(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अभ्यंग स्नान

    भारतातील सण हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. अशीच एक परंपरा आहे उटणे लावणे. दीपावलीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटणे हे वनौषधींपासून बनवलेले असावे, असा संकेत आहे. दिवाळीच्या दिवसामध्ये भल्या पहाटे उठून अंगाला तेल लावून घातलेले स्नान म्हणजेच अभ्यंग स्नान होय.

    अभ्यंग स्नानासाठी जे सुवासिक तेल वापरले जाते ते केवळ सुवासिक न वापरता त्यासोबत कोमट तीळ तेलाने अभ्यंग करावा. शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यंग करताना सर्वागाला तेल लावून हलकेसे मालिश करणे आवश्यक असते. अभ्यंग करताना तो हातापायांच्या ठिकाणी खालून वरच्या दिशेने करावा तर सांध्याच्या व पोटाच्या ठिकाणी घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने गोलाकार करावा. आपल्याकडे फक्त दीपावलीच्या दिवसांमध्येच केला जातो. अनेक कुटुंबातील स्त्रिया सर्व घरातील सदस्यांना अभ्यंग करून स्नान घालतात; परंतु स्वत:साठी वेळ काढून अभ्यंग करीत नाहीत.

    अनेक जणींचा बाळंतपणानंतर अंगाला तेल लावून स्नान करणे एवढाच काय तो अभ्यंगाशी संबंध आलेला असतो. परंतु त्यामुळेच बऱ्याच स्त्रियांमध्ये नियमित अभ्यंग न झाल्याने वयाच्या तिशी-पस्तिशीनंतर कंबरदुखी, पाठदुखी, संधिवात, गुडघेदुखी, अंगदुखी अशा अनेक तक्रारी दिसून येतात. धावपळीच्या युगात बऱ्याचशा स्त्रिया डोक्यालादेखील तेल लावण्यास वेळ काढत नाही.

    त्यामुळे केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, केस व डोक्याची त्वचा रूक्ष होणे, केसांमध्ये कोंडा होणे अशा तक्रारी अनेक जणींमध्ये आढळतात. या तक्रारी दूर करण्यासाठी पौष्टिक आहाराबरोबरच आठवडय़ातून दोन वेळा डोक्याला तेल लावून हलकीशी मालिश करणे गरजेचे आहे.

    नियमित अभ्यंग केल्याने रोजच्या रोज होणारे शारीरिक श्रम दूर होतात. शरीराला बल मिळते. शरीरातील वाढलेल्या वायूचे शमन होऊन दृढता प्राप्त होते. त्वचेचा कोरडेपणा जाऊन त्वचा कांतियुक्त होते. अभ्यंगामुळे आजच्या आधुनिक काळात प्रवासामुळे व हवेतील प्रदूषणामुळे होणारा वात प्रकोप व त्वचेवरील दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात. नियमित अभ्यंग केल्याने भूक चांगली लागून मलबद्धतेचे विकार नाहीसे होतात. मानसिक थकवा दूर होऊन झोप चांगली लागते; मनाची एकाग्रता वाढून स्मरणशक्ती वाढते.

    एवढेच काय तर वृद्धत्व उशिरा येऊन चिरतारुण्य प्राप्त होते. म्हणून सर्वानीच दीपावलीच्या काळात तळपायापासून ते डोक्यापर्यंत सर्व अवयवांना अभ्यंग करावे व नंतरही आठवडय़ातून एकदा तरी सुटीच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे.

    अभ्यंगानंतर स्नान करताना सुगंधी उटणे लावण्याची प्रथा आहे. शरीराला लावलेले तेल त्वचेमध्ये जिरून शिल्लक राहिलेले जास्तीचे तेल किंवा त्वचेचा तेलकटपणा जावा व शरीरातील रक्ताभिसरण सुधारून हालचालीमधला सहजपणा व चपळपणा कायम राहून शरीराला सुगंध यावा. हा यामागे उद्देश असतो. जसे अभ्यंग करताना आपण तेल लावतो अगदी त्याच दिशेने व पद्धतीने उटणेही शरीराला लावावे.

    जाहिरातीमध्ये आकर्षक वाटलेला परंतु रासायनिक प्रक्रियेने तयार केलेला साबण या अभ्यंगाच्या वेळी लावू नये. त्यामुळे त्वचा जास्तच रूक्ष होते. म्हणून कुठलाही साबण लावू नये. अशा पद्धतीने अभ्यंग करून उटणे लावून नंतर सोसवेल अशा गरम पाण्याने केलेले स्नान शरीर स्वच्छ करून मनाला तरतरीतपणा, प्रसन्नता आणते व एकूणच शरीराचे सर्व आजार बरे होऊन दीर्घायुष्य प्राप्त होते.

    अभ्यंगासाठी तेल अभ्यंग करण्यासाठी कोमट तीळ तेल वापरावे किंवा आपल्या प्रकृतीनुसार व एखादी व्याधी असेल तर त्या व्याधीनुसार वेगवेगळी तेले तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वापरता येतात. उदाहरणार्थ वातशामक तेल, चंदन बलालाक्षादी तेल, सहचर तेल आदी.

    उटणे सहसा उटणे हे घरीच किंवा तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार वापरावे. बाजारात मिळणाऱ्या उटण्यांमध्ये अनेक वेळा चूर्णाची भेसळ झालेली दिसून येते.

    उटणे बनविण्याची कृती.
    साहित्य:- पाव किलो मसूर डाळ पीठ, २५ ग्रॅम आवळकाठी, २५ ग्रॅम सरीवा, २५ ग्रॅम वाळा, २५ ग्रॅम नागर मोथा, २५ ग्रॅम जेष्टमध, २५ ग्रॅम सुगंधी कचोरा, ५ ग्रॅम आंबेहळद, २५ ग्रॅम तुलसी पावडर, २५ ग्रॅम मंजीस्ट, ५ ग्रॅम कापूर. ( हे सर्व साहित्य कास्टा औषधीच्या दुकानात मिळते.)
    कृती : वरील सर्व साहित्य चांगले मिक्स करून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे.
    हे उटणे लावल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारून त्वचा कांतियुक्त होते.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      April 17, 2017


  • http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2017/05/p-2537-boondi-laddu.jpg

    बुंदीचे आयुर्वेदिक लाडू

    मुगाचे पीठ पाण्यात मिसळून मिश्रण छानएकजीव करून घ्यावे. कढई मध्ये तूप घेऊन ते तूप तापवावे. बुंदी काढून घ्यावी. तुपात चांगले तळल्यानंतर बुंदीच्या दाण्यांना कढईतून काढून साखरेच्या पाकात भिजवावे. नंतर सर्व बुंदीच्या दाण्यांना पाकातून काढून घ्यावे आणि त्यांचे छानपैकी लाडू बांधावे.

      May 10, 2017


  • गूळ, कणकेचे शंकरपाळे

    साहित्य- कणिक एक पाव, गूळ, तूप व वेलची पूड.
    कृती- कणीक व त्यात थोडे डाळीचे पीठ टाकावे. चवीला थोडे मीठ टाकावे. नंतर गुळाचे घट्ट पाणी तयार करावे. कणकेच्या निम्मे गूळ घ्यावा. कणकेत गरम तुपाचे मोहन घालावे व तूप कणकेला चांगले चोळावे. नंतर गुळाच्या पाण्याने कणिक घट्ट भिजवून ठेवावी. अध्र्या तासाने अंदाजाने गोळे तयार करावे, एकेका गोळ्याची पोळी लाटावी. पोळी जरा जाडसर असावी. नंतर कातणीने शंकरपाळे कापावे व तुपात मंदाग्नीवर तळावे. मंद तळल्याने शंकरपाळे खुसखशीत होतात. मुलांना डब्यात देण्यास चांगला पदार्थ आहे. खूपच चविष्ट लागतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      December 23, 2016


  • मेथीचे घावन

    साहित्य:- २ वाट्या ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी डाळीचे पीठ (बेसन), २ जुड्या मेथी, १ चमचे तिखट, २ चमचे मीठ, तेल.
    कृती:- दोन्ही पिठे तिखट व मीठ घालून पाणी घालून ३० मिनिटे भिजवून ठेवावी. मेथी धुवून बारीक चिरावी व त्यात घालावी. पाव चमचा सोडा घालावा. पीठ थलथलीत असू द्यावे. तव्यावर तेल सोडून धावन करावे. मेथीऐवजी कोथिंबीर किंवा कोबी किसूनही असेच घावन करता येतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 17, 2017


  • गार्डन सॅन्डविच

    गार्डन सॅन्डविच – Recipe

      September 11, 2026


  • क्रीम ऑफ टोमॅटो सूप

    साहित्य: ५-६ लाल टोमॅटो, अर्धा कप क्रीम, चवीपुरते मीठ, साखर, २ स्लाईस ब्रेड.

    कृती: वेळ: २० मिनिटे टोमॅटो न चिरता, पाणी न घालता कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. गार झाल्यावर हाताने त्याची साले काढून मिक्सरमध्ये एकजीव करावे. नंतर त्यात क्रीम घालून मिक्सर जरासाच फिरवावा. क्रीममुळे रंग छान येतो. एका भांड्यात हे मिश्रण न गाळता काढावे. त्यात मीठ, साखर घालून थोडे दाटसर राहील अशा बेताने पाणी घालावे. सूप वेळेवर चांगले गरम करावे. सूप उकळवू नये. ब्रेड स्लाईसच्या कडा काढून त्याचे चौकोनी तुकडे करावेत. हे तुकडे थोड्या तुपात तळून घ्यावेत. गरम सूप बाऊलमध्ये काढून वेळेवर ब्रेडचे तळलेले तुकडे आणि चिरलेली कोथिंबीर वरून पेरावी.

      September 10, 2026


  • p-958-Elaichi-biscuit

    इलायची बिस्किटस्‌

    तूप, साखर फेसावे. कणीक, बेकिंग पावडर चाळून मिसळावे. थोडं दूध वापरून हलक्याल हाताने, लाटून गोल किंवा चौकोनी कापावे. (लाटतानाच वेलदोड्याची पूड पेरा. म्हणजे नीट चिकटेल.) दहा-बारा मिनिटं मध्यम ओव्हनवर भाजावं. काश्मिूरी डोढा बर्फी साहित्य :- 1 कप कणीक, दीड कप खवा, दीड कप साखर, पाऊण कप दूध, पाऊण कप तूप, केशर, ड्रायफ्रूड, चिरून वर्ख इ. कृती :- तुपावर कणीक भाजावी. गार झाल्यावर दुधात कालवावी.

      March 6, 2017


  • p-1044-shevaya-upma

    शेवयाचा उपमा

    तेल न घालता शेवया कढईत थोड्या लालसर रंगावर भाजून घ्याव्यात. त्या बाजूला काढून ठेवून त्याच कढईत तेल तापवून घ्यावे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालावा. मोहरी थोडी तडतडली की त्यात उडीद डाळ घालून तांबूस रंगावर भाजू द्यावी. त्यातच मिरची घालावी.

      March 19, 2017


  • p-1157-methi-parathe

    मेथीचे पराठे

    साहित्य - मेथीची पाने - १ वाटी, बेसन / चणा डाळीचे पीठ - २ चमचे, वाटलेली हिरवी मिरची / लाल तिखट - चवीनुसार, मीठ - चवीनुसार
    तीळ - १ चमचा, हिंग - १/२ लहान चमचा, हळद - १ लहान चमचा, कणिक / गव्हाचे पीठ - १ १/२ वाटी.

    कृती - मेथीची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरावीत. त्यात मीठ, हिंग, हळद, मिरची पेस्ट / तिखट कालवावे. त्यात तीळ, बेसन आणि कणिक घालून गोळा मळून घ्यावा. हे पीठ थोडेसे चिकट होते त्यामुळे तेलाचा हात लावून छोटे गोळे बनवावेत आणि कणिक अथवा तांदळाच्या पिठावर लाटावेत. तेल, तूप, लोणी किंवा वनस्पती तुपावर खरपूस भाजावेत. सोबत घट्ट दही किंचित मीठ आणि तिखट भुरभुरून वाढावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      April 17, 2017


  • साबुदाणा चकली

    सर्वसाधरणपणे उपवास म्हटले की डोळ्यासमोर येतात ते पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर, बटाट्याचा किस वगैरे. मात्र उपवासाच्या पदार्थातही साठवणीचे अनेक पदार्थ आहेत. यातीलच एक म्हणजे साबुदाण्याची चकली. एकदा बनवून ठेवून जेव्हा हव्या तेव्हा तळून किंवा मायक्रोवेव्ह ओवनमध्ये भाजून घेतलेल्या या चकल्या बहारदारच.

      November 19, 2015