(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • kelyachi-koshimbir-300

    केळ्याची कोशिंबीर

    सर्वप्रथम केळी सोलून बारिक चिरणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. नारळाचा चव, साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे. ही कोशिंबीर उपासाला चालते.

      June 15, 2017


  • p-1553-rice-kheer

    आजचा विषय खीर

    तांदूळ, रवा, शेवयांची खीर हे आपण पारंपरिक प्रकार नेहमी करतो, पण भोपळा, मका, गहू, मूग पनीर. यांची खीर कधी बनवत नाही, या खीरी चवीला तर त्या छान असतातच, पण पौष्टिकही.

      January 19, 2017


  • सुंठवडा

    साहित्य :- एक चमचा ओवा, दोन चमचे खोबरा कीस, दोन चमचे धणे, एक चमचा तीळ, दोन इंच सुंठ तुकडा, पाच- सहा मिरी, तीन चमचे गूळ.

    कृती :- गूळ सोडून सर्व पदार्थ हलके वेगवेगळे भाजून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करावे. नंतर गूळ घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. प्रसादाचा सुंठवडा तयार!
    (काहीजणांकडे फक्त सुंठ खडीसाखर व सुकामेवा घालून ही करतात.)

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      February 24, 2017


  • मेथीची गोळा भाजी

    जिन्नस : मेथीची मोठी १ जुडी, लाल तिखट पाव चमचा, धने जिरे पूड पाव चमचा, चवीपुरते मीठ, २ ते ३ चमचे डाळीचे पीठ, २ ते ३ चमचे चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या चिरलेल्या २, १ ते २ मिरचीचे लहान तुकडे, फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, हळद.

    कृती : मेथी निवडून धुवून घ्या. कूकरमध्ये शिजवून घ्या. कूकर गार झाला की त्यातली शिजलेली मेथी बाहेर काढा व त्यात डाळीचे पीठ मिक्स करा. मिक्स करताना त्यात गुठळी होऊन देवू नका. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ घालून डावेने भाजी एकसारखी करून घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात तेल घाला. नेहमी फोडणी करतो त्यापेक्षा जरा जास्त तेल घालावे. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. फोडणीमध्ये चिरलेली मिरची, लसूण व कांदा घाला. कांदा लसूण बारीक चिरा. आच कमी करून हे सर्व जिन्नस थोडे परतून घ्या. नंतर त्यात मेथीचे तयार केलेले मिश्रण घाला. व थोडे पाणी घाला. भाजी ढवळा. एकसारखी करा. नंतर त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा. गॅस बंद करा. मेथीची भाजी तयार झाली आहे. कांदा लसूण फोडणीत घातल्याने एक छान चव येते. पोळीपेक्षाही ही भाजी गरम भाकरीशी जास्त छान लागते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 17, 2017


  • p-3737-kokum-saar

    कोकम सार

    साहित्य: ५-६ आमसूलं, १ टीस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरं, ३-४ कढीपत्त्याची पानं, १ मिरची मोठे तुकडे करून (ऐच्छिक), चिमूटभर हिंग, १ टीस्पून साखर, मीठ चवीनुसार

    कृती: आमसूलं धुवून १ कप पाण्यात भिजवा. भिजली की कुस्करून रस काढा. गाळून घ्या. तुपाची फोडणी करा. त्यात जिरं घाला. ते तडतडलं की कढीपत्ता आणि हिंग घाला. हवी असल्यास मिरची घाला. त्यावर हे आमसूलाचं पाणी घाला. त्यात साधारण २ वाट्या पाणी घाला. उकळा. मीठ-साखर घाला. परत उकळा. पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण आपल्या अंदाजानं वाढवा.

      September 3, 2018


  • Metkut-300

    मेतकूट

    ३-४ डाळी, तांदूळ. गहू आणि निवडक मसाले यांचे मिश्रण असलेले हे  चटकदार मेतकूट…

      January 11, 2017


  • मटणाचे लोणचे

    साहित्य : पाव किलो मटण (मटण बोनलेस व कोवळे घ्यावे) स्वच्छ धुवून, ५ लिंबाचा रस, मीठ, थोडी हळद, आले लसणाचे वाटण लावावे.

    वाटण : ६-७ मोठ्या लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा हे वाटण लावून मटण अर्धा तास तसेच ठेवावे. मटण वाफवण्यासाठी पाणी १ ते दीड वाटी, मेथी हिंग मोहरी फोडणी
    गरम मसाला पावडर : २ लवंगा, अर्धा दालचीनीचा तुकडा ४-५ वेलची, ४-५काळी मिरी, १
    चमचा शहाजिरे, सुख्या २ ते ३ लाल मिरच्या, सर्व पदार्थ गरम करुन त्याची पुड करावी.
    आवडीनुसार तेल मोहरीचे, तिळाचे किंवा कोणतेही घ्यावे, ४-५ लिंबाचा रस
    गोड मसाला : दिड चमचा खसखस, धने अर्धा चमचा, पाव चमचा बडीशेप, जीरे पाव चमचा,
    १ लहान वाटी, सुखे खोबरे भाजून घ्यावे व ह्या सर्वांची पूड करावी. सजावटी साठी ह्यासोबत
    पुदीना कोथिंबीर
    लोणच्याचा मसाला: तयार लोण्याचा मसाला च मोहरीचे तेल अथवा तिळाचे तेल ३०० ग्रॅम (दिड वाटी मोठी अंदाजे)

    कृती: अर्धा तास मुरत ठेवलेले मटण कुकर मधून चांगले वाफवून घ्यावे, मऊ शिजले पाहिजे. येथे लोणच्यासाठी तिळाचे तेल वापरले आहे. नंतर पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यावर आले लसुण वाटण चांगले परतावे त्यावर मटण परतावे व थंड होऊ द्यावे. (पाणी पूर्ण आटवावे), दुसऱ्या पॅनमध्ये दिड वाटी मोहरीचे अथवा तीळाचे तेल टाकून गरम करुन घ्यावे. त्यावर राई हिंग मेथी चवीनुसार घालावी व फोडणी झाल्यावर लगेच खाली उतरवावे व त्यात गरम मसाला पावडर घालावी. चांगले एकत्र कालवावे.

    नंतर लोणच्याचा मसाला घालून पुनः एकत्र कालवावे. त्यावर ४-५ लिंबाचा (अंदाजे १ वाटी रस) घालून नीट ढवळावे. व पूर्ण थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या बाटलीत भरावे, १ दिवस पूर्ण मुरु द्यावे. हे लोणचे १५ दिवस ते एक महिना टिकते. (चमचा नेहमी कोरडा घालावा), लोणचे खायला घेताना त्यावर गरम मसाला (खोबऱ्याचा) कोथिंबीर, पुदीना यांच्या बारीक कापलेल्या पानानी सजवावे. इतर सजावट हवी असल्यास करावी.

    ज्वारीची भाकरी हाताने ठेचलेला पातीचा ओला कांदा बाजूला भाजलेले शेंगदाणे ह्या बरोबर, हे घाटी लोणचे खाण्याची पद्धत आहे. (देशावर, घाटावर) पण तुम्ही तुमच्या आवडीच्या पदार्थांबरोबर खाल्ले तरी हे लोणचे अतिशय चविष्ट लागते.

    - सौ. अनुपमा प्रधान

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026


  • p-1868-laal-chavli-usal

    बारीक लाल चवळीची उसळ

    चवळी धुऊन घ्यावी. तिच्यात मसाला व बारीक कांदा घालावा व पाणी घालून चवळी कुकरला २/३ शिट्टय़ा देऊन उकडून घ्यावी. नंतर पातेलीत कांद्याची फोडणी करून त्यात चवळी टाकावी. तिच्यात हळद, मीठ व गूळ घालावा व उसळ शिजू द्यावी. वरून ओले खोबरे (न वाटता) घालावे व आपल्याला हवी त्या प्रमाणात उसळ सैल व घट्ट करावी.

      March 6, 2017


  • p-1738-rolled-sandiwch

    रोल्ड सॅन्डविच

    ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यावर जॅम किंवा मार्मलेडस लावून घ्या. त्यावर किसलेले चीज घाला. आता दुसऱ्या ब्रेडलाही जॅम लावून घ्या. हा ब्रेड पहिल्या ब्रेडच्या वर व्यवस्थीत ठेऊन घ्या

      March 6, 2017


  • lemonade-sharbat-300

    लेमोनेड सरबत

    मंदाग्नीवर जाड बुडाच्या पातेल्यात साखर पाणी एकत्र करून सतत ढवळत राहा. साखर पूर्णपणे विरघळून दोन तास पाक तयार करा. पाक थंड झाल्यावर त्यात प्रिझर्व्हेटिव्ह घाला. लिंबू रस गाळून त्यात टाका आणि चांगले मिसळा.

      November 9, 2016