महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुनही करता येते.
November 9, 2016
एका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस किंवा सायट्रीक अॅलसिड आणि दालचिनी पूड एकत्र करा. सफरचंदाचा मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा. ते वरील पाण्यातच किसा. आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल.
April 29, 2017
साहित्य:
सारणासाठी: १ वाटी हिरवी मूगाची डाळ,१ चमचा आले पेस्ट,३ हिरव्या मिरच्या/ लाल तिखट, १ चमचा आमचूर पावडर, १ चमचा बडीशेप
१ चमचा गरम मसाला, दिड चमचा साखर, हिंग, हळद, कढीपत्ता, तेल, मीठ.
आवरणासाठी: २ वाट्या गव्हाचे पिठ,३-४ चमचे तेल,पिठ भिजवण्यासाठी पाणी,चवीपुरते मीठ,तळण्यासाठी तेल.
कृती:
१) मूग डाळ ४-५ तास भिजत ठेवावी. भिजवलेली मूगडाळ जाड बुडाच्या पातेल्यात घेऊन १ वाटी पाण्यात उकळवावी. उकळवताना गॅस मध्यम असावा आणि पातेल्यावर झाकण ठेवावे. मूगडाळ अगदी नरम शिजवू नये. सर्व पाणी निघून जाऊ द्यावे. नंतर मूगडाळ थोडी चेचून घ्यावी.
२) गव्हाचे पिठाची कणिक भिजवावी. अगदी घट्ट किंवा अगदी सैल भिजवू नये. कणिक झाकून ठेवावी.
३) कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात हिंग, हळद, आले पेस्ट, मिरच्या/लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यानंतर मूगडाळ, गरम मसाला, बडीशेप, आमचूर पावडर, मीठ, साखर घालून ढवळावे. सारण थंड होवू द्यावे. हाताने एकत्र करावे म्हणजे ते मिळून येईल.
४) कणकेचे दोन-दोन इंचाचे गोळे करावे. गोल पुरीसारखे लाटावे. पुरी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने त्यात एक चमचा सारण घालावे आणि सर्व कडा एकत्र आणून व्यवस्थित बंद करावे. हे करत असतानाच तळणासाठी कढईत तेल गरम करत ठेवावे. मिडीयम हाय हिटवर कचोर्या गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळून काढाव्यात. या कचोर्या गरम असतानाच खाव्यात. थंड झाल्यावर चव फार चांगली लागत नाही.
या कचोर्या कोथिंबीर-पुदीना मिरचीच्या चटणीबरोबर किंवा चिंच खजूराच्या चटणीबरोबर अगदी झकास लागतात.
टीप:
१) गरम मसाल्याबरोबर २ चमचे गोडा मसाला (काळा मसाला) वापरल्यास चव छान येते.
२) आवडत असल्यास सारण परतताना काळ्या मनुका किंवा बेदाणे घालू शकतो.
August 7, 2018
ग्लुकोज बिस्कीट जाडसर कुटून घ्यावे. त्यात लोणी गरम करून टाकावे. आता कुटलेले ड्रायफ्रूट्स, मध आणि चॉकलेट सॉस एकत्र करून त्यात टाकावे.
June 12, 2017
मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाहीतरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो
November 9, 2016
साहित्य : अर्धा किलो मोठी कोलंबी (झिंगे), २ कांदे, २ चहाचे चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, ४ टे. स्पून तेल, एक मोठ्या लिंबा एवढी चिंच, अर्धी वाटी किसलेले, भाजलेले सुखे खोबरे, १ मोठा कांदा, उभा चिरुन तेलात परतलेला, ७-८ लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ चमचा मीठ वाटण नं. १: लसूण, कोथिंबीर चाटण नं. २: कोलंबीचे पाय (लहान नांगडे) वाटून गाळून त्याचा रस चाटण नं. ३: तळलेला उभा कांदा, भाजलेले सुखे खोबरे घ्यावी.
कृती : प्रथम कोलंबी साफ करुन (कवच काढणे) पाय तोडून वाटून ठेवणे. कोलंबीला वाटण नं. १ चोळून लावणे. त्याला हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ लावणे. एका भांड्यात तेल टाकून तापवणे. त्यात २ चिमूट हिंग टाकणे, नंतर त्यात खूप बारीक चिरलेला कांदा टाकणे. कांदा ब्राऊन झाल्यावर त्यामध्ये मसाला लावलेली कोळंबी चांगली घालून सवताळून चाटण नं. २ घालून परतत रहावी. मधून मधून चिंचेच्या कोळाचे पाणी घालून सवताळत रहावी. झाकण ठेवू नये. मंद आंचेवर झिजत ठेवावी. शिजल्यावर वाटण नं. ३ (तळलेला मसाला) व गरम मसाला टाकावा. पांच मिनिटे उकळी येऊ द्यावी. गॅस बंद करावा. उतरल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- सौ. दिप्ती देशपांडे
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
साहित्य : पाव किलो वाल, १ चमच लाल तिखट, मीठ चवीनुसार, मोठ्या लिंबाएवढा गूळ, २ चमचे थोडा मसाला, १ वाटी ओले खोबरे, कोथिंबीर, २ पळ्या तेल, फोडणीचे साहित्य.
कृती : तेलाच्या फोडणीत मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून मोड आलेले वाल घालून ते चांगले परतावे. नंतर त्यात २ भांडी पाणी घालून उकळावे. वाल अर्धवट शिजल्यावर त्यात लाल तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ घालावा. ही उसळ शिजतानाच ओले खोबरे घालावे. उसळ खाली उतरल्यावर कोथिंबीर घालावी.
टीप : उसळ जर प्रेशर पॅनमध्ये केली तर पाणी २ भांडे घालावे. कारण त्यातील पाणी तेवढे आटत नाही. प्रेशर पॅनमध्ये १ शिटी झाली की उसळ उतरावी.
August 22, 2018
साहित्य : एक वाटी मटार, एक वाटी ओल्या खोबऱ्याचा चव, पाव वाटी कोथिंबीर, दोन चमचे आले-मिरची पेस्ट, सहा उकडलेले बटाटे, तीन चमचे कॉर्नफ्लोअर, लिंबूरस, मीठ, साखर चवीनुसार.
कृती : कढईत तेल गरम करून त्यात मटार परतून घ्या. खोबऱ्याचा चव, मीठ, साखर, हिरवी मिरचीची पेस्ट, लिंबूरस घालून पुन्हा परता; मात्र मटार जास्त कडक होता कामा नयेत. त्यात किसलेले चीज घाला व पुन्हा थोडेसे परता. गॅस बंद करा. बटाटे उकडून घ्या. त्यात मीठ व कॉर्नफ्लोअर घालून मळून गोळा तयार करा. त्यात मटार-चीजचे सारण भरा. पारीचे तोंड बंद करून त्याला चपटा आकार देऊन गरम तेलात तळा. सॉसबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
December 26, 2016
वांगे चांगले धुवून घ्या. त्याच्या गोल चकत्या कापा. त्यांना मीठ लावून ठेवा. अर्ध्या तासाने पिळून घ्या. त्या चकत्यांना आलं-मिरचीचे वाटण लावा. या चकत्या तेलात खमंग तळा. एका भांड्यात दही फेटून घ्या. त्यात मीठ व लसणाच्या पाकळ्या वाटून घाला. तेल गरम करा. त्यात तळलेले वांग्याचे काप घाला व त्यावर वरील दह्याची फोडणी घाला. वरुन थोडी मिरपूड भुरभुरवा. अशाप्रकारे चटपटीत आणि चवदार असा बैंगन रायता तैयार.
April 30, 2016
मैदा आणि तूप मिसळून घ्या. त्यात पाणी मिसळून मळून घ्या. एका भांडय़ात तूप घाला. ते गरम करा. त्यात खोवलेला नारळ घालून तो चांगला परतून घ्या. तो बाहेर काढून ठेवा आणि त्याच भांडय़ात रवा परतून घ्या. रव्यात साखर, नारळ, वेलदोडे आणि सुका मेवा मिसळा. आता मळलेल्या मैद्याच्या लहान लहान पुऱ्या करून घ्या. त्यात खोबऱ्याचे मिश्रण भरा. त्या करंज्यासारख्या आकार द्या. तळा आणि गरम गरम खायला द्या.
March 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti