महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
आपण वेगवेगळ्या सॅन्डविचची चव घेतो. परंतु गोड सॅन्डविच हा प्रकार खूप कमी वेळा टेस्ट करत असतो. खरे तर या सॅन्डविचच्या माध्यमातून विविध फळे खाल्ली जातात. हे सॅन्डविच करताना प्रथम अननस, सफरचंद, चिक्कू, केळ, स्ट्रॉबेरीचे पात्तळ आणि बारीक काप करुन घ्या. आता मोसंबी, अंजीर, संत्रे सोलून त्याचे बारीक भाग करुन घ्या.
March 6, 2017
साहित्य: १ वाटी कणीक, १ वाटी साजुक तुप, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी पाणी, थोडी वेलची पुड
कृती: प्रथम कढईमध्ये अर्धीवाटी तुप घालून कणीक चांगली खरपूस भाजून घेणे. कणीक भाजून झाल्यानंतर त्यात पाऊणवाटी साखर व पाऊण वाटी गरमपाणी घालून मिश्रण एकजीव करून त्यावर झाकण ठेवावे. एक चांगली वाफ आल्यावर त्यावर अर्धीवाटी तुप सोडावे व चांगले ढवळून घ्यावे व वरुन वेलची पुड घालावी असा हा लज्जतदार शिरा खाण्यास तयार झाला !
टीप: हा शिरा पौष्टीक आहे व झटपट तयार होतो. मांसाहारी पदार्थाबरोबरही खायला छान लागतो.
- सौ. शुभांगी संजय दिये
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
बटाटे उकडून सोलून घ्या व कुस्करून ठेवा. आले, हिरवी मिरची, कोथिंबीर यांचे बारीक तुकडे करा.एक चमचा तेल गरम करा. हिंग, आले व मोहरी टाका. तडतडल्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद टाका. आता बटाटे मिसळून चांगले हलवा. थोडी साखर, लिंबू रस व मीठ टाका. चुली वरून उतरून घ्या. थंड झाल्यावर छोटे-छोटे लाडू सारखे गोळे करा. बेसन, धणे पावडर, एक चमचा गरम तेल व मीठ टाकून लापशी बनवा. जाडसर लापशी तयार झाल्यावर तळण्यासाठी तेल गरम करा. बटाट्याचे गोळे बेसनात बुडवून तेलात तळा.
October 25, 2016
प्रथम बेबीकॉर्न शिजवून घ्या. मैद्यामध्ये पाणी आणि मीठ मिसळून मिश्रण तयार करा. बेबी कॉर्नचे दोन तुकडे करून मैद्याच्या मिश्रणात बुडवा आणि तेलात तळून घ्या. कढईत एक चमचा तेल गरम करून उभी कापलेली हिरवी मिरची घालून परतून घ्या. यात सर्व भाज्या, मीठ, अजिनोमोटो व शेजवान सॉस घालून चांगले परतून घ्या.
November 17, 2016
नॉनव्हेज पार्सल – Recipe
September 11, 2026
साहित्य:- १ वाटी उकडलेले मटार, तेल, हिंग, जिरे वा स्वच्छ निवडलेली कोथिंबीर पाव वाटी, पाव वाटी ओले खोबरे, मीठ साखर घाला व मिक्सपरमध्ये घालून व किंचित पाणी घाला व चटणी तयार करा व लिंबू पिळून ढवळून घ्या. ही चटणी सॅंडवीच करता खूप छान लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
December 26, 2016
दुधात वेलची टाकून उकळायला ठेवावे. पाव भाग झाल्यावर गॅसवरून उतरून साखर मिसळावी व थंड करावे. थंड दुधात पिवळा रंग, मध, लिंबाचा रस, रंगीत खडीसाखर व मेवा टाकावा.
May 5, 2017
साहित्य: नारळाचे दुध ३ वाट्या, साखर १ वाटी, १ वाटी शिंगाड्याचे पिठ, साजुक तुप दोन चमचे थोड़ी वेलची पुड
कृती: प्रथम जाड बुडाच्या पातेल्यामध्ये पांढऱ्या शुभ्र ओल्या खोबऱ्याचे तीन वाट्या दुध गाळून घ्यावे त्यात एक वाटी साखर व एक वाटी शिंगाड्याचे पिठ एकजीव करून मिश्रण मंद गॅसवर ठेवावे हे मिश्रण सतत हलवत रहावे. थोडेसे घट्ट होत आले की दोन चमचे तुप टाकणे. कडा लगताच ताबडतोब पसरट थाळ्यात ओतावे. लवलवीत असल्यामुळे थाळा थोडा हाताने हलवल्यास थाळाभर सारखे पसरले जाते. मिश्रण थोडे थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात शिंगाड्याची खांडवी तयार.
विशेष टिप: आधुनिक भाषेतील हे शिंगाड्याचे पुडींग लज्जतदार चवीमुळे खास उपवासापासुन कोणत्याही वेळी करता येते. सीकेपी भगिनी गेल्या कित्येक पिढ्या हे करीत आहेत.
शकुन हजिरनीस
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
June 10, 2010
साहित्य: १ जुडी पालक, ३ टोमॅटो, वेळ: २० मिनिटे १ लहान कांदा, २ टे. स्पून 'अमूल' बटर, अर्धा कप फेटलेले क्रीम (मलई), पाव टी स्पून मीठ, मिरे पावडर.
कृती: पालक कोवळ्या देठासह निवडून, स्वच्छ धऊन बारीक चिरा. कांदा बारीक चिरा, टोमॅटोच्या फोडी करा. एका मोठ्या भांड्यात थोडेसे बटर घालून त्यात कांदा मऊ होईपर्यंत परता. नंतर त्यात पालक आणि टोमॅटो घाला व ३-४ कप पाणी घालून उकळत ठेवा. चांगल्या उकळ्या आल्या की गॅस बंद करून सर्व मिश्रण पाण्यासहित मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करा. मोठ्या गाळणीने सर्व मिश्रण गाळा. जरूर वाटल्यास पुन्हा थोडे पाणी वापरा व बेताचे दाटसर सूप तयार करा. गॅसवर उकळत ठेवा. मीठ, मिरेपावडर घालून उकळत असताना त्यात उरलेले बटर घालावे. हे गरम-गरम सूप बाऊलमध्ये घातल्यावर त्यावर फेटलेले क्रीम १- १ टी स्पून घाला.
September 10, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti