाणे, कोथिंबीर, मीठ घालुन मिक्सरमधुन थोडे जाडसर वाटुन घ्यावे.
    टीप - एखादा दोडका थोडा जून निघतो अशावेळी त्याची साल थोडी तासुन टाकून उरलेल्या दोडक्याची चटणी करता येते.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    दोडके भात
    साहित्य:- ३ वाटय़ा दोडक्याचा कीस, १ वाटी तांदूळ, २ वाटय़ा पाणी, चवीला मीठ, १ चमचा गोडा मसाला, फोडणीसाठी १ मोठा चमचा तेल, मोहरी, िहग, हळद, सात-आठ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं, कोिथबीर.
    कृती: तांदूळ धुऊन ठेवावेत, तेलाची फोडणी करून त्यात लसूण मिरच्यांचे तुकडे परतावे, तांदूळ आणि दोडक्याचा कीस परतावा, मीठ, मसाला, गरम पाणी घालून भात शिजू द्यावा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    दोडक्याचे सूप
    साहित्य : कोवळे दोडके तीन ते चार २५० ग्रॅम , जीरा पावडर १/२ चमचे , काळी मिरी पावडर १/२ चमचे , मीठ १/२ चमचे, आले : छोटा तुकडा , लोणी चार चमचे.
    तूप दोन चमचे, १/२ चमचे जिरे.
    कृती : दोडका चिरून घ्यावा. कुकर मध्ये चिरलेला दोडका आणि आले, दोन वाट्या पाणी घालून ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्या. थंड झाल्यावर कुकर मधून दोडका तुकडे काढून मिक्सर मधून मध्ये थोड थंड पाणी घालून वाटून घ्या व मिश्रण एक चाळणी मधून एका भांडया मध्ये गाळून घ्या. कुकर मध्ये उरलेलं पाणी ही त्यात मिसळा. जीरा पावडर , काळी मिरी पावडर व मीठ घालुन त्याला एक उकळी येऊ ध्या. आपले सूप तयार. कपात एक चमचा लोणी घालून सूप सर्व करा.
    टीप : लोणी नसल्यास, तूप व जिर्याची फोडणी ही दिली तरी चालते. स्वादात काहीही फरक पडणार नाही.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      February 2, 2017


  • p-1788-ambola-rice

    आंबोला भात

    ज्वारी तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर पाण्यातून उपसून त्याची कापडाच्या साहाय्याने साले काढून घ्यावीत. नंतर त्याला भारतासारखे शिजवून कच्चं तेल, कढी किंवा ताकाबरोबर खावं.

      February 8, 2017


  • चिकन व पालक सूप

    साहित्य: अर्धी जुडी पालक, पाव किलो चिकन मध्यम तुकडे करून, ५ कप पाणी, अर्धा टी स्पून मीठ, पाव टी स्पून मिरेपावडर, १ टी स्पून आल्याची पेस्ट, पाव टी स्पून लसूण पेस्ट, ३ टे.स्पून सोयासॉस, पाव टी स्पून आजिनोमोटो.

    कृती: वेळ: ३० मिनिटे पालक निवडून स्वच्छ धुवावा. पानांचे हातानेच मोठे मोठे तुकडे करावेत. सोयासॉसमध्ये मीठ, मिरे पावडर, आले-लसूण पेस्ट घालून त्या मिश्रणात चिकन एक तासभर भिजत ठेवावी. पाणी उकळत ठेवावे. त्यात सॉसमिश्रणासहित चिकन घालावे. झाकण ठेवून चिकन शिजू द्यावे. थंड झाल्यावर त्यातील चिकन बाहेर काढावे. चिकनचे मांस व हाडे वेगवेगळी करून उरलेले पाणी उकळत ठेवावे. त्यात पालकाची पाने आणि सुटे केलेले चिकन घालावे. पाने थोडी मऊसर झाली की गॅस बंद करावा. हे सूप वेगळ्या चवीचे पण छान लागते. गरमागरम सूप प्यायला देताना सजावटीसाठी अंड्याच्या ऑमलेटच्या पातळ बारीक बारीक पट्ट्या कापून वरून घालाव्यात.

      September 10, 2026


  • कोबी पार्सल

    कोबी पार्सल – Recipe

      September 11, 2026


  • पुण्यातल्या मेनूच्या अफलातून सूचना

    मागे पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रमाला जायचा योग आला त्यावेळी त्या आयोजकांनी मला मेनू विषयी माझ मत मागितल… त्यावेळी त्यांना मी दिलेले हे उत्तर…

      July 26, 2017


  • p-3124-batata-koshimbir

    बटाटयाची कोशिंबीर

    साहित्य : ४ मोठे उकडलेले बटाटे, एक चमचा भरून मीठ, २ डाव भरून गोड दही, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे पूङ

    कृती : उकडलेले बटाटे सोलून घ्या, एका पातेलीत घालून ते हाताने छान कुस्करा, सुरी वापरता येत असेल तर मिरचीचे बारीक तुकडे करा नाहीतर आई किंवा ताईकडून ते करून घ्या. कुस्करलेल्या बटाटयात साखर, जिरेपूड, मिरच्यांचे तुकडे व अर्धा चमचा मीठ घालून सर्व नीट कालवून घ्या. आता त्यात दही घालून डावाने सर्व नीट ढवळून घ्या, चव घेऊन पहा. मिठाची जरूरी आहे का? असल्यास थोडे घालून, चव घेऊन पहा, झाली कोशिंबीर तयार. कोथिंबीर असेल तर तीही थोडी निवडून, धुवून, चिरून वर पेरलीत तर कोशिंबीर छान दिसेल.

    टीप : ही कोशिंबीर २ मोठया माणसांना पुरेशी होईल.

      August 3, 2018