महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
(चकलीची भाजणीचे प्रमाण हे एक जनरल कृती दिली आहे.आपले सभासद सुगरण आहेत.आपल्या चवी प्रमाणे थोडे बदल करुन घ्यावेत.)
चकली म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. दिवाळी ला तर हमखास सगळ्यांच्या घरी चकली केली जाते.
चकली भाजणी पद्धत १
साहित्य:- भाजणीसाठी एक किलो तांदूळ, अर्धा किलो मूगडाळ, पाव किलो उडीद डाळ व पाव किलो हरबरा डाळ, धने १०० ग्रॅम, २५ ग्रॅ. जिरे.
कृती-तांदूळ धुवून घ्यावे. सुकल्यावर गुलाबी रंगावर भाजावे. त्याचा रूचकर वास यावा. तसेच डाळी स्वतंत्र भाजून घ्याव्यात. त्यात धने १०० ग्रॅम, २५ ग्रॅ. जिरे खमंग भाजून मिसळावे. अशी एकत्रित भाजणी दळून आणावी.
चकली भाजणी पद्धत २
साहित्य- ४ वाटय़ा तांदूळ, २ वाटय़ा हरभरा डाळ, १ वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी धने, पाव वाटी जिरे, कृती- धान्ये धुवून भाजावी. त्यात धने, जिरेही घालावे. गार झाल्यावर भाजणी दळून आणावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चकलीचे प्रकार
चकली
साहित्य:- ५ भांडी चकलीची भाजणी, ३ भांडी पाणी, ५ टीस्पून घरचं लोणी किंवा तेल, २-३ टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, २ टेबलस्पून तीळ, १-२ टीस्पून ओवा, मीठ चवीनुसार. तळण्यासाठी तेल.
कृती:- एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. पाण्याला खळखळून उकळी आली की त्यात लोणी किंवा तेल, तिखट, मीठ, हळद, तीळ आणि ओवा घाला. गॅस बंद करा. आता त्यात भाजणी घाला आणि चमच्यानं एकत्र करून घ्या. गरम असताना नीट एकत्र होणार नाही तेव्हा जसं जमेल तसं एकत्र करा. झाकून ठेवून द्या. २-३ तासांनी किंवा पीठ थंड झाल्यावर ते परातीत काढून घ्या. चांगलं मळून घ्या. मळताना लागेल तसं साधं पाणी घाला. चकलीचं पीठ भाकरीच्या पिठापेक्षा जरासं घट्ट हवं.
मळलेलं पीठ चकलीच्या सो-यात घाला. चकल्या पाडा. कढईत तेल कडकडीत गरम करा. नंतर आच मध्यम ठेवा. चकल्या लाल रंगावर तळा. तेलाचं तापमान सतत एकसारखं राह्यला हवं. म्हणून तेल जरा थंड झालंय असं वाटलं तर आच वाढवा. पण गरम झाल्यावर परत मध्यम ठेवा. चकल्या फार लाल करू नका.
टिप्स:-चकल्यांना हळद कमीच घालावी म्हणजे रंग छान येतो. मसाल्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
April 17, 2017
साहित्य : २ मोठे राजस्थानी उडीद पापड, १ बारीक चिरलेला कांदा, २ बारीक कापलेले लाल भडक टोमॅटो, दोन चमचे भरून धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, लहान अर्धा चमचा लाल तिखट, थोडेसे अमूल बटर.
कृती : यात पापड भाजून घेण्यासाठी तुम्हाला कुणाची तरी मदत घ्यावी लागेल. थोडया गरम पाण्यात अमूल बटर घातलेली वाटी ठेवा म्हणजे ते विरघळेल व पातळ होईल. आता थोडे बटर घेऊन पापडाच्या एका बाजूला हाताने नीट पसरवून लावा. पापड एका प्लेटमध्ये ठेवा व बटर लावलेली बाजू वरच्या बाजूला येईल असे पहा. पापडावर थोडा कांदा, टोमॅटो व कोथिंबीर सगळीकडे पसरून घाला. सर्वात शेवटी वरून लाल तिखट व मीठ टाका, झाला मसाला पापड खायला तयार.
August 3, 2018
साहित्य:- शेवग्याची कोवळी पाने (साधारण एक जुडी होईल एवढा पाला), मुगाची डाळ अर्धी वाटी, कांदा एक, हिरव्या मिरच्या तीन-चार, लसूण पाकळ्या चार-पाच, तेल, चवीपुरतं मीठ, हिंग फोडणी साठी, ओलं खोबरं.
कृती:- मुग डाळ एक तास आधी धुवून भिजत ठेवावी व नंतर निथळून घ्यावी. शेवग्याची कोवळी पाने निवडून स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर बारीक चिरावित. एका कढईत तेल घेउन त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. कांदा बारीक चिरून फोडणीत घालावा व परतून घ्यावा. नंतर लसूण पाकळ्या, मिरची घालून परताव्यात. ते खमंग परतल्यावर त्यात डाळ घालावी व डाळ जराशी परतल्यावर त्यात चिरलेली भाजी घालावी मीठ घालून झाकण ठेवून मोकळी शिजू दयावी .
झाकण ठेवून वाफेवर शिजवावी. जरूर पडल्यासच पाणी घालावे. एक वाफ येउन गेल्यावर चविनूसार मीठ घालावे व पुन्हा परतून झाकण ठेवावे.. भाजी पूर्ण शिजल्यावर ओले खोबरे घालावे व भाजी गँसवरून उतरवून घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 16, 2017
साहित्य:- अगस्ताची कोवळी पानं, फुलांच्या पाकळय़ा, हरभऱ्याचं भाजलेलं पीठ, लाल तिखट, हळद, धणेपूड, ओवा, हिंग. भजी तळण्यासाठी तेल.
कृती:- अगस्ताची कोवळी पानं आणि फुलांच्या पाकळय़ा निवडून स्वच्छ धुऊन, चिरून त्यांना मीठ लावून ठेवावं. मीठ लावल्यावर पंधरा मिनिटांनी त्यात लाल तिखट, हळद, धणेपूड, ओवा, हिंग असं साहित्य घालावं. नंतर त्यात मावेल इतकंच पीठ घालावं. पानांना आणि फुलांना सुटलेल्या पाण्यातच पीठ कालवावं. गरज पडेल तर पुन्हा एकदा लाल तिखट अॅडड करावं. मिश्रण एकत्र करून लहान गोळे करून तेलात तळावेत.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
January 17, 2017
साहित्य : १ मोठे लिंबू, पाच चहाचे चमचे भरून साखर, अर्धा चहाचा चमचा मीठ, चिमूटभर जिरे पावडर, दोन ग्लासभर थंड पाणी, बर्फाचे ४-५ तुकडे.
कृती : लिंबू हाताने स्वयंपाकाच्या ओट्यावर गोलगोल फिरवून हाताने दाबून मऊ करावे म्हणजे त्याचा रस काढणे सोपे जाते. मग सुरीने त्याचे दोन तुकडे करून एका स्टीलच्या पातेल्यात फोडींचा रस पिळावा. त्यातील बिया काढून टाकाव्यात, त्यात साखर, मीठ व जिरेपूड घालून आधी थोडेसे पाणी घालून ते ढवळावे साखर विरघळेपर्यंत हलवावे, ग्लासात ओतावे आणि वर बर्फाचे खडे टाकून हे सरबत द्यावे.
August 3, 2018
धान्यफराळ म्हणून भाजलेल्या धान्याचे पदार्थ केले जातात. अशा वेळी या भाजणीचा उपयोग करता येतो. ही भाजणी वापरून खमंग पदार्थ तयार करता येतात.
March 7, 2017
उकडलेले ओले हरबरे (सोलाणे) – Recipe
September 11, 2026
साहित्य - 2 वाट्या रात्रभर भिजवून सकाळी शिजवून घेतलेला लाल राजमा, 1 कांदा बारीक चिरून, 5-6 लसूण पाकळ्या बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, अर्धी वाटी टोमॅटो प्युरी (अथवा 2 मोठे टोमॅटो गरम पाण्यात अर्धा मिनीट ठेवून बाहेर काढावेत, म्हणजे त्याची साले निघतील. साले काढून टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.), अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ व थोडी साखर, थोडे तेल.
भाज्या बनविण्यासाठी - फ्लॉवर, राजमा, गाजर, बेबी कॉर्न, मशरूम यांचे तुकडे दोन वाट्या शिजवून घ्यावे. 1 कांदा, एक सिमला मिरची बारीक चिरावी. मीठ, मीरपूड तसेच 1 मोठा चमचा बटर घ्यावे. टोबॅस्को अथवा चिली सॉस एक चमचा घ्यावा.
व्हाइट चटणीसाठी - 1 चमचा लोणी, 2 मोठे चमचे मैदा किंवा कणीक, 1 ते दीड कप दूध, मीठ, मीरपूड, 1 वाटी किसलेले चीज.
कृती - प्रथम एका पातेल्यात थोडे तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण, हिरव्या मिरच्यांचे तुकडे सर्व परतून घ्यावे. त्यात टोमॅटोची प्युरी घालून नीट ढवळावे. नंतर त्यात जिरेपूड, मीठ, साखर घालून त्यात शिजवलेला लाल राजमा घालून हे मिश्रण तयार करून ठेवावे.
दुसऱ्या पातेल्यात लोणी वितळवून त्यात कांदा व सिमला मिरची परतून घ्यावी. त्यात शिजवलेल्या सर्व भाज्या, मीठ, मीरपूड घालावे. थोडा सॉस मिसळावा. नंतर व्हाईट सॉस बनवून घ्यावा. त्यासाठी 1 चमचा लोण्यात मैदा किंवा कणीक परतून घ्यावी. त्यात दूध घालून सतत ढवळावे, नाही तर गुठळ्या होतील. लागल्यास दूध आणखी थोडे घालावे. चवीनुसार मीठ व मीरपूड घालावी. बेकिंग डिशमध्ये थोडे लोणी सगळीकडे पसरून लावावे. प्रथम तयार केलेल्यालाल राजम्याचा थर पसरावा. त्यावर तयार केलेल्या भाज्या घालाव्यात. त्यावर व्हाइट सॉस घालून सगळीकडे नीट पसरावे. शेवटी त्यावर किसलेले चीज पसरून ओव्हनमध्ये 12 ते 15 मिनिटे बेक करून घ्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
March 3, 2018
साहित्य: १ लहान जुडी पालक, १ लहान बटाटा, अर्धा कप कॉर्न दाणे, २ लसूण पाकळ्या, लहान पाव कप दूध, मीठ आणि मिरपूड चवीनुसार
कृती: पालक, बटाटा आणि कॉर्न दाणे एकत्र करून कपभर पाणी घालून कुकरला शिजवून घ्या. पाण्यासकट थंड करा आणि मिक्सरला वाटून घ्या. गाळू नका. त्यात दूध घालून मंद आचेवर उकळा. मीठ-मिरपूड घाला.
September 1, 2018

March 27, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti