(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

  • मसाला पराठा

    मसाला पराठा

    साहित्य :- प्रत्येकी एक चमचा धनेपूड, जिरे पूड , तेल किंवा बटर, कांदा मसाला किंवा गरम मसाला, चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा पिठीसाखर, दोन-तीन चमचे तीळ, सहा पोळ्यांची कणीक (नेहमीचच) .

    कृती :- १) कणकेचा एक गोळा घेऊन पिठीवर फुलक्याएवढी पोळी लाटावी .
    २) मग नेहमीप्रमाणे तेल वा बटर लावावं . तीळ सोडून इतर सर्व मसाले एकत्र कालवावे .
    ३) त्यापैकी एक चमचा मसाला लाटलेल्या फुलक्यावर पसरावा व त्याची गुंडाळी करून चकलीप्रमाणे घट्ट वळवावी , दाबावी व पिठी आणि तिळावर जाडसर लाटावी . तेल सोडून हा पराठा खरपूस भाजावा . सॉसबरोबर वाढवा .